Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil) header
Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil) profile picture

1+2+3+4+....∞ = -1/12

कोल्हापूर , मुंबई , वेंगुर्ला
Joined July 2020
Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)Photo by Shubham Patil (कोल्हापूर) (@PositivePatil)
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
It is heartwarming to see so many people come together with one simple thought: to bring a smile to a little girl's face. ❤️ Over the past few days, many people reached out to us, asking if we could connect them with the family of the six-year-old girl from Panchkula. They wanted to send her something or support her in their own little way. And they did. Some contributed funds that her parents can use towards her future needs, while others sent dresses, books, toys and little surprises. Some gifts have already reached her, and more are on their way. Each contribution and every gift reflects the thought and care behind this gesture. A heartfelt thank you to everyone who came forward and made this possible: @somenmishra0 | @anandagarwaal | @PositivePatil | @ArunimaSharma84 | Sayan Banerjee | @baewaqufiya | @bhargabbanerje1 | @parul_bhatti | @jo_olore | @shrupidity | @md_anas_sheikh and all the anonymous donors. A special thank you to @somenmishra0 for initiating this effort, and to @mohitgupta1962 for connecting us with the family. We are glad to have been able to bring everyone together and play a small part in this effort. #IndiaCares
Is there a way to send gifts/toys to the girl child? So that she knows there's love, compassion, kindness in the world too. That hate/violence god knows how traumastic it can be. Scary that was. Any journo/NGO who can help, we can all send whatever we want.
8
20
3
53
2,144
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं ! सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे ! राज ठाकरे ।
255
1,721
40
8,271
211,688
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Update - पंचकूला के सरकारी स्कूल में K.G क्लास की बच्ची के साथ हुए घटनाक्रम के बाद बेटी पहुंची सकुशल घर! घर पर पहुंचते ही बेटी का हुआ जोरदार स्वागत! मासूम की मुस्कान और परिवार की खुशी ने सभी को भावुक कर दिया। ❤️ #Panchkula #PanchkulaNews #HaryanaNews #SchoolIncident #Child
Update- #पंचकूला स्कूल हादसा: आखिरकार अस्पताल से घर लौटी 6 साल की मासूम! PGI चंडीगढ़ से छुट्टी मिलने के बाद मासूम अपने घर के लिए रवाना हुई। इस भावुक पल ने हर किसी की आंखें नम कर दीं। मासूम के जल्द पूरी तरह स्वस्थ होने और खुशहाल जीवन की कामना। ❤️ #Panchkula #PanchkulaNews #PGI
113
448
44
3,234
231,169
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Is there a way to send gifts/toys to the girl child? So that she knows there's love, compassion, kindness in the world too. That hate/violence god knows how traumastic it can be. Scary that was. Any journo/NGO who can help, we can all send whatever we want.
42
227
17
1,719
66,200
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
आज डॅा. नरेंद्र दाभोलकरांचा जन्मदिन. अभिवादन.
12
120
1
1,072
13,709
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
विवेक, विज्ञान आणि मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राज्यघटनेला अपेक्षित असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवून विवेकशील, समताधिष्ठित आणि पुरोगामी समाज घडवणे, हाच त्यांच्या विचारांचा खरा वारसा आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा निर्धार करूया. विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्या या पुरोगामी विचारवंताला विनम्र अभिवादन! #DrNarendraDabholkar #NarendraDabholkar #ScientificTemper
2
40
2
233
5,106
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
सत्ताधाऱ्यांचा माज कसा जिरवायचा असतो असा प्रश्न जेव्हा जेव्हा पडेल, तेव्हा तेव्हा "गोकुळ" आठवेल.. @satejp जी - मनःपूर्वक अभिनंदन साहेब!
3
69
590
4,572
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
विद्यानंद बापट यांच्या मताशी मी एक नागरिक म्हणून सहमत आहे! आणि आपण ?
65
206
10
1,540
22,627
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Sunday Wisdom!"अती घाई-संकटात नेई" याचा प्रत्यय #MPSC च्या संदर्भात खालील घटनांमधून. •वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक मुख्य परीक्षेची शिफारस जून २०२२ मधे स्विकारत तत्संबंधित जुलै २०२२ च्या घोषणेत सुधारीत योजना लगेच मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय.तयारीसाठी पुरेसा अवधी न दिल्याने परीक्षार्थींचे पुण्यात मोठे आंदोलन व निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षे पुढे ढकलणे क्रमप्राप्त. •जुलै २०२६ मधील गट क च्या जाहीरातीत पूूर्व परीक्षेेचे निर्धारीत धोरण बदलत ती ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्याचा निर्णय थेेट जाहीरातीतून घोषित.विद्यार्थ्यांंचे पुन्हा आंदोलन,शासनाचा हस्तक्षेप व निर्णयाची अंमलबजावणी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची पाळी. •गैरप्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अन्य पर्यायांची चाचपणी न करता दि.१३ मे २०२६ रोजी 'ऑप्टींग आऊटचा' पर्याय रद्द करत बहुुसंंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही सुतोवाच त्याच परिपत्रकात.उप निबंधक/कर निरीक्षक इ. संवर्गात बर्‍याच उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने व पदपसंंतीचा पर्याय न दिल्याने (प्रतिक्षा यादी अभावी पदे रिक्त राहूनही संधी गमावण्याच्या भितीने) उमेदवारांत असंतोष.प्रसार माध्यमे व समाज माध्यमांतून याची दखल.परिणामी रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतून शिफारस करण्याचे नंंतर स्पष्टीकरण देण्याची आयोगावर वेळ. •औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पुरेशी चौकशी न करता वा संयम न बाळगता लगेच गैरप्रकार न झाल्याचा निर्वाळा देणारे पत्रक व त्यात तक्रार खोटी निघाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याबाबत फौजदारी कार्यवाहीची तंबी. मात्र शेवटी पेपरफुटी झाल्याची कबुली नि आयोगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अटकेने तोंडघशी पडण्याची नामुष्की. तात्पर्य आयोगाची तत्परता स्वागतार्ह मात्र परिक्षार्थ्यांच्या भवितव्याला प्रभावीत करणारे निर्णय व तत्संंबधीत घोषणां ह्याचा ताळमेळ बसवतांना परिणामांचा दूरगामी व सांगोपांग विचार करणे आयोगाच्या प्रतिमेेच्या दृष्टीने हितावह!
44
275
6
485
16,041
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Mass resignation campaign has begun. All of us should follow. #5daysbanking
1
32
73
3,390
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
We have around eight lakhs employees in all public sector banks. All of them are not union members. Let’s assume only five lakhs are members of different unions. The average monthly union fund deduction is Rs. 150/- per employee. That makes the monthly income of Rs. 75000000/- Average Annual income of Rs. 900000000/- THINK OF THE AMOUNT INVOLVED And you think they will leave the leadership position so easily and let the young generation lead? #5daysbanking
2
26
1
125
8,695
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
It is being reported that the ED conducted a raid at the premises of the representatives of the Bank Unions. In view of the prevailing pressure and circumstances, the proposed strike has reportedly been deferred/compromised. This message is circulated by UFBU leaders My only simple ❓ ❓ ❓ why are they afraid of an ED raid? If they are honest and have nothing to hide what will they find in the raid . And ED is related to FEMA and money laundering! If they are involved, what kind of representatives ???? Anyone has authentic news regarding this? #5daysbanking
5
41
1
170
17,122
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Replying to @UFBUIndia
@UFBUIndia There is only one question to you. Release the complete (hidden) MOU document signed with IBA at Midnight Yesterday. Why are you so afraid?
6
69
225
8,078
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
SBI Employees
18
245
3
1,817
140,519
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची आज जयंती. आज समाज अती उत्सवप्रिय आणि गोंगाटप्रिय झालेला असताना आणि धर्माच्या नावाखाली कुठल्याही अंधश्रध्दांना श्रद्धा म्हणायचं आणि त्यावर कोणी तार्किक प्रश्न विचारला की त्याला लगेचच हिंदू विरोधी ठरवायचं अशा काळात आमच्या आजोबांची आठवण जास्तच प्रकर्षाने येते. राजकारण्यांनी खरं तर समाज हा कुप्रथांमध्ये अडकत असेल आणि वाहवत जात असेल तर समाजाला थांबवायला हवं. पण सध्या चित्र उलटंच दिसतंय, स्वतःच्या मतांच्या लाचारीसाठी संधी दिसेल तिकडे झुकायला राजकारणी तयार होत आहेत. आज आमचे आजोबा असते तर त्यांनी या सगळ्यांवर लेखणीचे आसूड कसे ओढले असते हा विचार अनेकदा मनात येतो. असो. महाराष्ट्राला प्रबोधनाची वाट संतांपासून ते समाजसुधारकांपासून अनेकांनी दाखवली. त्यावर महाराष्ट्र अनेक शतकं चालत आला म्हणून आजचा महाराष्ट्र दिसतोय. महाराष्ट्राकडे कुठल्याही गोष्टीकडे तर्काने बघण्याची जी एक मोठी शक्ती होती आणि आजही आहे, तिचा कधीही लोप होऊ नये हीच इच्छा. आणि ती शक्ती वृद्धिंगत होत राहणे हीच आमच्या आजोबांना खरी श्रद्धांजली ठरेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. राज ठाकरे ।
149
441
23
3,495
85,692
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
ह्या मराठ्यामुळे आज ह्या हिंदुस्थानात हिंदू शाबूत आहेत. नाही तर उत्तरे कड़चे बायका पुढे करुन पळून गेले होते हा इतिहास लोक विसरली नाहीत. आजवर सर्वा साठी लढणारा मराठा त्यांच्या दुलक्षित समाज बांधवा साठी मुंबईत आलेत तर ह्या हरामखोराच काय अडलय? #hindustanibhau
27
93
734
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
मराठी बांधवांनो महाराष्ट्रात मराठीची गळचेपी उघड्या डोळ्यांनी पाहू नका. महाराष्ट्रात मराठीतच बोला, पहा, वाचा, व्यवहार करा. अनेक भाषा शिका पण मराठीच स्थान किंचतही कमी होवू देवू नका. #महाराष्ट्रात_मराठीच #महाराष्ट्र 🚩
5
11
121
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
"हनुमानअंश"चे यश चिंताजनक आहे कारण ह्यामुळे आपली लोकं पुन्हा "बुवा", "बाबा" यामध्ये अडकणार अंधश्रद्धेला खतपाणी मिळणार,ती फोफावणार व २९ साली लोकांना पुन्हा धर्मासाठी मत द्यायला बाध्य करणार रेल्वे थांबवणे, जिभेवर रोप उगवणे,गुहेत साप गळ्याभोवती गुंडाळून बसणे, अंधश्रद्धा प्रेरक आहे
12
27
1
235
9,945
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
“कोल्ह्याला द्राक्ष आंबट” 😜 (हलके फुलके) सध्याच्या पेपरफुटीच्या प्रकरणावर आणि एमपीएससीपुढील अन्य प्रश्नांवर तोडगा म्हणून माझी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी जाहीर मागणी आमदार श्री @RRPSpeaks यांनी केली आहे. त्यांच्या सद्भावनेबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. तथापि, माझे वय त्या पदासाठी निर्धारित केलेल्या पात्रतेच्या चौकटीत बसत नसल्यामुळे तशी नियुक्ती होणे शक्य नाही. अर्थात, वयाची अट आड आली नसती, तरीही मी हे पद स्वीकारले नसते. कारण, प्रशासनात ३४ वर्षे काढल्यानंतर पुन्हा कोणतेही शासकीय पद स्वीकारणार नाही, असे मी २०१८ मध्ये निवृत्तीनंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे जाहीर केले होते. आजही मी त्या निर्णयावर ठाम आहे. माझे व्यक्तिगत तत्त्व असे आहे की, अधिकाऱ्यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद स्वीकारू नये. कारण निवृत्तीनंतर एखाद्या पदाची अपेक्षा मनात बाळगली, की सेवाकाळातील निर्णयांवर त्या अपेक्षेची सावली पडण्याचा धोका निर्माण होतो. मग सेवेत असतानाच राजकीय लांगूलचालन करणे, सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे निर्णय घेणे आणि त्या ‘गुंतवणुकीचा’ लाभ निवृत्तीनंतर एखाद्या पदाच्या रूपाने वसूल करणे—असे एक सर्वपरिचित गणित तयार होते. अर्थात, या नियमाला सन्माननीय अपवाद आहेत; पण अपवादांनीच नियमाचे अस्तित्व अधोरेखित होत असते. शासन आणि न्याय व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतर पुन्हा नियुक्ती देवू नये असा पत्रव्यवहार मी शासनाकडे यापूर्वीच केला आहे. मी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय पद स्वीकारणार नाही हा माझा निर्णय होता हे मात्र अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य थोडे अधिक मनोरंजक आहे. माझ्यासारख्या अधिकाऱ्याला शासनव्यवस्थेने तब्बल ३४ वर्षे सहन केले, हीच मुळात त्या व्यवस्थेच्या सहनशीलतेची परिसीमा म्हणावी लागेल. त्या अफाट सहनशीलतेला माझा मनःपूर्वक सलाम! मी ज्या-ज्या पदावर काम केले, त्या प्रत्येक ठिकाणी रुजू झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्याच आठवड्यात अंतर्गत यंत्रणा आणि स्थानिक राजकीय नेतृत्वाच्या मनात एकच उत्कट भावना निर्माण होत असे—“ही ब्याद येथून कधी जाते?” त्यांच्या दुर्दैवाने, मी त्या भावनेचा आदर करून तत्काळ बदली झाली तर जे सामाजिक वजन, प्रतिष्ठा प्राप्त होते त्या वजनापासून आणि प्रतिष्ठेपासून वंचित राहण्याकडे माझा कल असे; आणि मग उलट, जे करणे कायद्याने आणि लोकहितासाठी आवश्यक असे, ते मी अधिक ठामपणे, अधिक वेगाने आणि अगदी ठासून करीत असे. या पार्श्वभूमीवर, माझ्या निवृत्तीनंतर ३४ वर्षांनी का होईना “ही ब्याद अखेर एकदाची गेली!” असा सुटकेचा निःश्वास व्यवस्थेने सोडला असण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे माझी इच्छा असती, तरी मला पुन्हा एखाद्या शासकीय पदावर नेमण्याची चूक शासनाने केली असती, असे वाटत नाही. हा प्रकार “कोल्ह्याला द्राक्ष आंबट” या म्हणीप्राणे असून हेच पूर्ण सत्य होय!(अर्थात, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नेमलेल्या एका आयोगावर मला नाइलाजाने तीन महिने काम करावे लागले होते. त्या कामाचे संपूर्ण मानधन मी एका संस्थेला देऊन टाकले. शासनव्यवस्थेलाही विनोदबुद्धी असते—आणि ती अनेकदा अनपेक्षित ठिकाणी प्रकट होते. या कामासाठी झालेला माझा निवास आणि प्रवासखर्चही शासनाने दिला नाही; मात्र त्याच वेळी आयोगावर कोट्यवधी रुपयांचा अनावश्यक खर्च करण्यास कोणतीही कंजुषी दाखवली नाही. काटकसर आणि उधळपट्टी यांचा असा मोहक समन्वय केवळ शासनच साधू शकते!) एमपीएससीच्या कार्यक्षमतेबाबत मात्र मी अत्यंत संवेदनशील आहे. लोकशाहीची गुणवत्ता, राज्याचे सार्वभौमत्व आणि प्रशासनाची भावी क्षमता यांचा या संस्थेशी थेट संबंध आहे. म्हणूनच, सुरुवातीपासून मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला लोकशाहीचा आणखी एक महत्त्वाचा आधारस्तंभ मानत आलो आहे. आयोगाची स्वायत्तता, विश्वासार्हता आणि परीक्षा प्रक्रियेचे पावित्र्य यांविषयी मी वर्तमानपत्रांतून वारंवार लिहिले आहे. शासनाशी पत्रव्यवहार केला आहे. उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ दिला आहे. लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही तो करीत राहीन. एमपीएससीच्या अध्यक्षपदावर बसणे मला शक्य नाही; परंतु आयोगाच्या शुचितेसाठी, स्वायत्ततेसाठी आणि लाखो उमेदवारांच्या न्याय्य भवितव्यासाठी आवाज उठविण्यास कोणतीही वयोमर्यादा नाही. तो आवाज मी शक्य तितक्या स्पष्टपणे उठवीत राहीन. आता राज्यात एमपीएससी उमेदवारांचे जे आंदोलन सुरू आहे त्यावर तातडीने निर्णय व्हावा ही अपेक्षा. -महेश झगडे
17
56
375
10,079
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
🚩🔥 शिवछत्रपतींचा आशीर्वाद… चला देऊ मनोज जरांगे पाटलांना साथ! 🔥🚩 किती षडयंत्रं रचणार? किती अडथळे उभे करणार? किती बदनामी करणार? एक लक्षात ठेवा — संघर्षाची आग अडथळ्यांनी विझत नाही, ती आणखी धगधगते! मनोज जरांगे पाटील,संघर्ष सुरू ठेवा — समाज तुमच्यासोबत खंबीरपणे उभा आहे! 🚩🔥
7
17
208