Pinned Tweet
प्रवास कुठंतरी पोहोचण्यासाठी नसावा ,
कोणत्याही ओझ्याविना असंच चालत राहावं..
चालणं म्हणजे पोहोचणं नव्हे..
पूर्णत्वाचा अट्टाहास सोडला की ,
आयुष्य अजून सुंदर दिसू लागतं
..एखाद्या रानफुलासारखं...🌸
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
It is heartwarming to see so many people come together with one simple thought: to bring a smile to a little girl's face. ❤️
Over the past few days, many people reached out to us, asking if we could connect them with the family of the six-year-old girl from Panchkula. They wanted to send her something or support her in their own little way.
And they did. Some contributed funds that her parents can use towards her future needs, while others sent dresses, books, toys and little surprises. Some gifts have already reached her, and more are on their way.
Each contribution and every gift reflects the thought and care behind this gesture.
A heartfelt thank you to everyone who came forward and made this possible:
@somenmishra0 | @anandagarwaal | @PositivePatil | @ArunimaSharma84 | Sayan Banerjee | @baewaqufiya | @bhargabbanerje1 | @parul_bhatti | @jo_olore | @shrupidity | @md_anas_sheikh and all the anonymous donors.
A special thank you to @somenmishra0 for initiating this effort, and to @mohitgupta1962 for connecting us with the family.
We are glad to have been able to bring everyone together and play a small part in this effort.
#IndiaCares
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे १२ विरोधात सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) ५ संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !
सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.
भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे !
राज ठाकरे ।
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Update -
पंचकूला के सरकारी स्कूल में K.G क्लास की बच्ची के साथ हुए घटनाक्रम के बाद बेटी पहुंची सकुशल घर! घर पर पहुंचते ही बेटी का हुआ जोरदार स्वागत!
मासूम की मुस्कान और परिवार की खुशी ने सभी को भावुक कर दिया। ❤️
#Panchkula #PanchkulaNews #HaryanaNews #SchoolIncident #Child
Update- #पंचकूला स्कूल हादसा: आखिरकार अस्पताल से घर लौटी 6 साल की मासूम!
PGI चंडीगढ़ से छुट्टी मिलने के बाद मासूम अपने घर के लिए रवाना हुई। इस भावुक पल ने हर किसी की आंखें नम कर दीं। मासूम के जल्द पूरी तरह स्वस्थ होने और खुशहाल जीवन की कामना। ❤️
#Panchkula #PanchkulaNews #PGI
सार्वजनिक वाचनालये एकेकाळी वैचारिक मशागतीची आणि साहित्याची आश्रयस्थाने होती. बालकवींच्या निसर्गकविता, ग्रेसांच्या गूढ ओळी आणि नेमाड्यांच्या कादंबऱ्या वाचणारे तरुण दुर्मिळ झाले. त्याऐवजी, टेबलांवर स्पर्धा परीक्षांच्या ‘शॉर्टकट’ नोट्स, ठोकळे आणि बाजारू गाईड्सचे ढिगारे दिसतात 👇
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Is there a way to send gifts/toys to the girl child? So that she knows there's love, compassion, kindness in the world too. That hate/violence god knows how traumastic it can be. Scary that was.
Any journo/NGO who can help, we can all send whatever we want.
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
विवेक, विज्ञान आणि मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. राज्यघटनेला अपेक्षित असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजवून विवेकशील, समताधिष्ठित आणि पुरोगामी समाज घडवणे, हाच त्यांच्या विचारांचा खरा वारसा आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना कृतीची जोड देण्याचा निर्धार करूया. विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्या या पुरोगामी विचारवंताला विनम्र अभिवादन!
#DrNarendraDabholkar #NarendraDabholkar #ScientificTemper
पुणे, नागपूर, कोल्हापूर, संभाजीनगर या शहरांमध्ये देशाची 'सिलिकॉन व्हॅली' बनण्याची क्षमता आहे. या शहरांकडे तरुण बुद्धिमत्ता आणि अफाट सामर्थ्य आहे. ही तरुण ऊर्जा तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, संशोधन आणि जागतिक दर्जाचे कौशल्य मिळवण्याकडे वळवली असती, तर आज महाराष्ट्राचे चित्र वेगळे असते.
हरयाणातील व्हिडिओ पाहिल्यानंतर मन सुन्न होते. लहान मुलांमध्ये ही हिंसक आणि भयंकर मानसिकता एका रात्रीत तयार झालेली नाही ; ती आपल्या आजूबाजूला कुजत चाललेल्या सामाजिक व्यवस्थेचा परिणाम आहे.
पुढची पिढी हाताबाहेर जाण्याआधी लहान मुलांच्या मोबाईल वापरावर कायदेशीर नियंत्रण गरजेचे !
MPSC अभ्यासक्रम असा असावा जो विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडा न बनवता त्यांच्यात विश्लेषणात्मक आणि व्यावहारिक कौशल्ये रुजवेल , जेणेकरून एकूण विद्यार्थ्यांपैकी 99.99% विद्यार्थी - जे स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले नाहीत ते इतर कोणत्यातरी क्षेत्रांत सन्मानाने उभे राहू शकतील.
(1/n)
कार्यालयीन व्यवस्थापन , कामगार कायदे , आर्थिक साक्षरता , आधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली , व्यावहारिक कायदे यांचा अंतर्भाव होणे गरजेचे
नवीन अभ्यासक्रमात या तंत्रज्ञानाच्या प्रशासनातील वापरावर भर असायला हवा.
गेल्या 10/15 वर्षे जुन्या syllabus मधून बाहेर पडणे सर्वात जास्त महत्वाचे 👇
#MPSC करणाऱ्यांमध्ये बेरोजगारी एवढी वाढली आहे की,
परीक्षा पास होऊन अधिकारी होणे हे आता ध्येय राहिले नसून नेत्यांसोबत फोटो काढणे, social media influencer बनणे, स्वतः नापास होऊन दुसऱ्यांना मार्गदर्शन करणे, telegram चॅनेल काढणे, कोंदट अभ्यासिका चालवणे..
यामध्ये आता career दिसत आहे
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
सत्ताधाऱ्यांचा माज कसा जिरवायचा असतो असा प्रश्न जेव्हा जेव्हा पडेल, तेव्हा तेव्हा "गोकुळ" आठवेल..
@satejp जी - मनःपूर्वक अभिनंदन साहेब!
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
विद्यानंद बापट यांच्या मताशी मी एक नागरिक म्हणून सहमत आहे! आणि आपण ?
Shubham Patil (कोल्हापूर) retweeted
Sunday Wisdom!"अती घाई-संकटात नेई" याचा प्रत्यय #MPSC च्या संदर्भात खालील घटनांमधून.
•वैकल्पिक विषयांसह वर्णनात्मक मुख्य परीक्षेची शिफारस जून २०२२ मधे स्विकारत तत्संबंधित जुलै २०२२ च्या घोषणेत सुधारीत योजना लगेच मुख्य परीक्षा २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय.तयारीसाठी पुरेसा अवधी न दिल्याने परीक्षार्थींचे पुण्यात मोठे आंदोलन व निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षे पुढे ढकलणे क्रमप्राप्त.
•जुलै २०२६ मधील गट क च्या जाहीरातीत पूूर्व परीक्षेेचे निर्धारीत धोरण बदलत ती ऑफलाईन ऐवजी ऑनलाईन घेण्याचा निर्णय थेेट जाहीरातीतून घोषित.विद्यार्थ्यांंचे पुन्हा आंदोलन,शासनाचा हस्तक्षेप व निर्णयाची अंमलबजावणी २०२७ पर्यंत पुढे ढकलण्याची पाळी.
•गैरप्रकाराची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच अन्य पर्यायांची चाचपणी न करता दि.१३ मे २०२६ रोजी 'ऑप्टींग आऊटचा' पर्याय रद्द करत बहुुसंंवर्गीय पदांसाठी प्रतीक्षा यादी न ठेवण्याचेही सुतोवाच त्याच परिपत्रकात.उप निबंधक/कर निरीक्षक इ. संवर्गात बर्याच उमेदवारांची दोन पदांवर निवड झाल्याने व पदपसंंतीचा पर्याय न दिल्याने (प्रतिक्षा यादी अभावी पदे रिक्त राहूनही संधी गमावण्याच्या भितीने) उमेदवारांत असंतोष.प्रसार माध्यमे व समाज माध्यमांतून याची दखल.परिणामी रिक्त जागांवर प्रतिक्षा यादीतून शिफारस करण्याचे नंंतर स्पष्टीकरण देण्याची आयोगावर वेळ.
•औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पुरेशी चौकशी न करता वा संयम न बाळगता लगेच गैरप्रकार न झाल्याचा निर्वाळा देणारे पत्रक व त्यात तक्रार खोटी निघाल्यास आयोगाची प्रतिमा मलीन करण्याबाबत फौजदारी कार्यवाहीची तंबी. मात्र शेवटी पेपरफुटी झाल्याची कबुली नि आयोगातील अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या अटकेने तोंडघशी पडण्याची नामुष्की.
तात्पर्य आयोगाची तत्परता स्वागतार्ह मात्र परिक्षार्थ्यांच्या भवितव्याला प्रभावीत करणारे निर्णय व तत्संंबधीत घोषणां ह्याचा ताळमेळ बसवतांना परिणामांचा दूरगामी व सांगोपांग विचार करणे आयोगाच्या प्रतिमेेच्या दृष्टीने हितावह!
Publicity मिळवणे अणि काम तडीस नेण्यासाठी प्रत्यक्ष काम करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ✅
#MPSC
MPSC परीक्षा आता केवळ प्रशासकीय अधिकारी निवडण्याची प्रक्रिया राहिलेली नाही. ती एका अशा दुष्टचक्रात रूपांतरित झाली आहे, जिथे लाखो बेरोजगार विद्यार्थी स्वतःचे भविष्य पणाला लावून अडकून पडले आहेत. हे चक्र केवळ अभ्यासापुरते मर्यादित नसून यात तरुणांच्या भावनांचा बाजार मांडला गेला आहे👇
या व्यवस्थेचा सर्वात मोठा फायदा कुणाला होत असेल, तर तो 'लाल दिव्याच्या गाडीचे' स्वप्न विकणाऱ्या कोचिंग क्लासेसना. पुण्यासारख्या शहरात गल्लोगल्ली उभे राहिलेले हे क्लासेस आणि library चे जाळे बेरोजगारी वाढवण्याचे काम करत आहेत 👇
















