Nilesh Zalte (@nilzalte) header
Nilesh Zalte (@nilzalte) profile picture

पिहू-साऊचा बाबा ❤️ | Journalist | Digital Media | Translator | Lead YT, Social Media at- @News18_Marathi | Past: @mumbaitak, @Abpmajhatv, #Janshakti, @Lokmat

Mumbai, India
Joined October 2015
Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)Photo by Nilesh Zalte (@nilzalte)
'भावनांच्या पलिकडे गेलं की बुद्ध भेटतो. द्वेष आणि दुःखं करत बसू नका. आपलं काम करत रहा. कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडून जे उत्कृष्ट देता येईल ते द्या.' - प्रफुल्ल वानखेडे @wankhedeprafull #विचार #म
3
63
1
565
नेटवर्कींग या प्रकारात माणूसकी, मैत्री, ओळख ही कमोडीटी ( विक्रीयोग्य माल) बनलाय. समाजमाध्यमं, चॅट जीपीटी, एआय आणि विविध प्रकारच्या कट्टरतेच्या काळात “माणसाचं माणूस म्हणून राहणं” ही आजची खरी ऑपॉर्चुनिटी आहे.
2
24
2
195
3,731
ज्यांच्याकडे गावाकडे शेतीयोग्य कमी जमीन असेल त्यांनी गाव सोडून जवळच्या मोठ्या शहरात यायला हवं. नवे स्किल्स शिकण्याची तयारी असेल, माणूस म्हणून इतरांना स्विकारण्याची तयारी व लवचिकता असेल तर शहरात स्वतःला व मुलाबाळांना शिक्षण, आरोग्यसुविधा, दळणवळण व रोजगार बराय.
36
2
434
8,974
हवे आहेत... #News18Marathi
2
219
आपल्या इथली तरूणाई वाचन, पुस्तकं आणि त्यांचं सिलेक्शन याबाबत फार सजग आणि चोखंदळ झालीये याचा फार आनंद आहे. ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला ते पाहता येत्या काळात अधिकाधिक पुस्तकांबद्दल आपण बोलूया, वाचूया आणि मिळून शिकूया. सर्वांचे आभार आणि मनापासून धन्यवाद 🙏🏻❣️
6
24
189
3,559
पुस्तकाला Charging लागत नाही. Data pack लागत नाही. Password लागत नाही, आणि मधेच "Skip Ad" पण येत नाही. एक पुस्तक श्रीमंताच्या मुलालाही तेच सांगतं आणि गरीबाच्या मुलालाही तेच. मला ही खरीखुरी ‘समता’ वाटते. आज भेटूया पुण्यात. संध्याकाळी ६ वाजता. नक्की या.
9
41
6
307
6,840
पुण्यातील मित्रांनी आवर्जून जा या कार्यक्रमाला.
अल्लाउद्दीनकडे “जादूचा दिवा” होता. आपल्याकडे ‘पुस्तकं’ आहेत. जादू मात्र तीच! योग्य पुस्तकं निवडा, ती नीट समजून घ्या, त्यातलं ज्ञान शहाणपणानं वापरा आणि बघा, आयुष्य कसं उजळून निघतं! वाचनाच्या अशा जादुई प्रवासावर गप्पा मारायला मी या शनिवारी संध्याकाळी ६ वाजता पुण्यात येतोय. १/५
1
4
346
तसं विचार करायला सोप्पय…. फक्त तसं वागता यायला हवं!
3
71
1
770
11,826
दिवाळी अंक परंपरा व आव्हाने यावर चर्चा अरूण शेवते सर, संध्या नरे पवार ताईं आणि @nilzalte सोबत. यंदा निलेशने @News18_marathi वर दिवाळी निमित्त वेगवेगळे प्रयोग केले हे खूप भारी गोष्टय. नक्की बघा रात्री ९:५१ मिनिटांनी.
1
2
22
589
आलोक म्हणजे भन्नाट मनुष्य. जितका दिसायला, बोलायला शांत तितकाच टोकदार आणि थेट भाष्य करणारा. अनेक वर्षांपासून बारकाईनं फॉलो करतोय. कुठलं स्पेसिफिक सरकार आहे किंवा कुठल्या ठराविक पक्षाचा नेता म्हणून एखाद्यावर व्यंगचित्र न करता चूक असलेल्या सर्वांना 'समान न्याय' देण्याचं काम (1) 👇🏾
2
4
2
35
2,598
त्यानं आपल्या कलेच्या माध्यमातून केलंय. आलोकच्या व्यंगचित्राच्या गोष्टी भन्नाट आणि वेगळ्या असतात, त्या थेट अपील होतात. आता त्यानं याच भन्नाट कलेचं एक वेगळं रूप समोर आणलंय दिनदर्शिका अर्थात कॅलेंडरच्या माध्यमातून. (2)👇🏾
1
6
150
राज ठाकरेंसारखा उत्तम कलाकार असलेला नेता आलोकचा फॅन आहे. प्रफुल्ल दादांमुळे अशा अनेक लोकांच्या जवळ जाता आलंय, त्यामुळं त्यांना धन्यवाद आणि आलोकला खूप सदिच्छा. #CartunistAlok
5
120
दोन गोष्टी... साध्या, सोप्या आणि संयत गोष्टी सांगणारी माणसं. इतक्या फाफट पसाऱ्यात महत्वाच्या गोष्टी लिहिणारी ही दोन माणसं. ही माणसं वेळोवेळी, वारंवार आपलं आयुष्य समृद्ध करत असतात, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे... 💙💕 #गोष्टछोटीडोंगराएवढी #गोष्टपैशापाण्याची
1
4
2
109
2,986
माझा मित्र कार्टूनिस्ट आलोक @caricatured यावर्षी एक भन्नाट, क्रिएटिव्ह आणि पुर्ण नवा प्रयोग घेऊन आलाय. पुलं देशपांडे यांच्या खुमासदार विनोदांचं कॅलेंडर. आपल्याकडे मराठीत असे ‘धाडसी’ प्रयोग व्हायला हवेत. आपणही सर्वांनी अशा प्रयोगांना साथ द्यायला हवी. #मराठी #दिनदर्शिका १/३
2
55
6
190
12,672
धन्यवाद प्रेक्षक मायबाप... लक्ष असू द्या...! @News18_marathi #न्यूज18मराठी
2
118
काल इंडिगोच्या विमानाने प्रवास केला. इंडिगो ही माझी तशी पहिली चॅाईस कधीच नसते. परंतू हल्ली सर्वच एअरलाईन्स एअर इंडियाला आदर्श मानून प्रवासाला लागल्याने “मग दुसरा काही पर्याय असेल तर सांगा” या विवेकी , सर्वमान्य व सर्वदूर पोहचलेल्या फिलोसॅाफीमुळे इच्छा असो की नसो त्यानेच प्रवास करावा लागतो. खरं तर वीसेक वर्षांपूर्वी ज्यांनी एअर इंडीया, जेट एअरवेज, काही वर्षांपूर्वी विस्तारा आणि सार्वकालीन - सर्वश्रेष्ठ किंगफिशर एअरलाईन्सने प्रवास केलाय त्यांनाच खरा राजेशाही विमानप्रवास म्हणजे काय ते ठाऊक आहे. कधीकधी तर वाटते आजच्या पिढीला हे कळावे म्हणून श्री श्री श्री विजय मल्ल्यांना भारतात बोलावून पुन्हा एकदा किंगफिशर एअरलाईन्स चालू करू द्यावी. लोकांना नक्की बेस्ट एअरट्रॅव्हल काय असतो तो तरी एकदाचा कळेल. बाकी त्यांच्या भानगडी हा वेगळा विषय. पण किंगफिशर म्हणजे भारतीय हवाई प्रवासाला पडलेलं एक सुंदर स्वप्न होतं असं माझं ठाम मत आहे. यावर पुन्हा कधीतरी सविस्तर चर्चा करूया. तर मुळ विषयाकडे येतो. विषय आहे इंडिगोच्या विमान प्रवासाचा आणि त्यांनी प्रवासात दिलेल्या खाद्यपदार्थांचा. चार - साडेचार तासांचा आंतरराष्ट्रीय प्रवास. विमान सूरू झाल्या झाल्या एअरहोस्टेसने पाण्याची बाटली दिली. मी नेहमीच्या सवयीने लेबलं पाहिलं - Blue Fire नावाची पाण्याची बाटली. मग उत्सुकता म्हणून त्याचा बॅाटलिंग प्लांटचा पत्ता पाहिला. तो पत्ता होता, हिमाचल प्रदेशचा. थोड्या वेळाने कुकीज आणि रेडीमेड मसाला चहा दिला. त्याच्या कुकीजचा डबा मला नेहमीच आवडतो. (कुकीज पेक्षा). त्याचाही मॅनुफॅक्चरींग ॲड्रेस पाहिला. तो निघाला थेट तामिळनाडूचा. पुढे काही मिक्स ड्रायफ्रुट्स दिले. त्याच मॅन्युफॅक्चरिंग होतंय बंगलोरला, कर्नाटकात. शेवटी एक छोटीशी मिठाईची वडी दिली. ती बनलेली होती दिल्लीत. विमानात जेवण म्हणून जे दिलेलं ते रेडी टू इट प्रकारातलं होतं. ते ही चौकशी केल्यावर कळालं की ते ही तामिळनाडूमध्येच बनतंय. विशेष म्हणजे इंडीगोचा तो जूना आणि मोठा सप्लायर आहे. एक काळ होता जेंव्हा भारतीय विमानसेवेत अशा खाद्यपदार्थांमधे मुंबई आणि दिल्लीची जवळपास मक्तेदारी होती. आता ती तशी जवळपास मोडीत निघालीये. या पारंपारिक “हब ॲंड स्पोक” मॉडेलला इंडिगोच्या “पॉईंट टू पॉंईट” बिझनेस फिलॉसॅाफीने ने सर्वच बाजूंनी धक्का दिलाय. आता आंतरराष्ट्रीय प्रवासात मात्र त्यांनी मध्यम मार्ग स्विकारून हायब्रिड मार्ग स्वीकारला आहे असं एकंदर दिसतंय. त्याचाही त्यांना फायदाच होतोय. आता मुद्दा क्रमांक दोन. येत्या काळात भारतात विमान प्रवास अजून वाढेल. ( काही तज्ञांच्या मते बुलेट ट्रेन किंवा अजून काही फास्ट ट्रेन्स सूरू झाल्या तर विमान प्रवास थंडावेल वगैरे वगैरे) पण मला तसं वाटतं नाही. ज्या पद्धतीची आपली लोकसंख्या आहे, भारताची भौगोलिक रचना आहे, त्याप्रमाणे यात नक्कीच प्रचंड वाढ अपेक्षित आहे. तसेच या खाद्यपदार्थांची विक्री तसेच पर्यायाने उत्पादनही खूप वाढेल. या सोबतच अजूनही याच्याशी संबंधीत अनेक उद्योग वाढतील. महाराष्ट्रातील अनेक तरूणांनी या क्षेत्रात उतरायला हवं. Clear पाण्याचा ब्रॅंड असो किंवा पेपरबोट किंवा असे बरेचशे कन्झ्युमर ब्रॅंड्स जे अशाच प्रकारचा व्यवसाय करत मोठे बनलेत. त्यांचा आदर्श आपण घ्यायला हवा. या सर्व व्यावसायिक प्रोसेसमधे प्रचंड कष्ट लागतात. दररोज जवळपास फायनलचीच परिक्षा द्यावी लागते. “स्पर्धा परीक्षांसारखं एकदा पास की आयुष्यभर पास” असं काही सुखावह आयुष्य नक्कीच नाही. पण जर यश मिळालं तर “मागची पुढची सगळी ब्लडलाईन - तुमच्यावर गर्व करेल” हे मात्र नक्की. दुसरं तुम्ही तुमच्या कमावलेल्या पैशांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी अभिमानानं करू शकाल. या क्षेत्रात फक्त व्यवसायच नाही तर नोकरीच्या खूप संधी आहेत. त्यासाठीची स्किल्स शिकली तरी चांगल्या पगाराची महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर सहज नोकरी मिळू शकते. फुड टेक्नॉलाजी, सेल्स, मार्केटिंग, इंजिनियरींग, प्रोसेस ऑटोमेशन, तसेच लोअर अन मिडल मॅनेजमेंटमधे अनेक ठिकाणी तुम्हाला संधी मिळू शकते. बाकी या प्रवासात तरी मला महाराष्ट्रातलं काहीच मिळालं नाही ही खेदाची बाब वाटली. नवी मुंबई एअरपोर्ट सूरू होत असल्याने इकडे आजूबाजूला अशा प्रचंड इंडस्ट्रीज आता येऊ घातल्यात. तीच काय आशादायी बाब. त्यामुळे यात आपल्या मराठी मंडळींनी लक्ष घालायला हरकत नाही. (जयंत्या, सण, उत्सव यासाठी वर्गणी किंवा खडी रेती सिंमेट दम देऊन विकण्यापेक्षा) पुर्ण तयार, दर्जेदार, कायमस्वरूपी, अधिक मानाचा असा शाश्वत उद्योग कधीही चांगला. त्याच विमानात टिश्यू पेपर दिलेला त्यावरच वाक्य या लेखाचा शेवट करताना - दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम। आता विचार आणि कृती आपल्याला करायची आहे.
13
62
5
397
24,223
नमस्कार मी निलेश. आपण बघताय न्यूज 18 मराठी. आता इथे भेटत राहुयात... I have joined Network 18 Marathi (Network18 Group) as Lead off Platforms. बाकी, प्रेम कायम असू द्या! 😊 Thank you. धन्यवाद! @News18_marathi #निलेश्राव #न्यूज18मराठी #मीडिया
13
1
1
96
2,296
अलविदा मुंबई तक! जवळपास साडेतीन वर्षांचा काळ इथं कसा गेला ते कळलं नाही. मराठी डिजिटल माध्यमात मुंबई तकनं अनेक इतिहास घडवलेत. त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार होता आलं. अनेक भन्नाट प्रयोग इथं केले, जे जबरदस्त यशस्वी झाले, यात वाटा उचलता आला याचं समाधान आहे. (1) 👇🏾
8
1
1
213
12,057
इथून निघताना प्रत्येकाच्या नजरेत आपल्याबद्दल प्रेम होतं, प्राउड होता ही गोष्ट प्रचंड उमेद देणारी राहील. मुंबई तक म्हणजे प्रेम होतं. अनेक लेव्हलवर इथं काम करता आलं याचं समाधान आहे. पण म्हणतात ना, 'कुछ तो मजबूरियाँ रही होंगी, यूँ ही कोई बेवफ़ा नहीं होता...' (2)👇🏾
1
20
1,600
साहिल सर, मिलिंद सर, मनीष सर, निरंजन सर, अभिजित 'दादा' आणि माझ्या 'मुंबई तक टीम'सह संपूर्ण प्रोडक्शन, एडिटिंग, मेकअप टीम आणि सर्वच्या सर्व सहकारी तुम्ही सांभाळून घेतलंत, त्यामुळं चांगलं काम करू शकलो. Thank You! 💕🙏🏽 भेटुयात, काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.. #MumbaiTak #मुंबईतक
1
29
1,368
Nilesh Zalte retweeted
SIR List 2026: महाराष्ट्रात 2 कोटी मतदारांचं काय होणार? काँग्रेस विरुद्ध भाजप आणि निवडणूक आयोग @nilzalte #SIR #MaharashtraNews
1
2
497