ravindra deshmukh (@RaveeLokmat) profile picture

Journalist, Lokmat Solapur

Joined July 2012
Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)Photo by ravindra deshmukh (@RaveeLokmat)
सर, सोलापुरातील हे झाड लक्षवेधी ठरलं आहे. आपण शेअर केल्यामुळे त्याची विशेषता राज्यात पोहोचली.
निसर्गाची ही हिरवाई डोळ्यांना सुखावते; मात्र झुकलेले झाड अपघाताचा धोका वाढवत आहे. योगायोग म्हणजे, या झाडाचा हेल्मेटसदृश आकार जणू रस्त्यावर सुरक्षिततेसाठी हेल्मेटचे महत्त्वही अधोरेखित करतो आहे. #Solapur #nature #helmet
60
खूप शानदार समारंभ..आर्थिक आणि उद्योग क्षेत्रावर उपयुक्त मंथन झाले.
लंडन येथे पार पडलेल्या ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’नंतर छत्रपती संभाजीनगरला परतलो. हा खरंच एक अविस्मरणीय अनुभव ठरला. लोकमत समूहाचे अध्यक्ष व माझे ज्येष्ठ बंधू विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभूतपूर्व परिषदेत भारताची ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, विकासाच्या संधी आणि धोरणात्मक बदल यांवर सखोल चर्चा झाली. राजकारण, व्यवसाय, प्रशासन, माध्यमे, सामाजिक सेवा आणि प्रवासी भारतीय अशा विविध क्षेत्रांतील अग्रगण्य भारतीय व विदेशी मान्यवर या मंचावर एकत्र आले, हा एक दुर्मिळ योग होता. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी, वेदांत गृपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, फिनोलेक्सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, गल्फ ऑइल इंटरनॅशनलचे अध्यक्ष संजय हिंदुजा, लॉर्ड रामी रेंजर, श्रीमती अमृता फडणवीस, अभिनेते सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, ओबीसी मंत्री अतुल सावे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, खा. सुनील तटकरे, खा. अजित गोपछडे, राज्यमंत्री सर्वश्री योगेश कदम, माधुरी मिसाळ, पंकज भोयर यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींना या वेळी पुरस्कारांनी गौरविण्यात आले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर चार चर्चासत्रे झाली. यापैकी ‘महाराष्ट्र - द इकॉनॉमिक पॉवरहाऊस ऑफ इंडिया’ या विषयावरील चर्चासत्राचे संचालन करण्याची संधी मला मिळाली. शिक्षणानिमित्त मी काही वर्षे लंडनला राहिलो असल्याने या शहराशी माझे भावनिक नाते आहे; त्यामुळे अनेक गोड आठवणी ताज्या झाल्या. एक गोष्ट विशेष जाणवली ती म्हणजे तिथे जमलेल्या प्रत्येक भारतीयाचा प्रचंड आत्मविश्वास. अमेरिकेने लादलेले टेरिफ असो वा इतर आव्हाने - कुणीही घाबरलेले नव्हते. उलट, “हे शतक भारताचे आहे” असा ठाम विश्वास सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मूलभूत सुविधा, शिक्षण, व्यवसायसुलभता आणि सुशासनावर भर दिला तर भारताला कुणीही अडवू शकणार नाही, असा ठाम सूर होता. या परिषदेतील अनुभवाने प्रचंड ऊर्जा घेऊन मी परतलो आहे. या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व लोकमत सहकारी व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन. @nitin_gadkari @PiyushGoyal @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @vijayjdarda @VDoraiswami @fadnavis_amruta @RamdasAthawale @rahulnarwekar @save_atul @AshokChavan1958 @MPLodha @SanjayShirsat77 @SMungantiwar @HCI_London @AnilAgarwal_Ved @SunilTatkare @dbmahadik @RVikhePatil
3
भावपूर्ण श्रद्धांजली!!
जंगलातील प्राणीजीवन आणि त्याचे बारकावे ओघवत्या शैलीत रेखाटणारे प्रख्यात वन्यजीव अभ्यासक, पक्षीशास्त्रज्ञ, लेखक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, माजी वनाधिकारी, अरण्यऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाने साहित्यक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. तब्बल ६५ वर्षे जंगलात फिरत त्यांनी जंगलाशी नाते जपले. जंगलाच्या आयुष्यातील अनुभव तसंच संशोधन हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे यासाठी ललित लेखनाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. भावपूर्ण श्रद्धांजली.
3
सर्व विजेत्यांचे अभिनंदन!! जय लोकमत!!
नाशिकच्या ताज हॉटेल - गेटवे मध्ये काल रात्री झालेला लोकमत अचिव्हर्स अवॉर्ड्स सोहळा अविस्मरणीय ठरला. एक यशस्वी आणि आघाडीचे वृत्तपत्र चालवण्यासाठी हुशार आणि मेहनती मनुष्यबळ लागते आणि लोकमत याबाबतीत खूप भाग्यवान आहे. संपादकीय, जाहिरात, वितरण, डिजिटल, उत्पादन, इव्हेंट्स, मनुष्यबळ व्यवस्थापन, अकाउंट्स, वसुली अशा सर्वच विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धा अटीतटीची होती आणि जे विजेते होऊ शकले नाहीत त्यांची कामगिरीही तोलामोलाची होती. सर्वच विजेत्यांचे आणि एकंदरीतच लोकमत टीमचे खूप खूप अभिनंदन. माझे ज्येष्ठ बंधू विजयभैय्या लवकरच अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने सर्वांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले. समूह संपादक विजय बाविस्कर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा यासाठी अविरत प्रयत्न करणाऱ्या तसेच बेस्ट टीम पुरस्कार मिळविणाऱ्या नाशिक टीमचे प्रमुख बी बी चांडक आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन. काल जवळजवळ वर्षभरानंतर सर्वच युनिट्स मधील सहकारी भेटले, मनमुराद गप्पा झाल्या. असे वाटले जणू काही नव्या ऊर्जेचा संचार झाला. खूप रम्य आठवणी घेऊन संभाजीनगरला परतत आहे. @vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda @lokmat
1
2
भीषण आणि थरारक!
२६ एप्रिल १९९३... हा काळा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. माझ्या केबिनमध्ये दुपारी संपादक विभागाची बैठक सुरु होती. अचानक आगीचा बंब सायरन वाजवत 'लोकमत'च्या समोरून सुसाट धावत गेला. मनात शंकेची पाल चुकचुकली. ते दिवस मोबाईलचे नव्हते. चौकशी केली आणि लगेच माहिती मिळाली की औरंगाबादहून मुंबईला जाणारे इंडियन एअरलाईन्सचे बोईंग ७३७ विमान कोसळले होते! मी लगेच टेबलावरील माझा कॅमेरा उचललेला आणि छोट्या मारुती गाडीमध्ये मी आणि काही मोजके सहकारी चिकलठाण्याकडे निघालो. टेकऑफनंतर विमान अपेक्षित उंची गाठू शकले नव्हते. त्याची चाके एका ट्रकला धडकली, काही अंतरावर विजेच्या तारांना त्याने स्पर्श केला आणि मग वरुड शिवारात — आजच्या केम्ब्रिज स्कूलजवळ — ते कोसळले. घटनास्थळावर आम्ही जे दृश्य पाहिले, ते आयुष्यभर विसरणे शक्य नाही. बोईंग विमानाचे दोन तुकडे झाले होते. आगीच्या ज्वाळा, काळा धूर, साऱ्या बाजूंनी विखुरलेले मृतदेह... अर्धवट जळालेली विमानाची पुढची बाजू... डोळ्यासमोरचे ते भीषण चित्र पाहताना अंगावर अक्षरशः शहारे आले. ११८ प्रवाशांपैकी ५५ जणांनी जीव गमावला होता — त्यात शहरातील उद्योजक, अधिकारी, विविध क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश होता. पत्रकार आणि संपादक म्हणून माझ्यावर मोठी जबाबदारी होती. मी आणि माझे सहकारी तिथेच थांबलो. छायाचित्रे टिपली. माहिती गोळा केली. 'लोकमत'ने त्या भीषण दुर्घटनेचे सखोल वार्तांकन केले — अपघात कसा झाला, कुठल्या चुका झाल्या, अशा घटना पुन्हा टाळण्यासाठी काय उपाययोजना व्हायला हव्यात यावर प्रकाश टाकला. या लेखनाची दखल घेत अनेक यंत्रणांनी पुढील काळजी घेतली. मी अपघातस्थळी होते हे माहित झाल्याने मग 'बीबीसी'ने मला कॉल करून दूरध्वनीवरून माहिती घेतली. आग लागलेल्या आणि जळत्या विमानाचा फोटो फक्त माझ्याकडे होता तो पुढे अनेकांना मी दिला. आज ३२ वर्षांनंतरही त्या काळ्या दिवसाची जखम ताजी आहे...
1
2
शानदार सोहळा👌👌
महाराष्ट्र ज्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहतो, असा भव्यदिव्य 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सोहळा बुधवारी राजभवन, मुंबई येथे उत्साहात पार पडला. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत आणि ऋषी दर्डा यांनी घेतलेली उद्योगपती संजीव बजाज यांची मुलाखत अत्यंत लक्षणीय ठरल्या. या दिमाखदार समारंभात महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे स्वामी ब्रह्मविहारी दास, अभिनेता कार्तिक आर्यन, माझे ज्येष्ठ बंधू आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉ विजय दर्डा, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. आरोग्य, उद्योग, राजकारण, समाजकारण, प्रशासन, वैद्यकीय क्रीडा, शेती अशा विविध क्षेत्रांत अतुलनीय कार्य करणाऱ्या दिग्गजांच्या सन्मानाने हा सोहळा संस्मरणीय ठरला. सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! फक्त विजेतेच नव्हे, तर नामांकन मिळालेल्या प्रत्येकाने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला आहे. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहणाऱ्या सर्व मंत्री, विधिमंडळ सदस्य, उद्योग, रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख मंडळी, सनदी अधिकारी यांचे खूप खूप आभार. तसेच, या प्रतिष्ठित पुरस्कारांची संकल्पना रचणारे लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यक्षम टीमचे अभिनंदन! #Lokmat #AWARDS #Maharashtra @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @vijayjdarda @Jayant_R_Patil @devendarda @sanjivrbajaj @rishidarda @karandarda @TheAaryanKartik @lokmat @BAPS @BAPS_PubAffairs
1
13
जय माय मराठी..जय महाराष्ट्र!!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना लक्ष, लक्ष शुभेच्छा. मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि ज्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो त्या ज्येष्ठ कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि समीक्षक वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने आजचा आपला आनंद द्विगुणित झाला आहे. जगभरातील मराठी माणसाचा अभिमान म्हणजे मराठी. नाट्य, संगीत, चित्रपट, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांत मराठीचा अमूल्य ठेवा आहे. आपले असंख्य ग्रंथ, विचारधारा आणि समृद्ध वारसा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस. एक पत्रकार, संपादक, लेखक म्हणून माझ्याकडूनही मराठीची अल्पशी सेवा घडली याचा मला सार्थ अभिमान आहे. #MarathiPride #MarathiBhashaGauravDin #kusumagraj
3
जय हिंद सर!!
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याची हमी देणारे भारतीय संविधान लागू झाले तो आजचा आनंदाचा दिवस 'लोकमत'च्या माझ्या सर्व सहकाऱ्यांसमवेत ध्वजवंदन करून साजरा केला. भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो. आप सभी को 76 वें गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। संविधान के प्रति कटिबद्ध हमारा लोकतंत्र और अधिक मजबूत हो। हम सब भारतीय जात- पात , धर्म इत्यादि के भेद मिटाकर विकसित राष्ट्र का निर्माण करें ! जय हिंद।
7
आदरणीय सर, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा!!
2024 चा सूर्य मावळतो आहे... फार काही दिले या वर्षाने आणि काही थोडे हिरावूनही घेतले!!! उद्याचा उगवता सूर्य नवी स्वप्ने आणि नवी उमेद घेऊन येईल!!! नव्या वर्षात सर्वांना सुख मिळू दे, सर्वांच्या आयुष्यात प्रेम असू दे..आणि जगाच्या जखमांवर मलम लागू दे... मन:पूर्वक शुभेच्छा!!! #HappyNewYear #Welcome2025 #NewYear2025 #NewYear #byebye2024
1
28
थोर माणसाला विनम्र अभिवादन!!
Remembering Padmavibhushan Ratan Tata on his birth anniversary today. He was a visionary, respected and popular industrialist who gave a new direction to the Tata Group, and contributed in nation-building. I was fortunate to get an opportunity to interact with him when I was a minister and later also. I received rich inputs and insights from him and found him to be a beacon of simplicity, humanity, and philanthropy. His legacy continues to inspire us all. #InspirationForever #Padmavibhushan #Tata #RatanTata #ratantatabirthday
1
9
भावपूर्ण श्रद्धांजली!!
I am deeply saddened by the passing of former Prime Minister Dr. Manmohan Singh—a visionary economist, statesman, teacher, and leader of unshakeable integrity. From RBI Governor to Union Finance Minister and two-term PM, he spearheaded India's transformation from a license raj to a liberalized economy. In 2004, when united opposition wanted Sonia Gandhi to be PM, she reposed faith in Dr Singh and announced him to be PM. As a Maharashtra cabinet minister, I had opportunity to meet Dr Singh on many occasions. He came across as an affable and highly intelligent leader always ready to help. His legacy endures in the progress we see today. India mourns the loss of its noble son today. Om Shanti. @INCIndia #DrManmohanSimgh
1
9
'लोकमत'च्या सर्वसमावेशीपणाचं दर्शन
नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपस्थित राज्याचे मंत्रिमंडळ तसेच विधिमंडळाच्या सदस्यांसाठी 'लोकमत'तर्फे काल रात्री स्नेहभॊजन आयोजित करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदेजी, अजित पवारजी, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजी, चंद्रशेखर बावनकुळेजी, चंद्रकांत पाटीलजी, अतुल सावेजी, संजय शिरसाटजी, पंकजाताई मुंडे, मेघनाताई बोर्डीकर, योगेश कदमजी, यांच्यासह सर्व मंत्री, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते आ. अंबादास दानवेजी, आ. अमित देशमुखजी, आ. सत्यजित तांबेजी, सर्व पक्षीय आमदार आवर्जून उपस्थित होते. सभागृहातील गरमागरमी, कटुता विसरून सर्व एकत्र आले. विधिमंडळातील माझ्या अनेक जुन्या सहकाऱ्यांची खूप दिवसांनी भेट झाली. गप्पा, हास्यविनोद रंगले. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिकजी, पोलीस महासंचालक रश्मी शुकलाजी यांच्यासह राज्यातील अनेक सनदी अधिकारी या स्नेहभोजनाला उपस्थित होते. उत्तररात्रीपर्यंत चाललेला सोहळा अविस्मरणीय ठरला. @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @cbawankule @ChDadaPatil @rahulnarwekar @RamShindeMLA @save_atul @Pankajamunde @SanjayShirsat77 @iYogeshRKadam @MeghnaBordikar @ssaunik @iambadasdanve @amitdesh @satyajeettambe @vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda @lokmat
1
7
देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!! त्यांची कारकीर्द राज्याचा विकास करणारी, जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणारी ठरो!!💐💐
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसजी @Dev_Fadnavis यांचे हार्दिक अभिनंदन. देवेंद्रजी एक तरुण, कल्पक आणि हुशार नेते आहेत. त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. मी विधिमंडळात सदस्य, मंत्री असताना त्यांची कामाची पद्धत, समर्पण जवळून पहिले आहे. मुख्यमंत्रीपदी दुसऱ्या कार्यकालासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. @vijayjdarda @devendarda @fadnavis_amruta @Devendra_Office #MaharashtraCM #BJP #ChiefMinister #DevendraFadanvis
1
24
Thanx for info Sir
Maharashtra Assembly Elections 2024: Key Voting Insights Key Highlights 1️⃣ Total Electors Across Maharashtra • 9.7 Crores 👥👥👥 2️⃣ Total Voters • 6.4 Crores ✔️🎉 • Overall turnout: 66.03% 📈 3️⃣ Gender Breakdown of Electors • Male Electors: 5 Crores 👨 • Female Electors: 4.7 Crores 👩 • Other Electors: ~6,100 🌈 4️⃣ Voter Turnout by Gender • Male Voters: 3.3 Crores – 66.80% turnout 💪 • Female Voters: 3.06 Crores – 65.21% turnout 🙋‍♀️ • Other Voters: 1,815 🌟 ________________________________________ District-Wise Insights 📍 🏆 Top Performing Districts by Voter Turnout • Gadchiroli • Electors: 8.2 Lakhs • Voters: 6.18 Lakhs (Turnout: 75.26%) 💯 • Sindhudurg • Electors: 6.8 Lakhs • Voters: 4.83 Lakhs (Turnout: 71.14%) 🌴 • Kolhapur • Electors: 33 Lakhs • Voters: 25.3 Lakhs (Turnout: 76.63%) 🚀 📉 Low Turnout in Urban Areas • Mumbai City • Electors: 25.4 Lakhs • Voters: 13.39 Lakhs (Turnout: 52.65%) 🌆 • Mumbai Suburban • Electors: 76.8 Lakhs • Voters: 43.34 Lakhs (Turnout: 56.39%) 🏙️ ________________________________________ Regional Analysis 🗺️ Vidarbha Region 🌾 • Total Electors: 1.8 Crores • Total Voters: 1.17 Crores • Top District: Gadchiroli with 75.26% turnout. 💪 Western Maharashtra 🐄 • Total Electors: 2.3 Crores • Total Voters: 1.63 Crores • Top Districts: Kolhapur (76.63%), Sangli (72.12%). 🥇 Konkan Region 🌊 • Total Electors: 1.3 Crores • Total Voters: 86 Lakhs • Sindhudurg leads with 71.14% turnout. 🌟 ________________________________________ Key Takeaways 💡 ✅ Strong Rural Participation: Rural areas like Gadchiroli and Sindhudurg show high enthusiasm with over 70% turnout. 🌾 ✅ Urban Engagement Lags: Major urban hubs like Mumbai City and Suburban Mumbai fall below 60%. 🌆 ✅ Gender Balance Improving: Women voters close the gap, with 65.21% turnout compared to 66.80% for men. 👩‍👩‍👧 ✅ Consistent Performers: Western Maharashtra and Konkan continue their tradition of high turnout! 🚀 ________________________________________ 📢 Source: District Election Offices/ Such data is expected from the Transparent Election Commission 🗳️ Let’s celebrate this vibrant democratic participation! 🌟 What do you think about these trends? Share your thoughts! 💬👇 #MaharashtraElections2024 #VotingTrends #DemocracyInAction #GenderDynamics #ElectionInsights #VoterTurnout #RuralParticipation #UrbanVoting #DemocracyMatters #ElectionData #ElectionTransparency #DemocracyMatters #IndiaVotes #ECIIntegrity #ECIFairness #FairElectionsNow #ECIAccountability #ElectoralReforms #FreeAndFairElections #ECIUnderScrutiny #EmpowerVoters #ReformECI #TransparentElections #DemocracyWatch #ElectoralJustice @INCIndia @IYC @INCKerala @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @AUThackeray @OfficeofUT @BJP4Maharashtra @BJP4India @AjitPawarSpeaks @YSRCParty @ECISVEEP @CEO_Maharashtra @SpokespersonECI
1
9
Useful info sir
MAHARASHTRA POLLS 2024: SPOTLIGHT ON 28 KEY CONSTITUENCIES ⚡️ 🔍 Here’s a close look at the key battles in Maharashtra, featuring key ministers like CM Eknath Shinde (60), DCM Ajit Pawar (65), and ministers from Mahayuti, facing challengers from the Maha Vikas Aghadi alliance. 📊 BATTLEFIELD INSIGHTS 👴 Out of 28 ministers, 20 are older than their rivals. 📊 The average age of Mahayuti candidates is 61 years, while the average age of MVA challengers is 51 years → highlighting a 10-year generational gap in leadership styles. 🚀 The increase in electors in just 4 months after the Lok Sabha elections is remarkable! 🗳️ These electors, eligible to vote in this election, will decide the fate of all candidates. 📈 Jalgaon Rural: +32,598 🔥 Ballarpur: +20,288 📊 Nandurbar: +16,978 🧓 Baramati: Ajit Pawar (65) faces Yugendra Pawar (33) → 32 years apart! 🕰️ Digras: Sanjay Rathod (52) takes on Manikrao Thakare (70) → a generation-defining clash. 👶 Shrivardhan: Aditi Tatkare (36) contests against Anil Navgane (45) → the youngest ministerial candidate faces a senior challenger. 🔥 A UNIQUE FAMILY RIVALRY IN AHERI 🏡 Aheri sees a rare father-daughter battle as Minister Dharamrao Aatram (71) faces his daughter, Bhagyashree Atram (43) of NCP-SP, adding intense drama to the election. 🗳️✨ 🗝️ MINISTERS & THEIR CONSTITUENCIES 🏛️ Eknath Shinde (60) – Kopri-Pachpakhadi 📜 Devendra Fadnavis (54) – Nagpur South West 🎯 Ajit Pawar (65) – Baramati 🧓 Chhagan Bhujbal (77) – Yevla 💼 Radhakrishna Vikhe Patil (65) – Shirdi ⚖️ Dilip Walse Patil (67) – Ambegaon 🛡️ Sudhir Mungantiwar (62) – Ballarpur 🔧 Chandrakant Patil (65) – Kothrud 🌾 Vijaykumar Gavit (69) – Nandurbar 🏹 Dhananjay Munde (49) – Parli 👔 Hasan Mushrif (70) – Kagal ⚙️ Girish Mahajan (64) – Jamner 🏞️ Gulabrao Patil (58) – Jalgaon Rural 📌 Dadaji Bhuse (60) – Malegaon Outer 🌊 Aditi Sunil Tatkare (36) – Shrivardhan 🌾 Sanjay Rathod (52) – Digras 🎯 Suresh Khade (66) – Miraj 🛡️ Uday Samant (48) – Ratnagiri 🏛️ Tanaji Sawant (60) – Paranda 🏘️ Ravindra Chavan (54) – Dombivali 🏯 Abdul Sattar (59) – Sillod 🌳 Deepak Kesarkar (69) – Sawantwadi 🌾 Sanjay Bansode (52) – Udgir 🏢 Atul Save (62) – Aurangabad East 🏹 Shambhuraj Desai (58) – Patan 🏔️ Mangal Lodha (69) – Malabar Hill ⚕️ Anil Bhaidas Patil (57) – Amalner ⚔️ KEY CONSTITUENCIES TO WATCH 🏛️ Kopri-Pachpakhadi: CM Eknath Shinde (60) faces Kedar Dighe (44, SHS-UBT) → a 16 years younger rival. 📜 Nagpur South West: Devendra Fadnavis (54, BJP) competes with Prafulla Gudadhe (49, INC). Prafulla Gudadhe, the son of Vinod Gudadhe, the first-ever BJP MLA from Nagpur, adds historical weight to this contest. 💪 Shirdi: Radhakrishna Vikhe Patil (65) contests against INC's Prabhavati Ghogare (57). ⚔️ Jalgaon Rural: A 29-candidate contest, the most intense battleground! 🏟️ Patan and Shirdi: Both with 18 candidates. 🤝 BATTLES BY PARTY CONTESTS BJP vs INC: 5 battles BJP vs SHS-UBT: 4 battles BJP vs NCP-SP: 1 battle NCP-AP vs NCP-SP: 8 battles (the most intense rivalry!) NCP-AP vs INC: 1 battle SHS-ES vs SHS-UBT: 6 battles SHS-ES vs NCP-SP: 2 battles SHS-ES vs INC: 1 battle TOTAL: 28 key battles #MaharashtraElections2024 #KeyBattles #FatherDaughterFaceOff #PoliticalRivalries #ElectorsDecide #GameChangerElection #BattleForMaharashtra #VoteForChange #MVAvsMahayuti
3
माय मराठीचा जय हो!!
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन अनेक वर्षांची न्याय्य मागणी केंद्र सरकारने मान्य केली, ही खूप आनंदाची आणि अभिमानाची बाब. मराठी भाषेचा आदिकाल यादव काळापासून आहे. या प्राचीन भाषेतील विपुल ग्रंथसंपदेने साहित्यविश्वात मोठी भर घातली आहे. माझ्यासारख्या मराठी पत्रकार, संपादक, लेखकाच्या दृष्टीने आजचा क्षण खूप आनंदाचा. अभिजात भाषेचा दर्जा तर मिळाला; पण मराठी ही ज्ञानभाषाही झाली पाहिजे आणि बदलत्या युगाची आव्हाने स्वीकारून ती आणखी समृद्ध झाली पाहिजे, त्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये कसूर राहाता कामा नये. मराठीबरोबरच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली भाषांनाही हा दर्जा मिळाला आहे, त्याचे मन:पूर्वक स्वागत. देशातील भाषावैविध्याचा हा सन्मान आहे. #classicalMarathi #Marathi #languages #Literature @lokmat
1
21
सुशीलकुमार शिंदे यांना जन्मदिनाच्या खूप शुभेच्छा!! 💐💐🎂🎂💐💐
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली होती. सदैव हसतमुख असणारे सुशीलकुमारजी सर्वसहमतीने काम करण्यावर विश्वास ठेवतात. येणारे वर्ष त्यांना आनंदी आणि आरोग्यदायी जावो ही कामना. @SushilShindeINC @Praniti_Shinde_ @ShindePraniti @INCMaharashtra @INCIndia @IYC #Congress #SushilkumarShinde #HappyBirthday
6
शर्मा यांच्या पुस्तकाला खूप शुभेच्छा!! 🎂🎂
Last night, I had the privilege of being the Guest of Honour at the launch event of two books authored by CA Umesh Sharma. They are collections of his insightful articles on finance and taxation, published as part of his column #Karneeti in 'Lokmat Times' and 'Lokmat'. The event featured distinguished personalities including Chief Guest and former Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad, senior CAs Ashok Patil and R B Sharma, Chairperson of the Chhatrapati Sambhajinagar branch of the ICAI CA Rupali Bothra, publisher Baba Bhand and various other prominent figures. Finance is indeed a complex subject, but CA Sharma’s ability to present it in a simple and understandable language has won readers’ appreciation and ensured the record longevity of his column. Many organisations have acknowledged his unique achievement. His consistency, research, and dedication are truly commendable. सीए उमेश शर्मा यांच्या 'लोकमत टाइम्स' आणि 'लोकमत'मधील करनीती या वित्त आणि करविषयक लेखांचे संग्रह असलेल्या दोन पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा काल योग आला. प्रमुख पाहुणे आणि माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ सीएज अशोक पाटील आणि आर बी शर्मा, सीए संघटना छत्रपती संभाजीनगर शाखेच्या अध्यक्षा सीए रुपाली बोथरा, प्रकाशक बाबा भांड यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी संवाद साधता आला. खर तर फायनान्स हा तसा क्लिष्ट विषय. मात्र, सर्वांना समजेल, उमजेल अशा सोप्या भाषेत तो मांडण्याची सीए शर्मा यांची शैली वाचकांच्या पसंतीस उतरली आणि हा स्तंभ प्रदीर्घ काळ चालला. त्यांच्या या अनोख्या विक्रमाची अनेक संस्थांनी दखल घेतली. त्यांचे सातत्य, अभ्यास आणि समर्पण खूप कौतुकास्पद आहे. @DrBhagwatKarad @FCAUmeshSharma @lokmat @theicai @LokmatTimes_ngp #Lokmat #Tax #Finance #LokmatTimes #CA #ICAI
3
धक्कादायक विधान!
संतापजनक.!! शिक्षण मंत्री दीपक केसरकर @dvkesarkar यांचे भाष्य अत्यंत संतापजनकच आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यावर भाष्य करताना मंत्रिमहोदयांनी नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असेल, वाईटातून काहीतरी चांगले घडणार असेल असे भाष्य केले. तेथे आणखी भव्य पुतळा उभा करायचा असला तरी असे विधान करणे नक्कीच शिक्षण मंत्र्यांना शोभणारे नाही. @CMOMaharashtra @mieknathshinde @Devemdra @AjitPawarSpeaks #ShivajiMaharajStatue #ShivajiMaharaj #Sindhudurg #RakjotFort
2
सराहनिय समारोह..पूज्य संत को नमन!
छत्रपति संभाजीनगर में रक्षाबंधन के अवसर पर श्वेताम्बर जैन समाज के तत्वावधान में 1200 से अधिक बहनों ने अपने भाइयों की कलाई पर प्यार बांधा, जिसे परम पूज्य आचार्य श्री प्रवीणऋषिजी मसा के आशीर्वाद वचन और परम पूज्य प्रशमदर्शना मसा तथा परम पूज्य ओजसदर्शनाजी मसा का मार्गदर्शन मिला। चातुर्मास आयोजनों की श्रृंखला में यह अवसर सभी की स्मृतियों में समा गया। #rakshabandhan2024 #rakshabandhancelebration #SiblingBond #Rakhi2024 #रक्षाबंधन
6