Replying to @realDonaldTrump
@realDonaldTrump Mad deals with India, Japan, S korea and china for selling oils at 40% off price for next six months order of current market price. Whether the international price goes high or low, the 40% price is based on the signed date of contract. MAGA!
1
16
Check out my new single "Life is Journey" distributed by @DistroKid and live on Spotify! open.spotify.com/album/1XYEh…
2
55
Baba retweeted
Replying to @CMOMaharashtra
Dude how many times you will resign the same MOU
the saame was signed Sept 2025
Replying to @mnsadhikrut
@mnsadhikrut @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @bjpmaha @RajThackeray
रस्त्यावरचे सरकार :निवडणूक आयोगाला रस्त्यावर न्याय कसा देणार ?
EVM मशीन घोटाळा करणाऱ्याला रस्त्यावर न्याय कसा देणार ?
बिनविरोध आलेल्यांना रस्त्यावर न्याय कसा देणार ?
अमित-अदित्य रस्त्यावर सरकार कसे चालवणार ?
1
4
@avinash_mns @rajupatilmanase @mnsadhikrut
रस्त्यावरचे सरकार :निवडणूक आयोगाला रस्त्यावर न्याय कसा देणार ? EVM मशीन घोटाळा करणाऱ्याला रस्त्यावर न्याय कसा देणार ? बिनविरोध आलेल्यांना रस्त्यावर न्याय कसा देणार ? अमित-अदित्य रस्त्यावर सरकार कसे चालवणार ?
8
Replying to @mnsadhikrut
@mnsadhikrut @ShivSenaUBT_ @RajThackeray @AdityaThackerey
BMC निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि ठाकरे बंधूंची युती अपेक्षित यश मिळवू शकली नाही, तरीही त्यांनी मराठी माणसाला एकत्र आणण्यात, त्याच्या मनात जागरूकता निर्माण करण्यात मोठी भूमिका बजावली.
1
9
काही ठिकाणी त्यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात चांगली लढत दिसली, आणि मुख्य म्हणजे दोघेही भाऊ एकत्र आले हे स्वतःच एक मोठा विजय आहे – बाळासाहेबांच्या वारशाला न्याय देणारा!
@ShivSenaUBT_ @mnsadhikrut
3
Baba retweeted
राज साहेब एक विनंती आता उद्धव ठाकरेंची साथ सोडू नका. 🙏
मराठी माणूस कायम तुमच्या पाठीशी उभा राहिल. ✊🏻
महाराष्ट्राला तुमची खरी गरज आता आहे.
@RajThackeray @OfficeofUT
Baba retweeted
रसमलाई वरून भाड्याच्या पक्षाचे कार्यकर्ते राज साहेबांना लक्ष करत आहेत, त्याना एकच सांगणं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या राज ठाकरे साहेबांचा आम्हाला अभिमान आहे. कारण बाँबे नाही मुंबई आहे हे ठासून कायम सांगत राहू. आम्ही पण मद्रास ला चेन्नई म्हणून स्वीकारलं आहे.
Baba retweeted
Over the past few years, the Adani Group has expanded at an extraordinary pace—be it the power sector, ports, airports, or almost every major sphere within the state. One by one, critical sectors are being handed over to a single corporate conglomerate.
As Maharashtrians, if we fail to view this rapid consolidation with the seriousness it demands today, inch by inch, vast stretches of land and key assets of this state will slip into the hands of one corporate group.
This video lays out the staggering scale of the Adani Group’s expansion across the state and is well worth watching.
Baba retweeted
अनुजा धाकरस यांची पत्रकारिता बघून देशातल्या जवळजवळ 98% दलाल पत्रकारांना स्वतःची पत्रकारिता बघून लाज वाटत असेल.
अनुजा असच प्रामाणिक पत्रकारिता करत रहा.👏
#Maharashtra #BMCElections
Baba retweeted
गिरगावात त्या दिवशी सहज एक दोन नवीन टॉवर मध्ये चक्कर मारली नवीन घर घेण्यासाठी. सेल्स टीमला म्हंटल, की माझा गिरगावात वन बीएचके आहे, तो सेल करून मी थोडा मोठा वन बीएचके शोधतोय, वगैरे…
त्यांचा पहिला प्रश्न होता, की - व्हेज की नॉन व्हेज…
हा प्रश्न मला अपेक्षित होता आणि त्यावर मी माझ्या मराठी बाण्याला अनुसरून उत्तर दिलं की मी महाराष्ट्रीयन आहे, आणि मांसाहारी आहे… त्याच्या पुढचं जे उत्तर त्यांच्याकडून मिळालं ते थोडं भयावह होतं…
त्यांच्या सेल्स टीमने म्हंटलं की सर, बी-विंगमध्ये हे तीन फ्लॅट अवेलेबल आहेत… इथे तुमच्या आजूबाजूला महाराष्ट्रीयन लोकच असतील. त्यामुळे तुम्हाला पण बरं पडेल…
मी मुद्दाम म्हंटलं की मला रेफ्युजी फ्लोअरवरचा फ्लॅट हवा असेल तर… तर ती म्हणाली नाही सर, आमच्याकडे व्हेज फ्लोअर आणि नॉनव्हेज फ्लोअर अशी विभागणी आहे. व्हेज फ्लोअरवर कोणीच महाराष्ट्रीयन नाहीत… आणि रेफ्युजी फ्लोअरवरच्या फ्लॅटला जास्त मागणी असते, तो आमचा व्हेज फ्लोअर आहे.
मी म्हंटलं की मला बी विंग नकोय, कारण त्याला एवढा चांगला व्ह्यू नाही… मला ए विंगमध्ये नॉनव्हेज फ्लोअरवरचा फ्लॅट दाखवा…. त्या संपूर्ण विंगमधील फ्लॅट्सना चांगला व्ह्यू आहे… त्यावर तिचं उत्तर होतं, की ती संपूर्ण विंग जैन, मारवाडी, गुजराथी लोकांसाठीच राखीव आहे… नॉनव्हेज फ्लोअर फक्त बी विंग मध्येच आहेत. म्हणजे बघा की आता कशी विभागणी करत आले आहेत.
( तात्पर्य- आता इमारतीमध्ये फ्लॅट्स नाकारता येत नाही म्हणून ही योजना काढली आहे, की व्हेज फ्लोअर आणि नॉनव्हेज फ्लोअर ) आणि ज्या चाळींच्या जागेवर ह्या इमारती उभ्या आहेत, त्यात जुन्या रेसिडेंट्सना मागच्या बाजूला टाकण्यात येते आहे. ) म्हणजे आमच्या जागेवर आम्हाला अडगळीत किंवा आमच्याच जमिनीवर आम्ही परके…
—--
उपनगरात सर्रास असते तशी गिरगावात आतापर्यंत कधी एसआरए टाईप इमारतीच्या रचना नव्हत्या. रिडेव्हलपमेंट होताना गिरगावातला स्वाभिमानी मराठी माणूस बिल्डरकडे स्पष्ट सांगायचा की इमारत एकच बनेल. आणि तुझे सेलचे फ्लॅट आणि आमचे रिडेव्हलपमेंटचे फ्लॅट दोन्ही विंगमध्ये विभागून असतील. ( जसे आम्ही आमच्या इमारतीचे रिडेव्हलपमेंट होताना सांगितले, आणि आमच्या बिल्डरनेही ऐकले ) पण सध्या गिरगावात एक बिल्डर आलाय झुलेवा नावाचा. ( नाव बदललंय… ) गिरगावातली प्रसिद्ध आणि उच्चभ्रू समजली जाणारी स्वामी समर्थ नगर सोसायटी, पूर्वीची चंपावाडी, इथल्या लोकांनी त्याच्यासोबत कसं काय डील केलं काय माहिती… पण त्याने जुन्या रेसिडेंटची एक वेगळी इमारत बांधली… आणि उर्वरीत मोठ्या जागेवर त्याला सेल टॉवर बांधला… हे अविश्वसनीय आहे… त्या जुन्या रेसिडेंटच्या इमारतीची बांधणी त्याने टिपीकल एसआरएच्या इमारतीसारखी केली आहे… हे का सहन करतोय आपण…
माननीय मुख्यमंत्री ( त्यांच्या ठरलेल्या मोठ्या आवाजातल्या शैलीत रेकून ) म्हणतात - गिरगावातल्या मराठी माणसांना आम्ही घर दिलं…
अरे सॉरी बॉस… तुम्ही घर नाही दिलं… ती जमीन आमचीच होती… तुम्ही घरं दिलंत हे वारंवार सांगून उगाचच आम्हाला उपकृत भावनेत ढकलायचा प्रयत्न करू नका…
हे तर गिरगावातल्या मराठी माणसाने म्हणायला पाहिजे की आमच्या घरांच्या जागेवर तुमच्या बिल्डरांनी इमारती बांधून तुम्हाला पार्टी फंड दिला. आणि त्या पार्टी फंडवर तुम्ही तुमचे पक्ष आणि मतदारसंघ बांधलेत…
महत्त्वाचे - आमच्या इमारतीत आम्ही सर्व गुजराती जैन मारवाडी गुण्या गोविंदाने आणि एकमेकांचा आदर ठेऊनच नांदतो. पण हा आदर मराठी माणसानेच टिकवला पाहिजे…
By Kamlesh Deorukhkar
Baba retweeted
मुंबई तकच्या या दोघांचे खरं तर मनापासून आभार.....
सगळे न्युज चॅनल आणि पत्रकार विकलेले आहेत अशा उघड चर्चा घडत असताना तुम्ही दोघं त्यांना आपल्या पत्रकारितेतून दाखवून देत आहात की नाही! सगळेच विकलेले नाहीत!
पत्रकार हा नेहमी विरोधी असावा तो जनतेचा हक्काचा आवाज असावा याला तुम्ही कटीबद्ध दिसता. ज्या निर्भीडपणे तुम्ही भिडत आहात ते पाहून समाधान वाटतं.
सध्या विरोधी आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी कोणत्या स्तराला जातील याची कल्पना करणे कठीण आहे. पण पत्रकारिता हे डरपोक लोकांचं काम नाही यावर मीही ठाम आहे! अनुजा धाक्रस @AnujaDhakras21 आणि अभिजीत कारंडे @AbhijitKaran25 दोघांचेही आभार आणि शुभेच्छा 🙏
Baba retweeted
उद्याची निवडणूक – काही नोंदी
होणार.. होणार.. होणार.. असं ज्यांच्याबद्दल गेली तीन-साडेतीन वर्षे बोललं गेलं, त्या महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या होत आहेत. या निवडणुकीत सर्वसामान्य नागरिक म्हणून मी भाजपला मतदान करणार नाही, हे स्पष्टच आहे. २०१४ सालापासून – म्हणजे या देशाला तथाकथित नवं स्वातंत्र्य मिळाल्यापासून, संघपरिवारातील लोकांनी जो उन्माद केला आहे, त्याचं एक रूप महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारातही दिसलं आहे. भाजपने निवडणूक आयोग आणि न्यायालयाच्या मदतीने दोन पक्ष फोडले, कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून आमदार, खासदार, नगरसेवक विकत घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांची आमिषं दाखवून आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणले आणि प्रातिनिधिक लोकशाहीच्या तत्त्वालाच काळिमा फासला. अर्थात हे पाप एकट्या भाजपचं नाही. तोतया शिवसेना आणि भावकीतील राष्ट्रवादी या दोन पक्षांचाही या पापात तितकाच वाटा आहे.
मोदी आणि शाह यांच्या हिंस्र राजवटीमुळे भारताचं रूपांतर निवडणुका घेणाऱ्या हुकूमशाहीत झालं आहे. जैन, गुजराती, मारवाड्यांचं भांडवल आणि गायपट्ट्यातील हिंदू व मुसलमानांची बुरसटलेली मानसिकता यांचा समसमा संयोग झालेली ही हिंदुत्वाची विचारसरणी आणि राजकीय ताकद तिचं मूळ रूप ब्राह्मणी असलं तरी, आता बहुजनांच्या खांद्यावर आहे आणि त्यामुळे हा देश अधिक वेगाने गर्तेत जातो आहे.
लोकसभा निवडणुकीत ‘चारसौ पार’ची अपेक्षा बाळगणाऱ्यांना मतदारांनी २३६ वर आणून थांबवलं. त्यामुळे विधानसभेतसुद्धा बरं चित्र राहील अशी अपेक्षा होती. पण अचानक आलेली वाढीव मतदारांची सूज, संध्याकाळी सहा नंतर झालेलं गोंधळातलं मतदान आणि अद्याप ज्याची नीट कारणमीमांसा करता आली नाही असा मशीनमधला झोल – या सगळ्यांच्या एकत्रित परिणामांमुळे महायुतीला पाशवी बहुमत मिळालं. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांची भीड अजूनच चेपली आहे.
गेल्या वर्षभरात फडणवीस आणि त्यांच्या इन्फ्रा टोळीने नुसता जाहिरातींवर खर्च केलेला पैसा बघितला तर, एखाद्या जिल्ह्याचा संपूर्ण विकास होऊ शकेल इतकी ती रक्कम आहे. जवळपास सगळी आयएएस, आयपीएस लॉबी बगलेत मारलेली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले तर माध्यमांनी शरणागती पत्करली आहे किंवा सरकारच्या तालावर नाचायचे ठरवले आहे. पदं, मानधन आणि पुरस्कारांचे भुकेले असणारे अभिजन सरकारच्या दारात गोंडा घोळत फिरत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला आता आपला वारू कोणीच रोखू शकणार नाही असं वाटल्यास नवल नाही.
तरीही मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महानगरपालिकांमध्ये विरोधकांनी बऱ्यापैकी वातावरण निर्मिती केली आहे. गेल्या वर्षभरात तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात मराठी अभ्यास केंद्र आणि इतर कार्यकर्त्यांनी जे आंदोलन उभं केलं, त्याचा परिणामस्वरूप फायदा शिवसेना व मनसे या मराठीवादी पक्षांना झाला आहे, हे स्पष्टच आहे. या दोन पक्षांनी आजवर जे मराठीचे राजकारण केले त्याच्या पलीकडे जाणारे ‘महाराष्ट्रधर्मावर आधारित मराठीकारण’ म्हणजे मराठीचे पर्यायी संस्कृतिक राजकारण उभं राहण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एका अर्थाने हा संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा आहे. पण अशा लढ्यासाठी लागणारी राजकीय हत्यारं एका रात्रीत तयार होत नाहीत. त्यासाठी दीर्घकाळ मेहनत करावी लागते. गेले जवळपास वर्षभर महाराष्ट्राच्या विविध भागात दौरे करून या नव्या मराठीकारणाची बांधणी आम्ही करत आहोत.
काँग्रेस पक्षाने तथाकथित भाषानिरपेक्ष भूमिका न घेता काही प्रमाणात का होईना मराठीधार्जिणी भूमिका घेणं, डाव्या पक्षांनी मराठी भाषेच्या लढ्यात पुन्हा उतरणं, दोन्ही ठाकरे बंधूंनी हिंदुत्वाच्या राजकारणापासून दूर सरकून मराठीच्या राजकारणाची कास धरणं – यातल्या अनेक गोष्टी मराठीकारणाच्या चळवळीमुळे घडल्या आहेत, हे कोणालाही नाकारता येणार नाही.
कोणत्याही लढाईमध्ये नजीकच्या काळातील भूमिका आणि दूर पल्ल्याची भूमिका यात फरक करावा लागतो. येत्या २५–५० वर्षांतलं महाराष्ट्रधर्माचं राजकारण आम्ही कार्यकर्तेच उभं करणार आहोत. पण उद्याची लढाई अगदीच जवळची आणि तितकीच निकराची आहे. शिवसेना आणि मनसे या पक्षांशी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून आमचे मतभेद आहेत. उदा. हिंदुत्वाच्या राजकारणापासून संपूर्ण फारकत घेतल्याशिवाय भाषेचं राजकारण उभं राहू शकत नाही. तसंच ते प्रतीकात्मक आणि प्रतीक्रियात्मक स्वरूपाचं राहिलं तर फार काळ टिकणारही नाही. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मराठी शाळा टिकल्याशिवाय मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रधर्म यातलं काहीच टिकू शकणार नाही. हे आम्हाला स्पष्टपणे कळतं म्हणूनच भाषेच्या चळवळीत आम्ही मराठी शाळांना केंद्रस्थानी ठेवतो. तसंच आम्ही हिंदुत्वाच्या आडून केलं जाणारं धर्माचं राजकारणही ठामपणे नाकारतो. आजवर कधी भाषेचं तर कधी धर्माचं राजकारण करणाऱ्या शिवसेना आणि मनसेच्या या बाबतीतल्या भूमिकांना आम्ही कसून विरोध केला आहे आणि यापुढेही करत राहू.
मात्र हे मतभेद आहेत म्हणून भाजप आणि महायुतीतील पक्षांना आणि त्यांच्या महाराष्ट्रद्रोही राजकारणाला स्वीकारणं अजिबातच शक्य नाही. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीत आपण शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या उमेदवारांना मतदान करावं ही विनंती आहे. या पक्षांना सत्ता मिळाली आणि त्यांनी मराठी शाळांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यालाही रस्त्यावर उतरून विरोध करू. पण केवळ पैशांच्या आणि धाकदपटशाच्या जिवावर महाराष्ट्राचं मातेरं करणाऱ्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही, हे मात्र आपण सगळे ठरवूया.
जय मराठी… जय महाराष्ट्र…
आपला,
दीपक पवार
(मराठी अभ्यास केंद्र)
Baba retweeted
Replying to @RajThackeray
Baba retweeted
आज, ११ जानेवारी २०२६ रोजी शिवतीर्थ दादर येथे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवशक्तीची जाहीर सभा पार पडली. या सभेत माझे व शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.
माझ्या भाषणातील प्रमुख मुद्दे -
- आज या क्षणाला आम्ही दोन भाऊ एकत्र आल्यानंतर आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि माँ. मिनाताई असायला हवे होते.
- गेले अनेक दिवस मराठीच्या या लढ्यात आम्हाला दीपक पवार व त्यांचे सहकारी, टेलिव्हिजन चॅनल्सचे पत्रकार आणि संपादक यांसारख्या अनेकांनी मदत केली त्यांचे मनःपूर्वक आभार!
- मी आणि उद्धव आम्ही एकत्र येण्याचं मूळ कारण म्हणजे या मुंबईवर आलेलं संकट.
- अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली.
- भाजपचे ६६ जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे ६६ ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत.
- तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून?
- सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
- जगामध्ये अदानींप्रमाणे १० वर्षांत इतक्या मोठ्या प्रमाणात श्रीमंत झालेला दुसरा माणूस नसेल.
सरकारची एकट्या अदानींवर इतकी मेहरबानी का?
- वाढवणला बंदर येतंय ठीक आहे. पण विमानतळ कशासाठी तर, सगळे कार्गो वाढवणला नेणार आणि मुंबई विमानतळावरची सगळी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं नवी मुंबईत हलवणार आणि नंतर मुंबई विमानतळाची जमीन विकायला काढणार.
- आधीपासून त्यांच्या डोक्यात आहे मुंबई गुजरातला न्यायची. त्यासाठी पालघरचा जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्हा आणि एमएमआर परिसराचा भाग ताब्यात घ्यावा लागेल आणि नंतर मुंबई गुजरातला जोडून घेणं सोपं होईल.
- एकदा मुंबई हातातून गेली तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाहीत हे.
- देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी भुजबळांना जेलमध्ये टाकलं होतं. अजित पवारांविरोधात बैलगाडीभरून पुरावे फडणवीसांनी सादर केले आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलेत. आणि आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताय?
- काल उत्तर भारतातला एक माणूस बोलला, मुंबई महापालिकेत नोकऱ्या द्यायच्या असतील तर इथल्या उत्तर भारतीयांना दिल्या पाहिजेत, बाहेरून कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून येणाऱ्यांना कशाला द्यायच्या. आमच्या कोल्हापूर, सातारा, सांगलीतून येणारी लोकं बाहेरची झाली?
- तुम्ही मराठी म्हणून एकत्र येता कामा नये म्हणून यांचा हा खेळ सुरू आहे.
- मराठी माणसाला एकटं पाडण्यासाठी हा डाव रचला जातोय. पण एकटे असलो तरी बास आहोत.
- माझा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण तुम्ही आमच्यावर लादणार असाल तर लाथच मारू.
- हिरे, मोती, सोनं, चांदी व अन्य कितीही मौल्यवान वस्तू असतील तरी फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हंटलंय कारण तीच खरी संपत्ती आहे. जर जमीन तुमच्या हातातून गेली तर तुमचे अस्तित्व संपते.
- ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात तर मुकलात म्हणून समजा.
- माझं इतर पक्षांतील मराठी माणसांनाही आवाहन आहे. सोडा ते सगळं मराठीसाठी एक व्हा, महाराष्ट्रासाठी एक व्हा.
- ही मुंबई, हा महाराष्ट्र मराठी माणसाच्या हातात रहावा, तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते.
- जो लढा आजवर मराठा साम्राज्याने दिला तो लढा आता आपल्याला उभा करायचाय. हा महाराष्ट्र वाचवायचाय, महाराष्ट्र समृद्ध करायचाय, ही मुंबई आपल्याला वायचायचीये यासाठी आपण कामाला लागाल अशी अपेक्षा करतो.
- 'हिंदीची सक्ती राष्ट्रीय एकतेसाठी घातक ठरेल हे सत्य कोणीही लपवू शकत नाही' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे किती घातक आहे हे तेव्हाच लिहून ठेवलंय.
Baba retweeted
महाराष्ट्रासाठी फक्त ठाकरेच…!!!
@mnsadhikrut @RajThackeray @mnsreport9
#MNS #BMCElections #BMC #Election2026 #Thackeray_Ray_of_hope






















