Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) header
Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare) profile picture

जिल्हाध्यक्ष - BJP south central mumbai

Joined September 2016
Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)Photo by Niraj Ubhare - निरज उभारे (@nirajubhare)
नवनवीन शोध, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होते. चला, विज्ञानाचा सन्मान करूया आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊया. आपल्या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवून त्यांना विज्ञाननिष्ठ   नागरिक करूया. सर्वांना जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!   #WorldScienceDay #ScienceForPeaceAndDevelopment #ScientificTemper #FutureGenerations  @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
11
बलिप्रतिपदेचा हा पावन सण म्हणजे बळीराजाच्या औदार्याचा, समृद्धीचा आणि सुराज्य निर्मितीच्या संकल्पाचा प्रतीक आहे. शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यातील सर्व संकटे व ईडा-पीडा दूर होऊन सर्वांच्या जीवनात समृद्धीचे 'बळीराज्य' येवो, हीच प्रार्थना! दिवाळी पाडवा व बलिप्रतिपदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #DiwaliPadwa #BaliPratipada #Baliraja #Diwali2026 @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
26
अंधकारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर सत्याचा विजय होण्याचे प्रतीक म्हणजे दीपावलीचे हे पवित्र पर्व. नरकसुराच्या वधाचा हा दिवस आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि सदैव सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रगतीचा आणि न्यायाचा प्रकाश सदैव तेवत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! नरक चतुर्दशीनिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा! #NarakaChaturdashi #ChotiDiwali #Diwali2026 @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
26
दीपावलीचा अत्यंत पावन आणि तेजोमय क्षण म्हणजे 'लक्ष्मीपूजन'! आजच्या या मंगलप्रसंगी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीविष्णूंच्या असीम कृपेने सर्वांच्या घरात सुख, समृद्धी, उदंड आरोग्य आणि ऐश्वर्य नांदावे, हीच प्रार्थना! लक्ष्मीपूजनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #LakshmiPuja #Diwali2026 #LakshmiPujan #FestivalOfLights #ProsperityAndSuccess @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
3
59
आपल्या अगाध बुद्धिमत्ता आणि संशोधनाच्या जोरावर आशिया खंडात भौतिकशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे भारताचे थोर सुपुत्र सर सी. व्ही. रामन यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! त्यांनी लावलेल्या शोधांनी जगाला थक्क केलेच, शिवाय भारतीय विज्ञानाला जागतिक स्तरावर सर्वोच्च सन्मान मिळवून दिला. आपल्या मतदारसंघातील तरुण पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आणि नवनवीन संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारताचा वैज्ञानिक नावलौकिक वाढवणाऱ्या या महान शास्त्रज्ञाच्या पावन स्मृतीस त्रिवार प्रणाम! #SirCVRaman #CVRamanJayanti #NobelLaureate #IndianScience @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
2
34
कर्करोग हा आजार जरी गंभीर असला, तरी योग्य वेळी झालेले निदान आणि अत्याधुनिक उपचारांमुळे यावर पूर्णपणे मात करता येते. नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करणे आणि प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. आज 'राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिना'निमित्त स्वतःची आणि कुटुंबाची नियमित आरोग्य तपासणी करण्याचा संकल्प करूया. निरोगी राहा, सुरक्षित राहा! #NationalCancerAwarenessDay #CancerAwareness #EarlyDetection #PublicHealth #HealthFirst @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
37
मंगलमयी प्रकाशाचा आणि समृद्धीचा पावन उत्सव म्हणजे 'धनत्रयोदशी'! आजच्या या शुभप्रसंगी श्री महालक्ष्मी आणि कुबेर देवाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि भरभराट नांदावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना. धनत्रयोदशीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक मंगलमय शुभेच्छा! #Dhanteras #Dhanteras2026 #Diwali2026 #ProsperityAndSuccess @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
34
पडद्यामागची मेहनत आणि मंचावर सादर होणारा जिवंत अनुभव म्हणजे आपली समृद्ध मराठी रंगभूमी! सर्व नाट्य रसिक, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांना 'मराठी रंगभूमी दिन' निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा!  #MarathiRangbhumiDin #MarathiTheatre #StageLovers #Drama @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
46
गोमाता ही केवळ आपल्या श्रद्धेचे केंद्र नसून आपल्या समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. आपल्या संस्कृतीचे रक्षण, शेतकरी बांधवांचे कल्याण आणि गोवंशाचे जतन हीच आपली खरी प्राथमिकता आहे. वसुबारसच्या या पवित्र पर्वावर गोमातेचे पूजन करून दीपावलीचा मंगलमय शुभारंभ करूया. वसुबारसनिमित्त सर्व बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा! @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
2
24
पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याची मशाल चेतवून इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणारे सशस्त्र क्रांतीचे जनक, आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम! #VasudevBalwantPhadke #RevolutionaryHero #JayantiWishes @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
33
जय श्रीराम! बीपीटी कॉलनी, नाडकर्णी पार्क येथे आयोजित भव्य रामलीला महोत्सवास सदिच्छा भेट दिली. ‘रामलीला’ भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्रावर आधारित या पारंपरिक नाट्यप्रयोगातून रामायणातील विविध प्रसंग सादर केले जातात. प्रभू श्रीरामांच्या आदर्श जीवनप्रवास, सत्य, धर्म, मर्यादा, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेची शिकवण या कलाकृतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचते आहे. अधर्मावर धर्माचा, असत्यावर सत्याचा आणि वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय हाच रामलीलेचा मूलभूत संदेश आहे. अशा सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांमुळे आपल्या समृद्ध भारतीय परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होते. या सुंदर भक्तिमय कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन! #BPTColony #NadkarniPark #mumbaiEvents #Pune #CulturalHeritage @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
3
48
मशीनमध्ये नाही, तर काँग्रेसच्या विचारात आणि नेतृत्वात बिघाड आहे! प्रत्येक निवडणुकीच्या पराभवान्यानंतर ईव्हीएमवर खापर फोडणे हे काँग्रेसचे ठरलेले नाटक असते. परंतु, पारदर्शक निवडणूक प्रक्रियेचे सत्य संपूर्ण देशासमोर आहे: -मतदानापूर्वी कडक तपासणी आणि मॉक पोल -दोन वेळा ईव्हीएमचे 'रँडमायझेशन' केले जाते. -ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांची पडताळणी होते. -सर्व पक्षांसमोर 'मॉक पोल' घेतला जातो. जनतेचा कौल स्वीकारण्याची हिंमत नसलेले लोक जेव्हा लोकशाही प्रणालीवर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा त्यांचे सत्य जनतेसमोर आणणे गरजेचे असते. #BJP #EVM #RahulGandhi #IndianPolitics #Democracy @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
20
प्रभादेवी येथे भाजपा दक्षिण मध्य मुंबई गुजराती सेलचे उपाध्यक्ष श्री. जयेश छेडा यांनी दिवाळीनिमित्त फराळ साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजकांचे कौतुक केले. दिवाळीच्या सणानिमित्त समाजातील नागरिकांपर्यंत आनंद आणि आपुलकी पोहोचविण्याचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. यावेळी भाजपा मुंबई पदाधिकारी सचिन शिंदे, बबन तोडणकर, राजेंद्र दर्वणकर तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व आयोजक आणि कार्यकर्त्यांचे या सामाजिक उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा! #bjpmumbai @Dev_Fadnavis @AmeetSatam @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
3
48
युवाशक्तीच्या अभिव्यक्तीला व्यासपीठ! मुंबईतील अँटॉप हिल येथे मुंबई भाजयुमोच्या दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने आयोजित ‘संपर्क – वक्तृत्व स्पर्धा’ या कार्यक्रमाला उपस्थित राहून युवा स्पर्धकांशी संवाद साधला तसेच त्यांना संबोधित केले. यावेळी आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, मुंबई भाजयुमो अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी, जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप सिंह धाम जी व श्री. लोरिक यादव जी, दक्षिण मध्य मुंबई जिल्हा भाजयुमो प्रभारी तथा मुंबई भाजयुमो सरचिटणीस सौ. स्नेहा वेमुलकर जी आणि जिल्हाध्यक्ष श्री. सुनील धरिया जी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
1
3
24
भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम जी यांच्या नेतृत्वात ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ हा संकल्प घेऊन ०२ नोव्हेंबर रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. चला मुंबईकर, SIR च्या समर्थनार्थ आपला आवाज बुलंद करूया आणि लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या या अभियानात सहभागी होऊया! स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते कामगार कल्याण मंडळ मैदान वेळ : दुपारी ०३.०० वाजता #SaveDemocracyRemoveAnarchy @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
16
राष्ट्रचिंतन बौद्धिक संवाद कार्यक्रमात सहभाग! चेंबूर विधानसभा आयोजित ‘राष्ट्रचिंतन बौद्धिक संवाद’ या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांशी विविध राष्ट्रीय आणि विकासात्मक विषयांवर संवाद साधला. यावेळी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा तसेच देशवासीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा मांडला. त्याचबरोबर २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीची संकल्पना, देशाची प्रगती आणि भविष्यातील विकासाची दिशा या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रनिर्माण, विकास आणि सक्षम भारताच्या संकल्पनेवर आधारित अशा बौद्धिक संवादातून विचारांची देवाणघेवाण होणे निश्चितच महत्त्वाचे आहे. याप्रसंगी जेष्ट नेत्या कांताताई नलावडे, नगरसेवक महादेव शिवगण , जिल्हा महामंत्री संदीप सिंह धाम,तसेच सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प, समर्थ भारताचा ध्यास! #RashtraChintan #ViksitBharat2047 #NarendraModi #BJP #Dharavi #NationBuilding @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
2
27
राष्ट्रचिंतन बौद्धिक संवाद कार्यक्रमात सहभाग! धारावी विधानसभा आयोजित ‘राष्ट्रचिंतन बौद्धिक संवाद’ या कार्यक्रमास उपस्थित राहून उपस्थितांशी विविध राष्ट्रीय आणि विकासात्मक विषयांवर संवाद साधला. यावेळी आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा तसेच देशवासीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा मांडला. त्याचबरोबर २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठीची संकल्पना, देशाची प्रगती आणि भविष्यातील विकासाची दिशा या विषयांवर आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रनिर्माण, विकास आणि सक्षम भारताच्या संकल्पनेवर आधारित अशा बौद्धिक संवादातून विचारांची देवाणघेवाण होणे निश्चितच महत्त्वाचे आहे. याप्रसंगी आमदार कॅप्टन आर. तमिळ सेल्वनजी, जिल्हा महामंत्री संदीप सिंह धाम, लोरिक यादव, आनंद भंडारी, मंडळाध्यक्ष रमेश नाडर, मनीषा खंदारे, अरुण जयस्वाल तसेच सर्व पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. विकसित भारताचा संकल्प, समर्थ भारताचा ध्यास! #RashtraChintan #ViksitBharat2047 #NarendraModi #BJP #Dharavi #NationBuilding @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
23
भारताची अंतराळातील यशस्वी घोडदौड सुरूच! 'बिल्ट इन इंडिया' आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या जोरावर भारताने आणखी एक मोठी मजल मारली आहे. GSLV-F18 च्या यशस्वी प्रक्षेपणाने देशाच्या स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टीमला नवी ऊर्जा दिली आहे. आपल्या शास्त्रज्ञांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! #AtmanirbharBharat #SpaceSuccess #NavIC #ISROUpdates @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
12
दृढ इच्छाशक्ती, निर्णयक्षमता आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. भारताच्या या लोहपुरुषाला जयंतीनिमित्त सादर नमन! @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Mumbai #bjpmumbai #bjpmahararashtra
24
आज चेंबूर विधानसभा क्षेत्रातील मैसूर कॉलनीचे चेअरमन तथा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी श्री. गुरुदास पै जी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांची आपुलकीने विचारपूस केली. प्रदीर्घ आजारपणावर यशस्वी मात करून श्री. गुरुदास पै जी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने पक्षकार्यात सक्रिय होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'आयुष्याचा पुढील संपूर्ण प्रवास भारतीय जनता पार्टीच्या सेवेसाठी समर्पित असेल', ही त्यांची भावना आपल्या सर्वांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अशाच निष्ठावान, समर्पित आणि जिद्दी कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठिंब्यावरच भारतीय जनता पार्टीचे संघटन अहोरात्र बळकट होत आहे. श्री. गुरुदास पै जी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! यावेळी भाजप जिल्हा प्रभारी श्री. महेश पारकरजी आणि इतर प्रमुख जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. #NirajUbhare #Chembur #MysoreColony #BJPMumbai #GurudasPai #MaheshParkar @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @BJP4Mumbai @BJP4Maharashtra
28