Deepak Khalde retweeted
जाहीर निषेध❌
पुण्यात रॅपिडो बाईक सुविधा बंद करून सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचे काम केले आहे 🫤
आधीच रिक्षावाल्यांची मुजोरी👎🏻
कॅब चे अवाढव्य भाडे⏫
यात बाईक टॅक्सी 🏍️अनेकांच्या खिशाला परवडत होती. पण सामान्य जनतेचे सरकारला देणेघेणे असेलच कसे?
किती दिवस वाहतूक संघटनेच्या हप्त्यावर जगणार?
Deepak Khalde retweeted
सरकारी नोकरीच्या नावाखाली भरभक्कम पगार वेळेवर खात्यात जमा होतो, नोकरीची सुरक्षितता असते, प्रवासाचा खर्च खिशाला किती चटका देतो याचं गणित रोज मांडावं लागत नाही...मग सामान्य माणसासाठी ₹50 आणि ₹150 मधला फरक किती मोठा असतो, हे कसं कळणार?
Rapido सारखी सेवा कुणासाठी फक्त मोबाईलमधलं एक App असेल...पण सामान्य प्रवाशासाठी ती कमी खर्चात, कमी वेळेत आणि सहज उपलब्ध होणारी प्रवासाची सोय आहे.
नियम मोडले? कारवाई करा.
Licence नाही? Licence घ्यायला लावा.
Safety चा प्रश्न आहे? नियम आणखी कडक करा.
पण आपल्या व्यवस्थेकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकच का असतं...
“बंद करा!”
वाहतूक कोंडी कमी करता येत नाही...पण पर्याय बंद करता येतो.
सार्वजनिक वाहतूक प्रत्येक ठिकाणी पोहोचवता येत नाही...पण उपलब्ध पर्यायाला ब्रेक लावता येतो.
वा रे व्यवस्था! 👏
AC ऑफिसमध्ये बसून फाईलवर सही करण्यासाठी काही सेकंद लागतात... पण त्या एका सहीनंतर रस्त्यावरच्या सामान्य माणसाला किती जास्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो, हे कदाचित त्या फाईलमध्ये लिहिलेलं नसतं.
व्यवस्था सामान्य माणसासाठी आहे;
सामान्य माणूस व्यवस्थेसाठी नाही.
आणि नियमांचा उद्देश लोकांची सोय सुरक्षित करणे असावा, लोकांची सोयच बंद करणे नव्हे!
Visual Credit: Saam Tv
Deepak Khalde retweeted
🚨पेपर कसा फुटला: 💣💣
😎😎😎अवर सचिव अभिजीत गणपतराव लेंडवे यांच्याकडून MPSC Group B Pre 2025 चा
🫡🫡🫡Master पेपर , ASO विश्वेश्वर नकाते यांच्याकडे गेला , नकातेकडून ASO गोपाल मराठे
😱😱😱मराठे कडून यातला दलाल भैरवनाथ कदम यांच्यापर्यंत पेपर पोहचला.
😎😎😎पुढे हा पेपर विजय साहेबराव किंगर आणि साजिद संदे यांच्यापर्यंत पोहचला आहे.
😜😜😜विजय किंगरने नंतर त्याच्या Girlfriend आणि मित्राला पेपर दिला ,
🤩🤩🤩किंगरच्या बाजूने हा पेपर असे पसरत पसरत अनेक जनांपर्यंत पोहचला.
😍😍😍त्यात ASO गोपाल मराठेचे 4 जानेवारी 2026 च्या Whatsapp Chat नुसार 8 जण सापडले आहेत.
😱😱😱आता हे 8 जण विजय किंगर सारखेच , जसे किंगरने पेपर GF ला आणि मित्राला दिला ,
😒😒😒तसंच या 8 जनांनी त्यांच्या मित्रांना दिला ,
🤫🤫🤫साजिद संदेपर्यंत ही हा पेपर आला होता.
😳😳😳 साजिद संदे देसाई अभ्यासिकेत अभ्यास करायचा तिथे त्याच्या मित्रांना पोहचला ,
🫡🫡🫡त्याचे मित्र याआधीही आणि आताही पेपरफुटीतूनच Class 1 and Class 2 आहेत , हे सर्व पुरावे SIT ला पोहचले आहेत.
😳😳😳तिथलाच एक Sport कोट्यातला उमेदवार त्याला MPSC Group B Pre चे Mark's 72.50 आहेत ,
😱😱😱आणि मेरिट लागलंय Sport चे 26.75 आणि ही परीक्षा सोडून त्याला इतर परीक्षांना 25 , 26 marks आहेत.
😅😅😅साजिद संदेचे पुन्हा देसाई अभ्यासिका Connection मध्ये संदीप खलाटे हे नाव समोर येत आहे ,
😜😜😜नंतर त्याच Group मध्ये MPSC Group B 2025 चे SubRegistar Connection सापडते.
😅😅😅यात त्याचे अनेक मित्र सापडणार जे ऑलरेडी Postholder ही आहेत.
👍👍👍यात आता सर्वांची नावे आणि पुरावे सर्व माहिती समोर आली आहे ,
🫡🫡🫡परंतु सर्व न सांगण्याचे कारण की अटकेतील उमेदवार सोडून इतर जणांची नावे घेतली तर ते पुरावे नष्ट करतील.
😜😜😜जसं ऋतुजा पाटीलने CID ला जवाब दिला होता की मी अभ्यास करून पास झाले , मी पेपर फोडला नाही , माझा मोबाईल हरवला आहे.
😜😜😜त्यामुळं सर्वांची नावे सांगितली नाहीत पण SIT ला ऋषी गांगुर्डे आणि ऋषी खैरनार यांनी सर्व पुरावे दिलेले आहेत.
🤩🤩🤩विजय किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख रुपये दिले होते.
😍😍😍त्यात 50 लाखात Drug Inspector फोडला आणि उरलेले 10 लाख किंगरला परत केले.
🤩🤩🤩किंगरने पेपरफोडे Gang ला 60 लाख Group B साठी दिले होते परंतु सौदा फिस्कटला
🫡🫡🫡आणि किंगरला फक्तं DI आणि Group B Pre 25 पूर्वच भेटला .
😜😜😜सौदा बरोबर झाला असता तर किंगर आज DI सोबतच SubRegistar पण असता.
😎😎😎माझा प्राथमिक अंदाज हा आहे की या MPSC Group B 2025 कांडात 50 + जणांचा सक्रिय सहभाग आहे.
🫡🫡🫡हे प्रकरण खूप मोठं आहे परंतु शब्दांची मर्यादा आहे म्हणून पुर्ण प्रकरण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
@RRPSpeaks
@mpsc_office
@LoksattaLive
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
©️MPSC wallah
Deepak Khalde retweeted
सर्व मानसिक त्रासावर एकच रामबाण उपाय हवा आहे का ?
माइंडफुलनेस.
आनंद ह्या क्षणात आहे व तो सतत नव्याने अनुभवता येतो.
#सुप्रभात
Deepak Khalde retweeted
Mumbai IIT Prof Suryanarayana Doolla who faces arrest under SC/ST Act after catching a downtrodden student for allegedly copying in exam... doesn't deserve sympathy.
Look at his Bio & realise how he "deserves" arrest.
👉Qualifications:
-Professor at IIT Bombay (Energy Science & Engineering Dept), working in power electronics and power systems.
-B.Tech in Electrical Engineering
-M.Tech in Energy Systems Engineering, IIT Bombay
-Ph.D. in Power Systems, IIT Delhi
👉Earlier roles:
Machine 2 Machine, Hyderabad (2006–2008) and Power Research and Development Consultants, Bangalore (2009), before joining IIT Bombay.
👉Admin responsibilities at IIT Bombay:
-Dean (Student Affairs), March 2023 – present
-Organizing Chairman, JEE (Advanced) 2022
-Organizing Chairman, CEED / UCEED 2021
-Vice Chairman [JEE (Advanced), UCEED, CEED], 2020–2021
-Vice Chairman [UCEED, CEED], 2020–2021
👉Honors and awards:
-Prof. S. P. Sukhatme Excellence in Teaching Award, September 2021, IIT Bombay
-Best Paper Award, IEEE TPEC 2021, USA
-Outstanding Editor, 2019, 2018 and 2017, ITEES, Wiley
-Best Associate Editor, 2018, IEEE JESTPE
-Third Paper Prize Award, 2017 IEEE IAS Annual Meeting, Cincinnati, USA
-Bhaskara Advanced Solar Energy Fellowship, 2017
-Excellence in Teaching Award, 2017, DESE, IIT Bombay
-Visiting Faculty, 2016, Linnaeus-Palme International Exchange Program
-Young Faculty Award, 2009, IIT Bombay
👉Research interests
-Smart grids / microgrids
-Active distribution networks
-Converter topologies and control
-Grid integration of distributed energy resources
-Real-time simulation and emulation -Protection in inverter-based active distribution networks
Ab batao, isn't he just a criminal minded person who has all the time world to throw casteist slurs at an "innocent" student?
Anyway, Prof Suryanarayana has now resigned.
I'm sure Indian education system is on very correct path. Just a few few more reforms like "Right to Copy" are needed. I'm sure Govt will do that too in students' interest.
Deepak Khalde retweeted
महाराष्ट्र तसेच देशभरात प्रत्येक भागाची आपली आपली परंपरा अन संस्कृती असते, कोकणातील काही भागात गौरी सणाला मांसाहार नैवद्य केला जातो, अनेक देव-देवतांच्या नावाने मांसाहार होतो. शाकाहारी लोकांनी शाकाहारचे धार्मिक अवडंबर माजवले नाही पाहिजे…
Not resolved @navalMH – at Pune, India
Replying to @khalde_deepak @MDNagpure @CleanKharadi @IndiansOnTheGo @Kshitij_KRA @ComplaintsPune @mohol_murlidhar @aaplasurendra @PMCMCO
महोदय / महोदया,
आपली बांधकामाबाबतची तक्रार पुणे महानगरपालिकेकडे यशस्वीरित्या नोंदविण्यात आलेली आहे.
तक्रार टोकन क्रमांक : T70519
आपल्या तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या तक्रार निवारण पोर्टलला भेट द्यावी.
complaint.pmc.gov.in/inbox
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
पुणे महानगरपालिका
CM Devendra Fadnavis announces special drive and fresh notification to ban use of plastic flowers at festivals and banquet halls in Maharashtra
timesofindia.indiatimes.com/… / Mar 19, 202 – at Pune, India
– at Pune, India
Replying to @khalde_deepak @MDNagpure @CleanKharadi @IndiansOnTheGo @Kshitij_KRA @ComplaintsPune @mohol_murlidhar @aaplasurendra @PMCMCO
महोदय / महोदया,
आपली बांधकामाबाबतची तक्रार पुणे महानगरपालिकेकडे यशस्वीरित्या नोंदविण्यात आलेली आहे.
तक्रार टोकन क्रमांक : T70519
आपल्या तक्रारीची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी कृपया पुणे महानगरपालिकेच्या तक्रार निवारण पोर्टलला भेट द्यावी.
complaint.pmc.gov.in/inbox
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.
पुणे महानगरपालिका
Deepak Khalde retweeted
राज्यातील सगळे गुन्हेगार संपले आहेत फक्त एकच संतोष पंडित जो जनतेचे प्रश्न सरकारला विचारतो, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना भर रस्त्यावर नंबर प्लेटबद्दल विचारतो.
त्यामुळे अतिशय अपेक्षेप्रमाणे संतोष पंडित यांना मध्यरात्री १ वाजता अटक.
Well Done देवेंद्रजी 👏👏 – at Pune, India
@ – at Pune, India
गाडीवरच्या नंबर प्लेटवर चर्चा करणाऱ्यांनी एकदा पडळकर साहेबांच्या जनतेसाठी केलेल्या संघर्षाची 'प्लेट' वाचावी-हीच ती गाडी, हाच आमचा ब्रँड..!!💛
#MH10E007
#santoshpandit
Deepak Khalde retweeted
यापैकी दमदाटी,दिशाभूल करून घेतलेली प्रतिक्रिया कोणती वाटते ?
खुलेआम public place मध्ये घेतलेली की चारभिंतीच्या आत धमकावून घेतलेली ?
Deepak Khalde retweeted
पेण मध्ये उभारलेले छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प🤦
लाज वाटली पाहिजे होती हे शिल्प उभारताना...थोडं इतिहासाबद्दल ऋणी रहावं माणसाने..छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं याची जाण ठेवायला हवी होती.
शिल्प नसतं उभारलं असत तरी चालल असतं...पण असा अपमान करायची गरज नव्हती
Deepak Khalde retweeted
जंतर मंतर आंदोलनाचे खरे यश दीपके किंवा वांगचुक यांच्यासारख्या व्यक्ती नाहीत, तर
"नेहा बोरा"
आहे जी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील नाट्य आणि सादरीकरण अभ्यास या विषयातील २३ वर्षीय पीएचडी विद्यार्थिनी आहे.
उत्तराखंडमधील उधम सिंग नगर जिल्ह्यातील खतिमा येथील रहिवासी असलेली ती, गेल्या २३ दिवसांपासून जंतर मंतर येथे उपोषण करत होती; ती जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेची भावी अध्यक्ष आणि भारतीय राजकारणातील एक नवीन तारा असणार आहे.
तिची दृष्टी अत्यंत स्पष्ट, तिची भाषा निर्दोष आणि तिचे विचार शुद्ध आहेत.
कपिल सिबल यांच्या शोमधील तिच्या उपस्थितीपासून ते राहुल गांधींसोबतच्या पत्रकार परिषदेपर्यंत आणि तिच्या असंख्य मुलाखतींपर्यंत, प्रत्येक गोष्ट तिच्या यशस्वी उदयाची साक्ष देते...
भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
Deepak Khalde retweeted
अजितदादांनी बारामतीत कायमच कार्यक्षम अधिकाऱ्यांना आणून त्यांच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला. यापैकीच बारामती मेडिकल कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे हेही होते. परंतु त्यांच्या बदलीनंतर कार्यमुक्त होताना लोकांनी आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर ज्याप्रकारे फुलांची उधळण करुन निरोप दिला यावरून अजितदादांची निवड कशी योग्य होती, हेच दिसून येतं. आता कुणाच्या सांगण्यावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. – at Pune, India
Deepak Khalde retweeted
ऐंशी नव्वदेचा पत्रकारितेचा काळ होता. त्यातच एक मराठी पत्रकार लोकप्रभा कडून बिहारला गेला होता. तिथल्या राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील माफियांवर लिहिण्यासाठी.
जहानबाद, धनबाद, आरा, गोपालगंज सारख्या बाहुबलींच्या भागात तो पत्रकार वास्तव्यास होता. त्याचवेळी चंद्रशेखर यांचे सरकार पडून देशात मध्यावधी निवडणुका लागल्या होत्या.
त्याचवेळी जहानबाद येथील नौनवी गावात राज्याचे मुख्यमंत्री भेट देणार होते. त्यामुळे सर्व पत्रकार त्याठिकाणी जायला निघाले होते. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, एस. पी, काही मंत्री यांच्या ताफ्यामागे पत्रकारांची एक जीप होती. आणि पत्रकारांच्या जीप पुढे खासदार महेंद्र प्रसाद यांची लाल रंगाची जिप्सी चालली होती. इतक्यात ती लाल रंगाची जिप्सी थांबली. त्यातून एकजण खाली उतरला. आणि त्याने पत्रकारांची जीप आडवली. पण पत्रकारांनी दुर्लक्ष केलं, पण दुर्लक्ष करताच त्या माणसाने जीप च्या चालकाला खाली ओढले.
तेवढ्यात लाल रंगाच्या जिप्सी मधून खासदारांचा भाऊ उतरला. आणि त्याने पत्रकारांशी धक्काबुक्की करत त्यांचे कॅमेरा हिसकावून घेतले.
पत्रकारांनी गावात पोहचताच तिथं उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री यांच्याकडे त्या खासदार भावाची तक्रार केली. पण खासदारांचे नाव ऐकताच त्यांनी त्या गोष्टीकडे कानाडोळा केला. मग पत्रकारांनी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि एस. पी. यांची भेट घेतली.
एस. पी. त्या सर्व पत्रकारांना घेऊन खासदारांच्या लाल रंगाच्या जिप्सी जवळ घेऊन गेले. ती जिप्सी हत्यारांनी गच्च भरली होती. खासदार भावाच्या हातात मशीनगन होती. एस. पी. ला पाहून खासदाराच्या भावाने कॅमेरा मधील रोल ओढून काढला आणि कॅमेरा एस. पी. साहेबांच्या अंगावर फेकला.
तेव्हा पत्रकारांना ताबडतोब पोलिस संरक्षण देऊन पाटणा येथे पाठवण्यात आले. कारण डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांचे म्हणणे होते की, खासदाराच्या भावाचा भरवसा नाही. तो चिडला तर ह्या पत्रकारांसोबत काहीही करू शकतो.
सगळे पत्रकार निघून गेले. नौनवी गावात त्याच रात्री बराच नरसंहार झाला. पण एवढ होऊन सुद्धा एक निर्भीड पत्रकार सर्वांसोबत निघून न जाता तिथेच थांबला आणि साक्षीदार झाला त्या सर्व घटनेचा.
तो पत्रकार म्हणजे संजय राऊत...
- कपिल जाधव
@rautsanjay61 जी 🫡
Deepak Khalde retweeted
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड हे पंतप्रधानांच्या समवेत धार्मिक विधींमध्ये सहभागी होतात.
पण ही मंडळी तर त्याहूनही खालच्या पातळीवर उतरली आहेत; ते लंडनमध्ये मंत्र्यांसोबत बॅडमिंटन खेळत आहेत. हे खरोखरच अकल्पनीय आणि अशोभनीय आहे.
दिवसातील किमान १० तास एकत्र घालवणे न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत आणि पर्यटनस्थळांना भेटी देण्यापर्यंत या काळात प्रत्येक न्यायाधीशाशी कोणत्या प्रकारच्या चर्चा झाल्या असतील? याचे परिणाम किंवा त्यामागील अर्थ न समजणे म्हणजे केवळ मूर्खपणाच ठरेल.
लंडनच्या या नऊ दिवसांच्या दौऱ्यात, सरन्यायाधीशांसह ७५ न्यायाधीशांना केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतरच्या योजनांबद्दल माहिती दिली असण्याची दाट शक्यता आहे...या बदल्यात सरकारची काय अपेक्षा आहे, याचा सहज अंदाज लावला जाऊ शकतो.
मीनाक्षी नटराजन यांच्याबाबतचा निकाल हे याचेच एक उदाहरण आहे.
भारतात न्यायिक आचारसंहिता आणि घटनात्मक संकेत अस्तित्वात आहेत, न्यायिक आचारसंहितेनुसार, न्यायाधीश आणि भारताचे विद्यमान सरन्यायाधीश कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य होऊ शकत नाहीत, निवडणुकीचा प्रचार करू शकत नाहीत किंवा राजकीय वादांमध्ये जाहीरपणे कोणाची बाजू घेऊ शकत नाहीत.
न्यायिक आचारसंहितेअंतर्गत, न्यायाधीशांनी सार्वजनिक वादांपासून दूर राहणे अपेक्षित आहे आणि न्यायालयात सध्या सुरू असलेल्या किंवा भविष्यात सुनावणीसाठी येऊ शकणाऱ्या प्रकरणांवर त्यांनी सार्वजनिक भाष्य करू नये.
न्यायिक आचारसंहिता अशी अपेक्षा करते की न्यायाधीशांनी आपल्या निकालांनाच बोलू द्यावे आणि सामान्यतः प्रसारमाध्यमांना मुलाखती देणे टाळावे.
न्यायिक आचारसंहिता हे अनिवार्य करते की न्यायाधीशांनी असे कोणतेही वर्तन टाळावे ज्यामुळे जनतेच्या मनात न्यायव्यवस्थेच्या निष्पक्षतेबद्दल शंका निर्माण होऊ शकेल.
तुम्ही ही म्हण कदाचित ऐकली असेल:"न्याय केवळ झालाच पाहिजे असे नाही, तर तो झाल्याचे दिसलेही पाहिजे." हे न्यायिक आचारसंहितेचे मूलभूत तत्त्व आहे. न्यायिक आचारसंहितेनुसार, न्यायाधीशांना कायदेशीर, शैक्षणिक किंवा औपचारिक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई नाही; मात्र, अशा सहभागामुळे त्यांच्या निष्पक्षतेवर किंवा स्वातंत्र्यावर शंका निर्माण होता कामा नये. आता, न्यायमूर्ती शेखर यादव आणि न्यायमूर्ती स्वर्णा कांता शर्मा यांच्यापासून ते लंडनला गेलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ न्यायाधीशांपर्यंतच्या सर्वांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन या 'न्यायिक आचारसंहिते'च्या निकषांवर करून पहा.
निष्पक्षता दर्शवण्याऐवजी, हे सर्वजण निवृत्तीनंतरच्या सोयी-सुविधांची जुळवाजुळव करण्यातच व्यस्त असल्याचे दिसून येते...या नऊ दिवसांच्या काळात, न्यायाधीश आणि मंत्री यांच्यात मैत्री आणि जवळीक निर्माण होईल, ज्याचा परिणाम सरकारशी संबंधित खटल्यांमधील त्यांच्या निकालांवर होऊ शकतो.
अलाहाबाद उच्च न्यायालयात एकेकाळी न्यायमूर्ती जगमोहन सिन्हा होते; त्यांनी १९ मार्च १९७५ रोजी देशाच्या सर्वात शक्तिशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांना न्यायालयाच्या कठड्यात उभे केले होते आणि त्यांच्या पदाशी संबंधित कोणताही विशेष शिष्टाचार किंवा विशेषाधिकार त्यांना दिले नव्हते.
जेव्हा इंदिरा गांधी न्यायालयात आल्या, तेव्हा न्यायमूर्ती जगमोहन सिन्हा यांनी वकिलांना किंवा इतरांना त्यांच्या सन्मानार्थ उभे राहण्याची परवानगी दिली नाही; त्यामागे न्यायालयाच्या कक्षेत कायद्यासमोर सर्वजण समान आहेत, हा संदेश देण्याचा उद्देश होता. भारतीय इतिहासात पदावर असलेल्या पंतप्रधानांनी अशा प्रकारे न्यायालयात साक्ष देण्याची ही पहिलीच वेळ होती.
राजकीय दबाव किंवा पदाचा दरारा या कशाचाही प्रभाव न पडता, न्यायमूर्ती जगमोहन सिन्हा यांनी १२ जून १९७५ रोजी निकाल दिला आणि रायबरेलीतून झालेली इंदिरा गांधींची निवड रद्द ठरवली.
आजच्या काळात, राज्याशी संबंधित एखाद्या प्रकरणात सरकारविरुद्ध निर्णय घेण्याचे धाडस एखादा न्यायाधीश करू शकेल का? पंतप्रधानांविरुद्धचा निकाल ही तर कोणी कल्पनाही करू शकत नाही अशी गोष्ट आहे..
सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती न मिळताही ते आणखी 7 वर्षे अलाहाबाद उच्च न्यायालयात कार्यरत राहिले आणि १९८२ मध्ये निवृत्त झाले. त्यांचे पुत्र, निवृत्त न्यायमूर्ती विपिन सिन्हा यांच्या मते, त्यांना आपल्या निर्णयाबद्दल कधीही पश्चात्ताप झाला नाही वा त्यातून कोणताही वैयक्तिक लाभही त्यांनी मिळवला नाही; दीर्घ आजारानंतर मार्च २००८ रोजी अलाहाबाद येथे त्यांचे निधन झाले. या देशातील न्यायाधीशांची आणि पंतप्रधानांचीही ती पातळी होती, जानेवारी १९८० मध्ये पुन्हा पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधींनी त्यांच्याविरुद्ध कधीही सूड उगवण्याचा प्रयत्न केला नाही.
अन्यथा, न्यायमूर्ती लोयांचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आहेच.
भारतीय न्यायधीश #Repost





















