
Sr. Sub Editor and Reporter of @Lokmat Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar
Joined April 2011
- Tweets7K
- Following43
- Followers753
- Likes7.3K
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
दिवाळीचा प्रकाश रुग्णालयांतही उजळला! घाटी, जिल्हा रुग्णालय आणि शासकीय कर्करोग रुग्णालयात आकाशकंदील, विद्युत माळांनी सजावट करण्यात आली. डॉक्टर, परिचारिका यांनी सणाच्या दिवशीही रुग्णसेवेचे कर्तव्य बजावले. रुग्णांना खास दिवाळी भोजनाची मेजवानी देण्यात आली.#chhatrapatisambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
लहान वयातच मधुमेहाचे निदान झालेल्या चिमुकल्यांना आता उपचारांसाठी धावपळ करण्याची गरज भासणार नाही. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात ‘उडान’ संस्थेच्या पुढाकारातून बालमधुमेहींसाठी स्वतंत्र ‘टाइप-१ डायबिटिस स्पेशालिटी क्लिनिक’ सुरू झाले आहे. #chhatrapatisambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
✈️ सात हजारांचे विमान तिकीट, वर अडीच हजारांचा टॅक्सी खर्च!
नवी मुंबई विमानतळामुळे छत्रपती संभाजीनगरकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
#छत्रपतीसंभाजीनगर #विमानसेवा #मुंबई #नवीमुंबईविमानतळ #प्रवासी #महाराष्ट्र #Lokmat
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
एप्रिल २८, १८१९…
ब्रिटिश सैन्याधिकारी जॉन स्मिथ अजंठ्याच्या दाट जंगलात वाघाच्या मागावर होते. शिकार करताना अचानक लेनापूर परिसरातील डोंगररांगांमध्ये कोरलेल्या लेण्यांचे दर्शन त्यांना झाले. झाडाझुडपे दूर करत ते जेव्हा लेण्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा समोर उभे ठाकलेले अद्भुत दृश्य पाहून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.
तथागत गौतम बुध्दांच्या अप्रतिम शिल्पकृती, बौद्ध तत्त्वज्ञान प्रतिबिंबित करणारी चित्रे आणि शिल्पवैभव जगासाठी पुन्हा एकदा उजेडात आले त्या ऐतिहासिक क्षणाला आज २०७ वर्षे पूर्ण झाली. जिल्ह्याचे भूषण ठरलेल्या अजंठा लेण्या गेली दोन शतके देश-विदेशातील पुरातत्त्व तज्ज्ञ आणि पर्यटकांना आकर्षित करत आहेत. या वारशामुळे परिसरातील व्यापार आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळाली आहे.
आज गरज आहे ती लेण्यांपर्यंत दर्जेदार रस्ता बांधण्याची आणि हा अमोल सांस्कृतिक ठेवा जतन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची.
विशेष म्हणजे, जॉन स्मिथ यांचे पाचवे वंशज निवृत्त कर्नल मार्टिन स्मिथ आणि त्यांच्या पत्नी मार्गरेट यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) येथे येऊन अजंठा लेण्यांना भेट दिली होती. ही माहिती समजताच मी त्यांना आग्रहाने लोकमत भवनात आमंत्रित केले. मनमोकळ्या गप्पांमध्ये त्यांनी शहराच्या आदरातिथ्याचे मनापासून कौतुक केले.
“माझ्या पूर्वजांनी शोधलेल्या लेण्या आणि भारताचे एकंदर सांस्कृतिक वैभव पाहून मन भारावून गेले,” असे ते म्हणाले.
आज, या पुनर्शोधाच्या स्मृतिदिनी, त्यांच्याशी झालेल्या त्या संवादाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि मन भरून आले.
#AjantaCaves #JohnSmith
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
लोकमत छत्रपती संभाजीनगर आवृत्तीचा वर्धापन दिन माझ्यासाठी नेहमीच विशेष असतो. हर्ष, स्वप्नपूर्ती, कृतज्ञता, आणि भविष्याबद्दल प्रचंड आशावाद अशा अनेक भावना माझ्या मनात दाटून येतात. 'लोकमत'च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीच्या ४४ व्या वर्धापनदिनानिमित्त लोकमत परिवारातल्या माझ्या सर्व सदस्यांशी हितगुज साधताना आज चार दशकांहून जास्तीचा हा सर्व प्रवास माझ्या डोळ्यासमोर तरळून गेला. १९८१ साली मी जेंव्हा इथे आलो तेंव्हा पैसे, मनुष्यबळ आणि संसाधनांचा अभाव आमच्या समोर होता. माझ्याकडे शिदोरी होती ती 'लोकमत'चे संस्थापक बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन, विजयभैय्यांची खंबीर साथ आणि लोकमत परिवारातले माझे जीवाला जीव देणारे सहकारी. १९८२ ला याच दिवशी 'लोकमत'चा पहिला अंक प्रकाशित झाला तेंव्हा माझी संपूर्ण टीम होती अवघ्या ३५ लोकांची. मी त्यांना संस्थापक सदस्य म्हणेन. बऱ्याच जणांना कामाचा अनुभव नव्हता, कारकिर्दीची नुकतीच सुरवात होती पण सर्वांमध्ये एक समान धागा होता - मेहनतीची तयारी आणि काहीतरी जगावेगळे करून दाखवयाची जिद्द. 'लोकमत'ची उत्तरोत्तर प्रगती झाली यात मग आश्चर्य वाटायला नको. पुढे अनेक नवीन, समर्पित सदस्य जोडले गेले. 'लोकमत'ने नेहमीच लोकांच्या प्रश्नाला महत्व दिले, नवीन तंत्रज्ञान स्वीकारले, कालानुरूप वृत्तपत्रात बदल केले. सर्वांच्या सांघिक मेहनतीचे फळ म्हणजे आज लोकमत महाराष्ट्रातील गावागावात पोहोचलेले आघाडीचे दैनिक आहे. मला एका गोष्टीचे विशेष समाधान आहे. पुढील पिढी म्हणजे देवेंद्र, ऋषी आणि करण हे 'लोकमत'चा झेंडा डौलाने फडकवत ठेवण्यासाठी खूप परिश्रम घेत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डिजिटल पत्रकारिता हे नवे बदल स्वीकारत ते प्रिंटच्या व्यवसायालाही बळकटी देत आहेत. लोकमत परिवारातील सदस्यांना माझे फक्त एक सांगणे आहे - तेचतेच काम करण्यावर विश्वास ठेऊ नका, काहीतरी 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करा. यश निश्चितच मिळेल.
मराठवाड्यातील चोखंदळ वाचक, जाहिरातदार, आणि स्नेह्यांचे खूप खूप आभार. मी खरंच आपला ऋणी आहे. 'लोकमत'ला आपण आपला मानले, 'लोकमत'चे सर्व प्रयोग स्वीकारले, टीकाही केली, अनेक सूचना केल्या पण भल्या पहाटे लोकमत वाचल्याशिवाय आमचा दिवस सुरु होत नाही असे सांगणारे असंख्य वाचक मला नेहमी भेटतात. खूप खूप धन्यवाद..
@vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda
#Lokmat #ChhatrapatiSambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Listening to Papa on the 44th anniversary of Lokmat in Chhatrapati Sambhajinagar today was a moment to cherish for a lifetime. Not just for me, but for every member of the Lokmat family gathered at Lokmat Bhavan, it was truly mesmerising to hear about the humble beginnings of Lokmat on this very day in 1982-the many challenges and crises faced, and the dedicated team that worked tirelessly to overcome them.
It was an inspiring tale of commitment, grit and hard work. For me, it felt like a masterclass in true leadership and management. Hats off to Papa-the leader who identified talent, nurtured it, and created many “Bhuvans”, much like Lagaan.
Heartiest congratulations to Team Lokmat on this anniversary. My sincere gratitude to our discerning readers, advertisers, friends and well-wishers from Marathwada for your wholehearted support. That is the energy that keeps us going.
@RajendrajDarda
#Lokmat #ChhatrapatiSambhajinagar
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Replying to @RailMinIndia
@RailMinIndia @IR_CRB @Devendra_Office @OfficeOfNG Part 2 नागपूर ट्रेन मांग -औरंगाबाद से जालना,सेलू, परभणी अकोला मार्ग से नागपूर के लिये द्वि साप्ताहिक एक्स्प्रेस ट्रेन उपलब्ध कराये इस ट्रेन के कारण नागपूरकी जनता अजंता,एलोरा लेणी देखणे व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन को आ संकेंगे
Santosh Hiremath संतोष हिरेमठ retweeted
Replying to @PMOIndia
@PMOIndia @RailMinIndia @Devendra_Office Part 2 औरंगाबाद से परभणी रेल डबल लाइन - सर यात्री यो के सुविधा के लिये सेलू स्टेशन (Nanded Div) सेलू स्टेशन के कोरोना काल मे बंद किये गये स्टोपेज को पूर्ववत शुरु करे.पूर्ववत स्टोपेज बहाल करे यह यात्री यो की और से नम्र प्रार्थना.नम्र विनंती

















