
ALT आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी आज आर्णी येथील कार्यक्रमात केले. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पुसद यांच्या वतीने आर्णी येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह येथे आयोजित आदिवासी लाभार्थ्यांचा मेळावा व आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री, पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी रेवैयाह डोंगरे, पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर, तहसिलदार, गटविकास अधिकारी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी आदिवासी समाजासाठी राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने आदिवासी समाजासाठी विशेष पॅकेज देण्याचे काम केले. आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी समाजाची संस्कृती, परंपरा जपण्याचे काम केले.

ALT जनजाती गौरव दिन सेवा सप्ताह २०२६ निमित्त आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नागपूर यांच्या वतीने पारधी सखी समन्वयक यांच्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रायोगिक तत्त्वावर २० पारधी बेड्यांसाठी २० पारधी सखी तसेच ४ समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पारधी समाजातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचविणे व त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेमध्ये पारधी समाजातील नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन, आदिवासी विकास विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती समाजबांधवांपर्यंत पोहोचविणे, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे तसेच कागदपत्रे तयार करण्यासाठी सहकार्य करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

ALT धानोरा येथे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजातीय गौरव दिन व जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026 सेवा सप्ताहानिमित्त आयोजित विशेष शासकीय सेवा व लाभ वितरण शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. सदर कार्यक्रमास आमदार विजयकुमार गावित तसेच जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया गावीत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सर्व विभागाचे अधिकारी त्यांच्या उपस्थितीत विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली व पात्र लाभार्थ्यांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. वाटप लाभ तपशील:- 1)सातबारा वाटप-120, 2)संजय गांधी लाभार्थी प्रमाणपत्र 41, 3)शिधापत्रिका - 51, 4)अधिवास दाखला व नॉन क्रिमि. प्रमाणपत्र- 12 5)पुरवठा विभागाअंतर्गत साडीवाटप 20 लाभार्थी 6)कृषी विभागांतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्र 35 7)कृषी विभाग बी-बियाणे वाटप 7 लाभार्थी 8)आरोग्य विभाग अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड 10 लाभार्थी महिला व बालविकास व आदिवासी विकास विभागांतर्गत विविध योजनांची माहिती देण्यात आली.

ALT आदिवासी बांधवांसोबत दीपोत्सव साजरा, दिवाळी फराळाचेही वाटप क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव दिन’ व ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह-२०२६’ अंतर्गत कणकवली येथील गणपती साना येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ, जातीचे प्रमाणपत्र वितरण, समाजबांधवांचा सन्मान आणि दिवाळी फराळाचे वाटप अशा उपक्रमांच्या माध्यमातून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत दीपोत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, प्रांताधिकारी जगदीश काटकर, प्रभारी तहसीलदार विजय वरक, कणकवली नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गौरी पाटील, नगराध्यक्ष संदेश पारकर, उदय अहिर

ALT छत्रपती संभाजीनगर जनजातीय गौरव दिन समारंभ विकास योजनांचा लाभ आदिवासींना घरपोच द्यावा-पालकमंत्री संजय शिरसाट शासनामार्फत आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. मात्र दुर्गम भागात वास्तव्य आणि कमी जागृती असलेल्या समाजापर्यंत योजनांचा लाभ आता आदिवासी विकास विभागाने घरपोच द्यावा,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केले. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. आज भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम जनजातीय गौरव दिन समारंभाचे आयोजन बीड बायपास येथील अंबिका लॉन्स येथे करण्यात आले होते. पालकमंत्री संजय शिरसाट, विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाट, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, आदिवासी विकास विभागाच्या अमरावती विभागीय प्रादेशिक उपायुक्त शशिकला अहिरराव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, सहा. प्रकल्प अधिकारी बाणेश्वर भगत, डॉ. उद्धव वायाळ, एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे, दीपक पवार
























































