Pratibha Dhanorkar (@PSDhanorkar) header
Pratibha Dhanorkar (@PSDhanorkar) profile picture

MP, Chandrapur-Wani-Arni Lok Sabha Constituency | Former MLA, Warora Carrying Forward Late Balubhau's Legacy for the Inclusive Development.

Maharashtra
Joined May 2020
वेकोली वणी उत्तर क्षेत्रातील भूधारक, कामगार आणि ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत वणी उत्तर क्षेत्रातील ओ.बी. आणि कोळसा धुलाई कंत्राटदार कंपन्यांमध्ये स्थानिक नागरिकांना रोजगारात प्राधान्य देण्याबाबत तसेच केपीओसी वणी उत्तर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या माजरी क्षेत्रातील स्थलांतरणाशी संबंधित प्रलंबित एनओसी प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, कुंभारखणी युजी टू ओसी खाण प्रकल्पासाठी मौजा फुलोरा येथील आवश्यक जमिनीचे भूसंपादन नियमानुसार व गतीने पूर्ण करणे आणि वेकोली वणी उत्तर क्षेत्राकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा योग्य मोबदला बाधित भूधारकांना तात्काळ अदा करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ​स्थानिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि सर्व घटकांना न्याय मिळवून देणे हेच आमचे प्रमुख ध्येय असून, या सर्व निर्णयांची तात्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल. @TeamWCl #WorkersWelfare #PratibhaDhanorkar #WCL #WaniNorth #Chandrapur
1
7
196
Pratibha Dhanorkar retweeted
I wrote Belonging from my memories. Rahul and Priyanka added theirs, and the stories took on a whole new life. My children are my greatest joy, my strength, and the two people who test my patience like nobody else can ☺️
The proposal didn’t go according to plan and neither did my seventh birthday. The decision in 2004 gave some of us relief but others joy. There was an intention behind withdrawing Papa’s security. And even after 500+ pages there are some things Ma has left out of her book. Priyanka and I sat down with our mother to talk through all of it. Going back to those memories brought back the joy, the laughter and even the pain we felt at the time. Ma's journey of Belonging has been full of enormous love and terrible tragedy, and she has met all of it with dignity and courage.
372
2,476
53
10,301
135,244
चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सामाजिक वारशाचा गौरव करत, महापुरुष व समाजसुधारकांच्या कार्याला यथोचित मानवंदना देण्यासाठी जिल्ह्यातील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांचे नामकरण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. @AmitShah जी, केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. @AshwiniVaishnaw जी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांना पत्राद्वारे केली. आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदानाचा आणि अस्मितेचा सन्मान राखण्यासाठी चंद्रपूर रेल्वे स्थानकाला 'भगवान बिरसा मुंडा रेल्वे स्थानक' असे नाव देण्यात यावे. तसेच, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या व वरोऱ्याला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या कर्मयोगी पद्मविभूषण स्वर्गीय बाबा आमटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वरोरा रेल्वे स्थानकाचे नामकरण 'कर्मयोगी पद्मविभूषण स्वर्गीय बाबा आमटे रेल्वे स्थानक' असे करण्यात यावे. यासोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र आणि शोषित-पीडित, शेतकरी व कामगार जनतेचे नेते स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तसेच विदर्भाच्या जडणघडणीतील त्यांच्या योगदानाचा गौरव म्हणून बल्लारपूर रेल्वे जंक्शनला 'बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जंक्शन' असे नाव देण्यात यावे, ही चंद्रपूर जिल्हावासीयांची व सामाजिक संघटनांची प्रदीर्घ काळापासूनची मागणी आहे. जनतेच्या भावनांचा आदर राखत शासन व संबंधित विभागाकडून या तिन्ही स्थानकांच्या नामकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त करते. @RailMinIndia @Central_Railway @CMOMaharashtra #BirsaMunda #BabaAmte #RajabhauKhobragade #PratibhaDhanorkar #Chandrapur
1
1
21
594
राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या 'ब्लॅक गोल्ड सिटी' चंद्रपूर जिल्ह्यातून मुंबई व पुण्यासाठी थेट दैनंदिन रेल्वे सेवा नसल्याने विद्यार्थी, रुग्ण व व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या संदर्भात आज केंद्रीय रेल्वे मंत्री मा. श्री. @AshwiniVaishnaw जी यांना पत्राद्वारे नवीन कोचिंग टर्मिनलचे काम पूर्ण होईपर्यंत चंद्रपूर-मुंबई आणि चंद्रपूर-पुणे मार्गावर आठवड्यातून किमान २ ते ३ दिवस विशेष रेल्वे गाड्या तात्काळ सुरू करण्याची आग्रही मागणी केली. चंद्रपूरकरांच्या प्रवासाचा हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, असा विश्वास आहे. @RailMinIndia @Central_Railway #IndianRailway #PratibhaDhanorkar #Chandrapur
1
1
30
531
Pratibha Dhanorkar retweeted
संविधानाच्या सन्मानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि संविधानिक मूल्यांच्या जपणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्राने एकजुटीने पुढे यावे! चला, संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येऊया! 📍 संविधान चौक, शासकीय विश्रामगृहाजवळ, ठाणे 🗓️ २६ नोव्हेंबर २०२६ | गुरुवार ⏰ दुपारी १२:१५ वाजता संविधानाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र एकवटणार! 🇮🇳
16
44
1,057
📍चंद्रपूर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार 'वोट बचाओ देश बचाओ' अभियानांतर्गत संविधान मार्च व वोट रक्षक कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीत दि. २६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीद्वारे आयोजित 'संविधान बचाव रॅली' मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा सक्रिय सहभाग निश्चित करणे आणि जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर वोट रक्षक नियुक्त करून त्यांना प्रशिक्षित करणे, या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. लोकशाही मूल्ये आणि संविधानाच्या संरक्षणासाठी संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुभाष धोटे, राजुरा तालुका प्रभारी श्री. हैदर अली दोसानी, बल्लारपूर तालुका प्रभारी सौ. नंदाताई पराते, चिमूर तालुका प्रभारी श्री. संदेश सिंगलकर, शहराध्यक्ष श्री. शिवा राव, उपजिल्हाध्यक्ष श्री. अहेतशाम अली, श्री. प्रवीण काकडे, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. कुंदाताई जेणेकर, युवक काँग्रेस अध्यक्ष श्री. शंतनू धोटे, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष श्री. प्रमोद अवबाजी बोरीकर, ग्रामीण उपाध्यक्ष सौ. सपनाताई धोटे, नगराध्यक्ष श्री. अरुण धोटे, श्री. प्रवीण पडवेकर, श्री. संतोष सिंह रावत, श्री. रोशन लाल बिट्टू, श्रीमती सीमा गौर, श्री. शफक शेख यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. @INCMaharashtra @INCIndia #PratibhaDhanorkar #Chandrapur #SamvidhanBachao
1
25
488
📍चंद्रपूर दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त विधिमंडळ गटनेते तथा आमदार मा. श्री. विजय वडेट्टीवार व मित्रपरिवार यांच्या वतीने आयोजित दिवाळी स्नेह मिलन सोहळ्याला उपस्थित राहून या आनंदमयी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी सुप्रसिद्ध गायिका रागिणी शिंदे यांच्या सुमधुर गीतांनी कार्यक्रमात विशेष रंगत आणली. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या स्नेहमेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधत स्नेह, आपुलकी आणि आनंदाचे क्षण अनुभवले. यावेळी आमदार मा. श्री. @VijayWadettiwar, आमदार मा. श्री. @wanjarri, आमदार मा. श्री. @sudhakaradbale, माजी आमदार तथा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप गिरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री. राजेंद्र वैद्य, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते श्री. विनायक बांगडे व इतर मान्यवर उपस्थित होते. #DiwaliSnehaMilanSohala #CulturalCelebration #PratibhaDhanorkar #Chandrapur
1
30
581
📍चंद्रपूर दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आयोजित भव्य दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यास उपस्थित राहिले. यावेळी नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार मा. श्री. @wanjarri यांचा विशेष सत्कार करण्यात आला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि संविधानाच्या सन्मानासाठी एकत्रितपणे काम करण्याचा विचार यावेळी अधोरेखित झाला. तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्यसेवा, शेतकऱ्यांची समृद्धी आणि युवकांसाठी अधिकाधिक संधी या विषयांनाही महत्त्व देण्यात आले. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत दिवाळीच्या आनंदाचे क्षण अनुभवले. अशा स्नेहपूर्ण भेटीगाठींमधून आपुलकी, जिव्हाळा आणि सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. यावेळी आमदार मा. श्री. @VijayWadettiwar , आमदार मा. श्री. @sudhakaradbale , जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष धोटे, श्री. खांके साहेब, तालुकाध्यक्ष श्री. अनिल नरुळे, नगरसेवक श्री. सुरेंद्र अडबाले, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. कुंदाताई जेनेकर, नगरसेविका सौ. संगीताताई अमृतकर, ज्येष्ठ नेते श्री. विनोद दत्तात्रय, ज्येष्ठ नेते श्री. सुभाष गौर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #Diwaliasnehmelava #PratibhaDhanorkar #Chandrapur
4
40
615
सामर्थ्य, धैर्य आणि निर्णायक नेतृत्वाचा आदर्श निर्माण करणाऱ्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भारताच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कणखर नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा ठसा भारतीय इतिहासात सदैव अढळ राहील. #IndiraGandhi #IndiraGandhiJayanti #Congress #PratibhaDhanorkar #Chandrapur
2
5
146
📍नवी दिल्ली रोजगाराच्या संधींमध्ये समानता आणि प्रत्येक समाजघटकाला न्याय्य प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. लोकसभा सचिवालयाच्या इतर मागासवर्गीयांच्या कल्याणविषयक समितीच्या बैठकीत ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमधील ओबीसी समाजाच्या प्रतिनिधित्वासंदर्भात चर्चा केली. तसेच रोजगारातील आरक्षणाची अंमलबजावणी आणि ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत संबंधित मंत्रालय व संस्थेच्या प्रतिनिधींकडून माहिती घेतली. #PratibhaDhanorkar #OBCReservation #Parliament #Chandrapur
23
490
Pratibha Dhanorkar retweeted
"𝑾𝒉𝒂𝒕 𝒃𝒆𝒈𝒂𝒏 𝒘𝒊𝒕𝒉 𝒖𝒏𝒄𝒆𝒓𝒕𝒂𝒊𝒏𝒕𝒚 𝒈𝒓𝒂𝒅𝒖𝒂𝒍𝒍𝒚 𝒈𝒓𝒆𝒘 𝒊𝒏𝒕𝒐 𝒍𝒐𝒗𝒆, 𝒂𝒄𝒄𝒆𝒑𝒕𝒂𝒏𝒄𝒆 𝒂𝒏𝒅 𝒂 𝒅𝒆𝒆𝒑 𝒔𝒆𝒏𝒔𝒆 𝒐𝒇 𝒃𝒆𝒍𝒐𝒏𝒈𝒊𝒏𝒈."
46
324
12
952
24,278
कठीण प्रसंगांत कुटुंबाची साथ किती महत्त्वाची असते, याचा अनुभव सांगताना काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती @SoniaGandhi जी यांनी स्व. राजीव जी गांधी यांच्या निधनानंतर आदरणीय @RahulGandhi जी व श्रीमती @priyankagandhi जी यांनी कशा प्रकारे त्यांच्या पालकांची भूमिका निभावून आधार दिला, याविषयीच्या अत्यंत भावनिक आठवणींना उजाळा दिला. @INCIndia @INCMaharashtra #InspiringJourney #PratibhaDhaborkar #Chandrapur
Both my son and my daughter really came to my rescue. I became the child, and they became the parents because I was totally devastated and in a daze. : CPP Chairperson Smt. @SoniaGandhi ji recalls the difficult period following Rajiv Gandhi ji's assassination. 📍Delhi
1
1
6
168
स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेतृत्व, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाला प्राधान्य देत त्यांनी आधुनिक भारताच्या प्रगतीचा भक्कम पाया रचण्याचा प्रयत्न केला. बालकांवरील विशेष प्रेम आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याविषयीची आस्था यामुळे ते ‘चाचा नेहरू’ म्हणून लोकप्रिय झाले. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या बालदिनाच्या सर्व बालमित्रांना हार्दिक शुभेच्छा! प्रत्येक बालकाला शिक्षण, समान संधी आणि उज्ज्वल भविष्य मिळो, हीच सदिच्छा! #JawaharlalNehru #ChildrensDay #ChachaNehru #PratibhaDhanorkar #Chandrapur
2
7
155
नरेंद्र मोदी मेरे साथ आमने-सामने बैठकर डिबेट करें। मै गारंटी देता हूं- मेरे साथ one-on-one डिबेट के बाद नरेंद्र मोदी प्रधानमंत्री नहीं रह पाएंगे। : नेता विपक्ष श्री @RahulGandhi
1
12
329
Pratibha Dhanorkar retweeted
Revisiting my early memories of celebrating Diwali - the traditions, the festivities and the little moments that made it so special 🪔✨ Wishing everyone a Happy Diwali
892
4,542
164
19,504
565,760
लक्ष्मीच्या पावलांनी सौख्य यावे घरी, आनंदाचा उत्साह असावा प्रत्येकाच्या दारी! लक्ष्मीपूजन व दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा! दीपावलीचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक कुटुंबाची भरभराट होवो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात यश व आनंदाचा प्रकाश सदैव तेवत राहो, हीच प्रार्थना. #HappyDiwali #LaxmiPujan #Diwali #PratibhaDhanorkar #Chandrapur
2
5
171
1,938
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. रेवंत जी रेड्डी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो. आपल्या कार्यकुशल नेतृत्वातून तेलंगणा राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळो आणि जनहिताची कार्ये अधिक प्रभावीपणे घडत राहोत, ही सदिच्छा! @revanth_anumula #RevanthReddy #HappyBirthday #PratibhaDhanorkar #Congress #Chandrapur
1
1
52
532
📍 नवी दिल्ली लोकसभेचे विरोधी पक्षनेते आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेहसंमेलन सोहळ्याला उपस्थित राहण्याचा सुयोग आला. या विशेष प्रसंगी आदरणीय श्रीमती सोनिया गांधीजी, आदरणीय श्री. राहुलजी गांधी आणि श्रीमती प्रियंकाजी गांधी यांच्याशी स्नेहपूर्ण संवाद साधला व संपूर्ण काँग्रेस परिवाराला दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. स्नेह, आपुलकी आणि आनंदाने भरलेल्या या सोहळ्यात सर्वांसोबत काही सुंदर क्षण अनुभवता आले. अशा भेटीगाठींमधून जपली जाणारी नाती आणि आपलेपणाची भावना नेहमीच ऊर्जा देणारी असते. दिवाळीच्या या आनंदमय आठवणी कायम स्मरणात राहतील! @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @SoniaGandhi @INCMaharashtra #RahulGandhi #SoniaGandhi #PriyankaGandhi #PratibhaDhanorkar #Chandrapur #Congress #NewDelhi #Diwali2026
2
8
174
2,366
Kolhapur Sangarsha Morcha @satejp #Gokul #GokulElection2026 #SatejPatil
कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा.. सोमवार, 9 नोव्हेंबर 2026, सकाळी 10 वा. 📍स्थळ : दसरा चौक, कोल्हापूर मोठ्या संख्येने सहभागी व्हा!
1
30
261
1,675