
Deputy Leader of @ShivSenaUBT_| General Secretary, Bharatiya Kamgar Sena | Former Chairman MWAC - Minister Of State(R) Govt of Maharashtra
Pune, India
Joined April 2015
- Tweets17.5K
- Following451
- Followers7.7K
- Likes51.8K
Kuchik Raghunath retweeted
पवारांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीच काय प्रधानमंत्री बनवण्यासाठी जरी पिच केले, तरी त्यांच्या तथाकथित एनडीए प्रवेशाला लोक 'मास्टर स्ट्रोक किंवा डाव' म्हणुन मान्यता देणार नाही. कारण शेवटी जे काही चालले आहे, ते जनतेसाठी नाही तर कुटुंबासाठी चालू आहे.
तसेच जर हे सर्व घडून येणार असेल, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भाजप सारखा पक्ष फुकट सोडेल का? त्यांच्यासाठी मतदार संघ पुनर्रचना विधेयक किती महत्त्वाचे आहे, हे यातून समजायला पाहिजे. तसेच जर उद्या हे विधेयक पारित झाले, तर देशाचे राजकीय चरित्र आणि सामाजिक-राजकीय आकृतीबंध मुळासकट बदलणार आहे! त्यासाठी आज जे कोणी रस्ता मोकळा करून देत आहेत, त्यांचे राजकीय हितसंबंध भाजप या सर्व प्रक्रियेत जपणार आहे का?
newindianexpress.com/thesund…
Kuchik Raghunath retweeted
गेल्या काही महिन्यात युरोपातील जवळपास २५ (२५ ! ) देशांमध्ये विविध प्रश्नांवर तीव्र जनआंदोलने झाली किंवा सुरू आहेत. (कृपया गुगल करून फॅक्ट चेक करावे)
महिन्याभरापूर्वी फ्रान्समध्ये झालेल्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाचे बरेच वार्तांकन इथल्या मीडियामध्ये झाले. पण युरोपातील इतर अनेक देशात देखील हा असंतोष आहे. ब्रिटन, इटली, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी ही मोठी राष्ट्रे त्या यादीत आहेत तसेच ऑस्ट्रिया, क्रोएशिया अशी मध्यम / लहान राष्ट्रे देखील आहेत.
ज्या प्रश्नांमुळे या सर्व देशात एकाचवेळी असंतोषाचा भडका उडाला त्या प्रश्नात प्रचंड सामायिकपणा आहे, सामान्य नागरिकांच्या राहणीमानाचे प्रश्न !
शिक्षण, शाळा कॉलेजमधील सुविधांचा अभाव, महाग शिक्षण,
दुर्लक्षित आणि महाग आरोग्य सेवा,
रोजगारांचा अभाव, रोजगारांची अनिश्चितता आणि अनौपचारिकीकरण
महागाई, विशेषतः इंधन आणि अत्यावश्यक वस्तूंची, affordability हा कळीचा शब्द बनला आहे
महागाई प्रमाणे न वाढणारे वेतन,
या देशांमध्ये वयस्कर नागरिकांचे लोकसंख्येतील प्रमाण वाढते आहे, त्यातील अगदी मूठभर नागरिकांना पेन्शन मिळते ते देखील अपुरे,
न परवडणाऱ्या घरांच्या किमती आणि भाडी
एकूणच सार्वजनिक सेवांची खालावलेली गुणवत्ता आणि किमती
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये नागरिकांनी ज्या प्रश्नांवर ट्रम्प विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाला भरघोस मते दिली, त्यात देखील affordability हा लोकांच्या हृदयाला भिडणारा शब्द बनला होता.
________________
भारतातील वंचितावस्थेत जीवन काढणाऱ्या कोट्यावधी नागरिकांना आपले राज्यकर्ते गेली १२ वर्षे सांगत आहेत की आपला देश अजूनही गरीब आहे, विकासमान आहे. २०४७ सालापर्यंत धीर धरा. त्यावेळी आपणही एक विकसित देश होऊ त्यावेळी सगळ्यांचे सर्व प्रश्न सुटलेले असतील …इत्यादी
युरोपियन युनियनची एकत्रित जीडीपी २३ ट्रिलियन डॉलर्स आहे. म्हणजे भारताच्या सहा पट. आणि दरडोई जीडीपी ६३,००० डॉलर्स , म्हणजे भारताच्या दरडोई उत्पन्नाच्या २५ पट !
मग प्रश्न असा विचारावयास हवा की विकसित राष्ट्र असे बिरूद अनेक दशके मिरवणाऱ्या विकसित अणि श्रीमंत राष्ट्रात देखील कोट्यावधी नागरिकांचे राहणीमानाचे मूलभूत प्रश्नांचे स्वरूप गरीब राष्ट्रासारखेच कसे आहे ?
ना सुटेड बुटेड नवउदारमतवादाचे अर्थशास्त्री यावर बोलायला येतील ना भाषणे ठोकणारे राजकीय नेते. कारण ते चालू लोक आहेत.
____________________
दोस्तांनो, देशाकडील साधनसामुग्रीचा अभाव हे देशाच्या लोकसंख्येतील तीन चतुर्थांश नागरिकांच्या वंचितावस्थेचे अनेक कारणांपैकी एक कारण आहे. एकमेव कारण नाही
त्यापेक्षा महत्वाचे कारण आहे तयार होणाऱ्या साधनसामुग्रीचे वाटप कसे होते ? अर्थसंकल्पीय तरतुदींचे प्राधान्यक्रम काय ?
सर्व काही मार्केटच्या अदृश्य हातावर सोपवल्यामुळे एका बाजूला बहुसंख्य गरीब / निम्न मध्यमवर्गीय जनतेचे जीवनमानाचे प्रश्न तयार झाले आणि दुसऱ्या बाजूला अल्पसंख्य कुटुंबाकडे ओकारी येईल एवढी संपत्ती / उत्पन्न अशी विभागणी झाली आहे किंवा नाही ?
कोणत्याही देशातील शासन यंत्रणेकडे एकमेवद्वितीय विशेषाधिकार असतो. आर्थिक धोरणे ठरवायचे आणि देशातील नैसर्गिक वित्तीय स्त्रोत कुठे वापरायचे हे ठरवायचे. तिने ठरवले तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेचा ढाचा मुलभूतपणे बदलू शकते.
यातील कळीचा शब्द आहे…ठरवले तर!
अर्थशास्त्र म्हणजे काही नैसर्गिक विज्ञान नाही. कधीच नव्हते आणि नसेल. आपला ब्रेनवॉश केला गेला की ते तसे असते म्हणून.
त्यामुळे ही धोरणे ठरवताना बहुसंख्य जनतेच्या दैनंदिन भौतिक प्रश्नांना , रोजगार आणि उत्पन्नाची साधनांना, (उदा आपल्या देशात शेतीक्षेत्राला) केंद्रस्थानी ठेवायचे की कॉर्पोरेट / वित्त भांडवलाच्या बेबंद नफा कमावण्याच्या अधिकाराला…. याचा निर्णय फक्त सत्ताधारी राजकीय नेते घेतात
भारतासारख्या गरीब आणि युरोपातील श्रीमंत देशांमधील बहुसंख्य नागरिकांच्या भौतिक प्रश्नांमध्ये साधर्म्य असेल तर त्या अर्थव्यवस्थांमध्ये देखील काही सामायिकपणा असला पाहिजे. तो कोणता?
गेल्या चाळीस वर्षात या सर्व अर्थव्यवस्था, नवउदारमतावादी आर्थिक विचारानुसार कॉर्पोरेट / वित्त भांडवल केंद्री बनवल्या गेल्यामुळे , सट्टेबाज आणि manipulative मार्केट शक्तीमुळे सर्व काही सोपवले गेल्यामुळे, कल्याणकारी ऍप्रोच महापाप ठरवले गेल्यामुळे, शासनाने अर्थव्यवस्थेतून अंग काढून घेतल्यामुळे, वरील एकाच प्रकारचे भौतिक प्रश्न या राष्ट्रात तयार झाले आहेत.
_____________________
जगात काय सुरु आहे याची माहिती ऍकेडेमिक नाही. आजच्या सर्व काही जागतिक झालेल्या काळात तर खचितच नाही. अशी माहिती ठेवल्यामुळे आपल्या प्रश्नांची मुळे नक्की कोठे आहेत हे कळते आणि आपण बरोबर दिशेने चालत आहोत हे कळून आत्मविश्वास दुणावतो
संजीव चांदोरकर (२३ नोव्हेंबर २०२६)
Kuchik Raghunath retweeted
The farmers who once employed laborers on their own fields are now forced to haul 50-60 kg sacks in Mumbai.
At 2 AM, while the city sleeps, farmers from Maharashtra's drought-hit regions toil at the Vashi APMC market. Drought first drove them out of their villages, and now low market arrivals mean both work and money are scarce here too. The coming months look grim for these farmers, yet the government seems indifferent. Watch this 2 AM ground report from Vashi's APMC market.
Link: youtu.be/pHbqMTwdtbM?si=hub2…
❉❉ दशक्रिया विधी ❉❉
बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी
सकाळी ७ः३० वा. • वैकुंठधाम
शिवाजी पार्क मुबंई येथे विधि संपन्न होईल.
कै.बबनराव (दादा ) कुशाबा कुचिक
माझे वडील यांचं दि.१६.११.२०२६ रोजी सकाळी ७.१० वाजता मुंबईत दुःखद निधन झाले होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना..!
• शोकाकुल समस्त कुचिक
परिवार व आप्तेष्ट ! मु पो खोडद
ता जुन्नर जिल्हा पुणे ग्रामस्थ !
Kuchik Raghunath retweeted
पक्ष फोडला, नेत्यांना तुरुंगात डांबले तरी मतभेद मनभेद बोलणे म्हणजे बोगस, विजय चोरमारे सर! #राष्ट्रवादी
youtu.be/6SkYg2dDcjA?si=el6j…
Kuchik Raghunath retweeted
जागतिक मस्त्यशेती दिवसाच्या निमित्ताने वाढवण वरोर येथे जमलेला हजारोंचा जनसमुदाय. विशेषतः मस्त्य व्यवसाय करणार्या महिलांची एकी.
आता वाढवण वरोर आंदोलन हे संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनतेच्या हातात गेलय.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०६ जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. २१ नोव्हेंबर, १९५४ रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये २१ जणांना प्राण गमवावा लागला. आज त्यांचे स्मरण करून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या या महान हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! कोटी कोटी प्रणाम 👏
• प्रबोधन युवाशक्ती
काही लोक तुमची क्षमता कमी लेखतात,
हे ऐकन्याची सवय करून घ्या !
प्रत्येकालाच तुमच्यातील सामर्थ्य लगेच ओळखता येईल असे नाही. तुमची प्रत्येक महत्त्वाकांक्षा स्पष्ट करण्याची किंवा प्रत्येक योजना जाहीर करण्याची गरज नाही. तुमची निष्ठा, मेहनत आणि सातत्य यातून स्वतःची क्षमता अधिकाधिक विकसित करा. इतके अर्थपूर्ण आणि भरीव कार्य उभे करा की, तुमची ओळख करून देण्यासाठी तुम्हाला शब्दांची गरजच भासणार नाही;
तुमचे कर्तृत्वच तुमची ओळख बनेल! 🔥
अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक विषमतेविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे थोर समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन ! कोटि कोटि प्रणाम 👏 #प्रबोधनयुवाशक्ति
आदरणीय मा पंतप्रधान इंदिराजी गांधी
जयंती निमित्त भावपूर्ण आदरांजली 👏
प्रबोधन युवाशक्ती
भारतीय कामगार सेना
देह काळाच्या पडद्याआड गेला,
पण विचारांचा सूर्य कधीच मावळत नाही !
आपले तेजस्वी नेतृत्व, निर्भीड विचार,
प्रखर हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी केलेला संघर्ष सदैव प्रेरणादायी राहील. साहेब, तुम्ही केवळ एक व्यक्तिमत्त्व नव्हते, तर लाखो शिवसैनिकांच्या हृदयात धगधगणारी विचारज्योत आहात.
अंत न होतो तेजस्वी सूर्याचा,
अंत न होतो धगधगत्या विचारांचा!
साहेब, तुमचे विचार अमर आहेत,
आमच्या रक्तात आजही शिवसेना जिवंत आहे !
वंदनीय साहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! कोटि कोटि प्रणाम 👏
#BalasahebThackeray #शिवसेना #शिवसैनिक #स्मृतिदिन #ठाकरे
Kuchik Raghunath retweeted
लोकसत्ताचे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर यांनी परफेक्ट विश्लेषण केलं आहे!
डिलीमिटेशन बिल हे भाजपला स्वबळावर सत्तेत आणणारे बिल आहे..इतकंच नाही तर प्रादेशिक पक्ष संपवण्याचे हत्यार आहे! आणि महाराष्ट्रातील पक्ष मोठ्या मनाने समर्थन द्यायला तयार आहे...धन्य धन्य ते नेते!
स्वतःची कबर स्वतःच्या हाताने खोदून घ्या...पण आता मागे हटू नका! भाजपच्या हातात हात होता आता अधिकृतरित्या होऊन जाऊ दे! #वाजवारेवाजवा
ना पैशाची ताकद, ना कॉर्पोरेटची दहशत ! ८०० कामगारांच्या एकजुटीपुढे #अॅमेझॉन झुकले !
कॅनडात अॅमेझॉनच्या ८०० कामगारांनी #Unifor संघटनेच्या नेतृत्वाखाली उत्तर अमेरिकेतील अॅमेझॉनचा पहिला सामूहिक कामगार करार जिंकला. वेतनवाढ, अतिरिक्त रजा आणि सेवासमाप्ती संरक्षण असे महत्त्वपूर्ण हक्क मिळवले.
हा संघटित कामगार शक्तीचा ऐतिहासिक विजय आहे ! कामगारांनो, संघटित व्हा !संघटनेत सामील व्हा ! आपल्या हक्कांसाठी एकजुटीने लढा !
• एकजूट हीच शक्ती, संघटन हाच विजय !
ना कॉर्पोरेटची दहशत, ना पैशाची ताकद! ८०० कामगारांच्या एकजुटीपुढे अॅमेझॉन झुकले; उत्तर अमेरिकेतील पहिला ऐतिहासिक कामगार करार संपादन!
कॅनडातील अॅमेझॉनच्या YVR2 केंद्रातील ८०० कामगारांनी Unifor संघटनेच्या माध्यमातून ऐतिहासिक सामूहिक कामगार करार जिंकला. वेतनवाढ, १८ आठवड्यांपर्यंत सेवा समाप्ती लाभ, अतिरिक्त रजा आणि सामाजिक सुरक्षा संरक्षण असे महत्त्वपूर्ण हक्क मिळवले.
हा केवळ करार नाही, तर संघटित कामगार शक्तीचा ऐतिहासिक विजय आहे !
जगभरातील कामगारांनो, संघटित व्हा! संघटनेत सामील व्हा, एकजूट मजबूत करा आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करा.
कारण भांडवलाची ताकद कितीही मोठी असली, तरी कामगारांची एकजूट त्याहून मोठी असते !
#Amazon told everyone a union contract would never happen, but workers proved them wrong." #Unifor
unifor.org/news/all-news/ama…
आदरणीय शिवसेना नेते
खा संजय राऊत साहेब … @rautsanjay61 jii
आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उदंड यश लाभो. लोकशाही मूल्यांप्रती आपली निष्ठा, निर्भीड भूमिका आणि जनतेसाठीचा संघर्ष असाच कायम राहो, हीच सदिच्छा !
• वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐
Kuchik Raghunath retweeted
When a few businessmen own the government, the people lose their voice.
India's democracy is a global public good, and the world needs it to survive.
We will save it the only way we know - no hatred, no fear, no anger. Only truth, non-violence and love.
Kuchik Raghunath retweeted
Justice for gig workers.
youtu.be/mfKFT5e_ypE?si=4Tcu…
प्रत्येकाला तुमचा संघर्ष, तुमचा प्रवास
आणि तुमची ध्येयं समजतीलच असे नाही, आणि त्यात काहीही गैर नाही. आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण आणि मोठं साध्य करण्या साठी तुम्हाला प्रत्येकाच्या मान्यतेची गरज नाही.
आपल्या स्वःताच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा, स्वतःची ऊर्जा जपा आणि प्रत्येक निर्णयाचं स्पष्टीकरण देणं थांबवा !
तुमचं आयुष्य प्रत्येकाला समजेल असचं असण्याची गरज नाही. ते सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे आणि …. तुमच्या मनाला पटलं पाहिजे !


















