District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur) header
District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur) profile picture

Official Handle of District Information Office, #KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra.

Kolhapur, India
Joined September 2012
Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)Photo by District Information Office, Kolhapur (@Info_Kolhapur)
#कोल्हापूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा! राज्य शासनाकडून अग्रीम मदतीची ₹५,००० रक्कम राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील लाभार्थी शेतकरी श्री. नामदेव बाबुराव पाटील यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. या मदतीसाठी त्यांनी शासनाचे आभार मानले. #शेतकरी
183
शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीची रक्कम! राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम मदतीपोटी ५,००० रु. लाभार्थी शेतकरी श्री.सागर गणपती पाटील मु. पो.कौलव,ता. राधानगरी यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आले. शेतकऱ्यांच्या संकटात शासनाचा मदतीचा हात! #शेतकरी
148
शेतकऱ्यांना अग्रीम मदतीतून दिलासा! राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदतीपोटी ₹५,००० ची रक्कम राधानगरी तालुक्यातील आमजाई व्हरवडे येथील शेतकरी श्री. नामदेव बाबुराव पाटील यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. संकटाच्या काळात शासनाची शेतकऱ्यांना साथ. #शेतकरी
168
शेतकऱ्यांना शासनाचा आधार राज्य शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अग्रीम मदतीपोटी ₹५,००० ची रक्कम पन्हाळा तालुक्यातील जाखले येथील लाभार्थी शेतकरी श्री. सुनील हरी चौगुले यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आली. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन #शेतकरी
149
दुष्काळी परिस्थितीत शासनाचा प्रयोग : ग्रा.पं., पशू संवर्धन, कृषी विभाग करणार काम गडहिंग्लजला चाऱ्यासाठी पडीक, गायरान जमिनीचा शोध #शेतकरी #दुष्काळ @MahaDGIPR
1
221
अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात इंग्रज सत्तेला हादरवणारे आदिवासी क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #जनजातीगौरवदिवस #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन
1
5
438
भगवान बिरसा मुंडा यांच्या संघर्ष, विचार आणि जनजातीय अस्मितेच्या गौरवातून प्रेरणा घेत १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या जनजातीय गौरव दिनानिमित्त महाराष्ट्रात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. #जनजातीगौरवदिवस #भगवानबिरसामुंडा #आदिवासीविकास #महाराष्ट्रशासन
164
महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री-शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, जातिभेद निर्मूलन आणि मानवाधिकार या क्षेत्रांत दिलेले योगदान आजही आधुनिक भारतासाठी प्रेरणादायी आहे. #MahatmaPhule200 #महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
165
District Information Office, Kolhapur retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष मुलाखत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जनजातीय गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. @drashokuike_mla #भगवानबिरसामुंडा
8
2
1,634
15 नोव्हेंबर - जनजातीय गौरव दिवस आदिवासी समाजासाठी जंगल हे संस्कृती, श्रद्धा आणि अस्तित्वाचे केंद्र आहे. जल, जंगल, जमीनीच्या पारंपरिक रक्षकांना सलाम ! मानव आणि निसर्गाचे नाते जपणारा समाज म्हणजे आदिवासी समाज ! भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! #जनजातीयगौरवदिवस
167
महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्र्यवीर - शौर्य, त्याग, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचा इतिहास ! भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास विविध समाजांच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून घडला आहे. या इतिहासात आदिवासी समाजाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. #जनजातीगौरवदिवस #भगवानबिरसामुंडा
161
District Information Office, Kolhapur retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #जयमहाराष्ट्र आणि #दिलखुलास कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येत आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि.१६, आणि मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘जनजातीय गौरव दिना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनातर्फे ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाजाची सांस्कृतिक ओळख व अस्मिता जपत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण, वनहक्क, पेसा कायद्याची अंमलबजावणी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देण्यात येत आहे. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीत आदिवासी शेतकरी व कष्टकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनाचे प्रयत्न व आगामी नियोजन याबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके हे या विशेष मुलाखतीत माहिती देणार आहेत. @drashokuike_mla #भगवानबिरसामुंडा
9
2
3
2,199
महाराष्ट्रातील आदिवासी स्वातंत्र्यवीर शौर्य,त्याग आणि स्वाभिमानाचा इतिहास! जल,जंगल,जमीनसाठी लढलेले आपले खरे नायक... राघोजी भांगरे |भागोजी नाईक | बाबुराव शेडमाके भिमा नाईक |खाज्या नाईक | नाग्या महादू कातकरी जिजाबाई भांगरे | वारली महिला योद्धा 15 नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस
1
240
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष... शिक्षणाची ज्योत :अज्ञानातून मुक्ती मार्ग #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष @MahaDGIPR
201
#कोल्हापूर : खा.धैर्यशील माने यांची वाड्या-वस्त्यांवर दिवाळी #शेतकरी #दुष्काळ @MahaDGIPR
1
229
District Information Office, Kolhapur retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची निवेदक प्रणय चव्हाण यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहा... मंत्री भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या महान जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा या मुलाखतीद्वारे आढावा घेतला आहे. @ChhaganCBhujbal #जयमहाराष्ट्र #महात्माफुले200 #MahatmaPhule200 #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
6
5
12
2,994
District Information Office, Kolhapur retweeted
📍नागपूर हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे तंत्रज्ञान, प्रतिकूल हवामान सहन करणारी पिके आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करण्यासाठी आधुनिक कृषी संशोधनाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. #रामटेक तालुक्यातील #कवडक येथे श्री दत्ता मेघे फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या स्व. दत्ता मेघे स्मृती दालन, नंदकिशोर जयस्वाल #कृषी महाविद्यालय आणि शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयाचे लोकार्पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह मेघे कुटुंबीय उपस्थित होते. यंदा अल निनोचा प्रभाव आणि प्रतिकूल पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रत्यक्ष शेतीत उपयोग होईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन महत्त्वाचे असून, देशी गोवंशाचे संवर्धन, आधुनिक पशुवैद्यकीय उपचार आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना सक्षम करण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मेघे फाऊंडेशनच्या या संस्थांमुळे ग्रामीण भागातील कृषी संशोधन, पशुसंवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळून रामटेकच्या विकासाला हातभार लागेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. निसर्गासह आपण सर्व एकाच विश्वाचे घटक असून त्याचे मालक नाही, ही जाणीव ठेवून सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारी जीवनदृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. जीवनात संयम राखून भारताने आपल्या विकासातून जगाच्या विकासाचा नवा मार्ग दाखवावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली. विदर्भात दुग्धव्यवसाय, शेळीपालन आणि पशुसंवर्धनाला चालना देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे देशी गोवंशाचे संवर्धन व दूध उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. मदर डेअरीच्या एक हजार कोटींच्या प्रकल्पासह शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे या क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. स्व. दत्ताभाऊ मेघे यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा पुढे नेत मेघे कुटुंबाने कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, या संस्थांमुळे रामटेकच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी नेहरू बालसदनच्या चमूने महाराष्ट्र गीत सादर केले. सागर मेघे यांनी प्रास्ताविक केले, तर आमदार समीर मेघे यांनी आभार मानले. @DrMohanBhagwat @Dev_Fadnavis @nitin_gadkari @cbawankule @Ashishjaisw3Adv @DRPANKAJBHOYAR @MegheSameer
9
1
8
2,385
District Information Office, Kolhapur retweeted
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून अनुसूचित जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या सप्ताहात १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण आणि महिला बचत गटांसाठी उपक्रम, १४ नोव्हेंबर रोजी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, तर १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन आणि #गडचिरोली येथे राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १६ नोव्हेंबर रोजी शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरे, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती आणि १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यक्रम होणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नियुक्ती, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे, तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती योजना सुरू करण्यात आली आहे. कोलाम, कातकरी, माडिया व पारधी समाजाच्या विकासासाठी विशेष पॅकेज आणि आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासासाठी विद्यापीठ स्तरावर अध्ययन केंद्र स्थापन करण्याचे निर्णय घेतल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्ह्यात पाच लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत २ लाख १२ हजार ३९० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मियावाकी पद्धत, जिओ मॅपिंग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासह या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. @ShelarAshish #भगवानबिरसामुंडा
1
10
1
2
2,433