District Information Office, Parbhani (@InfoParbhani) header
District Information Office, Parbhani (@InfoParbhani) profile picture

परभणी जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं. महाराष्ट्र शासन

Parbhani,
Joined November 2015
Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)Photo by District Information Office, Parbhani (@InfoParbhani)
District Information Office, Parbhani retweeted
#गडचिरोली #थेटप्रसारण *मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घटन कार्यक्रमास उपस्थिती.* *YouTube* - youtu.be/CEhIGsKS_bc
1
63
District Information Office, Parbhani retweeted
#महात्माजोतीरावफुले #द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उलगडले महात्मा फुलेंचे जीवनकार्य
1
181
District Information Office, Parbhani retweeted
भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर विदित संतोष गुजराथी यांना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार २०२५ जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरी आणि बुद्धिबळ क्षेत्रातील मोलाच्या योगदानातून त्यांनी देशाचा गौरव वाढविला आहे. @rashtrapatibhvn @MahaDGIPR
1
257
District Information Office, Parbhani retweeted
📍 मंत्रालय भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव घनश्याम जाधव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. #PanditJawaharlalNehru
1
1,851
District Information Office, Parbhani retweeted
#छत्रपतीसंभाजीनगर #दुष्काळ परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.संभाव्य पाणी आणि चाराटंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील,अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी फुलंब्री येथे दिली.
1
170
District Information Office, Parbhani retweeted
📍 विधानभवन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (३) डॉ. विलास आठवले, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले. #PanditJawaharlalNehru
1
1
2
1,920
District Information Office, Parbhani retweeted
दुष्काळग्रस्तांसाठी शासनाच्या १२ महत्त्वपूर्ण उपाययोजना राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देणाऱ्या १२ उपाययोजना जाहीर केल्या आहेत. @MahaDGIPR
🤖 Made with AI
1
1
279
District Information Office, Parbhani retweeted
शेतकऱ्यांच्या दारी मायेची भाऊबीज; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा बळीराजाशी आपुलकीचा संवाद! दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. #शेतकरीभाऊबीज
1
1
150
District Information Office, Parbhani retweeted
“दुष्काळात शासनाकडून ५ हजार रुपयांची अग्रिम मदत मिळाल्याने माझी दिवाळी साजरी झाली. त्याबद्दल शासनाचे आभार.” - ज्ञानोबा हरिबा कोंपले, मु.पो. शेलू खुर्द, जि. लातूर. #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
3
7
5
2,436
District Information Office, Parbhani retweeted
दिवाळीपूर्वी माझ्या बँक खात्यात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली ५ हजारांची मदत प्राप्त झाली. कुणाही शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी ही रक्कम फायदेशीर ठरली आहे – स्वप्नील राजेंद्र महल्ले, रा. पिंपरी, ता. जि. अमरावती #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
3
5
2,290
District Information Office, Parbhani retweeted
भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी #लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपालांचे सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जयराज कारभारी तसेच लोकभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. #PanditJawaharlalNehru
3
4
1,878
District Information Office, Parbhani retweeted
“मला शासनाकडून भात शेती साठीचे नुकसान सानुग्रह अनुदान ५ हजार रुपये मिळाले. मी शासनाचा आभारी आहे.” - रामकृष्ण मांजरेकर, रा. गालसुरे काठी, ता.श्रीवर्धन, जि.रायगड #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
10
6
5,973
District Information Office, Parbhani retweeted
📍सातारा दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण! मात्र निसर्गाच्या अवकृपेने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात यंदा या सणाचा आनंद काहीसा हिरावला गेला आहे. या शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी थेट शेताच्या बांधावरच दिवाळी साजरी केली. माण तालुक्यातील पिंपरी गावात आज एक आगळेवेगळे आणि माणुसकीचा संदेश देणारे चित्र पाहायला मिळाले. कोणताही औपचारिक मंच नाही, मानपानाचा बडेजाव नाही, तर शेतातील मातीवर अंथरलेल्या घोंगड्यावर पालकमंत्री शेतकऱ्यांसोबत बसले होते. सोबतीला गावातील शेतकरी, समोर दिवाळीचा फराळ आणि मनमोकळा संवाद! निमित्त होते दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेण्यासाठी आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमाचे. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. संकट कितीही मोठे असले तरी खचून जाऊ नका, धीर सोडू नका, असा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. @shambhurajdesai #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
8
3
2,392
District Information Office, Parbhani retweeted
राज्यात दुष्काळाचे सावट असताना शेतकरी आणि आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडील आरे मिल्क कॉलनी परिसरातील खांबांचा पाडा येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी लहान मुलांना शैक्षणिक साहित्य, खेळणी, फटाके, बिस्किटे आणि सायकलींचे वाटप करून त्यांच्या आनंदात भर घातली. निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव आतापर्यंतच्या सर्वात खास दिवाळीच्या आठवणींपैकी एक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. @MPLodha #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
8
9
3,825
District Information Office, Parbhani retweeted
📍सांगली राज्यातील ३०५ तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले असून, त्यात सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव योगाश्रमात पालकमंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्यासोबत #दिवाळी फराळ केला. पीक पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानभरपाई देण्यात येईल. तोपर्यंत दिवाळी सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. तसेच पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवायचे असल्याने त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. #जत तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाची कामे, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणीपुरवठा आणि रोजगार हमी योजनेच्या कामांना गती देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. मागेल त्याला टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून, १५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या आवर्तनात जत तालुक्यातील तलाव प्राधान्याने भरून घेण्यात येणार आहेत. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांच्या घरी भेट देऊन फराळाचे वाटप केले आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार धैर्यशील कदम, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. @ChDadaPatil #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
8
12
2,631
District Information Office, Parbhani retweeted
📍 *सांगली* दुष्काळामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी #आटपाडी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांसमवेत भोजन केले तसेच दिवाळी शिध्याचे वाटप करून शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी केली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आगामी सहा महिन्यांतील संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे, अशी ग्वाही मंत्री आबिटकर यांनी दिली. यावेळी शेतकरी जगन्नाथ जाधव यांच्या अडीच एकर क्षेत्रातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या केळीच्या बागेची पाहणी करण्यात आली. या बागेसाठी सुमारे साडेपाच लाख रुपये खर्च करूनही पाणीटंचाईमुळे पीक वाया गेल्याची व्यथा जाधव यांनी मांडली. तसेच परिसरातील तीन गावांमधील सुमारे १ हजार ६०० जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर आवश्यकतेनुसार चारा डेपो सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री आबिटकर यांनी प्रशासनाला दिल्या. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात असून, योजनेपासून वंचित गावांना फेब्रुवारीअखेर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार सुहास बाबर यांनी दिली. पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत वितरित करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार शीतल बंडगर, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. @iprakashabitkar #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
7
1
18
1,382
District Information Office, Parbhani retweeted
📍जळगाव दीपावलीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या भावनेतून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी #यावल तालुक्यातील बोरमळी येथे सहपरिवार आदिवासी बांधवांसोबत दीपावली साजरी केली. यावेळी त्यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना #दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत त्यांनी सर्वांसोबत स्नेहभोजनाचा आनंद घेतला. सण-उत्सवांच्या आनंदात समाजातील सर्व घटकांचा सहभाग असावा आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला आदिवासी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आमदार अमोल जावळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, विविध पदाधिकारी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. @girishdmahajan #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
1
7
1
4
2,357
District Information Office, Parbhani retweeted
📍 सोलापूर शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याच्या उद्देशाने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी #मंगळवेढा तालुक्यातील #रेड्डे येथील शेतकरी माने कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन दिवाळी साजरी केली. यावेळी कुटुंबीयांशी संवाद साधत दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मंत्री गोरे यांनी दिली. दिवाळीनिमित्त माने कुटुंबीयांना फराळ व आहेर भेट देण्यात आली, तसेच घरातील लहान मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. मंत्री गोरे यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केल्याने माने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. @Jaykumar_Gore #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
6
3
2,420
District Information Office, Parbhani retweeted
📍धुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासोबतच शेतीच्या शाश्वत विकासासाठी जलसंधारण व सिंचनाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, दुष्काळावर मात करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली. #शिंदखेडा तालुक्यातील #आच्छी व #दत्ताणे येथे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी करताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन #धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात आला असून, पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात येत आहे. शिंदखेडा तालुक्यातील ८३ हजार २१६ खातेदारांपैकी ६९ हजार १४२ शेतकऱ्यांच्या मदतीला मंजुरी मिळाली असून, ५० हजार ७९२ शेतकऱ्यांच्या खात्यांत मदतीची रक्कम जमा झाली आहे. तसेच तालुक्यातील १४ हजार ३१४ अंत्योदय महिला लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप करण्यात येत असून, सुमारे १ लाख ९५ हजार लाभार्थ्यांपर्यंत ज्वारी, गहू, साखर व तांदळाचे वितरण दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. दुष्काळावर दीर्घकालीन उपाययोजना म्हणून नदी-नाले खोलीकरण, जलसंधारण, भूजलपातळी वाढविणे आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्यावर भर देण्यात येणार आहे. तापी नदीवरील प्रकाशा, सारंगखेडा व सुलवाडे प्रकल्प, बुराई नदी बारमाही करण्याचे काम आणि पाइपलाइनद्वारे पाणी वितरणाच्या माध्यमातून शेतीला पाणी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आगामी चार ते सहा महिन्यांतील पिण्याच्या पाण्याच्या गरजेनुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, कापूस उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी राज्यात भारतीय कापूस महामंडळाची सुमारे १२५ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. शिंदखेडा तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, प्रशासकीय व शैक्षणिक सुविधांसह नरडाणा औद्योगिक वसाहतीच्या विकासातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांत १५६ शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर होण्यास मदत झाली आहे. यावेळी पालकमंत्री रावल यांनी शेतकरी कुटुंबांना अन्नधान्य व भेटवस्तूंचे वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, धुळ्याचे माजी महापौर प्रदीप कर्पे, माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांच्यासह शेतकरी, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते. @JaykumarRawal #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
5
1
9
2,731
District Information Office, Parbhani retweeted
📍मालेगाव दुष्काळामुळे पाणीटंचाई, पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न आणि रोजगाराच्या अडचणींचा सामना करणाऱ्या आदिवासी कुटुंबांना आधार देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी #मालेगाव तालुक्यातील #गाळणे येथील नवादे वस्तीवर आदिवासी बांधवांसोबत #दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि संकटाच्या काळात शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी वर्षभरात पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा-पाणी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा आणि त्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासनही मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. नवादे वस्तीची जागा वन विभागाकडून कायदेशीर परवानगीने ग्रामपंचायतीच्या नावे करण्यात आल्याने येथील नागरिकांना घरकुलांसह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. मंत्री भुसे यांनी शेतकरी जीवन दाजी पवार आणि राजाभाऊ जीभाऊ पवार यांच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांसोबत दिवाळीचा फराळ केला. अहिराणी भाषेतून संवाद साधत त्यांनी स्थानिक बोलीभाषेतील आपलेपणा जपला. पवार कुटुंबीयांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी दोन्ही कुटुंबांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. नवादे वस्तीवरील अंगणवाडी केंद्राला भेट देऊन मंत्री भुसे यांनी बालकांशी संवाद साधला. बालकांनी कविता सादर करून त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना नवीन कपडे, भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. गाळणे गावात सर्वधर्मीय नागरिक एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करतात. दिवाळीनिमित्त नवादे वस्तीवर गेल्या चार-पाच वर्षांपासून स्नेहभोजन आणि छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीतही ही परंपरा कायम राखण्यात आली. सामाजिक सलोखा, माणुसकी आणि परस्परांना आधार देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक अशोक शेवाळे, पर्यवेक्षिका ज्योती देसाई, अंगणवाडी सेविका सुनंदा गांगुर्डे, मदतनीस मंदा जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. @dadajibhuse #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
5
3
2,266