मियाँ गिरे भी तो टांग ऊपर!
This is ref #TigerShroff Case.
#MumbaiPolice
The reported arrest of three suspects within a day is an encouraging evidence of emerging rapid inter-state police coordination.
Also optimum use of
CCTNS and the Inter-Operable Criminal Justice System in place.
Also full use of CCTV video analytics and railway surveillance and passenger-movement coordination.
Timely use of Technology with Human intelligence and experience evident.
India investing in modernisation of police forces is reaping rewards. With more and more investments in forensics committed.
Thank you @AmitShah and Union Home Ministry, GOI.
@Dev_Fadnavis @CPMumbaiPolice
#KotaPolice @PoliceRajasthan
@IPS_Association
@mygovindia
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
Monday morning questions: How does the Lawrence Bishnoi gang operate with such impunity, in India and abroad, when its BOSS is lodged in the high-security Sabarmati jail? Who is running the network, how is it being funded, and why has the state been unable to dismantle it? A gangster behind bars should not mean a gang beyond the law, no?
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
क्या अब तक आपने एक भी गोदी पत्रकार को डिटेन होते देखा !
यही है दिल्ली पुलिस- गोदी मीडिया- RW गुंडों का NEXUS ! #JantarMantar #GodiMedia #DelhiPolice #CJP #RahulGandhi
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
"No nation can be grateful at the cost of its liberty" हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते.
एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.
हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !
या देशांत आंदोलनं करायचीच नाहीत? तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाहीत ? आंदोलन करणं हा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण ? भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी घेऊन ३ ऑक्टोबरपासून दिल्लीत आंदोलनं सुरु आहेत. दिल्ली पोलिसांना हाताशी धरून हे सरकार फक्त आंदोलकांना चिरडत होतं असं नाही तर हे आंदोलन कव्हर करणाऱ्या महिला पत्रकारांचा पण छळ करत होतं.
आज दिल्लीत आंदोलनं होतील या भीतीने दिल्लीत मेट्रो सेवा बंद केलीत, रस्ते अडवलेत, इंटरनेट सेवा बंद केली आहे, बस सेवा थांबवली आहे, आंदोलकांना विमानातून उचलून नेलं जात आहे. ही कोणती पद्धत ? देशातील २०,३० वर्षांचे तरुण तरुणी अस्वस्थ आहेत, त्यांना त्यांचं भविष्य दिसत नाहीये, म्हणून ती शांततेत रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत आणि तुम्ही त्यांनाच चिरडायचा प्रयत्न करताय? जगभर मोदी जाऊन आमच्या देशात लोकशाही आहे हे आता कोणत्या तोंडाने सांगणार आहेत ? ही असली लोकशाही?
मला समजत नाही या ज्ञानेश कुमारबद्दल इतकं प्रेम का ? ज्ञानेश कुमार आणि त्या आधीचे निवडणूक अधिकारी हे तुमचे सत्ता काबीज करण्याचे मार्ग आहेत म्हणून ? निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्याच्या प्रमुखाने काही गोंधळ घातला असेल तर त्याचा राजीनामा व्हायलाच हवा. तसंच संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही प्रामाणिक आणि पारदर्शक असायला हवी या मागणीत गैर ते काय ? माझ्या मताचा अधिकार काढून घेतला जातोय, किंवा माझं मत कुठे आणि कोणाला जातंय हे मला समजत नाहीये. आणि त्यातून माझ्या मताचा अपमान होतोय हा राग व्यक्त करण्याचा अधिकार पण नसावा ? का वरच्या दोघांना भीती आहे की ज्ञानेश कुमारला राजीनामा द्यायला लागला आणि त्याने माझे मतचोरीचे करवते धनी कोण हे जर सांगितलं तर आत्तापर्यंतचं सत्तेचं सगळंच बिंग फुटेल म्हणून!
भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ (१) (अ) आणि (ब) यानुसार नागरिकांना शांततेत निदर्शनं करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा अधिकार तुम्हाला का चिरडायचा आहे ? काल तर चक्क माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील विचारलं, माशी मारायला हातोडा कशाला वापरताय ?. बरं आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि सोडून दिलं असं सहसा महाराष्ट्रात पोलीस डिपार्टमेंट करतं. आणि हे करताना नागरिकांच्या संविधानिक अधिकारांना धक्का बसणार नाही हे पाहतात. पण इथे दिल्लीत तर महिला पत्रकार ज्या हे आंदोलन कव्हर करत होत्या, त्यांच्या तक्रारी आहेत की पोलिसांनी स्थानबद्ध केल्यावर त्यांचा छळ केला म्हणून. जर आंदोलन कव्हर करणाऱ्यांचा छळ होत असेल तर आंदोलकांना नीट वागवतील याची काय खात्री ?
या देशातील तरुणांनी तुम्हाला झुकवलं आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला लावला हा राग अजून शमला नाहीये असं दिसतंय. अण्णा हजारे आंदोलनाच्या वेळेस मोदी-शाह गुजरातमध्ये आंदोलनं होऊ देत होते कारण ती फायद्याची होती. पण त्याच गुजरातमध्ये त्यांनी सत्तेच्या काळात त्यांच्या सरकारच्या विरोधातील अनेक आंदोलनं चिरडली. थोडक्यात हे बेगडी आणि दुटप्पी आहेत हे स्पष्ट दिसतंय.
नेटफ्लिक्सवर एक डॉक्युमेंट्री आहे, How to Become a Tyrant (tyarant म्हणजे जुलमी शासक ) ही डॉक्युमेंट्री बहुदा अमित शाह रोज गांभीर्याने बघत आहेत असं दिसतंय. त्यापेक्षा ज्या गुजरातमधून तुम्ही येता त्याच राज्यातून आलेल्या महात्मा गांधींनी शांततेतली केलेल्या आंदोलनांबद्दल आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल जरा वाचा. अर्थात यांच्याकडून मी अपेक्षा का बाळगतोय हेच समजत नाही ! असो . . .
निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे काम करतो ना?! मग त्याच्या विरूद्ध आंदोलन होत असेल तर सत्ता का अस्वस्थ होत्ये?! होऊ द्या की आंदोलन! जनता ठरवेल काय खरं काय खोटं.
नाही का?!
सत्तेकडे खूप कामं आहेत..
उदा.
स्टेडीयम झालं.. एयरपोर्ट झालं..
आता हिमालयाचं नाव बदलायचं मनावर घ्यायला हवं!
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
Can't serve notices.
Can't hold virtual hearings.
Can't give a voter a copy of the order deleting them.
And: "Once the appeal is disposed of... it cannot be restored on the portal if the restoration is needed on account of direction of the judicial order or otherwise."
That's not a complaint from an election official on the ground. It's the minutes of a meeting of retired High Court judges, appointed on the Supreme Court's orders to hear 38 lakh SIR appeals in West Bengal, on the portal the Election Commission's IT division (headed by Seema Khanna) built for them.
Minutes dated August 11, sent to the EC and the Chief Justice of Calcutta High Court.
Cracker of a story by @DaminiNath & @mitra_atri
indianexpress.com/article/in… via @IndianExpress
कोणाला पटो ना पटो!
आवडो ना आवडो पण २०२९ च्या निवडणूका धमाकेदार होणार आहेत!
धमाका होणार..
मोठमोठ्या फाजील वल्गना आणि आत्ममग्नतेसमोर सहवेदना आणि समाजभान शड्डू ठोकून उभे राहताना दिसतायत!
परिवर्तन सृष्टीचा नियमच आहे.
🤞🤞🤞
झारखंड मध्ये रांचीत तरूण तरूणींचं राज्यसरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणावर आंदोलन चालू आहे. आंदोलक जीव तोडून आणि हवालदील होऊन, डोळ्यात पाणी आणून प्रश्नं मांडतायत. शांततेने मोर्चे काढतायत.
इन्स्टाग्रामवर खूप सारे विडीयोज् आहेत, चर्चाही होत्ये. पण इथे एक्स वर तूलनेने खूप शांतता आहे!
सरकार कोणाचेही असो. तरूण तरूणींना अशी सतत आंदोलनं करून न्याय मागावा लागत असेल तर हे काही बरोबर नाही.
पण तरूणाई आता गप्प बसणार नाही. प्रश्नं विचारणार, जाब मागणार!
राज्यसरकारकडून त्यांना लवकरात लवकर उत्तरं मिळोत. न्याय मिळो!
नगरसेवक, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, पंतप्रधान
प्रशासन सगळ्यांना थेट प्रश्न विचारण्याचा अधिकार जनतेला आहे. देशाची घटना हा अधिकार प्रत्येक नागरीकाला देते. वाईट ह्याचं वाटतं की ते केलं की लोकांना राग येतो.
राजेशाही आपल्या रक्तात इतकी भिनल्ये की समानता आपल्याला मान्यच नाहीये.
‘एकतर तू मला तार किंवा मी तूला तारतो’ हीच आपली मनोवृत्ती आहे.
कारण सत्ताधाऱ्यांना प्रश्नं विचारले की लोक अंगावर धावून येतात. हे त्यांना का कळत नाही की प्रश्नं विचारताना ते सगळ्यांसाठी विचारले जातात. त्याची उत्तरं ही तूमच्यासाठीही असतात. सत्ताधारी हे तूम्हालाही उत्तरदायी आहेत. ते असायलाच पाहीजेत.
पण असो. ज्या देशात व्यक्तीपूजा ही जगण्याचा भाग आहे तिथे तर्काची अपेक्षा करणं हे चूक आहे.
Sameer Vidwans । समीर विद्वांस retweeted
Will FIRs also be filed against the IT cell members who have abused women in the worst possible manner for all these years?
सर तूमचं बरोबर आहे. शिव्यांचं समर्थन होऊच शकत नाही पण सर गेले अनेक वर्ष ते तूमचे काही (बरेच) समर्थक आणि ते IT Cell वाले देवा दिकांचे डीपी लावून समोरच्याला विचार न पटणाऱ्या पोस्टखाली अर्वाच्च शिव्या घालतात, त्यांनाही मोठ्या मनाने माफ करून टाका, की आधीच करून टाकलय?! की ठरावीक अंतराने माफ करत राहता! की त्यांना आयुष्यभरासाठी अभय दिलं गेलंय?!
ह्या आंदोलनातून आणि त्याला मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्यातून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे नवीन पिढीच्या भावना जास्त सर्वसमावेशक आहेत. व्यक्तीपूजेवर त्यांचा विश्वास नाही. आणि हे सर्व क्षेत्रांच्या बाबतीत ते वागणार. बेधडक प्रश्नं विचारणार, पटेल तेच करणार. मागच्या पिढीचं ‘कंडीशनींग’ त्यांच्यावर परिणाम करणार नाही. कारण त्यांना जगाचं खूप जास्त एक्स्पोजर आहे. आणि ते अजून मिळत राहणारे.
धर्म ह्या संकल्पनेलाही ते जीवन समजणार नाहीत. जीवनाच्या अनेक कप्प्यांपैकी एक कप्पा इतकंच ते धर्माकडे ते पाहणार. भूतकाळापेक्षा भविष्यकाळ त्यांना जास्त खूणावतोय. ‘आज’ काय आहे आणि ‘उद्या’ कसा असावा हे त्यांना महत्वाचं वाटतं. इथून पुढे टोकाचं धर्माचं राजकारण काम करणार नाही.
त्यांना चांगली नोकरी हव्ये, समृध्दी हव्ये. चांगलं आयुष्य हवंय. खोट्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल. हे त्यांच्या बेफीकीर बिनधास्त स्वभावाचं ब्रीदवाक्य ठरणार आहे. ही जमेची बाजू आहे.
अजून एक खूप मोठी जमेची बाजू म्हणजे ह्या आंदोलनातला मुलींचा मोठ्या प्रमाणात सहभाग. शिवाय सर्व जाती, पंथ, धर्म सर्व एकत्र होते. आपल्या पिढीने समानतेच्या गप्पा मारल्या पण ही नवीन पिढी ती समानता गवगवा न करता आचरणात आणताना दिसत्ये. ह्या पिढीकडून आपली आणि मागची पिढी धडे घेईल असं दिसतंय!
मला तरी भविष्य खूप आशादायी दिसतंय! २०२९ च्या निवडणूका सहज
सोप्या असणार नाहीत. गृहीत काहीच धरता येणार नाहीये.
सर्व स्तरावर परिवर्तन होणार असं वाटतंय.
अशी आशा करायला तर काहीच हरकत नाही 😊








