मान्य तुम्ही कारवाई केलात करतात पण त्या कारवाईमध्ये वेस्ट टायमिंग वेस्ट यंत्रणा कारण ज्यावेळी तुम्ही अतिक्रमण करता लगेच फ्रंट मार्जिनचे तर दुसरी दिवशी पुन्हा चालू होतं आणि वारंवार होतं याला कुठे आळा घालणार आहे तुम्ही तुम्ही कारवाई करता काय माता गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणात बोराटे वस्तीला खराडीत मोठी कारवाई झाली होती आता त्या ठिकाणी येऊन पहा.. पुन्हा जशास तसे मग या कारवाईचा अर्थ काय या प्रश्नाचे उत्तर कोण देणार..
📢 नगरसेवकांनी दिखावा बंद करावा; जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करावे!
मीटिंग, उद्घाटन, सत्कार, फोटो आणि मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्याला प्राधान्य द्या.
सोसायट्यांचा डेटा गोळा करणे, सहकार दरबार घेणे आणि मार्गदर्शन करणे यापेक्षा नागरिकांना प्रत्यक्ष सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे.
खराडी व परिसरातील नागरिक आजही अनेक मूलभूत समस्यांना सामोरे जात आहेत.
🔹 सोसायटीचा कचरा उचलणे मोफत व नियमित करा. 🔹 टँकर बंद करून नियमित नळाद्वारे पाणी द्या. 🔹 रस्त्यांवरील खड्डे बुजवा आणि रस्ते दुरुस्त करा. 🔹 भाजी मार्केटमुळे होणारी रस्त्यांची कोंडी थांबवा. 🔹 फूड स्टॉल्स व अनधिकृत अतिक्रमणांवर निष्पक्ष कारवाई करा. 🔹 रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळ्या करा. 🔹 विरोधात बोलणाऱ्या नागरिकांना किंवा सोसायट्यांना लक्ष्य न करता त्यांच्या प्रश्नांवर काम करा. 🔹 स्वतंत्र इमारतींना विनाकारण त्रास देणे बंद करा; नियम सर्वांसाठी समान असावेत. 🔹 मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काच्या मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजेत.
नगरसेवकांनी जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून काम करावे. नागरिकांना फोटो, प्रसिद्धी आणि दिखावा नको, तर पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते आणि अतिक्रमणमुक्त परिसर हवा आहे.
जनतेच्या मूलभूत सुविधा हा उपकार नसून नागरिकांचा हक्क आहे आणि त्या पुरवणे ही लोकप्रतिनिधी व प्रशासनाची जबाबदारी आहे.
📢 जनहितार्थ | आवाज जनतेचा प्रश्न जनतेचे… जबाबदारी लोकप्रतिनिधींची… उत्तर प्रत्यक्ष कामातून मिळाले पाहिजे!
#BJP #भारतीयजनतापक्ष #BJPMaharashtra #BJP_Pune #PuneMunicipalCorporation #PMC #पुणेमहानगरपालिका #पुणे #खराडी #वडगावशेरी #जनहितार्थ #आवाजजनतेचा #जनतेचेप्रश्न #नगरसेवकांनीकामकरावे #दिखावाबंदकरा #मूलभूतसुविधा #पाणीजनतेचाहक्क #अतिक्रमणमुक्तखराडी #खड्डेमुक्तरस्ते #कामबोललेपाहिजे #Accountability #PublicService #CivicIssues #CitizenRights #GroundWorkNotShow ✊📢BJP #भारतीयजनतापक्ष #BJPMaharashtra #BJP_Pune #PuneMunicipalCorporation #PMC #पुणेमहानगरपालिका #पुणे #खराडी #वडगावशेरी #जनहितार्थ #आवाजजनतेचा #जनतेचेप्रश्न #नगरसेवकांनीकामकरावे #दिखावाबंदकरा #मूलभूतसुविधा #पाणीजनतेचाहक्क #अतिक्रमणमुक्तखराडी #खड्डेमुक्तरस्ते #कामबोललेपाहिजे #Accountability #PublicService #CivicIssues #CitizenRights #GroundWorkNotShow ✊📢
19
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
मुख्यमंत्री दुसऱ्यांना अराजकवादी म्हणतात, पण स्वतः एका दूध संघाची निवडणूक हरल्यानंतर जनतेचा कौल स्वीकारण्याऐवजी सत्तेच्या जोरावर ‘होस्टाइल टेकओव्हर’ करण्याचा प्रयत्न करतात.
जनतेचा कौल पायदळी तुडवून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न करणारेच खरे अराजकवादी आहेत.
गोकुळ दूध संघाला या असंवैधानिक आणि अराजक शक्तींच्या तावडीतून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कोल्हापूरकरांना सलाम!
खराडी मध्ये ब्लू बेरी society जवळ PMC दवाखाने बाहेर फटका स्टॉल बिना परवाना... प्रशासन करते काय?
@PMCPune
2
302
🌳 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक प्रश्न!
आईला मारायचं आणि मुलींना जन्म देऊन आईची भरपाई केली म्हणायचं, हा कुठला न्याय?
त्याचप्रमाणे हजारो वर्षांची निसर्गसंपत्ती नष्ट करायची, जुनी झाडं कापायची आणि ९० हजार नवीन झाडं लावण्याचं आश्वासन द्यायचं!
५०-१०० वर्षांच्या झाडांची जागा नवीन रोपं घेऊ शकतात का?
विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल कशासाठी?
झाडं लावणं म्हणजे पर्यावरण संवर्धन; पण अस्तित्वात असलेली झाडं वाचवणं ही खरी जबाबदारी!
🌳 विकास हवा, पण निसर्गाचा बळी देऊन नाही!
✍️ प्रभा करपे
#DevendraFadnavis
#CMOMaharashtra
#MaharashtraGovernment
#SaveTrees
#StopTreeCutting
#SaveEnvironment
#TreeConservation
#पर्यावरण_वाचवा
#झाडांची_कत्तल_थांबवा
#विकासाच्या_नावाखाली_विनाश_नको
#जनहितार्थ
#PrabhaKarpe
@CleanKharadi @WelfareKrw40846 @WWFWagholi
42
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
धन्यवाद…!
अखेर MPSC च्या विविध परीक्षांच्या पेपरफुटीसह आणि शिपाई ते अध्यक्ष यांची चौकशी करुन आयोगाच्या संपूर्ण शुद्धीकरणासाठी Commissions Of Enquiry Act-1952 अंतर्गत न्यायिक आयोग स्थापन झाला. आयोगाकडून औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेसह Group B, Group C तसंच इतर संशयित परीक्षांचीही चौकशी होणार आहे. आयोगाला असलेले अधिकार बघता खालपासून वरपर्यंत संपूर्ण शुद्धीकरण होईल तसंच ३१७ च्या पुढील कारवाईसाठी शिफारस होईलच, ही अपेक्षा!
विद्यमान सदस्य अभय वाघ हे मोठे ‘खिलाडी’ असून त्यांना देखील भीमनवार यांच्याप्रमाणे रजेवर पाठवावे, अशी विद्यार्थ्यांची तीव्र भावना आहे. याबाबत सरकारने लक्ष घालावं, ही विनंती! Group B संदर्भात पुढच्या आठवड्यात न्यायिक आयोगाला भेटणार असून शक्य असतील तेवढे सर्व पुरावे आपल्याला द्यायचे आहेत, त्यामुळं विद्यार्थ्यांनी सर्व पुरावे विद्यार्थी प्रतिनिधी किंवा आमच्याकडे जमा करावेत, एकही दोषी सुटणार नाही याची आपण काळजी घेऊ!
जब तक घर भेजेंगे नहीं... तब तक छोड़ेंगे नहीं...!
#MPSC #MPSCPaperLeak #MPSCStudents #न्यायिक_आयोग #पेपरफुटी #विद्यार्थी_एकजूट
🎭 कलाकार गेला… पण माणुसकीचा एक मोठा वारसा मागे ठेवून गेला!
नाना पाटेकर म्हणजे केवळ एक महान कलाकार नव्हते, तर संवेदनशील मनाचा, समाजासाठी झटणारा आणि माणुसकी जपणारा माणूस होते. त्यांच्या अभिनयाने अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केले, तर सामाजिक कार्यातून त्यांनी अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला.
अशा व्यक्तीला निरोप देताना शब्द अपुरे पडतात… मन भरून येते.
पडद्यावरचा त्यांचा आवाज कायमचा शांत झाला, पण त्यांच्या भूमिका, विचार आणि माणुसकीची शिकवण सदैव आपल्या स्मरणात राहील.
🙏💐 महान कलाकाराला आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली!
🕉️ ॐ शांती.
#नाना_पाटेकर #NanaPatekar #भावपूर्ण_श्रद्धांजली #श्रद्धांजली #ॐशांती #महान_कलाकार #माणुसकी #समाजसेवा #नाम_फाउंडेशन #NanaPatekarForever #Legend #RestInPeace
1
46
PMC अधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आहेत, की बांधकाम पूर्ण होईपर्यंत झोप काढण्यासाठी?
तीन वेळा नुसती टोची मारून जात होते.. आणि कंप्लेंट बंद होत होत्या..
अनधिकृत बांधकाम सुरू असताना स्वतःहून पाहणी करून तात्काळ कारवाई करणे ही संबंधित विभागाची जबाबदारी आहे. नागरिकांनी तक्रार केल्यानंतरच कारवाई होणार असेल, तर यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
तोडक कारवाई झाल्यानंतरही अशाच प्रकारच्या अनधिकृत इमारती उभ्या राहत असतील, तर केवळ बांधकाम पाडून प्रश्न सुटणार नाही. संबंधित बिल्डर/बांधकामधारकाविरुद्ध FIR दाखल झालीच पाहिजे, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.
अनधिकृत बांधकामाला संरक्षण कोणाचे? जबाबदारी कोणाची?
आता केवळ कारवाई नको—बिल्डरविरुद्ध FIR दाखल करा!
कमिशनर याचे धन्यवाद! त्यांना याची आम्ही पूर्ण कल्पना दिली होती..
— प्रभा करपे | जनहित
@navalMH @navalMH @CPPuneCity@Wagholi @WelfareKrw40846 @CleanKharadi
बिल्डिंग बांधे पर्यंत PMC झोपली होती का? संबंधित अधिकारी आणि संबंधित व्यक्ती FIR दाखल झाले पाहिजे.. जेणे करून अशी काम पुन्हा होऊ नयेत.. आणि अशा बिल्डिंग खूप आहेत खराडीत.. आम्ही तक्रार केली म्हणून तुम्ही जागे झालात ..
PMC Demolishes 21,000-Sq-Ft Illegal Building on Playground-Reserved Plot in Kharadi punekarnews.in/pmc-demolishe…
युवा नेतृत्व शिवाजी मोरे.. यांनी MPSC पेपर फुटी प्रकरणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी उपोषण बसले आहेत.. त्याची मागणी MPSC इच्छा परीक्षेचे अध्यक्ष यांचा राजीनामा द्यावा.. आणि याच्या या मागणी साठी आणि त्यांना सपोट म्हणून आमचा पाठिंबा.. त्यांना पाठिंबा साठी आलेले अभिजित दिपके.. युवा पिढीचे नेतृत्व देशा साठी करत आहेत.. त्यांना देखील आमचा पाठिंबा.. चुकीचे आहे ते चुकीची म्हणण्याची ताकद या तरुणात आहेत.. उद्याचे भविष्य...@CJP_for_India
43
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
कहते हैं कि किसी परीक्षा में असफल होना मंजिल का अंत नहीं होता। शुभम सोनी की कहानी इसका एक उदाहरण है। शुभम को JEE, UPSC और RPSC जैसी प्रतियोगी परीक्षाओं में बार-बार असफलता का सामना करना पड़ा, लेकिन उन्होंने अपने करियर की दिशा में प्रयास जारी रखा। कई कोशिशों में सफलता नहीं मिलने के बावजूद शुभम ने अपनी स्किल्स और प्रोफेशनल करियर पर फोकस किया। आखिरकार उन्हें एक कंपनी से करीब ₹60 लाख सालाना पैकेज का ऑफर मिला।
#ShubhamSoni #SuccessStory #JEE #UPSC #RPSC #JEEFailed #UPSCFailed #RPSCFailed #CareerSuccess #JobPackage #60LakhPackage #60LPA #CareerNews #MotivationalStory #InspiringStory #StudentSuccess #News18Rajasthan
अशा प्रकारच्या जाहिरातींसाठी आकाशचिन्हाची परवानगी नेमक्या कोणत्या नियम/निकषांच्या आधारे देण्यात आली आहे?
संबंधित परवानगीची प्रत व अटी सार्वजनिक कराव्यात.
तसेच, याच चौकातील इतर अनधिकृत बांबू होल्डिंग्सवरही समान निकषाने तात्काळ कारवाई करून ती हटवण्यात यावीत.
नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाईही सर्वांवर समान झाली पाहिजे.
@PmcCare @PMCPune
1
45
🌺 Ganesh Chaturthi Wishes! 🙏
Let us celebrate Ganeshotsav traditionally, peacefully & responsibly, while preserving our culture and respecting others.
🔊 Let the voice of devotion be louder than loudspeakers.
Follow sound rules, prescribed timings & avoid unnecessary noise pollution. Let us be considerate towards senior citizens, children, patients & animals.
Tradition + Devotion + Discipline = Meaningful Ganeshotsav. 🌿🙏
Ganpati Bappa Morya! 🌺
#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #Ganeshotsav #TraditionalGaneshotsav #NoisePollution #ResponsibleCelebration #PublicWelfare #PrabhaKarpe
1
51
📢 जनहिताचा स्पष्ट प्रश्न — नियम सर्वांसाठी समान आहेत का?
झोन-7 मधील खराडी व चंदननगर परिसरातील दहीहंडी कार्यक्रमांमध्ये महिला नृत्य/कलानृत्य कार्यक्रमास परवानगी, कारवाई आणि नियमांच्या समान अंमलबजावणीबाबत पोलीस प्रशासनाकडे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
आमच्या माहितीनुसार, मंडळांना अशा कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही काही ठिकाणी प्रत्यक्षात महिला नृत्य/कलानृत्य कार्यक्रम झाल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट करावे—
🔹 संबंधित मंडळांना अशा कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली होती का?
🔹 परवानगी असल्यास तिची प्रत व त्यातील अटी व शर्ती काय होत्या?
🔹 परवानगी नसल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली का?
🔹 कारवाई झाली असल्यास त्याचा अधिकृत तपशील काय?
🔹 कारवाई झाली नसल्यास त्यामागील कारण काय?
विशेष म्हणजे, झोन-7 मध्ये मा. DCP साहेबांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उत्सवातील कार्यक्रमांबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. त्या सूचनांची सर्व संबंधित पोलीस स्टेशनकडून समान पद्धतीने अंमलबजावणी झाली का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.
⚖️ सर्वात महत्त्वाचा प्रश्न — नियम सर्वांसाठी समान आहेत का?
एका ठिकाणी महिला नृत्य/कलानृत्य कार्यक्रम रोखण्यात आला, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच स्वरूपाचा कार्यक्रम प्रत्यक्षात होऊ देण्यात आला, असे असल्यास दोन्ही ठिकाणी वेगवेगळे निकष का?
नियम समान असतील, तर त्यांची अंमलबजावणीही सर्व मंडळांसाठी समान असली पाहिजे.
हा कोणत्याही व्यक्ती किंवा मंडळाविरुद्धचा प्रश्न नसून, नियमांची पारदर्शकता, समानता आणि प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास याबाबतचा जनहिताचा प्रश्न आहे.
प्रशासनाने याबाबत स्पष्ट आणि अधिकृत माहिती जनतेसमोर मांडावी, ही अपेक्षा.
📢 आवाज जनतेचा… प्रश्न जनहिताचा…!
@CPPuneCity @iWagholi @CleanKharadi @IndiansOnTheGo @MumbaiPolice @DGPMaharashtra
1
94
🎀 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर प्रेम, विश्वास, आधार आणि एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्याचा सुंदर बंध.
ही नाती अशीच घट्ट राहोत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम, समाधान व आनंद नांदो. ❤️
सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
#रक्षाबंधन #RakshaBandhan #प्रेम #नाती #बंधుత్వ
37
Prabha Karape वडगावशेरी मतदार संघ - कार्यकर्त्या retweeted
I will go to Jaipur if the school repair work doesn’t begin and the BJP goons are not arrested within the next 48 hours.
@AshutoshRanka
खराडीमध्ये अतिक्रमण हटवायचे की जपायचे?
निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधींच्याच अतिक्रमणाला जणू 80% सूट मिळाल्याचे दिसते!
स्वतःचेच अतिक्रमण असल्यामुळे ‘अतिक्रमण फ्री’ची खास सुविधा का? 😏
नवीन रस्ते दिसतील तिथे भाजी मार्केट..
@PMCPune
@navalMH
#खराडी #अतिक्रमण #लोकप्रतिनिधी #अतिक्रमणमुक्त_खराडी #नागरिकांचा_आवाज #जनतेचा_आवाज #PMC #पुणे #Kharadi #Encroachment #CivicIssues #PublicInterest
1
3
156
### 🇮🇳 **८० वा स्वातंत्र्यदिन — देश खरोखर स्वतंत्र कधी होणार?** 🇮🇳
आज आपण **८० वा स्वातंत्र्यदिन** मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. तिरंगा फडकतोय, देशभक्तीची गाणी वाजत आहेत, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे… पण एक प्रश्न मनाला सतत टोचतोय — **आपला देश खरोखरच स्वतंत्र झाला आहे का?**
ज्या देशात **शेतकरी आपल्या हक्कासाठी रडतो, कष्ट करतो आणि तरीही असुरक्षित असतो**, ज्या देशात आपल्या मुलांना **शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो**, जिथे **शिक्षण दिवसेंदिवस महाग होत आहे**, जिथे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी चांगले शिक्षण घेणे ही मोठी आर्थिक लढाई झाली आहे…
ज्या देशात **आरोग्य ही सेवा न राहता अनेकांसाठी आर्थिक ओझे बनते**, सरकारी रुग्णालयांमध्ये पुरेशा सुविधा मिळत नाहीत आणि खाजगी उपचारांचा खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जातो… तिथे आपण स्वतःला पूर्णपणे स्वतंत्र कसे म्हणायचे?
**स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्ती नाही. स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार!**
शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. प्रत्येक मुलाला **गुणवत्तापूर्ण आणि परवडणारे शिक्षण** मिळाले पाहिजे. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळा अत्याधुनिक झाल्या पाहिजेत; गरीब मुलांच्या शिक्षणासाठी पैसा हा अडथळा ठरता कामा नये.
सरकारी रुग्णालयांमध्ये **खाजगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधा, डॉक्टर, औषधे आणि आधुनिक उपचार** उपलब्ध झाले पाहिजेत. आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा **व्यवसाय नव्हे, तर सरकारची जबाबदारी** मानली गेली पाहिजे.
खाजगीकरण असो किंवा विकास असो—तो **सामान्य माणसाच्या हितासाठी** झाला पाहिजे; सामान्य माणसाच्या हक्कांवर गदा आणण्यासाठी नाही.
आज गरज आहे ती केवळ **“भारत माता की जय” म्हणण्याची नाही, तर भारतातील प्रत्येक नागरिकाला न्याय, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सन्मान मिळवून देण्याची.**
**ज्या दिवशी शेतकरी आनंदाने जगेल, ज्या दिवशी मुलांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागणार नाही, ज्या दिवशी गरीबाला उपचारासाठी घर विकावे लागणार नाही, ज्या दिवशी प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क आणि अधिकार मिळेल— त्या दिवशी मी म्हणेन… 🇮🇳 “होय, आज माझा देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला!” 🇮🇳**
**८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त एक संकल्प — देश फक्त पुढे नेण्याचा नाही, तर प्रत्येक सामान्य माणसाला सोबत घेऊन पुढे नेण्याचा!**
🇮🇳 **जय हिंद! जय भारत!** 🇮🇳 **— प्रभा करपे** *सामाजिक कार्यकर्त्या*
#80thIndependenceDay #स्वातंत्र्यदिन #जनतेचा_आवाज #शेतकरी #शिक्षण #आरोग्य #हक्क #जय_हिंद @CJP_for_India
57
येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग ४, ५ व ६ संदर्भातील बैठकीदरम्यान प्रभाग ४ मधील लोकप्रतिनिधींच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तीने बैठक सुरू असताना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना बाहेर बोलावून घेतले. बैठक सुरू आहे, अधिकारी विषय मांडत आहेत याची पर्वा न करता हा हस्तक्षेप झाला. नंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याशी अयोग्य भाषेत बोलून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. या व्यक्तीच्या वर्तनाबाबत नागरिकांच्या तक्रारीही आमच्यापर्यंत येत आहेत.
जनतेच्या कामासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा किंवा पाठपुरावा केला असता तर ते समजण्यासारखे होते. मात्र येथे जनतेच्या कामाचा विषय नसून झेंड्यांसारख्या साहित्याच्या मागणीसाठी उशीर झाल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांवर दबाव आणला गेला, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. बैठकीची शिस्त भंग करून अधिकाऱ्यांचा अपमान करणे योग्य नाही.
लोकप्रतिनिधी आपल्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींना कोणती शिस्त आणि संस्कार देतात, हा प्रश्न आहे. मा. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची वस्तुस्थिती तपासून आवश्यक कार्यवाही करावी. पदाच्या नावाखाली दादागिरी जनता सहन करणार नाही. स्वतःला उच्चशिक्षित म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सहकाऱ्यांना सभ्यता आणि लोकशाहीची शिस्त शिकवावी. शिक्षणाची खरी किंमत वर्तनातून दिसते.
जनता हुकूमशाही सहन करणार नाही.
@PMCPune @MahaPolice @CMOMaharashtra
#Pune #Yerwada #PMC #GoodGovernance #CitizenRights #लोकशाही #जनतेचाआवाज
@iWagholi @CleanKharadi @navalMH
3
92
























