Sada Sarvankar (@misadasarvankar) header
Sada Sarvankar (@misadasarvankar) profile picture

अध्यक्ष - श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास (राज्यमंत्री दर्जा) ● मा. आमदार माहीम विधानसभा ● शिवसेना - उपनेते ● माजी स्थायी समिती अध्यक्ष, बृहन्मुंबई म.न.पा.

Mumbai, India
Joined October 2016
Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)Photo by Sada Sarvankar (@misadasarvankar)
सत्य, सेवा आणि समतेचा दिव्य संदेश देत मानवतेला प्रेम, बंधुता आणि सद्भावनेची शिकवण देणारे गुरु नानक देवजी यांचे विचार सदैव जीवनाला प्रकाशमान करोत. गुरु नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
2
306
हाती लोण्याचा गोळा, ओठी गोड हसू, घराघरात नांदू दे आपला लाडका वासू! बासरीच्या सुरांनी निनादू दे अंगण, श्रीकृष्णाच्या कृपेने सुखी होवो जीवन! तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏✨
1
103
रेशमी धाग्यात गुंफलेले प्रेम, विश्वासाचे बंधन आणि आयुष्यभराची साथ... प्रत्येक सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभ्या राहणाऱ्या, आपुलकी आणि प्रेमाचा आधार असणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸✨
2
99
क्षितिजापलीकडे पाहण्याची जिद्द आणि अशक्य ते शक्य करण्याची ताकद... अंतराळाच्या अथांग पसाऱ्यात भारताची पाऊलवाट उमटवणाऱ्या प्रत्येक वैज्ञानिकाला सलाम! राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
3
408
ॐ नमः शिवाय! पवित्र श्रावणाचा प्रथम सोमवार आणि सोबत नागपंचमीचा हा मंगलमयी योग! महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होऊन आयुष्यात सुख, यश आणि उत्तम आरोग्य लाभो. आपणांस व आपल्या परिवारास नागपंचमी आणि पहिल्या श्रावणी सोमवारच्या मंगलमय शुभेच्छा!
1
2
3
159
नव्या कल्पना आणि नवे विचार…. आजचा तरुणच उद्याच्या उज्ज्वल आणि समृद्ध भविष्याचा पाया आहे! सर्व युवा मित्रांना आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2
96
कांदा मुळा भाजी | अवघी विठाबाई माझी... आपल्या कष्टालाच पूजा मानून, शेतातल्या मातीत श्रीविठ्ठलाचे रूप पाहणारे श्रेष्ठ वारकरी संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन! 🙏✨
1
104
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥ संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विनम्र अभिवादन! नामस्मरणातून भक्तीचा मार्ग अखिल जनमानसाला दाखविणाऱ्या या महान संतांच्या चरणी कोटी कोटी नमन.
1
4
172
जल, जंगल आणि जमिनीचं रक्षण करणाऱ्या निसर्गपुत्रांच्या समृद्ध संस्कृतीला आणि अथांग वारशाला मानाचा मुजरा! जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
4
180
स्वदेशीचा स्वाभिमान, कारागिरांचा सन्मान. चला जपूया आपल्या परंपरेचा अनमोल ठेवा! राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सर्व हातमाग कारागिरांना आणि विणकरांना त्रिवार सलाम!
1
126
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच!” या सिंहगर्जनाने अखंड भारताला जागवणारे, क्रांतीची धगधगती मशाल पेटवणारे थोर राष्ट्रपुरुष, जहाल नेतृत्वाचे मेरूमणी, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
1
6
238
शोषितांचे दुःखाश्रू आपल्या साहित्यातून मांडणारे, शब्दांना क्रांतीची आणि संघर्षाची धार देणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
1
3
162
पाऊले चालती पंढरीची वाट... 🚩 संतांची पालखी निघाली पंढरीला, भक्तीचा पूर आला अलंकापुरीला! संत ज्ञानेश्वर माऊली पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बंधू-भगिनींना भक्तीमय शुभेच्छा! 🚩🙏
1
2
115
विघ्नहर्ता, सुखकर्ता, आराध्य दैवत गणराया... तुझे आशीर्वाद आम्हा सर्वांवर सदैव राहोत. तुझ्या कृपेने सर्वांचे जीवन सुख-समृद्धीने आणि उत्तम आरोग्याने वृद्धिंगत होवो. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने सर्व गणेशभक्तांना मंगलमय शुभेच्छा.!
1
4
169
शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या वैभवाचा सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याला मानाचा मुजरा. सर्व शिवप्रेमींना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
2
4
148
हिंदुत्वाचा हुंकार, अन्यायावर प्रहार... शिवसेना म्हणजेच बाळासाहेब आणि त्यांचे बुलंद विचार!🚩 हिंदुत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या सर्व बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या भगव्यामय शुभेच्छा! जय महाराष्ट्र! 🚩 जनात शिवसेना, मनात शिवसेना!
2
4
105
सर्व गणेश भक्तांना विनायक चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! विघ्नहर्ता श्री सिद्धिविनायकाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होवोत, सुख, समृद्धी, आरोग्य आणि यशाने आपले जीवन उजळून निघो, हीच श्री चरणी प्रार्थना.
1
3
62
या जागतिक पर्यावरण दिनी स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी वृक्षारोपण, जलसंवर्धन व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प करूया. पर्यावरणाचे संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. निसर्गाचे रक्षण म्हणजेच मानवजातीच्या भविष्याचे संरक्षण.
1
2
37
प्रखर राष्ट्रवाद हेच ज्यांचे जीवन आणि हिंदुत्व हाच ज्यांचा श्वास होता, अशा क्रांतीच्या धगधगत्या वीराला, ज्यांनी आपल्या लेखणीतून आणि विचारांतून हिंदू मनाला स्वाभिमान दिला, अश्या महापुरुषाला, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती दिनी त्रिवार वंदन!🚩
1
2
63
विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा पाया रचून भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख देणारे आधुनिक भारताचे शिल्पकार, शांततेचे दूत आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
1
2
60