Sunil Shinde (@misunilshinde) header
Sunil Shinde (@misunilshinde) profile picture

Member of Maharashtra Legislative Council I Ex MLA, 182 Worli | Ex Chairman of BEST Committee | Ex Corporator I अध्यक्ष : भारतीय विमा कर्मचारी सेना (LIC UNIT)

Lower Parel, Mumbai
Joined March 2014
Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)Photo by Sunil Shinde (@misunilshinde)
कालपण, आजपण आणि उद्यापण…फक्त @ShivSena #ShivsainikForever 🚩 @OfficeofUT @AUThackeray
67
248
9
4,297
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
1
42
202
2,652
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी हुतात्म्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. ह्यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, उपनेते रविंद्र मिर्लेकर, उपनेत्या माजी महापौर विशाखा राऊत, उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनिल शिंदे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार डॉ. राहुल पाटील आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.
48
1
226
3,031
अभिवादन लढवय्या वीरांना!
31
150
2,234
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
24
101
1,781
भारतीय आयुर्विमा महामंडळातील माझे सहकारी तथा भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थानीय लोकाधिकार समिती, फोर्ट विभागाचे उपाध्यक्ष श्री. अनिल गायकवाड यांनी महामंडळात तब्बल ३२ वर्षे अविरत आणि समर्पित सेवा बजावल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. या निमित्त आज त्यांची भेट घेऊन LIC मधील त्यांच्या या प्रदीर्घ सेवाकाळातील योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व निवृत्तीनंतरच्या नव्या जीवनप्रवासासाठी त्यांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान आणि आनंद लाभो, या सदिच्छा व्यक्त करून त्यांना सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
5
27
396
महाराष्ट्राला आत्मभान देणारे समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
1
43
164
2,264
परखड पत्रकार, निर्भीड विचारवंत आणि थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
3
71
297
4,052
अखेर प्रयत्नांना यश... रुग्णांना मोठा दिलासा ! 📍 नायर रुग्णालय | मुंबई नायर रुग्णालयातील MRI मशीन बंद पडल्यामुळे अनेक रुग्णांना तपासणीसाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गैरसोय दूर होऊन रुग्णांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णालयात नवीन MRI मशीन बसविण्याकरिता माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. यासाठी विधिमंडळ अधिवेशन तसेच जिल्हा नियोजन समिती (DPDC) च्या माध्यमातून माझा महानगरपालिकेकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, आज नायर रुग्णालय येथे ३ टेस्ला क्षमतेच्या अत्याधुनिक MRI मशीनचे महापौरांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मी उपस्थित होतो. या नवीन सुविधेमुळे रुग्णांना वेळेत आणि अधिक अचूक निदानाची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात मी केलेल्या पाठपुराव्याच्या लिंक १. facebook.com/reel/2351365861… २. facebook.com/share/p/1d7cjF7… ३. facebook.com/photo/?fbid=708…
4
22
368
शिवसेना उपनेत्या, प्रवक्ता आणि माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #HappyBirthday @priyankac19
8
1
92
7,669
तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर फाडण्याचा अत्यंत निषेधार्ह प्रकार करणाऱ्या शिंदे सेनेच्या प्रवक्त्या शायना एन. सी. च्या विरोधात व या कृत्याबाबत शिंदे गटाला जाब विचारण्यासाठी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक ११ च्या वतीने भारतमाता सिनेमा येथे आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
2
8
31
441
एलआयसी ऑफ इंडियातील माझे सहकारी, भारतीय विमा कर्मचारी सेना (एलआयसी युनिट) - कार्याध्यक्ष, सायन-कोळीवाडा मतदार संघाचे "विधानसभा प्रमुख" श्री. गोपाळ शेलार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.! #HappyBirthday #GopalShelar
7
39
382
मुंबईतील सर्व पागडी रहिवाशांच्या घराच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी रयत सेवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, दादर येथे आयोजित महासभेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
7
28
389
#माझे_प्रेरणास्थान 🙏🏼 मस्तक सदैव तुमच्या पायी..! शिवतीर्थ येथे माझे दैवत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला विनम्र अभिवादन केले. #मानवंदना #स्मृतिदिन #दैवत
11
169
920
शत जन्माचे उपकार तुमचे आम्हावरी आम्ही नाही विसरणार ह्या जन्मातरी शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन...!!🙏💐 #१७नोव्हेंबर #स्मृतिदिन #साहेब
10
65
432
आज आम्ही @MumbaiUni भेट देऊन, कुलगुरूंनी विद्यापीठात लोकशाही तत्त्वांचे पालन करावे, अशी आग्रही मागणी केली. आमचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत ह्यांना अपात्रतेसंदर्भात 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्यात आली आहे. काही महाविद्यालयांमधील कॅन्टीन, स्वच्छतागृहे आणि वर्गखोल्यांमधील अस्वच्छतेबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामुळे मुंबई विद्यापीठाची कथित "बदनामी" झाली, असे कारण ह्या नोटिशीत देण्यात आले आहे. तसेच, सिनेटच्या बैठकीत ठरलेल्या कार्यपत्रिकेच्या बाहेरील विषय मांडल्याचा उल्लेखही ह्या कारणे दाखवा नोटिशीत करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात प्रशासकीय अकार्यक्षमता आणि भाजपचे आदेश पाळण्यामुळे कुलगुरूंचे पद ह्यापूर्वीही कधीही इतक्या खालच्या पातळीवर घसरले नव्हते. महाविद्यालयांमधील आणखी प्रश्न आणि कुलगुरूंच्या प्रशासकीय अकार्यक्षमतेविरोधात आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू!
4
64
312
8,188
वरळी | बीडीडी चाळ क्र. ६४ व ६५ शिवाजी क्रीडा मंडळ, वरळी बीडीडी चाळ क्र. ६४ व ६५ यांच्या वतीने आयोजित निरोप समारंभास उपस्थित राहिलो. लवकरच पुनर्विकासासाठी या चाळींचे पाडकाम होणार असल्याने, अनेक वर्षांच्या आठवणींनी, जिव्हाळ्याच्या नात्यांनी आणि सुख-दुःखात एकमेकांना साथ देणाऱ्या माणुसकीच्या बंधांनी जोडलेल्या या वास्तूच्या निरोप घेणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देत, या चाळींचा पुनर्विकास लवकरात लवकर पूर्ण होऊन सर्व रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या, प्रशस्त आणि नव्या घरात सुखाने राहता यावे, या मनःपूर्वक सदिच्छा दिल्या
2
11
169
ज्येष्ठ व निष्ठावंत शिवसैनिक श्री. कृष्णा (भाऊ) मेढेकर यांचा ८० वा वाढदिवस आज शिवसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी भाऊंना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 💐🎂🚩
3
23
305
📍 आर्थर रोड नाका | मुंबई वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खासदार मा. श्री. अरविंदजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि जाणीव ट्रस्ट आयोजित भव्य कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ आज ह.भ.प. साध्वी सोनाली दीदी करपे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांच्यासह वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
3
123
📍 जांबोरी मैदान | वरळी जांबोरी मैदान, वरळी येथे महापर्व छठ पूजा समिती, वरळी यांच्या वतीने आयोजित छठ पूजा कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी छठ पूजेत सहभागी होत, उपस्थित भाविकांशी संवाद साधला व सर्वांना छठ पूजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सूर्योपासनेचा आणि श्रद्धा, भक्ती व समर्पणाचा संदेश देणारा हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच सदिच्छा!
1
1
4
198