मराठी माती retweeted
"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे कवी आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर) यांनी लिहिलेले एक प्रसिद्ध मराठी गीत
• गीतकार: आरती प्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर)
• चित्रपट: सामना (१९७४)
• गायक: रवींद्र साठे
आयुष्यातील जबाबदाऱ्यांचे ओझे, नश्वरता, व्यथा, त्याग आणि मानवी अस्तित्वाचे प्रश्न या गाण्यातून मांडले आहेत.
"कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कशासाठी उतरावें तंबू ठोकून?", "जन्म व्याधी" आणि "अंत अस्ताआधी" यांसारख्या मार्मिक ओळींमुळे ही रचना गाजली.
मराठी माती retweeted
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺
🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
मराठी माती retweeted
🙏 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन🙏
आज १७ नोव्हेंबर, शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन.
व्यंगचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू करणाऱ्या बाळासाहेबांनी आपल्या कुंचल्यातून आणि वाणीतून मराठी माणसाला स्वाभिमानाने उभं राहण्याची प्रेरणा दिली. "मार्मिक" साप्ताहिकातून त्यांनी आपले विचार मांडले, १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना केली आणि पुढे "सामना" दैनिकातून आपली भूमिका ठामपणे मांडत राहिले.
त्यांची रोखठोक शैली, स्पष्ट भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेली नाळ यामुळे ते कोट्यवधी चाहत्यांच्या मनात कायम राहिले. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, पण त्यांच्या आठवणी आणि विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात.
विनम्र अभिवादन 🙏🙏
मराठी माती retweeted
🙏 कुसुमावती देशपांडे: मराठी साहित्यातील तेजस्वी विदुषी 🙏
आज १७ नोव्हेंबर, ज्येष्ठ लेखिका, समीक्षक आणि अभ्यासक कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन. 📚
इंग्रजी साहित्यात ऑनर्स पदवी मिळवून त्यांनी नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम केले. पुढे आकाशवाणीत चीफ प्रोड्यूसर म्हणूनही त्या कार्यरत होत्या. 'दमडी', 'चिंधी', 'कला धोबिणीचे वैधव्य' अशा त्यांच्या कथांमधून सर्वसामान्यांचे जीवन चित्रमय शैलीत उभे राहिले. त्यांच्या कथांत नवकथेची बीजे दिसतात, असे समीक्षक मानतात. ✍️
'मराठी कादंबरी: पहिले शतक' हा त्यांचा ग्रंथ आजही मराठी कादंबरीच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा मानला जातो. 'पासंग', 'दीपकळी', 'दीपदान' आणि 'मोळी' यांतून त्यांचे समीक्षा आणि ललित लेखन वाचकांपर्यंत पोहोचले.
१९६१ मध्ये ग्वाल्हेर येथे झालेल्या ४३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. दुर्दैवाने त्याच वर्षी, १७ नोव्हेंबर १९६१ रोजी हृदयविकाराने त्यांचे अकाली निधन झाले.
कवी अनिल यांच्याशी झालेला त्यांचा आंतरजातीय विवाह आणि 'कुसुमानिल' मधून समोर आलेली त्यांची प्रेमपत्रे हा मराठी साहित्यातील एक हृद्य अध्याय आहे. 💞
कुसुमावती देशपांडे यांना विनम्र अभिवादन! 🙏
मराठी माती retweeted
रॉबर्ट पॅटिन्सन: नवा जेम्स बाँड! 🎬
"द बॅटमॅन" आणि "ट्वायलाइट" फेम ब्रिटिश अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन आता जेम्स बाँडच्या भूमिकेत दिसणार आहे. डॅनियल क्रेगची नंतर जेम्स बाँडची भूमिका साकारणारा सातवा अभिनेता ठरला आहे. 🕵️♂️
२०२८ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या २६ व्या बाँडपटात तो झळकणार आहे. अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओजने १६ नोव्हेंबर रोजी याची अधिकृत घोषणा केली. 💥
तुम्हाला ही निवड कशी वाटली? कमेंटमध्ये सांगा! 👇
मराठी माती retweeted
Replying to @DrVrushaliRaut
स्मिता पाटील यांची सुलभा ही मराठी सिनेमातील एक अविस्मरणीय कलाकृती आहे. अशी भूमिका पुन्हा साकारली जाणे अशक्य आहे
मराठी माती retweeted
नाट्यसंगीत आणि लावणी duet ? होय अगदी बरोबर वाचलंत !
हे भन्नाट duet आहे...
महाराष्ट्रात इतिहास निर्माण केलेला लावणीवरील कार्यक्रम, अर्थात प्रा. वसंत बापट लिखित, डॉ. मीना नेरुरकर दिग्दर्शित 'सुंदरा मनामधे भरली' मध्ये !
हे duet चंद्रकांत काळे, नूतन नाडकर्णी आणि अमिता आंबेगांवकर यांनी सादर केले आहे.
मराठी माती retweeted
दिवाळी अंक ❌
जाहिराती संच ✅
लोकसत्ता दिवाळी अंक कोणीही घेऊ नये ही नम्र विनंती किंमत फक्त 200 आहे पण अतिशय चीड आणणारी बाब म्हणजे पहिल्या 180 पानात प्रत्येक उजव्या पानावर सम्पूर्ण पानभर जाहिराती आहेत.पैसे वाया घालवू नका .
🙏
@girishkuber
मराठी माती retweeted
गझलकार सुरेश भट यांनी शब्दांत गुंफलेली एक अविस्मरणीय रात्र आणि हळवी पहाट. ✍️🌙
"केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली" हे कवी सुरेश भट यांनी लिहिलेले आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले एक अत्यंत लोकप्रिय मराठी गाणे आहे. हे गाणे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी गायले असून ते 'निवडुंग' (१९८९) या चित्रपटातील आहे.
मराठी माती retweeted
🌺 वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।🌺
🌺 निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🌺
















