
ALT नेहमी महिलांनाच नाही, कधी कधी पुरुषांनाही आधाराची गरज असते. कारण कधी कोण कुठल्या कारणामुळे कुटुंबापासून दुरावेल ते सांगता येत नाही.अशांनाच आधार देण्यासाठी गोदिया नगर परिषदेने 'दिनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत २०१८-१९ मध्ये तात्पुरतं 'सावली नागरी बेघर निवारा केंद्र' सुरू केल. या केंद्रात कायमच सरासरी २८ बेघर पुरुष वास्तव्याला असतात. बचतगटाच्या माध्यमातून पिशव्यांच्या व्यवसायाचा हा सुरुवातीचा टप्पा यशस्वीपणे पार केल्यावर सर्व सदस्यांना बचतगटाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय करण्याचे वेध लागले. म्हणून त्यांना बँक लिंकेजच्या माध्यमातून तब्बल १ लाख रुपये देण्यात आले. या रकमेतून गटाने अगरबत्ती पेकेजिंग आणि सुकी मिसळ (खारा बनवणे) व्यवसायाला सुरुवात केली. त्यातून सध्या या गटाला चांगला नफा मिळत आहे आणि त्यामधूनच मासिक बचत आणि दैनंदिन वापरातल्या वस्तु व बाहेरून लागणारी औषध या बेघर निवाऱ्यातील लाभार्थ्यांना पुरवण्यात येतात.

ALT महिलाशक्ती एकत्र आली तर काय चमत्कार घडवू शकते, ते रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत विविध महिला बचतगटांनी एकत्र येऊन सुरू केलेलं 'सोनचिरैया सुपर मार्केट पाहिल्यावर लक्षात येतं. हे सुपरमार्केट म्हणजे अलीबाबाची गुहाच आहे. नजर जाईल तिथे जीवनोपयोगी वेगवेगळ्या वस्तूंची उपलब्धता प्रत्येकच वस्तू हवीहवीशी वाटणारी... आणि ते साहजिकही आहे. कारण या सुपरमार्केटची केवळ कल्पनाच महिलांची आहे असं नाही, तर संपूर्ण मार्केट महिलांच्या बचतगटांनीच चालवले आहे विविध ब्रॅन्ड्स च्या रोजच्या जीवनातील वापराच्या वस्तू खाद्यपदार्थ या सोबतच महिला बचतगटांनी बनलेल्या अनेक जिन्नस इथे उपलब्ध आहेत. अर्थात हे सारं शक्य झालंय ते रत्नागिरी नगर परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत 'दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामुळेच!






















