|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) header
|ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak) profile picture
Mumbai, India
Joined December 2016
Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)Photo by |ग्रं|थो|पा|स|क| (@granthopasak)
#पुस्तकांची_ओळख ✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻 By #ग्रंथोपासक 😊 प्रत्येकच देशाच्या इतिहासात कित्येक दुर्दैवी घटनांच्या नोंदी सापडतात. काही नैसर्गिक तर काही मानवनिर्मित. नैसर्गिक आपत्तीला टाळता येणे अशक्य असले, तरी सोयीच्या दुर्लक्षामुळे, चुकांमुळे देशाला, एखाद्या समाजाला झालेले जबर नुकसान टाळणे मात्र शक्य असते. ३१ ऑक्टोबर १९८४ ला इंदिराजींची हत्या झाली त्याआधी त्यांचे अंगरक्षक बदलण्याच्या सूचना सुरक्षा यंत्रणांनी दिल्या होत्या. परंतु आपण शीख अंगरक्षक बदलले तर या समाजाबद्दल अविश्वासाचा वारा वाहील या कारणाने इंदिराजींनी त्यास नकार दिला (वाचलेलं). आणि शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. सुरक्षारक्षक सतवंत सिंग आणि बिअंत सिंग यांनी इंदिराजींच्या देहाची अक्षरशः चाळण केली. या हत्येचं कारण ठरलं सुवर्ण मंदिरात शिरलेले अतिरेकी हुसकावून लावण्यासाठी केंद्र सरकारने केलेली लष्करी कारवाई... ५ जून ते १० जून १९८४ या कालावधीतील सुवर्ण मंदिरातील लष्करी कारवाईचा आँखो देखा हाल म्हणजे "ऑपरेशन ब्लू स्टार, जसं घडलं तसं..." हे पुस्तक. ते ही खुद्द ऑपरेशन प्रमुख लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांच्याकडून, अगदी इत्यंभूत, तपशीलवार... भारत पाकिस्तान फाळणीतून हिंदू-मुसलमान राष्ट्रे निर्माण झाली खरी, पण या फळणीत अजून एक फाळणी दिसून येते ती पंजाबची. फळणीमध्ये पंजाबचेही दोन तुकडे झाल्यामुळे पंजाबवर वर्चस्व असणाऱ्या शीख समाजाला हिंदू नेत्यांबद्दल, हिंदू समाजाबद्दल अविश्वास वाटू लागला असावा (मत). १९४७ पासूनच पंजाबी बोलणाऱ्यांसाठी पंजाब हे स्वतंत्र राज्य असावं या मास्टर तारा सिंह यांच्या मागणीपासून, १९७० च्या दशकात स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या अतिरेकी भिंद्रनवाले याच्या उदयापर्यंत, पंजाबचे धगधगते राजकारण, खदखदते समाजकारण लेखकाने थोडक्यात पण अगदी व्यवस्थित समजावून दिले आहे. पंजाब आणि पंजाबचे लोकमानस भिंद्रनवालेच्या ताब्यात गेलं आणि देशाच्या एकोप्याला आव्हान देणाऱ्या एका क्रूर अतिरेक्याचा जन्म झाला. अकाली दलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सुरवातीला काँग्रेसनेही भिंद्रनवालेला ताकद दिली होती (वाचलेलं) आणि काही काळाने हाच भिंद्रनवाले काँग्रेस, अकाली दल, पोलीस, प्रशासन वैगेरे कुणालाही ऐकेनासा झाला. अनेक खून, असंख्य लुटी करून समांतर सरकार चालवणाऱ्या भिंद्रनवालेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकार हालचाली करू लागल्यावर, त्याने शेवटी शीख समाजाची अस्मिता असणाऱ्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला. अनेक प्रशिक्षित अतिरेकी, सैन्य दलातील निवृत्त/ बडतर्फ अधिकारी, गुन्हेगार, अत्याधुनिक शस्त्र सामग्री वैगेरेंनी सज्ज असलेल्या भिंद्रनवालेशी लढताना, सुवर्ण मंदिरातील हरमंदिर साहिब (पवित्र स्थान) वर एकही गोळी चालवणार नाही अशी मनोमन शपथ घेऊन लढणारे आपले ८३ वीर सैनिक मृत्यूला सामोरे गेले. लेखकाने या लढाईची गरज, निर्णय, आखणी, हालचाल, वाटचाल, अफवा, गैरसमज, संग्राम आणि विजय वैगेरे या पुस्तकात व्यवस्थित रचून ठेवला आहे. प्रत्यक्षात कारवाई ५-६ दिवसरात्र चालली असली, तरी त्याचे परिणाम पुढील २५-३० वर्षे दिसत होते... जसे इंदिराजींची हत्या, शीखांविरुद्धची दंगल, त्यावेळचे लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या, शिवाय खुद्द लेखकावर लंडनमध्ये झालेला हल्ला... सुवर्ण मंदिरातील या लष्करी कारवाईच्या हेतूबद्दल प्रशासकीय अधिकारी कुलदीप नय्यर किंवा ज्येष्ठ साहित्यिक खुषवंतासिंग यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित लोकांचेच अगाध अज्ञान होते, तर सर्वसामान्य शीख समाजामध्ये लष्कराच्या या धाडसाविरोधात किती अफवा आणि किती गैरसमज पसरले होते याची कल्पना पुस्तक वाचताना येते. या विषयावरील आपल्या समजाचे, माहितीचे खुंटे हलवून पुन्हा बळकट करण्यासाठी नक्कीच #वाचावं_असं_पुस्तक #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #सबका_मलिक_एकच_पुस्तकं #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
#पुस्तकांची_ओळख ✍🏻✍🏻✍🏻✍🏻 ✍🏻✍🏻✍🏻 by #ग्रंथोपासक 😊 फॉर हिअर, ऑर टू गो? इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या प्रत्येकाला कधी न कधी कळत नकळत कुत्सितपणे विचारला गेलेला हा प्रश्न... इथेच राहणार की गडगंज पैसा कमावून आपापल्या देशात निघून जाणार? हेटाळणीचे असे टोमणे झेलत १९६० च्या आसपास अमेरिकेत येण्यासाठी देश सोडलेले मराठी तरुण तरुणी, हे पुस्तक २००७ साली प्रकाशित झालं तेव्हा ६०-७० वर्षांचे सिनियर सिटिझन्स झाले असतील. त्यांच्या स्थलांतरित आयुष्यातील ४०-४५ वर्षांच्या हेलकाव्यांच्या लाटा, अपर्णा वेलणकर या कलंदर लेखिकेने या पुस्तकात कैद केल्या आहेत. कधी अक्राळ विक्राळ तर कधी संथ गंभीर अशा समुद्री लाटांच्या हेलकाव्यांमधून जशी लहान मोठी जहाजे आपापल्या वकुबाप्रमाणे मार्गक्रमण करत असतात, तशा काही मराठी माणसांच्या आयुष्याच्या जहाजांचे हे स्थलांतरित मार्गक्रमण... अमेरिकेच्या किनाऱ्याला लागणाऱ्या या मराठीजनांचे चार लाटांमध्ये वर्गीकरण करता येतील... भारतातील कारकुनी शिक्षण आणि संधींची उपासमार या तुलनेत अमेरिकेतील उच्च शिक्षण, स्वातंत्र्य आणि प्रगतीची संधी पाहून पहिल्या पिढीतील लोकांनी अमेरिकन भूमीवर पाय ठेवले ती स्थलांतरितांची पहिली लाट. जन्मापासून तरुणपणापर्यंतच्या आठवणी, माणसे, ठिकाणं हजारो मैल दूर ठेवून आलेल्या या पिढीला अमेरिकेत जम बसवण्यास प्रचंड संघर्ष करावा लागला आणि सुरू झाली शरीर-मनाची, भाव-भावनांची, अदृश्य असह्य घालमेल आणि तडफड. त्यातून काही अपयशी होऊन माघारी फिरले, तर काहींनी तग धरत आपल्या अर्धांगिनीला अमेरिकेत बोलवून घेतले. या "बेटर हाफ" म्हणजे अमेरिकेवर जाऊन धडकलेली दुसरी लाट. १९६०-७० च्या भरारी घेण्याच्या काळात अमेरिकेला मनुष्यबळाची बेसुमार आवश्यकता भासल्यामुळे "फॅमिली रियुनीफिकेशन" नावाखाली, तोपर्यंत अमेरिकेत स्थायिक झालेल्यांना आपल्या नातलगांना अमेरिकेत आणण्यासाठी मुभा देण्यात आली. या स्पॉन्सर स्कीममध्ये आलेले कुटुंब-नातलग, विशेष प्राविण्य नसताना देखील अमेरिकेत दाखल होऊ शकले ही तिसरी लाट म्हणता येईल. चौथी लाट मात्र स्थलांतरितांच्या या मराठी कुटुंबांमध्येच निर्माण झाली, ती म्हणजे त्यांची दुसरी पिढी. जी पिढी स्वतःला ना धड भारतापासून पूर्णपणे वेगळं करू शकली, ना धड अमेरिकेशी पूर्णपणे एकरूप होऊ शकली. या चारही लाटांनी कधी एकमेकांशी आदळत, कधी एकमेकांशी एकरूप होत, "अमेरिकेन ड्रीम"च्या किनाऱ्याला लागण्यासाठी चिवटपणे केलेल्या अविरत परिश्रमांचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. ज्यामुळे आपल्या अमेरिकेत राहणाऱ्या मराठी कुटुंबीयांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होऊ शकतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करून साधलेल्या प्रगतीमुळे अख्खा डोंगर विकत घेऊन राजवाड्यासारखे घर बांधणारं एखादं यशस्वी मराठी कुटुंब एकीकडे... तर जुजबी कौशल्यामुळे विशेष प्रगती न केलेले मुंबईतील चाळीतील घर भासावे अशा घरात राहणारे त्यामानाने अपयशी मराठी कुटुंब एकीकडे... जीवनमानाच्या या दोन टोकांवरील मधल्या अंतरात सापडणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांच्या, त्यातील माणसांच्या संघर्षाची, प्रयत्नांची, सुख-दुःखाची, मान-अपमानाची, यश-अपयशाची, दुस्वास-जिव्हाळ्याची ही खरीखुरी कहाणी... प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी... #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #कम्फर्ट_झोन_बाहेरचं_पुस्तक #पुस्तकांशी_सलगी #वाचावं_असं_पुस्तक #वाचन_शुभेच्छा 💐
4
14
1
56
8,650
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) बखर वाङ्मय हा मध्ययुगीन काळातील मराठी साहित्यातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा वाङ्मयप्रकार आहे. गेल्या पिढीतील इतिहास संशोधकांनी ऐतिहासिक साधन म्हणून बखरी प्रकाशित केल्या व त्याच दृष्टिकोणातून बखरींना दुय्यम दर्जाचे साधन ठरविले. विद्यापीठातून बखरींचे अध्यापन सुरू झाल्यानंतर मात्र बखरीतील वाङ्मय गुणांची पाहणी सुरू झाली आणि केवळ वाङ्मयीन कलाकृती म्हणूनही बखरींचे महत्त्व सर्वमान्य झाले. 'भाऊसाहेबांची बखर' ही साऱ्या बखर वाङ्मयातील गुणाढ्य अशी बखर आहे. व्यक्तिरेखाटनातील प्रखर भेदकता, संवाद-लेखनातील मार्मिकता आणि प्रसंग-वर्णनातील प्रत्ययकारिता हे या बखरीचे गुणविशेष आहे. या प्रभावी वाङ्मयीन वैशिष्ट्यांचा सविस्तर परामर्श घेणे हा या संपादनातील प्रमुख हेतू आहे. 'बखर' या वाङ्मय प्रकाराचे विशेष आणि भाऊसाहेबांच्या बखरीतील साहित्य-गुणांचा सोदाहरण व ससंदर्भ परिचय, यांमुळे ही संपादित आवृत्ती अभ्यासकांना संग्राह्य वाटल्याशिवाय राहणार नाही. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
4
15
464
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) देव माणसांच्या मनात जागले; आणि त्यांनी गुणित-शतगुणित होत कोट्यावधी रुपे धारण केली, ठोस व ठसठशीत आकार धारण केले. कुणी घडवले त्यांना? कसे घडले ते? प्रतिमांच्या प्रवासाचा हा विलक्षण थरारक असा वेध... #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
3
20
603
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) 'द लिट्ल किंग' तो आला, त्याला पाहिलं आणि तो आमचा झाला. घरातला तो सगळ्यांत छोटा पेट. मग नाव तर स्पेशलच हवं. सगळ्यांनी मिळून ठरवलं, नाव 'रायन' ठेवायचं. रायनचा अर्थ 'द लिट्ल किंग'. सगळ्या घरावर, आमच्यावर आणि घरातल्या 'ॲनिमल किंगडम्' वरही याचंच राज्य. त्याच्या राज्यात आम्ही सगळे समाधानी, आनंदी आणि सुरक्षितसुद्धा. त्याची आमच्या सर्वांबरोबरची जवळीक, त्याचं खेळणं, त्याचं बागडणं, सगळंच भावणारं. त्याचं स्वतःवरही इतकं प्रेम नसेल तितकं प्रेम तो आमच्यावर करायचा. आम्ही त्याला जे दिलं, त्यांत त्याला सुख देण्याची आमची भावना होती पण त्याने आम्हाला जे दिलं त्यांत त्याची दात्याची भावना नव्हती, तर समर्पणाची भावना होती. आम्ही त्याच्या सहवासात मजेत होतो. तो होता का आमच्याबरोबर मजेत ? #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
1
3
12
365
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) A compulsively readable account of a journey to the Congo a country virtually inaccessible to the outside world - vividly told by a daring and adventurous journalist. Ever since Stanley first charted its mighty river in the 1870s, the Congo has epitomized the dark and turbulent history of a failed continent. However, its troubles only served to increase the interest of Daily Telegraph correspondent Tim Butcher, who was sent to cover Africa in 2000. Before long he became obsessed with the idea of recreating Stanley's original expedition but travelling alone. Despite warnings Butcher spent years poring over colonial-era maps and wooing rebel leaders before making his will and venturing to the Congo's eastern border. He passed through once thriving cities of this country and saw the marks left behind by years of abuse and misrule. Almost, 2,500 harrowing miles later, he reached the Atlantic Ocean, a thinner and a wiser man. Butcher's journey was a remarkable feat. But the story of the Congo, vividly told in Blood River, is more remarkable still. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
4
16
463
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 डॉ. आनंद नाडकर्णी कसोटीच्या कालखंडाला कसं सामोरं जायचं ह्या विषयावर मी जसा वागत होतो तसाच बोलत होतो... ते पुस्तकी नव्हतं. विवेकनिष्ठ माणूस म्हणून मानसोपचारतज्ज्ञ आणि अद्वैत तत्त्वज्ञान ह्या दोहोंमधली माझी समज विस्तारणारं होतं. शिवाय, माझं माणूस म्हणूनचं जगणं आणि मनआरोग्य प्रसारक म्हणून माझं उद्दिष्ट ही दोन्ही अगदी एकजीव झाल्याचा अनुभव मला यायला लागला. या पुस्तकात तुमच्या भेटीला येणारे लेख तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे आधीच वाचले, ऐकले, पाहिले, अनुभवले असण्याची शक्यता आहे. पण आता हा त्यांचा एकत्रित असा गुच्छ आहे. ह्यामध्ये कोरोनाच्या कालखंडाचे वैयक्तिक, सामाजिक, भावनिक असे दस्तऐवजीकरण तर आहेच; पण त्याचबरोबर ह्या पालक खंडातून जाताना नेमकं काय शिकायचं आणि पुढे काय न्यायचं ह्याचं भरीव सूचनही आहे. आजूबाजूची अनिश्चितता काही रातोरात संपणार नाही हे आपल्याला कळून चुकलं आहे. अशा संक्रमणकाळातून जाताना स्वतःच्या विचारभावनांचं आरोग्य कसं जपायचं ह्यासाठी एक 'गाईड' म्हणूनही हे पुस्तक उपयोगाचं आहे आणि ह्या साऱ्यातून पार पडल्यावर उद्याच्या पिढीला कोरोनाची गोष्ट सांगण्यासाठीसुद्धा हे लिखाण उपयुक्त ठरणारं आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
13
65
1,722
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 गिरीश प्रभुणे जमिनीत खोलवर लुप्त झालेली संस्कृती उत्खननातून सापडते. 'मोहेन्जोदाडो-हराप्पा' या अशाच सापडलेल्या शहरांमुळेच आपले पूर्वज-गणगोत आपल्याला गवसले ! जमिनीत खोलवर खणत जाता येतं. गाळाखाली गाडलेलं उकरून काढता येतं. गाळाने, मातीने जतन करून ठेवलेलं आपल्या आघातानं तुटणार नाही, नष्ट होणार नाही असं काढावं लागतं. इथं झंझावाती वेगानं, आधुनिकतेनं नष्ट होत चाललेली संस्कृती. अगदी आपल्यातच प्राण हळूहळू निघून जावा तसा. आपल्यातच आपल्या जवळच वावरणारा एक आपलाच संस्कृती समूह 'इतिहासकालीन' सांस्कृतिक जीवन जगणारा. हळूहळू नष्ट होत जाणारा... त्याचं दर्शन अंगावर रोमांच उभं करणारं. तसंच खिन्न करणारं, वेदना देणारं. ही भारतीय लोकगंगा अनादी काळापासून वाहत आलेली. त्यातल्या काही ओंजळी म्हणजे हे लेखन. या समाजदर्शनानं माझं जीवन समृद्ध झालं. या लोकगंगेच्या काठावर अजून खूप घनदाट अरण्य आहे. अनेक जाती-समूह प्राचीन भारतीय वैभवसंपन्न समृद्ध संस्कृतीचे चालतेबोलते अवशेष त्या ठिकाणी जगत आहेत. अनेक अस्पर्श वाटा खुणावताहेत. हे पुस्तक म्हणजे एक अवघड प्रवास आहे. भटक्या-विमुक्त समजातले असंख्य सहकारी कार्यकर्ते, समरसता मंचाचे कार्यकर्ते यांच्या बरोबरच्या चर्चा, बैठका, प्रवास यामधूनच हे लेखन साकारले. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
1
8
26
609
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
पुस्तकाचे नाव - परदेशी लेखक - रत्नाकर मतकरी प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशनकाल - ऑक्टोबर, २०१५ पुनर्मुद्रण - फेब्रुवारी, २०१९ पृष्ठसंख्या - ११२ मूल्य - १५० रुपये थ्रेड🧵 ⬇️
3
6
33
1,432
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) डिमोना ही इस्रायलची छुपी अणुभट्टी. तिचं रहस्य 'दि संडे टाइम्स' या दैनिकासमोर उघड करणारा इस्त्रायली जागल्या मोर्देचाई व्हॅनुनू. पण हे इस्रायलला कसं चालणार? मग त्यानं एका मदनिकेकरवी व्हॅनुनूवर टाकलं सौंदर्याचं जाळं. व्हॅनुनूला स्वतःच्या जाळ्यात ओढून '#मोसाद ' या गुप्तचर यंत्रणेला व्हॅनुनूचं अपहरण करण्यात मदत करणारी चेरील बेंटॉव्ह उर्फ सिंडी. सिंडी एकाच वेळी 'सीआयए' आणि 'मोसाद' या दोन यंत्रणांसाठी गुप्तहेर म्हणून काम करत होती का? युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, बेल्जियम आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांनी इस्रायलला आण्विक ज्ञान आणि तंत्रज्ञान मिळवण्यात गुप्तपणे कशी मदत केली? अपहरणानंतर मोर्देचाई व्हॅनुनू डिमोनाचं रहस्य उघड करू शकला का? तो आपल्या ध्येयात यशस्वी झाला का? सिंडीचं पुढे काय झालं? या सर्व घटनांवर भेदक प्रकाश टाकणारी, इस्त्रायलच्या 'मोसाद' या गुप्तचर यंत्रणेचं क्रूर जाळं छेदणाऱ्या जागल्याची कहाणी... #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
2
10
34
1,104
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 प्रो. शैलेंद्र लेंडे 'कोयतूर' ही कादंबरी आदिवासी जीवनरूपाला, त्यांच्या समस्याग्रस्ततेला, प्रश्नोपप्रश्नांना व अभ्युदयमार्गांना सुस्पष्ट करणारी अशी महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. विदर्भाच्या भौगोलिक परिसरातील गोंड आदिवासी जमातीवर केंद्रिभूत असलेली ही कादंबरी समस्त आदिवासी समाजाच्या जीवनसंघर्षाला व त्यांच्या शोषित-वंचिततेला अधोरेखित करते, तसेच त्यांच्या अस्मिता व अस्तित्व शोधाची खडतर वाटचालही प्रातिनिधिकपणे अभिव्यक्त करीत जाते. स्थानिक, प्रादेशिक, राज्यस्तरीय, देशस्तरीय आणि एकूण वैश्विक संदर्भाची संपृक्तीदेखील या कादंबरीमधून ठळकपणे पाहावयास मिळते. अनेक शतकांपासून उपेक्षित व वंचित गोंड आदिवासींच्या जीवनरूपांना, जीवनसमस्यांना ही कादंबरी कधी चर्चात्मक, तर कधी चिंतनात्मक पद्धतीने हात घालते आणि त्या समस्यांच्या निराकरणाचे मार्गदेखील अधिक सुस्पष्ट करू पाहते. भारतीय समाजसंरचनेमध्ये सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या गोंड या आदिवासी जीवनाचा असा प्रदीर्घ पट डॉ. विनोद कुमरे यांच्या 'कोयतूर' या कादंबरीच्या रूपातून मराठी कादंबरीमध्ये पहिल्यांदाच इतक्या कलात्मक, प्रत्ययकारी व प्रभावी पद्धतीने प्रगट झालेला आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
1
7
24
634
|ग्रं|थो|पा|स|क| retweeted
आटपाट देशातल्या गोष्टी लेखक - संग्राम गायकवाड आयकर आयुक्तांसारख्या अधिकाऱ्याच्या अनुभवातून जन्मलेली ही कादंबरी केवळ एका आयकर धाडीच्या निमित्ताने उघडकीस येणाऱ्या समाजाच्या विविध स्तरांचे, मानवी स्वभावाचे आणि नैतिकतेच्या गुंतागुंतीचे सखोल चित्रण आहे👇 @LetsReadIndia @PABKTweets
1
10
46
1,543
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) श्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात 'हत्या' ही कादंबरी विशेषत्त्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तवाच्या पातळीवरील, तर्कसंगत आणि हृद्य अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादंबरीसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खऱ्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली; परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाङ्मयाभिरुचीच्या चौकटीत न बसणारी गोष्ट होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दुःखार्त अशी मांडणी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबऱ्यांच्या विकासाची बीजे या कादंबरीत सुप्तपणे विखुरलेली दिसतात. 'हत्या'च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हिरो'ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे. (✍🏻 डॉ. रवींद्र शोभणे) 'हत्या' कादंबरीचा 'कलंदर' हा पुढील भाग; - पण किती तरी वेगळा. 'हत्या'तील आत्मकथनाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कलेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृद्ध झाला आहे; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रूपे धारण करते आहे; कथानकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार', 'हद्दपार', 'गारंबीचा बापू', 'हत्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबऱ्यांत पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सूक्ष्म व संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाश्चात्त्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरमेळाची आठवण व्हावी, इतके ते संमिश्र, चढते आणि अनेक बिंदूंभोवती रुंजी घालूनही एका केंद्राकडे झेप घेणारे व अनेक पातळ्यांवर विकास पावूनदेखील एकात्म व सुसंवादी आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
1
7
32
740
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) On October 31st in New Delhi, the unthinkable occurred: the prime minister's own prized bodyguards turned their weapons on the very leader they were sworn to protect. In an unprecedented betrayal, Beant Singh and Satwant Singh-aided by their government-issued firearms, assassinated Prime Minister #IndiraGandhi in a brutal attack that left her body riddled with bullets. Opening fire - at point blank range - Beant Singh fired five rounds from his .38 revolver, while Satwant Singh unleashed 25 rounds from his 9mm Sten submachine gun. Both assassins emptied their magazines, leaving a beloved prime minister, a personification of "Mother India", fatally injured by 30 bullets. This shocking assassination sent ripples through the global community and exposed vulnerabilities within India's security establishment. How could such an attack occur within the nation's most secure location? And how did the assassins slip past the intense surveillance measures put in place as part of India's military assault on Darbar Sahib, measures specifically designed to prevent such an incident? Baljit Singh, the NSYF's research lead, has painstakingly examined every available source to produce a comprehensive account that focuses on the lives and motivations of the assassins. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
4
8
388
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) जी.ए. कुलकर्णी यांच्या कथांना मोठा वाचक वर्ग होता आणि आहे. कथेच्या वेगवेगळ्या रूपांना एकत्र करून त्यांनी समृद्ध, आशयसंपन्न कथा वाचकांना दिल्या. त्यांच्या कथेत मानवी मूल्य हमखास दिसते. सर्वसामान्य, अतिसामान्य आयुष्य त्यांनी कथांमधून उलगडली. त्यांच्या डोहकळीमा या कथासंग्रहातील प्रत्येक कथा याला अनुरूप आहेत. त्यांच्या पहिल्या चार कथासंग्रहातील निवडक कथांचा यात समावेश केला आहे. 'बळी' या कथेत जोगतिणीच्या बेवारशी ठरलेल्या मुलीची, अमाशीची हृदयद्रावक कहाणी आहे. यात खेड्यातील जीवन, परंपरा, मानवाचे रानटी रूप दाखवून दिले आहे. 'माकडाचे काय; माणसाचे काय?' या कथेमधून माणसाच्या शेवटच्या दिवसांतील भावना व्यक्त झाल्या आहेत. तसेच 'रात्र झाली गोकुळी' मध्ये एका गरीब कुटुंबाचे चित्रण आहे. कनिष्ठ समाजाच्या परिस्थितीचे विदारक दर्शन यात घडते. संग्रहातील अन्य कथाही भ्रामक कल्पनेपलीकडील जग आपल्यासमोर मांडतात. जी.ए. नी केलेल्या रुपकांच्या वापरामुळे कथानकाची वास्तवता दाहक मांडण्यास मदत होते. त्यामुळेच हा कथासंग्रह जी.ए. भक्तांसाठी एक खास भेट आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
1
11
43
1,014
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) बलात्कारातून मिळालेले कुमारीमातृत्व असो वा फसवून, आमीष दाखवून किंवा संमतीनं संभोग केल्यानंतर मिळालेले कुमारीमातृत्व असो, यानंतर सर्वसामान्य आयुष्य जगणं स्त्रीला अवघड होतं; पुरुषाला नाही. कारण चारित्र्य ही फक्त स्त्रीनंच टिकवायची गोष्ट असते; ते नीतिनियम पुरुषांना लागू होत नाहीत. केवळ कौमार्यच नव्हे, तर निरागसता, प्रेम, सहजीवन, कौटुंबिक सुख, नातेसंबंधांवरील विश्वास अशा सगळ्याच गोष्टी या मुली कायमच्या गमावून बसतात. आपुलकी, सहृदयता, माणूसकी यातली कोणतीही वाट त्यांच्या वाट्याला कधीच येत नाही. अन्याय-अत्याचाराचं एक दुष्टचक्र यातून सुरू होतं, त्याखाली चिरडत-भरडत राहणं हेच या मुलींचं भागधेय बनतं. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
🤖 Made with AI
1
5
23
788
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) बुटक्या एका जमीनमालकाकडे कामाला असलेला अस्पृश्य मुलगा. दिवसभर बकऱ्या चारणारा, शेतात काम करणारा लहान मुलगा... खडतर आयुष्याचे चटके खाताना मित्रांच्या सोबतीत आणि निसर्गात विरंगुळा शोधणारा. चिमूटभर आनंदसुद्धा धरून ठेवण्यासाठी धडपडणारा... पण, अपार कष्ट आणि पोटाची आग यांत त्याचं चैतन्यमय निरागस बालपण हरवून गेलेला... या कादंबरीतलं चित्रदर्शी वर्णन, घटना, प्रसंग, पात्रे, संवाद आणि त्यातून उलगडत जाणारं भीषण वास्तव वाचकाला अस्वस्थ करतं, खिळवून ठेवतं आणि अंतर्मुख करतं. 'कुलामाथारी' या पेरुमाल मुरुगन लिखित अत्यंत वाचनीय तमिळ भाषेतील कादंबरीचा तितकाच प्रवाही, परिणामकारक अनुवाद. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
1
10
50
1,587
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) ✍🏻 नरहर कुरुंदकर "विचारस्वातंत्र्य हे महत्त्वाचे स्वातंत्र्य आहे हे तर मी मानतोच; पण ती सर्व स्वातंत्र्याची परिपूर्णता आहे असेही मी मानतो. पण हे विचारस्वातंत्र्य विचार करणाऱ्याला गुलाम करणाऱ्या बाबी संपवून निर्माण करावे लागते... ...व्यक्तीला सुरक्षितता देऊन व दिल्यामुळे, व्यक्तीचे हक्क मान्य करून व केल्यामुळे, व्यक्तीच्या हक्कावर आक्रमण होणार नाही अशी काळजी घेऊन व ती घेतल्यामुळे, स्वातंत्र्य निर्माण होत असते." #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
6
38
849
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊) `संभ्रम' हे बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती या सामाजिक रोगांचे चित्रण करणारे बोलके पुस्तक आहे. यात रजनीश, रमामाता, न्यायरत्न विनोद, सदानंद महाराज यांच्या प्रभावाचे प्रत्यक्ष दर्शन घडवले आहे. मीरा दातारचा दर्गा, समर्थांच्या पादुकांचा आगमन सोहळा, शिर्डीच्या साईबाबांचा रामनवमी उत्सव, काळुबाईची जत्रा, वारकरी संमेलन यांसारख्या अंधश्रद्धांच्या केंद्रावरील वातावरण डॉक्युमेंट्री पद्धतीने घडवले आहे. जैन समाजात अल्पवयीन मुलींनाही संन्यासदीक्षा दिली जाते. यल्लम्मास अल्पवयीन मुली सर्रास सोडल्या जातात. या अंधश्रद्धांच्या बळींचाही येथे वेध घेतला आहे. या अंधश्रद्धांचा वैचारिक परामर्ष घेणारी प्रस्तावना सुप्रसिद्ध विचारवंत मे. पुं. रेगे यांनी लिहिली आहे. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
6
31
858