Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा लादण्याचा निर्णय एकदाचा मागे घेतला. सरकारने या संबंधातील २ जीआर रद्द केले. याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली. हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे.
पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचं अभिनंदन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षविरहित मोर्चा काढायच्या ठरवल्यावर अनेक राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्यात सहभागी होण्याची तयारी दाखवली. हा मोर्चा जर झाला असता तर इतका विशाल झाला असता की संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळाची आठवण व्हावी. कदाचित या एकजुटीचा धसका सरकारने घेतला असेल, पण हरकत नाही ही भीती असली पाहिजे.
अजून एक गोष्ट, सरकारने पुन्हा एकदा नवीन समिती नेमली आहे. मी स्वच्छ शब्दांत सांगतोय समितीचा अहवाल येऊ दे किंवा नको येऊ दे परंतू हे असले प्रकार परत खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत ! ही गोष्ट सरकारने कायमची त्यांच्या मनात कोरून ठेवावी ! ! !
हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे असं आम्ही गृहीत धरतोय आणि महाराष्ट्रातील जनतेने पण हेच गृहीत धरलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी.
आता मराठी माणसाने पण यातून बोध घ्यायला हवा. तुमच्या अस्तित्वाला, तुमच्या भाषेला नख लावायला आपलेच लोकं बसलेत आणि त्यांच्यासाठी ते ज्या भाषेत शिकले, वाढले, जी भाषा त्यांची ओळख आहे त्याच्याशी काही देणंघेणं नाहीये... त्यांना कोणालातरी खुश करायचं आहे बहुदा. यावेळेस मराठी मनांचा एकत्रित राग दिसला तो पुन्हा पुन्हा दिसला पाहिजे.
असो, पण भाषेसाठी मराठी माणसं एकवटताना दिसली हा आनंद आहे. हा कडवटपणा अधिक वृद्धिंगत होऊ दे, आणि मराठी भाषा ज्ञानाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा होऊ दे हीच इच्छा.
मराठी जनांचं पुन्हा एकदा अभिनंदन.
राज ठाकरे ।
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
गारवा पून्हा वाढलाय, आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे सकाळचे ऊन अंगावर घ्यायला बसलोय. माझ्याच सोसायटी मध्ये राहणारे रा. स्व. संघांचे सक्रिय कार्यकर्ते मला म्हणाले " येताय का आज गोकुळ आनंद दहिसर ते कांदिवली "बांगलादेशीकडून हिंदुवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात मानव साखळी उभारतो आहोत.
त्याना म्हंटल 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन झाली आणि पहिल आंदोलन झाले बांगलादेशी विरोधात. मुंबईतील रेशनिंग ऑफिसला घेराव घालून रेशनिंग कार्डचा पासपोर्ट सारखं उपयोग करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना रेशनिंग कार्ड वाटप होऊ नये म्हणून आंदोलन करणाऱ्या मुंबईतील जळपास 678 महाराष्ट्रासैनिकांवर केसेस दाखल झाल्या. कांदिवली रेशनिंग कार्यालयाला टाळे ठोकले म्हणून माझ्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल झाला.
आज मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर हातगाडी घेऊन फिरणारे फेरीवाले कोण आहेत ते तपासा, बांगलादेशी अलगद हातात सापडतील, त्याना हातगाड्या भाडे तत्वावर पुरवणारे कोण आहेत? त्यांना संरक्षण देणारे कोण आहेत? याची माहिती सरकारने घ्यावी. आता तर हिंदुत्ववादी आणि राष्ट्रप्रेमी सरकार राज्यात आणि केंद्रात आहे.
फक्त तोंडदेखल हिंदुत्व भाजप आणि शिवसेनेने दाखवू नये रजा अकादमी च्या मोर्च्या दरम्यान झालेल्या हिंसाचाराला राज ठाकरे नावाच्या मर्दाने महाप्रचंड मोर्चा काढून उत्तर दिले होते.त्यावेळी भाजप, शिवसेना मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले होते.
अविश्वस्नीय असे बहुमत मिळाले आहे, सत्तेची सर्व केंद्र, अधिकार तुमच्याकडे आहेत, आता करून दाखवाच... नाहीतर हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या बाता मारू नका.
हेमंतकुमार कांबळे
प्रवक्ता -महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@BJP4Maharashtra
@mnsadhikrut
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
झारखंडमधल्या गिरीहीद जिल्ह्यातलं 'सम्मेद शिखरस्थळ' हे जैन धर्मियांचं पवित्रस्थळ आहे. ह्या धर्मस्थळाला पर्यटनस्थळाचा दर्जा देऊ नये, कारण एकदा का ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित झालं की तिथे जैन धर्माला मान्य नसलेल्या अनेक गोष्टी घडू शकतील अशी जैन बांधवांची भावना आहे. १-१
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
अफजलखानाच्या कबरीच्या अवतीभवतीचे अतिक्रमण हटविल्याबद्दल सरकारचे अभिनंदन! सोबतच "मराठा आरक्षण" हा विषय तितकाच महत्त्वाचा आहे.मराठा आरक्षणासंदर्भात तितकीच तात्परता दाखवावी व नंतरच पेढे वाटून कौतुकाची थाप घ्यावी नाहीतर "मुद्दा भरकटविण्याकरिता खेळलेली चाल"असा इतिहास लिहिला जाईल.
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
दुरबुद्धी सुचली आणि महाराष्ट्र सैनिकांचा नाद केला,आता आपली लंका वाचवा लंके..
आम्ही कुणाच्याही वाटेत जात नाही पण आमच्या वाटेत कुणी आडवे आले तर सोडत नाही.#महाराष्ट्रसैनिक
VIDEO: "राज साहेबांना सांगा तुमचा मनसैनिक पूर्ण खचलाय", निलेश लंकेंच्या 1 कोटीच्या दाव्यावर मनसे पदाधिकारी भावनिक
tv9marathi.com/maharashtra/o…
@RajThackeray @mnsadhikrut
#RajThackeray #NileshLanke #AvinashPawar #NCP #MNS #Ahmednagar
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
"आमचं स्वप्न राजसाहेबांच्या मनसेने पूर्ण केलं" गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया ! पाहाच मनसेचा सरपंच असलेल्या गावात बदलाला सुरुवात...
#मनसेचा_सरपंच #महाराष्ट्रसैनिक
@mnsadhikrut @RajThackeray @mnsreport9 @manojchavanmns1 @chileyog @Vaibhav69974438 @JadhavMns @SandeepDadarMNS
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
MNS | सविनय कायदेभंग म्हणून आपल्या सगळ्यांना रेल्वेने प्रवास करायचा आहे - मनसे नेते, @chileyog
youtu.be/9FaZVHnLGNc
@mnsadhikrut #panvel #navimumbai
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोणताही विषय हाथी घेतला कि लगेच सरकारला जाग येते ! मग चाकरमान्यांसाठी कोकणात जाईची व्यवस्था असो किंवा जिम !
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
पनवेल आगारातून कोकणात जाण्यासाठी एस टी सेवा चालू करण्यात याव्यात याबाबत निवेदन देण्यात आले. #पनवेल_मनसे @msrtcofficial @advAkshaykashid @chileyog – at Panvel, India
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
बील बद्दल विचारल लोकांनी म्हणुन राग काढताय की काय..? गेल्या १ तासापासुन पनवेलमद्धे लाईट नाही...
@MSEDCL @NitinRaut_INC @MyPanvel @PanvelV @NaviMumbaiToday @panvel @WeArePanvel @SmartPanvel @ithakurprashant
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
गेल्या महिनाभराच्या तमाशा नंतर आज पर्यंत मला बरेच लोक बोलले की आत्ता च्या राजकारणात विश्वास ठेवण्या सारखा एकच माणूस आहे भले त्यांचा एक आमदार असो, नगरसेवक असो ते म्हणजे "राज ठाकरे" त्यांनी असलं घाणेरडे राजकारण कधी केलं नाही.
विशेष म्हणजे त्यांच्यात भक्त पण होते...👍
@RajThackeray
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी मा.श्री.अमित राजसाहेब ठाकरे मैदानात !
नवी मुंबई महापालिकेवर महामोर्चा !
स्थळ - सिवूड्स रेल्वे स्थानक ते नवी मुंबई महानगरपालिका.
वेळ - सकाळी १० वा.
दिनांक - २८ नोव्हेंबर २०१९
@mnsadhikrut #AmitThackeray
#MNS #NaviMumbai #Kamgar #NMMC
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
मस्त.
ते मदतकार्य, पुनर्वसन, लोकांचे संसार उभे करून देणं वगैरे सगळं झूठ आहे.
प्रचार, प्रचार आणि केवळ प्रचार !!
m.maharashtratimes.com/mahar…
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
Replying to @sawsammer3
आपले ४४ जवान हुतात्मा झाले तेव्हा १०-१२ दिवस देश शोकात होता, वायुसेनेने #AirStrike करून #पुलवामा चा बदला घेतला याचा मला अभिमान आहे पण यापुढे दुसरा #पुलवामा सारखा हल्ला होऊ नये म्हणून काय काय करायला हवे ?
मीडिया चॅनेल सोबत जनतेलाही आपल्या जवानांचा विसर पडला काय असं वाटू लागलंय 😕
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
थोडा वेळ आपापले पक्ष बाजूला ठेवून भारतीय नागरिक म्हणून एकत्र हे प्रश्न विचारा,
१) ३०० किलो स्फोटके देशात आली कुठून..?
२) अतिरेक्यांना देशातील कोण देशद्रोही सामील होते..?
लक्षात घ्या आता सर्व वातावरण शांत झालं पण उद्या पुलवामा सारखा हल्ला होऊ नये, म्हणून ही चौकशी झालीच पाहिजे
#म
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
विषय भ्रष्टाचाराचा नाही, विषय UPA चा नाही..!
विषय हा आहे की केंद्रीय संस्थांना राज्याच्या अधिकारांना घाला घालता येत नाही, सीबीआय असो ईडी असो धाड घालण्यासाठी लेखी आज्ञापत्र हवं, ते नसताना केवळ केंद्रीय सत्तेच्या दबावामुळे धाड टाकणे हे असंविधानिक, यालाच विरोध !!!
#SaveDemocracy
Replying to @RajThackeray @MamataOfficial
सकाळी एक मुख्यमंत्री फोन वरुन सभा घेतो तेव्हा एक पण पत्र लिहल नाही. मग #SaveDemocracy नव्हती का ? साहेब अशा लोकांना समर्थ न देउ नका हा मॅटर UPA च्या काळात ला आहे. भ्रष्टाचाराचा आहे ,आता जेव्हा चौकशी होत आहै तेव्हा बोंब मारत आहेत .
Yogesh J Chile (योगेश चिले) retweeted
The Only Jobs Available these days. #HowsTheJobs





















