Arvind Jagtap retweeted
'पु ल देशपांडे दिनदर्शिका 2027' चे प्रकाशन आज मा श्री राज ठाकरे यांच्या हस्ते झाले..
ते फार जिव्हाळ्याने, आपुलकीने बोलले!
त्यांचं संपूर्ण भाषण जोडत आहे :
youtu.be/jGLjzdgJjiY?si=I7Tg…
गावगाडा नावाचं शतकातलं महत्वाचं पुस्तक. त्र्यंबक अत्रे यांचं. १०० वर्ष आधीचं. अर्पणपत्रिका.इंग्रज सरकारी अधिकाऱ्याला अर्पण केलंय. दुष्काळातल्या कामासाठी. आताही तशीच परिस्थिती आहे. अधिकाऱ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. तुम्ही आमचे आहात. तुमची मदत गरजेची आहे. शेतीसाठी! आपल्या मातीसाठी!
फोटो काढला वेगळा वाटला म्हणून. पण वेगवेगळे आकार दिसतात दरवेळी. जुनी खोडं सहजा सहजी समजत नाहीत. फांदीला खोडाचा इतिहास नाही फक्त वारसा सांगता येतो. खोड इतिहास सांगत नाही आणि फांद्या इतिहासावर भांडत नाहीत. कुठल्याच फांदीने खोडाला बदनाम केल्याची इतिहासात नोंद नाही. म्हणून झाड भारी.















