क्रोध नेहमीच वाईट नसतो. जो क्रोध अन्याय, विषमता आणि अत्याचाराविरुद्ध प्रेमातून आणि न्यायाच्या भावनेतून येतो, तो आवश्यक आणि योग्य आहे. त्याला दाबून टाकण्याची गरज नाही.
परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर डिसेंबर १९५५ मध्ये मिलिंद कॉलेज , औरंगाबाद येथील भाषणात याबद्दल बोलताना म्हणतात,
" मी अतिशय क्रोधी आहे, हे जगाला चांगले परिचित आहे. श्री देव म्हणतात. माणसाने क्रोध गिळला पाहिजे. मला यावरून वाटते की देवांचं वाचन अपुरं आहे. त्यांनी चांगलं वाचन केलेलं दिसत नाही (टाळ्या).
भगवान बुद्धानी 'राग' (Anger) यावर व्याख्यान दिलं आहे. ते जर देवांनी वाचलं असतं तर त्यांनी असले उद्गार काढले नसते. मनुष्य रागीट असला तर त्याच्यावर टीका करू नये. राग दोन प्रकारचे असतात.
(१) द्वेषमूलक
(२) प्रेममूलक
जो कसाई असतो तो कु-हाड घेऊन जातो. त्याचा राग हा द्वेषमूलक असतो.
आईने आपल्या मुलाला चापट मारली तर तिला कोण काय म्हणेल ? तिचा राग असतो तो प्रेममूलक असतो. मुलाने सदाचारी व्हावं म्हणून आई मुलाला मारीत असते.
समतेनं वागावं म्हणून मी राजकारणात लोकांची मी मुळीच पर्वा करणार नाही. माझा रागही प्रेममूलक आहे. तुम्ही समतेने वागावं म्हणून मी राजकारणात शिव्या देतो. माझ्यावर टीका करणाऱ्या लोकांची मी मुळीच पर्वा करत नाही. (टाळ्या) मी सगळं केलं ते झगडा करून केलं आहे."
GSM retweeted
The OG Crowdpuller... Hon. BALASAHEB AMBEDKAR✊️✌️
चलो मुंबई! 🏃♂️🏃♂️🏃♂️
संविधान सम्मान महासभा!
भारत का संविधान, हमारा अभिमान!
🗓️25 नवंबर 2026 । 🕰 दोपहर 4 बजे
📍छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर, मुंबई
मनुवाद मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद!
#संविधान_सम्मान_महासभा #चलो_मुंबई
💙💙 आंबेडकर,आंबेडकरआंबेडकर,आंबेडकर, आंबेडकर.💙💙
“विशाखापट्टणम के बीच पर बाबासाहब के नाम पर दौड़….
संविधान की रक्षा और समानता का संदेश लेकर हजारों लोग सड़कों पर! जय भीम ✊”
जर जगह आंबेडकर आंबेडकर आंबेडकर 💙💙
#JaiBhim #Babasaheb #RunForAmbedkar #Vizag
आज बुद्ध पौर्णिमा केंद्र सरकारच्या gazetted (राजपत्रित) सुट्ट्यांमध्ये समाविष्ट आहे आणि अनेक राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी असते.
यामागील इतिहास बघितला तर परमपूज्य, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे आणि दबावामुळे २७ मे १९५३ रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंती (बुद्ध पौर्णिमा) निमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.
दिनांक 27 मे 1953 रोजीच्या,नरेपार्क, मुंबई येथील भाषणात बाबासाहेब म्हणतात,
"आपण आज सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहोत. आज या ठिकाणी जी बुद्ध जयंती साजरी होत आहे तशी ती अनेक ठिकाणी साजरी होत असली तरी येथील जयंतोला विशेष महत्त्व आहे.
बुद्ध जयंतीचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानला जावा म्हणून मी सन १९४२ सालापासून सरकारकडे मागणी करीत होतो. मध्यंतरीच्या काळात मंत्रीमंडळात असतानाही मी बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो. परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळचे गृहमंत्री श्री. मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती. परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही. बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही, या विवंचनेत ते होते. त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रीमंडळात घेतले गेले. मंत्रीमंडळात गेल्यानंतर ही माझी जी मागणी होती ती श्री. पंडित जवाहरलाल नेहरुंनी तरी मान्य करावी म्हणून मी त्यांच्या खूप पाठिशी लागलो. माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनीही साहाय्य केले.
तेहतीस कोटी हिंदुंच्या जन्म दिवसास सुट्टी, मुसलमान, पारसी, जैन. खिस्ती या धर्मातील देवांच्या जन्म दिवसास सुट्टी मिळते. मग बुद्ध जयंतीस का नको ? एकतर या सर्व सुट्यातून एखादी कमी करून ती आम्हास द्या अगर एक सुट्टी जास्त वाढवा, अशी मागणी मी श्री. नेहरूंकडे केली. पं. नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे. सुदैवाने नेहरू सरकारने बुद्ध जयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली."बुद्धाचे नाव काढले की ज्या हिंदू लोकांना एक प्रकारची भीती वाटत होती व आपणावर कोणी बाँब तर टाकीत नाही असे वाटत होतेः त्यांच्यामधील कैक लोकात सुज्ञानपणा येऊन ते. आज बुद्धाचा गौरव करू लागले आहेत. मी काही एखादा भविष्यवादी नाही व पुढे काय होईल हे सांगू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगू शकतो की, बुद्धाचा धर्म या पृथ्वीतलावर पुन्हा अवतीर्ण होईल. तो कोणत्या मार्गाने येईल हे आज सांगता येत नाही.
मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे शेवटचे आयुष्याचे दिवस आता बुद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी हे बुद्ध धर्म प्रचाराचे शेत पेरणार आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहाणार आहे.
बुद्धाने स्पष्ट सांगितले की, मला ईश्वर नको, परमेश्वर नको तर या पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती मिळाली पाहिजे व सर्वांनी सुखाने राहिले पाहिजे. बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्याच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
जातीभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडावयाची असेल तर आपणास बौद्धधर्माचीच शिकवण अंमलात आणली पाहिजे. ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे.
मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानलाच काय पण साऱ्या जगाला शेवटी बौद्ध धर्माची कास धरावी लागेल, यासाठी मी बौद्ध धर्माचे बायबल लिहीले आहे, ते लवकरच प्रसिद्ध होईल व ते वाचल्यावर बौद्ध धर्म स्वीकारावयाचा की नाही, हे तुमच्या हाती राहील. एकदा तुम्ही जो मार्ग चोखाळला तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. बुद्धाचे एक देऊळ मी मुंबईत बांधणार आहे. बुद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण प्रत्येकजण या मंगलप्रसंगी प्रतिज्ञा करू या."
#बोधिसत्वबाबासाहेबआंबेडकर..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय समाजातील स्त्रियांवर केलेले उपकार अनंत आहेत स्त्रियांनी देवांना पुजण्यापेक्षा बाबासाहेबांना वाचायला पाहिजे. स्त्री जातीच्या कल्याणाची एवढी तळमळ भारतीय इतिहासात कुणालाच दिसून येत नाही.
तारीख २५ डिसेंबर १९५२ रोजी कोल्हापूर येथे कोल्हापूरातील स्त्रियांच्या निरनिराळ्या नऊ संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकराना तेथील राजाराम चित्रपटगृहात मोठ्या थाटाने मानपत्र अर्पण करण्यात आले व त्यांनी स्त्रियांच्या विनंतीवरून आपल्या हिंदू कोड बिलात स्त्रियांना कोणकोणते हक्क दिले होते व काय तरतुदी केल्या होत्या याविषयी थोडक्यात पण सुबोध रीतीने दिवेचन केले. या समारंभास असंख्य स्त्रिया व कित्येक पुरुषही हजर होते.या सभेत बाबासाहेब म्हणतात,
" स्त्रियांच्या सर्वस्वी हिताचे हे बिल मंजूर करण्यासाठी
स्त्रियांनी काहीच हालचाल केली नाही ही खेदपूर्वक बाब आहे. मी पुरूष असून देखिल स्त्रियांचा हितासाठी भांडलो, पण स्त्रियांनी का उत्सुकता दाखविली नाही हे समजत नाही. या बिलाला पाठिंबा देण्याची गोष्ट तर बाजूलाच राहो, पण काही स्त्रियांनी माझ्याकडे येऊन ते बिल चांगले नाही असे मला सांगण्याचा प्रयत्न केला. मी दिल्लीत असताना तर काही प्रमुख स्त्रियांचे शिष्टमंडळच माझ्याकडे आले. त्यांना मी 'ते बिल वाचले का?' म्हणून विचारले तर त्यांनी से वाचले नाही असे सांगितले, न वाचताच का विरोध करता असे त्यातील मुख्य स्त्रीला बोलावून विचारता ती म्हणाली 'माझ्या नवऱ्याने मला सांगितले की, तू त्या बिलाला विरोध कर, नाही तर मी दुसरी बायको करून घेतो.' म्हणून सवत पत्करण्यापेक्षा बिलालाच विरोध करणे मला भाग आहे. पण स्त्रियांची मानसिक दुर्बलता आहे. त्यांच्या या दुर्बलतेमुळेच या बिलाचा घात झाला. स्त्रियांच्या पायात ताकद असती तर ते बिल बारगळले नसते.
पार्लमेंटमध्ये निवडून आलेल्या स्त्रियांनी देखील या बिलाबाबत काही जागरूकता दाखविली नाही. त्या स्त्री-सभासदांचे सारे लक्ष युनो, आय. एल. ओ.. कोरिया या गोष्टीकडेच लागलेले असायचे! माझ्या बिलाला पाठिंबा देण्यास त्या तयार दिसल्या नाहीत. कारण त्यामुळे पंतप्रधान नाखुष होतील व आपल्याला युनोत किंवा दुसरीकडे कोठे जाण्यास संधी मिळणार नाही याची त्यांना भीती वाटते. अशा प्रकारच्या लोभी वृत्तीनेच आपल्या देशाचे नुकसान होत आहे.
सार्वजनिक व राजकीय क्षेत्रात कार्य करणारा हरेक मनुष्य आज आपल्याला कमिश्नर होता येईल काय किंवा अमुक जागा मिळेल काय या लोभाने धडपडत असतो. स्त्रियात हा दोष मला फार दिसतो. स्त्रियांच्या मनावर परंपरेचा पगडा जास्त असतो. त्यामुळे त्यांच्यात हे मनोदौर्बल्य आहे हे त्यानी काढून टाकले पाहिजे.
इंग्लंडमधील स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळविण्यासाठी चळवळी केल्या आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांना आपली सुधारणा होण्यासाठी, आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जर हे बिल यावे असे वाटत असेल तर त्यासाठी त्यांनी चळवळ केली पाहिजे. त्याखेरीज स्त्रीवर जुलूम करणारा पुरुष तिची सुधारणा करणार नाही.
इंग्लंडमधील स्त्रिया आपल्या इच्छेप्रमाणे घटस्फोट घेऊन स्वतंत्र जीवन जगू शकतात. याचे मूळ कारण त्यांना संपत्तीचा वारसा हक्क असतो हे आहे. तसेच मलबारी समाजात गेल्या ५०-६० वर्षापासून घटस्फोट फारसे होतच नाहीत याचे कारण तेथे स्त्रीलाही वारसा हक्क आहे. त्यामुळेच पुरुष तिच्याशी चांगल्या प्रकारे वागतो. म्हणून पुरूषांप्रमाणेच आपल्यालाही वारसा हक्क मिळावा यासाठी स्त्रियांनी चळवळ सुरू करावी, घरात बसून किंवा सभा, संमेलने व ठराव करून या गोष्टी होणार नाहीत. त्यासाठी स्त्रियांनी स्वतः चळवळ करण्यास पुढे यावे.
हिंदु कोड बिलाची मुहूर्तमेढ १९३९ साली रोवली गेली व तेव्हापासून गेली अकरा वर्षे त्या बिलाच्या स्वरूपावर चर्चा चालू असताना पुनः त्या बिलाचे विभाग पाडून जनतेपुढे त्याच्या वावड्या का उडविल्या जात आहेत हे समजत नाही.
आपण येणाऱ्या बिलातील प्रत्येक कलम नीट तपासून पाहा. निव्वळ आंतरजातीय विवाहाचे कलम पाहून चालणार नाही. तेवढेच कलम नवे व बाकीचे कायदे जुनेच राहिले तर अनर्थ ओढवतील. आंतरजातीत स्त्री-पुरुषापासून झालेल्या संततीस आपल्या जुन्या शास्त्राप्रमाणे संपत्तीची मालकी मिळत नाही, म्हणून अशी संतती कायदेशीर ठरवून तिला मालकी देण्याची तरतूदही कायद्यात करून घेतली पाहिजे."
या बिलासाठी स्त्रियांना कळकळीचा पुन्हा एकवार आदेश देऊन त्यांनी आपले भाषण संपविले.
बौद्ध धर्माने भारतात सामाजिक समता, गणराज्य विचार, कला-संस्कृती आणि उच्च शिक्षणाचा पाया घातला. यामुळे तो फ्रेंच राज्यक्रांतीसारखाच महत्त्वाचा आणि क्रांतिकारी टप्पा ठरला.
याबाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या जून १९५० मध्ये दिलेल्या भाषणात सांगतात,
"बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोनही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत, असे मला म्हणावयाचे आहे. बौद्ध धर्माच्या उदयापूर्वी एखादा शूद्र राजा होऊ शकेल ही कल्पनाही करता येण्यासारखी नव्हती. परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांना हे माहीत आहे की बौद्धधर्माच्या प्रादुर्भावानंतर शूद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली. गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे.
भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर इ. पू. २७४ पर्यंत बौद्धधर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत. तथापि अशोकाच्या काळात बौद्धधर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला. अशोक आणि चंद्रगुप्तासारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध स्थापित केले होते.
बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी नानाप्रकारच्या कलांचा विकास झाला. बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी येथील नालंदा व तक्षशिला विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाले. त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता."
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑगस्ट, १९५२ साली सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथील आपल्या भाषणात त्यांच्या सामाजिक ,राजकीय कार्याचा आढावा घेतला आहे आणि समाजापुढे एक स्पष्ट संदेश दिला आहे. अगदी महत्वाचे असे हे भाषण प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीने वाचायलाच हवे.हा प्रगतीचा प्रवास आणि भविष्यातील काय प्रयत्न करता येतील याचा रोडमॅप आहे.
" अस्पृश्यांच्या उद्धारासाठी एका माणसाला एका युगात जे काही करता येणे शक्य होते ते मी केले आहे. माझे काही मार्ग यशस्वी झाले, काही झाले नसतील पण माझे कार्य मी धैर्याने चालूच ठेवले आहे. २५ वर्षात मी तुमच्यासाठी जे कार्य केले ते एवढ्या अवधीत एका व्यक्तीने कधीही, कुठेही केलेले नाही. हे मी गर्वाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतो. ही वस्तुस्थिती आहे. माझ्या
कार्याची दिशा तीन पद्धतीची होती !
एक, अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे ! हे कार्य पृथ्वीमोलाचे मला वाटले. मी राजकारणात पडण्यापूर्वी अस्पृश्य समाज कोणत्या पातळीवर होता, कसा माणुसकीहीन बनला होता, याचे मी एक उदाहरण देतो. वीस - पंचवीस वर्षापूर्वी जळगाव येथे दरवर्षी ब्राह्मण भोजने घालण्याची प्रथा होती. ती भोजने झाल्यावर त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या ते उकिरड्यावर टाकीत असत. तेथे आमचे अस्पृश्य बसत असत आणि त्या पत्रावळ्या गोळा करून उकिरड्यावरून नेत असंत. काहीकाही वेळा त्यांच्यात या उष्ट्या पत्रावळ्याबद्दल मोठे तंटे माजत असत. या अवस्थेत अस्पृश्य समाज होता. केवळ तो माणुसकीहीन बनला होता असे नव्हे तर तसे मानण्यात तो धन्यवाद मानीत होता. मानवी अधःपाताची ती कमाल होती.
मी गेली पंचवीस वर्षे झगडून त्यांना सर्वस्वी सुखी करू शकलो नसलो तरी त्यांच्यात जाज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे. अन्यायाविरुद्ध झगडण्याचे सामर्थ्य निर्माण केले आहे. हे काही साधे-सुधे काम नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना राजकीय हक्क प्राप्त करून देण्याची. आपल्याला पूर्वी दिल्ली कॅबिनेटमध्ये झाडूवाल्याचेसुद्धा काम मिळत नसे. आज २५ वर्षांनंतर तेथे अस्पृश्य समाजाचा मंत्री नेऊन बसविला आहे.
तिसरी गोष्ट शिक्षण क्षेत्रातील. २५ वर्षांपूर्वी अस्पृश्य समाजाला शिक्षणाची सारी दारे बंद होती. ती मी उघडी करून दिली आहेत. अस्पृश्य मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सरकारशी झगडून स्कॉलरशिप्स व फ्रिशिप्स मिळवून दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर यांना आपले म्हणता येईल असे प्रगतिमान " सिद्धार्थ " नावाचे कॉलेज मी यांच्यासाठी काढून दिले आहे. या कॉलेजात ३०० अस्पृश्य विद्यार्थी आहेत. दरवर्षी त्यांना २,००० रुपयाच्या स्कॉलरशिप्स दिल्या जातात. यांना राहाण्यासाठी जोडूनच बोर्डिंग काढले आहे. तसेच औरंगाबादला याच कॉलेजची शाखा उघडली आहे."
Disclaimer - अस्पृश्य हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषणात वापरलेला आहे.त्यामुळे कुणाच्या भावना दुखण्याचा हेतू इथे नसून फक्त बाबासाहेबांची माणसाला माणसाचे नैसर्गिक अधिकार मिळावे यासाठी त्यांचे परिश्रम आणि तळमळ दाखवणे हा आहे. जयभीम 💙🙏
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाचणे म्हणजे वेगळाच अनुभव आहे.एकदम थरार आहे. वाचताना एकदम डोळ्यापुढे दृश्य निर्माण होते.
ऑक्टोबर १९५६ मधील एका भाषणात बाबासाहेब सांगतात,
" मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकावर मोठी गदा आल्याप्रमाणे त्याना वाटत होते. त्यानी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय ? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही?
त्यावेळी कोणीतरी मनुष्य' केसरी' मधून पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला ५० ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची मिलावी हाडाची, मांसाची, खुरांची मिळून ५०० रुपया इतकी किमत होईल व मृत मास सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार यावेळी ' केसरी ' मधून होतो त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही तर साहेब करतो तरी काय?.
एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता. दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्याचे, शिंगाचे, मासांचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय ?"
मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले. " एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या."
मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत. भावालाही ५/७ मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत, आणि ५०० रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी स्वतः तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते गाझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे !
काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला," पार्लमेंट, असेब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता?" मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंब्ल्यामध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणाचे कोणा इतराचे किती अर्ज येतात ! मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही ?
आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता, असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते. लाभ प्यारा नसतो. .
आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. (डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही.
या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे, आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन."
आजकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचे शिल्पकार मानायचे नाही असे प्रयत्न चालू केले आहेत हे काही नवीन नाही. त्याकाळी सुद्धा बाबासाहेबांच्या कानावरती या गोष्टी आल्या होत्या आणि बाबासाहेबांनी त्याचा समाचार घेतला होता.
२२ नोव्हेंबर १९५१ साली परळ, मुंबई ला दिलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणतात,
" देशाची घटना बनविताना माझे अंग प्रमुख होते. पुष्कळसे लोक सांगतात की, या घटनेचा आराखडा जे काही कारकून होते त्यांनी तयार केला आणि मी फक्त सही केली ! (हंशा) माझ्याबरोबर ड्रॉफ्टींग कमिटीत जे सभासद होते ते किती दिवस हजर होते व किती दिवस बेपत्ता होते ते मी तुम्हाला सांगू शकतो. शेवटी मी व माझी प्रमुख सेक्रेटरी राहिलो. काहिंच्या कुठे नेमणुका झाल्या ! जेव्हा मला माझे आत्मचरित्र लिहिण्यास सवड होईल तेव्हा या गंमती विस्ताराने लिहीन, जेव्हा मी कॉन्स्टीट्युअंट असेंब्लीमध्ये शेवटचे भाषण केले तेव्हा ही माहिती गोळा केली व त्यात हजेरी घेणार होतो परतु आपल्या सहकाऱ्यांवर आरोप करणे असभ्यपणाचे होईल म्हणून भाषणातून तो उतारा भी गाळला."
सब सही है लेकीन ऐसे ही एक राजनितिक प्रयोग महाराष्ट्र मे वंचित बहुजन आघाडी ने भी किया था.उसका परिणाम बाद मे यह हुवा की ये पार्टी खुद्द को वंचित से बडा समझने लगी. और प्रयोग फेल हुवा.
जहा तक राजनीती का सवाल है तो महाराष्ट्र मे अँड. बालासाहेब आंबेडकर जी थे उनकी राजनितिक समझ और निर्णयक्षमता की बदौलत महाराष्ट्र के बुद्धीस्ट मतदाता का कोई मिसयूज नहीं कर सकता. मैं दलित नहीं, बुद्धीस्ट की बात कह रहा हुं.
UP मे इसका उलटा हो सकता है.क्यू की वहा बालासाहेब आंबेडकर जी नहीं है.
असदुद्दीन ओवैसी ने सहारनपुर में चंद्रशेखर आजाद के आवास पर उनकी माताजी के साथ खाना खाया.
असदुद्दीन ओवैसी चंद्रशेखर आजाद के घर पर खाना खाकर मीम और भीम के बीच भाईचारा का संकेत देना चाहते हैं.
AIMIM और ASP ने मिलकर सामाजिक मोर्चा बनाया है.
दोनों दलों ने मिलकर सभी 403 सीटों पर चुनाव लड़ने का एलान किया है.
असदुद्दीन ओवैसी की AIMIM ने 2025 के बिहार विधानसभा चुनाव में 5 सीटें जीती थी. AIMIM और ASP गठबंधन ने अगर 4-5% वोट भी पाने में कामयाब रहे तो BJP को 300+ सीट आएगी.
6
170
" मला असा प्रश्न विचारण्यात आला की, महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाशी तुम्ही करार का केला नाही? मी अजूनपर्यंत ह्याबाबत जाहीरपणे कोठे बोललो नव्हतो, आज मी ह्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. पूर्वी ब्राह्मणेतर पक्ष अस्तित्वात होता. आपल्या प्रांतातच नव्हे तर मध्यप्रांत, वन्हाड, मद्रास येथेही असा पक्ष अस्तित्वात होता.
म. जोतीबा फुले ह्यांनी ह्या पक्षाची मुहूर्तमेढ रोविली, म्हणून ह्या पक्षाचे अनुयायी आपणास जोतीबा फुले यांचे अनुयायी म्हणवू लागले. पण ह्या पक्षातील लोक केवळ नाममात्र अनुयायी राहिले जोतीबांचा कार्यक्रम, त्यांचे धोरण ह्यास या पक्षातील लोकांनी तिलांजली दिली. स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आपल्याच हातांनी जमिनीत गाडून हे लोक काँग्रेसमध्येही सामील झाले. हा ब्राह्मणेतर पक्ष काही काळाने नामशेष झाला.
जोतीबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला ह्यापूर्वीही कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज जोतीबांना एकनिष्ठ राहिलो आहे आणि मला अशी खात्री आहे की ह्या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला, त्याने कोणतेही नाव धारण केले तरी त्याला जोतीबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे.
समाजातील ८० टक्के लोकास विद्याप्राप्ती करू न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा ? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे. मागासलेल्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष आज जनतेचे नेतृत्व घेऊ शकत नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे."
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर,नाशिक
( १७ नोव्हेंबर १९५१ ).
1
46
राजकारणातील नैतिकता हरवल्यावर राज्यघटना तयार करणाऱ्या घटनेच्या शिल्पकाराला झालेलं दुखः आणि त्याची या भारत देशाच्या भविष्याप्रती वाढलेली चिंता जर पहायची असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं ऑक्टोबर १९५६ , नागपूर येथील भाषण वाचा. त्यात बाबासाहेब म्हणतात,
" भारताची राज्यघटना अंमलात येऊन पाच वर्षे झालीत. ही घटना चालते याचा प्रत्येकाने विचार करावयास पाहिजे. बाह्यात्कारी असे दिसेल की, आपली व इंग्लंडमधील राज्ययंत्रणा, काही भाग सोडला, तर बहुतांशी सारखीच आहे. तिकडे प्रौढ मतदान पद्धतीने निवडणुका होतात. आपल्या देशातही तशाच निवडणुका
होतात. त्या देशात पार्लमेंट आहे, आपल्या देशातही पार्लमेंट आहे. देशातील पार्लमेंटमध्ये बहुमताने निर्णय घेतात, आपल्या देशातील पार्लमेंटमध्येही बहुमताने निर्णय घेतात.
असे असले तरी त्या देशातील राज्यकारभारात एक त्या विलक्षण फरक दिसून येतो. आपल्या येथे डिक्टेटरशीपचा उदय झालेला दिसत आहे. आपल्या देशातील कारभारात दिसायला एक व वागायला दुसरे असा प्रकार चालला आहे.
तुम्ही या गोष्टीबाबत आपल्या देशाची राज्यघटना कशी काम करते व ती कशी राबविली जाते याचा विचार करता की नाही मला माहीत नाही. इंग्लंडमध्ये प्रजातंत्रात्मक पद्धती आहे. आणि लोकांनी आता भारताच्या नव्या राज्यकारभाराबाबत व राज्यघटनेबाबत जागृत राहिले पाहिजे.
संविधानाचा आद्यकर्ता मी आहे हे मी अभिमानाने सांगतो असे नाही पण निदान मी तरी तिचा आद्यकर्ता असल्यामुळे तसा नित्य विचार करीत असतो. आणि विचार करताना शेवटी या देशाचे होईल तरी काय असे भयानक चित्र माझ्या डोळ्यापुढे उभे राहते."
" आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली.
आता बुद्ध धर्माची लाट येईल, ती कधीही परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही.
भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या. काही छिद्रे राहिली होती. म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्ध धर्माचा प्रवाह थोडा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे.
आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही.
आपल्या स्वकष्टाने मला एक असे देऊळ बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल. त्याकरिता मी कोणा धनिकापुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. पंण तुम्ही पैसे जमवून देत असाल तर बांधीन व चांगले बांधीन.
आपल्या स्वपराक्रमाने बांधीन, दुसऱ्याच्या ओंजळीने बांधणार नाही."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर. (24 मे 1956, मुंबई.)
GSM retweeted
Yesterday in campus. 🤗
It makes me immensely happy to see more and more community members visiting our campus and extending their support, financially and in so many other ways. It means so much to me that Nalanda has been able to earn so much love and trust from our community.
Sometimes I feel that Nalanda’s greatest achievement is not just the thousands of students we have helped over the years, but the faith it has inspired in our community about what we can build together.
And for me, that is something truly precious. ❤️





















