Vivek Panmand (@VivekPanmand) header
Vivek Panmand (@VivekPanmand) profile picture

प्रवास | वाचन | वेबसिरीज | मीडिया | कॉफी आणि रनिंग | मित्र - गप्पा | आंबा बागायतदार | अहिल्यानगर - पुणे - मुंबई |

पारनेर (अहिल्यानगर)
Joined November 2019
Vivek Panmand retweeted
Traveling really makes you fall in love with life even more.
243
3,174
125
11,313
194,569
Vivek Panmand retweeted
What I create, I remember. What I consume, I forget.
521
3,036
331
22,998
502,465
मंगळवारी सकाळी जीममधून बाहेर पडताना एका व्यक्तीनं आवाज दिला. त्यानं जीम कशी आहे, लावायला पाहिजे का विचारलं. त्याला जीमच्या कर्मचाऱ्यानं एक महिन्याची 3,500 रुपये सांगितली होती. नंतर त्याला Cult च्या मॅनेजरचा नंबर दिला. पर्सनल ट्रेनिंग हवी असली तर ट्रेनरचा नंबर दिला. त्याला पैसे कसे वाचवता येतील हे सांगितलं. त्यानं हे ऐकल्यावर Thank You म्हणून नंबर घेतला. नंतर थोडावेळानं मुंबईला जायला निघालो. जाताना एका व्यक्तीला लिफ्ट दिली. त्यांचं बदलापुरवरून CSTपर्यंतच ट्रेन तिकीट काढलं. तिथं उतरल्यानंतर मेट्रो तिकीट काढून सोबत प्रवास केला. उतरल्यानंतर त्यांनी वाय बी सेंटरला जायचंय म्हटलं. त्यानंतर लगेच Rapido बुक करून दिली. त्यांनी धन्यवाद म्हणून पुण्यात आल्यावर भेटू म्हटलं. माणसाचं आयुष्य सोपं केलं की तो जवळ येतो. त्यानंतर आपलं जगणं सोपं होऊन जातं.
1
4
1
107
8,795
परिस्थिती कशीही असो, स्वप्ने पाहणं सोडू नका.
1
13
587
Vivek Panmand retweeted
स्वतःची निवड स्वतः करा! ✨ जास्त वाचा, चाला, मेहनत करा आणि फिट राहा. छान सुगंधी राहा, त्वचेची काळजी घ्या, चांगली कॉफी प्या आणि पुस्तकं विकत घेऊन वाचा. जास्त फिरा, फोटो काढा, आवडतं संगीत ऐका, रोज नवीन शिका आणि स्वतःसोबत वेळ घाला. छोट्या गोष्टींत आनंद शोधा.
7
69
4
622
10,284
Vivek Panmand retweeted
5,970
29,621
3,164
391,793
9,720,849
रात्री JW Marriott Hotelपासून घरी यायला राईड मिळाली. त्यावेळी रायडर सोबत बोलायला लागलो. तो पार्टीवरून घरी चालला होता. जाता जाता त्यानं राईड टाकली आणि आमची भेट झाली. घरी येईपर्यंत त्याच्यासोबत बोलणं झालं. तो एका कंपनीत HR Admin म्हणून काम करत होता. CCTV बसवणे आणि IT related त्याचा स्वतःचा बिझनेस होता. तिथं 3 मुलं कामाला होती. त्यानंतर घरून बाहेर पडताना आणि घरी जाताना ऑनलाईन राईड घ्यायचा. त्यातून त्याला दिवसाला 250-300 रुपये मिळतात. त्यातून घर खर्च भागत असल्याचं त्यानं सांगितलं. काम सुटल्यानंतर अर्ध्या तासात तो घरी पोहचतो. पण हे काम करून घरी जायला एक-दीड तास उशीर होतो असं त्यानं म्हटलं. आपण बाहेर पडलो, लोकांशी बोललो की जग समजत चालतं. माणसानं कायम स्वतःला Explore करायला हवं.
1
22
289
15,262
Vivek Panmand retweeted
Khadakwasla Ultra 100k done and dusted in 15 hours 52 minutes हिसाब बराबर💪🏼 #KeepRunning
11
1
70
1,525
Vivek Panmand retweeted
हा वेग आहे की विनाशाचा मार्ग आहे? अनेक गावात धड रस्ते नाहीत, मराठवाड्यात पाणी नाही, झाडे तोडली जातायेत, तरुण बेरोजगार आहेत. शेतकरी हताश आहे. गुन्हेगारी वाढली आहे. यालाच समृद्धी म्हणत असावेत बहुतेक..
11
25
149
3,415
English शिकायच्या Appवर एका मुलीशी Connect झालो. ती दिल्लीतल्या जिल्हा कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करत होती. तिला या फिल्डमधला 15 वर्षांचा अनुभव होता. तिचे वडील वकील होते आणि ती त्यांचा वारसा पुढं चालवतेय. तिचा नवऱ्यासोबत घटस्फोट झाला होता. त्या दोघांना एक मुलगा होता. ती त्या मुलाचा संभाळ करत होती. Call सुरु असताना मुलाचा कॉल आला. त्यानंतर तीच त्याच्यासोबत बोलणं झालं. तिने महाराष्ट्रातील नाशिक, पुणे आणि मुंबई या जागा पाहिल्या होत्या. एकदा नाशिक ते गोवा कारने ट्रिप पूर्ण केली होती. कोकण खूप आवडल्याचं तिनं सांगितलं. फिरल्यामुळं विचार बदलत गेल्याच कॉल ठेवताना म्हटली. नवीन माणसं आणि जागा आयुष्याकडं नवीन नजरेनं पहायला शिकवतात. आपण तेच करायचं.
4
3
149
9,576
सकाळी CME(कॉलेज ऑफ मिलिट्री इंजिनिअरिंग)मध्ये 21 किमी रनिंग पूर्ण केली. यावेळी मेजर सोबत असल्यामुळं शेवटपर्यंत Push करत राहिलो. रनिंग करताना अंध लोक सपोर्ट घेऊन पळत होते. दुसऱ्या बाजूला एक माणूस 3 बॉल खेळत मॅरेथॉन पूर्ण करत होता. अशा लोकांना पाहूनच Motivation मिळत होतं. रनिंग सुरु असताना अचानक अनिल कदम (मा. आमदार, निफाड विधानसभा) दिसले. त्यांना हात करून कदम साहेब म्हणालो, त्यांनी रनिंग करता करता हाय-फायव्ह केलं. परत आमची भेट झाली. त्यावेळी पळताना तुम्हीच आवाज दिला होता, असं त्यांनी म्हटलं. त्यावर त्यामुळंच तुम्ही लोकनेते आहात म्हटलं तर हसायलाच लागले. मॅरेथॉन पळताना अशी लै उत्साही लोक भेटतात. अनेकदा आपल्याला Stress येतो, एखादी गोष्ट कशी करायची समजत नाही. अशावेळी रनिंगची मदत होते. त्यामुळं वेळ मिळाला आणि जागा असेल तर रनिंग नक्की करायला हवी. @AnilKadam7711
1
16
1,991
Vivek Panmand retweeted
प्रत्येकजण आपला मित्र नसतो. काही जण फक्त वर्गमित्र असतात, काही सहकारी, तर काही फक्त ओळखीचे असतात. प्रत्येकाला 'मैत्री'चं लेबल देणं थांबवा. खरी मैत्री विश्वास, प्रयत्न आणि विचारांवर टिकते; फोटो किंवा ग्रुप्सवर नाही. सर्वांशी चांगलं वागा, पण सीमा ठरवा! ✨ #LifeLessons
34
194
3,435
सकाळी पुण्यात आल्यावर रामवाडीला उतरलो. तिथून जिल्हा कोर्टाकडं जाणारी मेट्रो पकडली. त्यानंतर परत मानकडं जाणारी मेट्रो पकडून औंधला उतरलो. पहिलं घरी यायचं म्हटलं की वाकडेवाडीला उतरावं लागायचं. नंतर तिथून मनपाची बस आणि परत औंधला यायचं. नंतर तर खडकीपर्यंत मेट्रोनं यायचो, पण तरी तिथून पुढं अडचण यायची. आता औंधला स्टेशन झाल्यामुळं ट्रॅफिकचं टेन्शन मिटलं. जिल्हा कोर्टला उतरून औंधकडं येणारी मेट्रो पकडायला लांब चालत जावं लागतं. त्यामुळं 10K स्टेप्स लवकर पूर्ण होतात. मेट्रोची Connectivityमुळं प्रवास करणं सोपं झालं. @metrorailpune
3
5
241
17,819
दुपारी नगरमध्ये Reporting करताना सुयोग भेटला. बरोबर 3 वर्षांपूर्वी मुलाखतीच्या निमित्तानं आमची भेट झाली होती. यावेळी भेटल्यानंतर गळ्यात पडून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गिफ्ट देऊन निरोप घेतला. मार्चमध्ये सुयोगमुळं तासभरात तिरुपती बालाजी दर्शन झालं. त्याची 'पदमराज डेअरी' अहिल्यानगरला आहे. त्याच्याकडं मिळणारा फ्रुटखंड खूप टेस्टी असतो. तो पार्थला खूप आवडतो. वर्षापूर्वी त्याला सांगितल्यावर लगेच संध्याकाळी पाठवून दिला. सुयोग भेटला की तोंडभरून बोलणार. कॉल केला की दादा बरे आहेत ना, नगरला आल्यावर भेटून जा म्हणत असतो. एका भेटीत माणसं जिवाभावाची का होतात, हे आता समजून चुकलंय. आपण जस वागतो, बोलतो आणि राहतो तशी माणसं Connect होतात. अशी माणसं खूप मोठी व्हावीत, त्यांनी जग जिंकावं असं मनापासून वाटतं राहतं!
आज दुपारी पदमराज गाईच्या तुपाची ऑर्डर मिळाली. याआधी या ब्रँडचं गाईचं तूप आणि म्हशीचं तूप वापरलंयं. दोन्ही तुपाची क्वालिटी मस्त होती. कंपनीनं गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वेबसाईट लॉन्च केली. कंपनीचा Founder सुयोग गर्जे मित्रचं आहे. त्यांचं फ्रुटखंड प्रोडक्ट पार्थला प्रचंड आवडतं. भावानं दिवाळीला गिफ्ट दिलं होतं. त्यात फ्रुटखंड, श्रीखंड आणि तूप मिळालं होतं. 3 वर्षांपूर्वी युवा उद्योजकांच्या स्टोरी कव्हर करत होतो. त्यावेळी सुयोगची ओळख झाली. साधा, सरळ स्वभाव असणाऱ्या सुयोगची बिझनेसमधील प्रगती जवळून पाहिलीय. माणसाच्या स्वभावाचं प्रतिबिंब बिझनेसमध्ये दिसतं. हे सुयोगकडं पाहून कायमच लक्षात येतं. मार्च महिन्यात तिरुपती दर्शन त्याच्यामुळचं झालं. आपण Authentic तुपाच्या शोधात असाल तर पदमराज तूप नक्की मागवा. Amazon - amazon.in/Padmaraj-Natural-P… Website - padmarajfarm.com/
1
6
781
Vivek Panmand retweeted
गावाकडं शेतकऱ्यासोबतं बोलत होतो. त्याला दिवाळी कशी चाललीय विचारलं. त्यानं साहेब दिवाळी नाही तर दिवाळं निघालंय, असं उत्तर दिलं. आता शेतात काय आहे, विचारल्यावर प्यायला पाणी नाही तर शेतीला कुठून येणार सांगितलं . यावेळी त्यानं बोलताना गोकुळचा मुद्दा काढला. त्यानं साहेब हे बरोबर चाललं नाही म्हटलं. त्याला विचारलं असं का तर, पुढच्या वर्षात सोसायटी आणि ग्रामपंचायत निवडणूका आहेत. यावेळी हे सरकार रडीचा डाव खेळणार, गावातली सत्ता त्यांच्याकडं घेणार म्हटलं. गावाकडं जे चाललंय ते चुकीचं आहे, हि भावना आहे. शेतकरी कट्यावर बसले की हि भावना बोलून दाखवतात. गावाकडची लोक साधी असतात, पण वेळ आल्यावर बरोबर उत्तर देतात.
2
28
1,239
गावाकडं शेतकऱ्यासोबतं बोलत होतो. त्याला दिवाळी कशी चाललीय विचारलं. त्यानं साहेब दिवाळी नाही तर दिवाळं निघालंय, असं उत्तर दिलं. आता शेतात काय आहे, विचारल्यावर प्यायला पाणी नाही तर शेतीला कुठून येणार सांगितलं . यावेळी त्यानं बोलताना गोकुळचा मुद्दा काढला. त्यानं साहेब हे बरोबर चाललं नाही म्हटलं. त्याला विचारलं असं का तर, पुढच्या वर्षात सोसायटी आणि ग्रामपंचायत निवडणूका आहेत. यावेळी हे सरकार रडीचा डाव खेळणार, गावातली सत्ता त्यांच्याकडं घेणार म्हटलं. गावाकडं जे चाललंय ते चुकीचं आहे, हि भावना आहे. शेतकरी कट्यावर बसले की हि भावना बोलून दाखवतात. गावाकडची लोक साधी असतात, पण वेळ आल्यावर बरोबर उत्तर देतात.
2
28
1,239
Vivek Panmand retweeted
हेचि दान देगा देवा | तुझा विसर नं व्हावा || आपल्याकडं जे आहे, ते दुसऱ्याला द्यावं 🙏😇
5
39
1,136
हेचि दान देगा देवा | तुझा विसर नं व्हावा || आपल्याकडं जे आहे, ते दुसऱ्याला द्यावं 🙏😇
5
39
1,136
दुष्काळाच्या काळात मायक्रोफायनान्स आणि कर्ज देणाऱ्या कंपन्या वाढत चालल्यात. सकाळी घरी पेपर वाचताना फायनान्स कंपनीचं पॅम्पलेट पाहिलं. त्यावर खाली एक नंबर दिला होता. त्या पॅम्पलेट वर दिलेल्या नंबरवर कॉल केला. त्यांना कर्ज हवंय असं म्हटलं. त्यांनी गहाण काय ठेवणार म्हटल्यावर 7/12 ठेवतो म्हटलं. त्यांनी गोठा आहे का, घरात कोणी नोकरीला आहे का विचारलं. नाही म्हटल्यावर अवघड आहे असं समोरून उत्तर दिलं. त्यानंतर काही Adjust झालं तर कॉल करतो असं उत्तर दिलं. त्या कंपनीनं तालुक्याच्या गावाला ऑफिस घेतलंय. या अडचणीच्या काळात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याला आधीच ते काटून हातात येतं. सध्या ग्रामीण भागात शेतीला पाणी नाही. त्यामुळं घरात पैसे कमी प्रमाणात येतात. याचाच गैरफायदा या कंपन्या घेतात. नंतर त्या कर्जाची परतफेड करताना काय होत ते आपण पाहिलं आहे.
5
5
90
7,901