Urja Foundation retweeted
‘मिशन खाकी - पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान’ माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार मोठा आधार..!!
#Shivsena #DrShrikantEknathShinde #maharashtra #mumbai #khaki #police
Urja Foundation retweeted
मिशन खाकी - पोलीस भरती योद्धा सहाय्यता अभियान शुभारंभ - मुंबई xitter.cf/i/broadcasts/1RJZzBmZy…
Urja Foundation retweeted
“मुरली देवरा नेत्र रुग्णालयासाठी लढा — रुग्णसेवा थांबणार नाही!”
इमारत धोकादायक असली तरी नागपाडा-भायखळा परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची रुग्णसेवा एका दिवसासाठीही थांबणार नाही! रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर याच विभागात असलेल्या 'ओझोन रिहॅबिलिटेशन सेंटर' (Ozone Rehabilitation Centre) येथेच करण्यात यावे, यासाठी माननीय खासदार श्री. @milinddeora जी यांनी महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्र देत प्रशासनाकडे आक्रमक भूमिका मांडली आहे.
माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. पुनर्विकास नक्की करा, पण नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही! जोपर्यंत रुग्णालयाचे याच परिसरात तात्पुरते पुनर्वसन होऊन सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत हा लढा आणि पाठपुरावा असाच सुरू राहील.
@mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @mybmc – at Mumbai, India
Urja Foundation retweeted
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण करण्यात यावे, या मागणीच्या अनुषंगाने आज
दिल्लीतील जंतर-मंतर येथे नामांतर संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध लोकप्रतिनिधींनी आंदोलन केले.
यानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांच्या उपस्थितीत संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित होतो. या बैठकीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामांतर 'लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' करण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी लोकभावनांचा आदर राखत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली. तर सरकार देखील सकारात्मक राहून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे, निलेश लंके, बजरंग सोनवणे, धैर्यशील पाटील यांच्यासह संघर्ष समितीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Shivsena #Drshrikanteknathshinde
Urja Foundation retweeted
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. स्वच्छ, हिरवेगार आणि शाश्वत मुंबईच्या दिशेने शिवसेना–महायुती सरकारचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
#Shivsena #EknathShinde #development #maharashtra
Urja Foundation retweeted
PV Sindhu clinches the Japan Open!
Winning this major title at the age of 31.
Never, ever, give up on a true Champion.
👏🏽👏🏽👏🏽🇮🇳
Urja Foundation retweeted
मुंबई.l
चांदिवली विधानसभा क्षेत्रातील मिठी नदी आणि विमानतळ प्राधिकरण क्षेत्रातील बाधित झोपडीधारकांना हक्काच्या घरांच्या चाव्या सुपूर्द!
Urja Foundation retweeted
माझगाव, ताडवाडी येथील बी.आय.टी. चाळ क्र. ४ मधील आमचे जिवलग स्नेही श्री. व सौ. लतिका लहू शेटगे यांची सुकन्या सौ. प्राजक्ता आणि श्री. तुषार दांडेकर यांच्या कन्यारत्न कु. कलाश्री हिच्या शुभ नामकरण सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद दिले.
Urja Foundation retweeted
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
जय भवानी, जय शिवाजी! 🚩
आमच्या लाडक्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन काल मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला! हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला.
आमचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दमदार आणि प्रेरणादायी भाषणाने उपस्थितांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. साहेबांच्या शब्दाशब्दातून शिवसेनेचा विचार आणि तळागाळातील सामान्य माणसासाठी काम करण्याची जिद्द पुन्हा एकदा ठळकपणे दिसून आली.
यावेळी साहेबांनी कार्यकर्त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र दिला आहे;
"आता प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या मनात फक्त आणि फक्त शिवसेनाच वसवायची आहे!"
हा केवळ एक विचार नसून, शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी एक नवी जबाबदारी आणि संकल्प आहे. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण आता पूर्ण ताकदीने कामाला लागूया.
वातावरणात असलेला हा उत्साह, हा जल्लोष आणि हा दृढ निश्चय पाहून खात्री वाटते की, शिवसेनेची घोडदौड अशीच अविरत आणि अधिक वेगाने सुरू राहील.
जय महाराष्ट्र! 🚩
#शिवसेना #वर्धापनदिन #बाळासाहेबठाकरे #एकनाथशिंदे #महाराष्ट्र #शिवसैनिक #जयमहाराष्ट्र #Shivsena
@mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @iYashwantJadhav @YaminiYJadhav @Shivsenaofc
Urja Foundation retweeted
नरसापूरचा नरकासूर…
कालपासून मन अक्षरशः सुन्न झालंय… ४ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या त्या अमानुष अत्याचाराची बातमी ऐकून शब्दच हरवले. त्या लेकराच्या वेदना, तिची भीती, तिचा आक्रोश… हे सगळं डोळ्यांसमोरून जातच नाही. एखाद्या फुलासारख्या निष्पाप जीवावर इतका क्रूर अत्याचार करणारा माणूस नाहीच, ती एक राक्षसी प्रवृत्तीच आहे.
याआधीही अशा अनेक गुन्ह्यांत नाव असलेला हा नराधम… समाजाच्या भीतीने, बदनामीच्या धास्तीने दडपले गेलेले गुन्हे… आणि आपण सगळे कुठेतरी शांत राहिलो… कदाचित म्हणूनच आज एका निष्पाप जीवाचा बळी गेला. ही फक्त एका कुटुंबाची नाही, तर संपूर्ण समाजाची हार आहे.
आता वेळ आली आहे, फक्त गुन्हेगारांना नाही, तर अशा विकृत प्रवृत्तींनाच संपवण्याची. प्रत्येकाने हे आपलं कर्तव्य समजून पुढे यायला हवं. अन्यायाविरुद्ध उभं राहणं, आवाज उठवणं, आणि अशा राक्षसी कृत्यांना मुळापासून थांबवणं हिच त्या चिमुरडीसाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
पुढे जाऊन कुणाचीही हिंमत झाली नाही पाहिजे अशा कृत्याचा विचार करण्याचीसुद्धा… इतकी कठोर शिक्षा त्याला झाली पाहिजे. आणि एक निडर, सक्षम आणि जागरूक समाजव्यवस्था आपण उभी करायला हवी.
त्या लेकराने कोणत्या यातना सहन केल्या असतील, हे विचार करूनच हृदय पिळवटून जातं… देवाने तिला आपल्या कुशीत स्थान द्यावं आणि तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही मनापासून प्रार्थना… 🙏
#JusticeForHer #StopCrimesAgainstChildren
Urja Foundation retweeted
बारामतीच्या जनतेने दाखवलेला प्रचंड विश्वास, विकासावरची ठाम भूमिका आणि दिवंगत अजितदादांच्या कार्याचा मजबूत वारसा या सर्वांची साक्ष देणारा हा ऐतिहासिक विजय!
मा. श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
जनतेचा विश्वास, कामाचा ध्यास आणि नेतृत्वाची ताकद, यांच्या बळावर आपण पुढील काळातही महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावाल, याची खात्री आहे.
#अभिनंदन @SunetraA_Pawar
Urja Foundation retweeted
आयुष्याच्या या वेलीला जणू जगण्याची आशा येऊन मिळाली आहे.
#Shivsena #EknathShinde
Urja Foundation retweeted
लालबागच्या कल्याणदासवाडी येथे आयोजित क्रिकेटच्या रात्र सामन्यांस उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. क्रिकेटच्या प्रेमाचा अनोखा फिव्हर येथे खेळाडूंमध्ये पहायला मिळाला. सामन्यांचा आनंद घेऊन विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. तसेच, यावेळी आयोजक तसेच स्थानिकांशी संवाद साधला.
#शिवसेना #विजयदाऊलिपारे
@shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @IamSanjayMore @iYashwantJadhav @yaminiyjadhav
Urja Foundation retweeted
निवडणूक आयोगाकडून राबविण्यात येणारी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मोहीम लवकरच संपूर्ण राज्यभर सुरू होत आहे. त्या अनुषंगाने बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमणुकीसंदर्भात शिवसेना दक्षिण मुंबईची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. या बैठकीस माननीय खासदार डॉ. @DrSEShinde साहेब, खासदार @milinddeora साहेब, संपर्कप्रमुख आमदार @meNeeleshNRane साहेब तसेच सचिनजी जोशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाचा लाभ झाला.
बैठकीत झालेल्या मार्गदर्शनानुसार भायखळा विधानसभा क्षेत्रात मा. श्री. यशवंत जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज BLA नेमणुकीच्या कामकाजाला प्रारंभ करण्यात आला आहे.
या प्रसंगी विधानसभा संघटक श्री. कृष्णा रेणुसे, श्री. संदीप गांजाळे, श्री. राजा म्हात्रे, श्री. @kasale_gaurav , श्री. प्रशांत कामतेकर आणि श्री. @speakOnkarPawar उपस्थित होते.
सर्वांच्या समन्वयातून हे काम अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पक्ष संघटना अधिक बळकट करत यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहेत.
@Shivsenaofc @mieknathshinde @IamSanjayMore @iYashwantJadhav @yaminiyjadhav
Urja Foundation retweeted
शिवसेना मुख्य नेते तथा लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या वतीने ‘बौद्ध रत्न’ पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
समाजकारण, जनसेवा आणि लोककल्याणासाठी केलेल्या आपल्या कार्याची ही पोचपावती आहे. आपल्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
#अभिनंदन
@shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @iamsanjaymore @iYashwantJadhav @yaminiyjadhav
Urja Foundation retweeted
माझे मित्र, ऊर्जा फाउंडेशनचे सदस्य @amitmore3546 यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस भरपूर यश, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
#happybirthday
@UrjaForYou
Urja Foundation retweeted
ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने आयोजित गुढी पाडवा शोभायात्रा यंदा अतिशय भव्य, दिमाखदार आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात आणि पारंपरिक साजशृंगाराने नटलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसरात नववर्षाच्या स्वागताची आनंदलहरी पसरली.
या मंगलप्रसंगी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची परंपरा जपणाऱ्या त्यांच्या वंशज शीतलताई मालुसरे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्यांच्या मनोगतातून व्यक्त झालेल्या शुभेच्छा आणि कृतज्ञतेच्या भावनेने उपस्थित प्रत्येकाच्या मनात अभिमान आणि प्रेरणेची नवी ज्योत प्रज्वलित झाली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील जेधे, बांदल आणि येसाजी कंक या सरदार घराण्यातली वंशज मंडळी उपस्थित होती. या थोर घराण्यांच्या वंशजांचे औक्षण करून सन्मानाने त्यांचे स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच तेज आणि गौरव प्राप्त झाला.
ही शोभायात्रा केवळ एक उत्सव नव्हता, तर आपल्या समृद्ध परंपरा, शौर्यगाथा आणि संस्कृतीचा जागर साजरा करणारा एक अभिमानाचा सोहळा ठरला. नव्या वर्षाच्या स्वागतासोबतच, एकजुटीची भावना आणि संस्कारांची परंपरा अधिक दृढ करण्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
ऊर्जा फाउंडेशनच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देणार्या सर्व मान्यवर, पदाधिकारी तसेच नागरिकांचे मनःपूर्वक आभार. आपणां सर्वांना मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा #gudhipadwa @UrjaForYou
@shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @IamSanjayMore @iYashwantJadhav @yaminiyjadhav
Urja Foundation retweeted
आशा, आकांक्षा आणि प्रगतीची नवी पहाट घेऊन आलेला गुढी पाडवा…
नवीन स्वप्नांना बळ देणारा, नव्या संधींची दारे उघडणारा हा सण आपल्याला अधिक एकत्र आणणारा ठरो. आपल्या प्रत्येकाच्या प्रयत्नांतून, एकजुटीतून आणि सकारात्मक विचारांतून यशाची उंच गुढी आपण सगळे मिळून उभारुया.
आपल्या सर्वांना गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा #gudhipadwa
Urja Foundation retweeted
दिवसभर घराची जबाबदारी, कुटुंबाची काळजी आणि समाजकार्यातील धावपळ…
या सगळ्यात स्वतःसाठी वेळ काढणं महिलांना अनेकदा शक्य होत नाही.
पण जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या या छोट्याशा कार्यक्रमात आपल्या सर्व महिला कार्यकर्त्या, पदाधिकारी मनमुराद हसल्या, खेळल्या, आनंदाने सहभागी झाल्या आणि ते पाहून खूप समाधान वाटलं.
घर आणि समाज दोन्ही सांभाळताना त्या जेवढ्या ताकदीने उभ्या राहतात, त्या प्रत्येक स्त्रीला अशा छोट्या आनंदाच्या क्षणांचा हक्क आहेच.
या कार्यक्रमात सहभागी होऊन वातावरण आणखी आनंदी केल्याबद्दल माझ्या सर्व महिला सहकाऱ्यांचे मनापासून आभार!
तुमची साथ, तुमच्याकडून मिळणारी ऊर्जा आणि तुमचं योगदान नेहमीच प्रेरणादायी आहे.
#internationalwomensday #जागतिकमहिलादिन
@shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @IamSanjayMore @iYashwantJadhav @YaminiYJadhav
Urja Foundation retweeted
माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
या केवळ ओळी नाहीत, तर मराठी मनाचा स्वाभिमान आहे.
अमृतासारखी गोड, विचारांनी समृद्ध आणि संस्कृतीने संपन्न अशी आपली माय मराठी! तिच्या गौरव दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी त्यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्याला दिलेले वैभव सदैव प्रेरणादायी राहील.
#मराठी #मराठीभाषागौरवदिन
@shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @iamsanjaymore @iYashwantJadhav @yaminiyjadhav































