शिवसेना भायखळा विभागप्रमुख विजय (दाऊ) लिपारे यांचे फॅन पेज

Maharashtra, India
Joined January 2020
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर! शिवसेनेचा दसरा मेळावा ! शिवसेनेची दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बळीराजाप्रती संवेदना… दि. २० ऑक्टोबर, २०२६ संध्याकाळी ५ वाजता स्थळ - नेस्को, गोरेगाव #दसरामेळावा #Shivsena #Eknathshinde #mumbai #शिवसैनिक #Maharashtra @mieknathshinde @DrSEShinde @milinddeora @iYashwantJadhav @meNeeleshNRane @YaminiYJadhav @Shivsenaofc
1
1
144
भगवा घेऊन खांद्यावर, शिवसैनिक दिसेल बांधावर… शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा २० ऑक्टोबर, २०२६ संध्याकाळी ५ वाजता स्थळ - नेस्को, गोरेगाव #दसरामेळावा #Shivsena #Eknathshinde #शिवसैनिक #mumbai #MaharashtraNews
86
253
11
424
17,641
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी डोंबिवलीकर मंत्रमुग्ध..!! #navratrispecial #Shivsena #Drshrikanteknathshinde #dombivli #नवरात्री
27
209
219
1,991
पनामा सिटीच्या दौऱ्यादरम्यान, मूळच्या मुंबईकर आणि पनामातील भारताच्या नवनियुक्त राजदूत श्रीमती प्रतिभा पारकर यांची भेट झाली. त्यांचे पतीही मराठी असून सध्या पेरूमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत. या मराठमोळ्या राजनैतिक दाम्पत्याची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना मनापासून आनंद झाला. @mieknathshinde @IndiainPanama @eoilima
8
10
164
17,094
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
काही व्यक्ती काळाच्या प्रवाहासोबत पुढे जातात, तर काही व्यक्तींच्या नेतृत्वामुळे काळालाच नवी दिशा मिळते. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचा २५ वर्षांचा सार्वजनिक जीवनातील प्रवास हा अशाच परिवर्तनकारी नेतृत्वाचा प्रेरणादायी अध्याय आहे. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या या नेतृत्वाने पुढे देशाच्या राजकारणाला, विकासाच्या संकल्पनेला आणि भारताच्या जागतिक भूमिकेला एक नवा आयाम दिला. २०१४ मध्ये खासदार म्हणून संसदेत प्रवेश केल्यापासून मोदीजींचे नेतृत्व जवळून पाहण्याची आणि त्यांच्या कार्यपद्धतीतून शिकण्याची संधी मला मिळाली. एखाद्या ध्येयावर अढळ विश्वास ठेवून त्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची दृष्टी आणि राष्ट्रहिताला प्रत्येक निर्णयाच्या केंद्रस्थानी ठेवण्याची वृत्ती, हे त्यांच्या नेतृत्वातून मला सातत्याने जाणवलेले प्रेरणादायी पैलू आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ विकासाची नवी स्वप्ने पाहिली नाहीत, तर ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा आत्मविश्वासही मिळवला. आज ‘नवा भारत’ आत्मविश्वासाने जगासमोर उभा आहे, हीच त्यांच्या २५ वर्षांच्या राष्ट्रसेवेची मोठी साक्ष आहे. नरेंद्र मोदीजींच्या या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवापर्वाला मनःपूर्वक सलाम आणि हार्दिक अभिनंदन. आगामी काळातही त्यांच्या दूरदृष्टीला आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाला अधिक बळ मिळो, भारताला सामर्थ्यवान, समृद्ध आणि आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून नव्या उंचीवर नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा. #Shivsena #DrShrikantEknathShinde #NarendraModi #India #PublicLeader
74
319
3
1,201
15,177
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि माझी आईही महाराष्ट्राची लेक आहे. त्यामुळे मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्राशी माझं नातं हे केवळ ओळखीपुरतं नाही, तर जिव्हाळ्याचं आणि अभिमानाचं आहे. समृद्ध साहित्यपरंपरा, संस्कृती आणि अस्मिता जपणाऱ्या आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हा प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा क्षण आहे. मराठी अभिजात भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #मराठीअभिजातभाषादिन #मराठी #मायमराठी #मराठीभाषा #महाराष्ट्र #अभिजातमराठी
3
14
155
11,418
मुंबईचा सुपुत्र कॅप्टन स्मित मच्छार यांनी अत्यंत कठीण आणि जीवघेण्या प्रसंगात दाखवलेल्या अदम्य साहस, धैर्याला आणि विलक्षण प्रसंगावधानाला सलाम. दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या विमानप्रवासादरम्यान घडलेल्या या गंभीर प्रसंगात स्मित स्वतः गंभीर जखमी झाले होते. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी न डगमगता दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि समयसूचकता निश्चितच असामान्य आहे. त्यांच्या धाडसी कृतीमुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविण्यात मोलाची मदत झाली. संकटाच्या त्या क्षणी सर्व प्रवाशांनीही एकजुटीने आणि तत्परतेने परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मनापासून सलाम. कठीण प्रसंगात एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची ही भावना खरोखरच प्रेरणादायी आहे. कॅप्टन स्मित, आपल्या शौर्याला मनापासून सलाम. आपण लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे आणि उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. आपले धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि प्रसंगावधान लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला आपला अभिमान आहे.
39
351
2
1,552
20,284
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
गेल्या चार पाच दिवसांत बर्नाल’चा भरपूर खप झालाय म्हणे 😂 #बर्नाल #burnol #burnolmoment #pharmacy_survey
1
4
74
📍 युनायटेड किंग्डम | 'यूके एशियन बिझनेस कौन्सिल' आणि 'कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस' यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह 'हाऊस ऑफ लॉर्डस'मध्ये आज ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मला गौरवण्यात आले. यावेळी या ऐतिहासिक सभागृहात 'जय हिंद... जय महाराष्ट्र...' म्हणत मराठी भाषेचा एकच गजर झाला. ज्या मातीतून मी इथवर आलो त्या महाराष्ट्राच्या विकासाची कहाणी मी मांडलीच, मात्र आई -पत्नीच्या काबाडकष्टांतून सर्वसामान्यांसाठी काम करण्याची माझी विचारसरणी घडली असे जेव्हा मी नमूद केले, तेव्हा संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. #मुंबई आणि #लंडन ही दोन्ही जगातील अत्यंत महत्त्वाची वित्तीय केंद्रे असून फिनटेक, ग्रीन एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, डीप-टेक आणि कौशल्य विकास क्षेत्रात #महाराष्ट्र - #ब्रिटन सहकार्याला मोठी संधी असल्याचे यावेळी स्पष्ट केले. यावेळी या सोहळ्याला उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक, कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे त्याचप्रमाणे संसदेच्या सभागृहांचे सदस्य, ब्रिटनचे वरिष्ठ मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत, जागतिक उद्योजक आणि कॉमनवेल्थ देशांतील मान्यवर उपस्थित होते. #London #HouseofLords #EknathShinde #Maharashtra
96
269
14
689
72,461
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि मराठी मातीचा सुगंध आता थेट ब्रिटनच्या संसदेपर्यंत दुमदुमला आहे! उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या दारात जाऊन शासन उभे करणारी ‘शासन आपल्या दारी’ असो किंवा माता-भगिनींना आर्थिक बळ देणारी ‘लाडकी बहीण योजना’, साहेबांच्या प्रत्येक निर्णयाने संवेदनशील आणि गतिमान प्रशासनाची नवी परिभाषा लिहिली आहे. ग्राउंड लेव्हलच्या या कामाची आज जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे, जी आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. ‘नमस्कार… जय महाराष्ट्र’ या तीन शब्दांनी ब्रिटनच्या ऐतिहासिक सभागृहाला दिलेली साहेबांची साद म्हणजे मराठी संस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जगभर झालेला जयघोष होता. हा पुरस्कार केवळ एका नेत्याचा नसून, महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी जनता, माता-भगिनी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाची पावती आहे. महाराष्ट्राचा मान जगात उंचावल्याबद्दल साहेबांना मनःपूर्वक सलाम आणि हार्दिक अभिनंदन! #Shivsena #DrShrikantEknathShinde #london #PublicLeader #HouseofLords #Congratulations @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
1
4
137
📍 #मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहेत. आज या हॉस्पिटलमध्ये जाऊन अण्णांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यावर उपचार करणारे डॉ.गौतम भन्साळी यांच्याकडून त्यांच्यावर सुरु असलेल्या उपचारांची माहिती जाणून घेतली. अण्णांच्या विचारांची आणि मार्गदर्शनाची समाजाला नितांत गरज असून, त्यांनी लवकरच पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा समाजकार्यात सहभागी व्हावे असे सांगत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ.गौतम भन्साळी आणि राळेगणसिद्धी मधील अण्णांचे अनुयायी उपस्थित होते. #AnnaHajare #Mumbai #EknathShinde #Maharashtra @ChivateMangesh
46
258
2
774
43,829
📍मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रेल्वेचा शुभारंभ कार्यक्रम.
30
219
1
385
13,189
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
“मुरली देवरा नेत्र रुग्णालयासाठी लढा — रुग्णसेवा थांबणार नाही!” इमारत धोकादायक असली तरी नागपाडा-भायखळा परिसरातील सर्वसामान्य रुग्णांची रुग्णसेवा एका दिवसासाठीही थांबणार नाही! रुग्णालयाचे तात्पुरते स्थलांतर याच विभागात असलेल्या 'ओझोन रिहॅबिलिटेशन सेंटर' (Ozone Rehabilitation Centre) येथेच करण्यात यावे, यासाठी माननीय खासदार श्री. @milinddeora जी यांनी महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना पत्र देत प्रशासनाकडे आक्रमक भूमिका मांडली आहे. माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे. पुनर्विकास नक्की करा, पण नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही! जोपर्यंत रुग्णालयाचे याच परिसरात तात्पुरते पुनर्वसन होऊन सेवा पूर्ववत होत नाही, तोपर्यंत हा लढा आणि पाठपुरावा असाच सुरू राहील. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @mybmc – at Mumbai, India
3
9
175
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
ज्याने धरली बाळासाहेबांच्या विचारांची कास, त्याचं नाव बंडू बॉस! #Shivsena #Eknathshinde
8
9
34
1,412
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
परभणी येथे शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या शेतकरी व युवा मेळाव्यातील खास क्षण : #Shivsena #Eknathshinde
8
13
482
📍मुंबई 'भटके विमुक्त हक्क, न्याय व विकास परिषद २०२६' कार्यक्रमातील काही खास क्षण!
40
215
1
343
16,190
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
आपल्याकडे जुन्या काळातील लोककथांमध्ये एक शेखचिल्ली नावाच काल्पनिक पात्र असायचं.. अगदी तशीच अवस्था @rautsanjay61 यांची झाली आहे.. आणि असल्या पात्रांवर यांचे कार्यकर्ते विश्वास ठेऊन मोठ्या मोठ्या कथा रचतात.. 🤣😂😅 #शेखचिल्ली
सह्याद्री ते विमानतळ… एकच आश्वासन; शिंदे: साहेब, आमच्या गटाचे मंत्री-आमदार घाबरले आहेत. शहा: का? शिंदे: सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला तर? आमदारांचं हेच म्हणणं आहे.बहोत डिस्टर्बड है सब लोक शहा: अरे छोड़ो… चिंता मत करो. मेरी पार्टी है ये भैय्या, मैं देख लूँगा. आधी सहा गद्दार खासदार संसद कार्यालयात भेटले तेव्हाही तोच सूर होता — “सब सेट हो जाएगा.” प्रश्न सरळ आहे: सुप्रीम कोर्ट त्यांच्या खिशात आहे का? संविधान खिशात घालून फिरणं हीच आता नवी आचारसंहिता झाली आहे का? न्यायालयात सत्य आणि धर्म जिंकतो… की दुर्योधनाचं पाप? पाहू. @narendramodi @rashtrapatibhvn @AmitShah
1
1
95
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
📍 परळ–भायखळा | मुंबई आज परळ येथील लक्ष्मी कॉटेज तसेच भायखळा येथील ‘माझगावचा मोरया’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या दोन्ही ठिकाणी इतर धर्माच्या व्यक्तींकडून हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न झाला, दंगल देखील झाली. दोन्ही ठिकाणच्या घटनांची सविस्तर माहिती जाणून घेतली आणि जे यात दोषी आहेत त्यांना सोडणार नाही हा विश्वास दिला. यावेळी माजी आमदार श्री. दगडू दादा सकपाळ, दक्षिण मुंबई सहप्रमुख श्री. संतोष नलावडे, माजी नगरसेवक श्री. नाना आंबोले, श्री. बबन कानावजे, शिवसेना विभागप्रमुख श्री. शशी निकम, भायखळा शिवसेना विभागप्रमुख श्री. विजय लिपारे यांच्यासह स्थानिक नागरिक, गणेशभक्त उपस्थित होते.
28
55
1
260
9,762
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
शिवसेना उपनेते सन्मा. यशवंतजी जाधव साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐 साहेब, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा समाजासाठी, शिवसैनिकांसाठी आणि आपल्या माणसांसाठी समर्पित राहिला आहे. संघर्षाच्या काळात खंबीरपणे उभे राहून अनेकांना आधार देणारे आणि सुख-दुःखात आपल्या माणसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आपले व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आपल्या नेतृत्वाची ताकद, माणसं जोडण्याची कला आणि प्रत्येक कार्यकर्त्याविषयी असलेली आपुलकी हीच आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. आपल्या प्रेमाची आणि मार्गदर्शनाची सावली आमच्यावर सदैव अशीच राहावी, हीच मनापासून इच्छा. या वाढदिवसानिमित्त श्री महागणपती चरणी एकच मनःपूर्वक प्रार्थना आपले आरोग्य सदैव उत्तम राहो, शरीर-मन निरोगी राहो आणि आपल्याला दीर्घ, आनंदी व समाधानी आयुष्य लाभो. 🙏 आपल्या चेहऱ्यावरचे हास्य सदैव असेच खुलत राहो, आपल्या आयुष्यात सुख-समाधानाची कमतरता भासू नये आणि येणारे प्रत्येक वर्ष आपल्यासाठी नव्या यशाचे, नव्या आनंदाचे आणि नव्या उमेदीचे ठरो. आपण निरोगी राहा, आनंदी राहा आणि आम्हा सर्वांना आपल्या प्रेमाने, आशीर्वादाने व मार्गदर्शनाने अशीच ऊर्जा देत राहा… हीच वाढदिवसानिमित्त मनापासून सदिच्छा! वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा साहेब! @iYashwantJadhav – at Mumbai, India
1
1
2
98
Aapla Daau/आपला दाऊ retweeted
बात “कड़वी” है लेकिन “विचारणीय” है.
81
1,358
66
3,458
94,962