
कशास पाहिजे तुला परंपरा? तुझीच तू परंपरा बनून जा | Calligraphy | #मराठी | Artworks are copyrighted. Contact : sheetaltara3@gmail.com #अक्षरकलावारी #अक्षरगणेश
Massachusetts, USA
Joined March 2015
- Tweets3.3K
- Following285
- Followers7.2K
- Likes17.6K
Pinned Tweet
The niche isn't something you pick. It's something you discover.
Featured in Creative Gaga Issue 71, sharing my views on calligraphy as a business and niche. Do read and tell me what you think.
creativegaga.com/design/grap… – at Boston, MA
Sheetaltara retweeted
माझा मित्र कार्टूनिस्ट आलोक @caricatured यावर्षी एक भन्नाट, क्रिएटिव्ह आणि पुर्ण नवा प्रयोग घेऊन आलाय.
पुलं देशपांडे यांच्या खुमासदार विनोदांचं कॅलेंडर.
आपल्याकडे मराठीत असे ‘धाडसी’ प्रयोग व्हायला हवेत.
आपणही सर्वांनी अशा प्रयोगांना साथ द्यायला हवी.
#मराठी #दिनदर्शिका
१/३
Sheetaltara retweeted
Issue 71 - Pitch or No Pitch
Explores the realities of pitching through the perspectives of freelancers, studios, agencies, & clients - examining its value, ethics, challenges, and the future of fair creative collaboration. bit.ly/4wWb1Fl
#creativegaga #graphicdesign
Epitome of design and calligraphy presentation comes to conclusion for this year 🫡 ❤️❤️❤️ take a bow @Sheetaltara
पंढरपूर दिसताच जीवाला अपार आनंद होतो, भानुदासांनी अनंत विरहानंतरच्या भेटीचा सोहळा शब्दांत मांडला आहे. आपण वारी चालू शकलो नाही, पण मनाने चंद्रभागेच्या तिरीच होतो. यावर्षीच्या अक्षरकलावारीचा हा समारोप 🙏 #अक्षरकलावारी
पंढरपूर दिसताच जीवाला अपार आनंद होतो, भानुदासांनी अनंत विरहानंतरच्या भेटीचा सोहळा शब्दांत मांडला आहे. आपण वारी चालू शकलो नाही, पण मनाने चंद्रभागेच्या तिरीच होतो. यावर्षीच्या अक्षरकलावारीचा हा समारोप 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
उद्या आषाढी एकादशी, आज वाखरीला रिंगण सजेल. संत सेनांच्या अभंगात विठ्ठलाला आपल्या आईबापासारखे मानून हक्काने मागणे आहे, याचना नाही, हक्क आहे. वारकऱ्यांना लागलेली पांडुरंगाच्या दर्शनाची आस हा अभंग किती परिपूर्णपणे दर्शवतो आहे. 🙏#अक्षरकलावारी – at Boston, MA
आपण देवाला शोधत फिरतो, पण देवच भक्तांच्या मागे आनंद शोधत धावतो , निळोबारायांची ही लाडकी कल्पना. वारीत सर्वजण एकमेकांना माउली म्हणतात कारण हेच कि विठ्ठल कुठल्याही रूपात भेटू शकतो. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
शून्य म्हणजे रिकामेपण नाही, ज्याचे वर्णन होत नाही ते निर्गुण आहे. आऊबाईंनी स्वतःला त्यात सामावलेले पाहिले आणि स्वतःच विठ्ठल झाल्याचे जाणवले. तीन ओळींत इतका गहन अर्थ. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
गोष्टी टोकाला घेऊन जाऊ नकोस. ही याचना नाही, हक्काची मागणी आहे कर्ममेळा विठ्ठलाला थेट विचारतात, पतितांच्या उद्धाराचे ब्रीद खरे करून दाखव. आपल्या प्रेमाचं माणूस देव असला तरी त्याला कठोर शब्द ऐकावेच लागतात.🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
जप-तपाचे अवघड नियम नाहीत, फक्त सर्वांगी सत्य प्रेम असावे तुकाविप्रांचा नेम इतका सोपा आणि इतका नेमका. भक्तीचे इतके छोटे सूत्र क्वचितच वाचायला मिळते. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
संत बंका म्हणतात माझ्याकडे मोठा प्रेमभाव नाही, मान्यता काय ते कळत नाही, पण विठ्ठलाशी सलगीने बोलताना आनंद होतो. विठ्ठलनाम म्हणजे रोज दिवाळी, आनंदाला मुहूर्त लागत नाही, नामजप पुरतो. 🙏#अक्षरकलावारी – at Boston, MA
देवाला वैकुंठ नको, भूषणे नको, आसन-वसनही नको त्याला हवा फक्त कीर्तनाचा गजर. तिथे श्रीहरी स्वतः नाचतो. देव भक्तीचा भुकेला आहे, वैभवाचा नाही सोयराबाई किती नेमकं सांगतात. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
जसा कुंभार मातीला घडवतो तसे मला घडव, गोरोबा देवाशी रोजच्या कामाच्या भाषेत बोलतात. त्यांना माहिती आहे कि आपणही देवाच्या चाकावरची माती आहोत, घडवणारा तो आहे. साधेपणात किती विलक्षण सौंदर्य आहे. 🙏
#अक्षरकलावारी – at Boston, MA
Sheetaltara retweeted
Some people write history.
Some preserve it with a camera.
For years, photographer Sandesh Bhandare walked with the Wari, documenting one of Maharashtra's oldest living traditions through his lens.
He wasn't chasing grand spectacles.
कीर्तनाने मनाचे उन्मन होते, विचार थांबतात, केवळ अनुभव उरतो. निवृत्तीनाथांनी नाथपंथाची योगसाधना आणि वारकऱ्यांचे कीर्तन एकाच अभंगात एकवटले. एका अभंगाची खोली पाहून थक्क व्हायला होतं. 🙏
#अक्षरकलावारी – at Boston, MA
मोक्षही नको, फक्त विठ्ठलचरणांचे दर्शन हवे कान्होपात्रेने देवाकडे देवालाच मागितले. जन्मोजन्मी गर्भवासही चालेल, पण चरण सोडायचे नाहीत. हे समर्पण शब्दांच्या पलीकडचे आहे. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
मीपणा गेला कि उंबरठा आडवा येत नाही चोखोबांनी हे जगून दाखवलं. महाद्वारावरूनही त्यांना पूर्ण विठ्ठल भेटला. चोखोबा आणि विठ्ठल वेगळे कधी नव्हतेच मुळात. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
मुंगी सूर्याला गिळते, वांझेच्या पोटी आत्मबोध जन्मतो, अहंकाराचा विंचू पाताळात जातो आणि मुक्ताई हसते. वीस वर्षाच्या मुलीने हे लिहिलं यावर विश्वास कसा ठेवावा? 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
सगुणही नाही, निर्गुणही नाही नरहरी सोनारांनी सोनाराच्या मुशीतून शुद्ध वेदांत काढला. क्षरही नाही, अक्षरही नाही, अशा परात्पर ब्रह्माला आपण वारीत शोधायला निघालो आहोत. 🙏 #अक्षरकलावारी – at Boston, MA
























