MSEDCL Nashik retweeted
सौर क्रांतीमध्ये महावितरणचा नवा अध्याय!
महावितरणने धामणी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील कालव्यावर २५ एचपीचा ऑफ-ग्रीड सौर पंप बसवला आहे. ढगाळ वातावरणातही ३.५ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमधून पाणी सोडणे शक्य झाले आहे. हा एक पथदर्शी प्रकल्प असून, महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. स्थानिक २५ शेतकऱ्यांच्या गटाला सहकारी पद्धतीने या प्रकल्पाचा लाभ झाला आहे.
सहकारी पद्धतीने जास्त क्षमतेचे ऑफ-ग्रीड सौर पंप घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प एक वरदान ठरत आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अशा सौर पंपांसाठी सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनुदान देखील उपलब्ध आहे.
#MSEDCL #greenenergy #solarenergy #Pune
MSEDCL Nashik retweeted
महावितरणचे पाच विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान!
महावितरणकडून १ कोटी ९२ लाख ७९ हजार ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे तर ३५ लाख ७३ हजारांवर ग्राहकांना नोंदणीकृत ई-मेलद्वारे विद्युत सुरक्षेचा संदेश देण्यात आला. या अभियानात २ लाख ११ हजारांवर नागरिक, शालेय विद्यार्थी, अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
#MSEDCL
MSEDCL Nashik retweeted
महावितरणचे पाच विक्रम; एशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान!
महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानामध्ये प्रामुख्याने १) विद्युत सुरक्षा रॅली २) मॅरेथॉन ३) विद्युत सुरक्षेची शपथ ४) ऑनलाइन प्रश्नमंजूषा तसेच ५) ‘एसएमएस’ व ‘ई- मेल’द्वारे ग्राहक संवादामध्ये लोकसहभागाच्या विक्रमांची नोंद केली. भारत सरकारकडे नोंदणीकृत व वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटीशी संलग्न एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आशियातील सर्व प्रमुख राष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्ड्सचे परीक्षण करून नोंदी घेतल्या जातात. त्यानुसार महावितरणच्या विक्रमांची घोषणा करण्यात आली.
#msedcl
MSEDCL Nashik retweeted
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची दैनिक मुंबई तरुण भारत मधून प्रसिद्ध मुलाखत.
#MSEDCL
MSEDCL Nashik retweeted
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचेकडून "नाते प्रकाशाचे" या पुस्तकाचे कौतुक
महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी पुणे परिमंडळाचे तत्कालीन मुख्य अभियंता म्हणून सन २०२३ ते २५ या दोन वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व विशेष उपक्रमांवर आधारित "नाते प्रकाशाचे" या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी या पुस्तकाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.
MSEDCL Nashik retweeted
सुरक्षा प्रतिज्ञा
विद्युत सुरक्षा सप्ताह दि.१ ते ६ जून २०२५
#MSEDCL #safetyweek2025
MSEDCL Nashik retweeted
ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना :
विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने हे करावे, हे करू नये.
विद्युत सुरक्षा सप्ताह: १ ते ६ जून २०२५ विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, वीज अपघात टाळा.
#MSEDCL #safetyweek2025
MSEDCL Nashik retweeted
ऑनलाईन वीज बिल भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेतील दुसऱ्या लकी ड्राची बक्षिसे विजेत्या ग्राहकांना वितरीत करण्यात आली. ग्राहकांनी ऑनलाईन वीज बिल भरणा करीत योजनेचा लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे. तिसरा लकी ड्रा जून महिन्यात काढण्यात येईल.
MSEDCL Nashik retweeted
सायबर भामट्यांच्या बनावट नौकर भरती विरोधात महावितरणने केली तक्रार
मुंबई : सायबर भामट्यांनी महावितरणची बनावट वेबसाईट बनवून नौकर भरतीची जाहिरात केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केलेली असुन लोकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.
फसवणूक करण्याच्या उद्देश्याने सायबर भामट्यांनी mahavitaranmaharashtra.com ही बनावट वेबसाईट तयार करून यात शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व सफाई कामगार या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले असुन या विरोधात महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली असुन सायबर भामट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
MSEDCL Nashik retweeted
प्रशिक्षणाचा उपयोग महावितरण, ग्राहकांसाठी करा: अरविंद भादिकर, संचालक (संचालन तथा मानव संसाधन)
#MSEDCL
MSEDCL Nashik retweeted
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०
#renewableenergy
MSEDCL Nashik retweeted
मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेसाठी इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमच्या ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२५’ पुरस्कार सोहळ्यात देशातील सर्वाधिक कल्पक ऊर्जा प्रकल्प म्हणून डायमंड पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरविण्यात आले.अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी कार्यकारी संचालक(प्रकल्प) धनंजय औंढेकर उपस्थित होते.
#renewableenergy
MSEDCL Nashik retweeted
मुंबई येथे आयोजित पेमेंट सिक्युरिटी समिट व अवॉर्डमध्ये महावितरणला डिजिटल ट्रान्सफॉम्रेशन इन पेमेंट सिक्युरिटी करिता सन्मानित करण्यात आले. महावितरणच्या वतीने कार्यकारी संचालक स्वाती व्यवहारे व सहकाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला.




















