Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is the Planning and Development Authority for the Pune Metropolitan Region.

Pune, India
Joined May 2017
🌼✨ सत्याचा असत्यावर विजय… अधर्मावर धर्माचा विजय! ✨🌼 🪔 विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐 दसऱ्याचा हा सण आपल्या जीवनात सुख, समृद्धी, सकारात्मकता आणि नव्या संकल्पांची प्रेरणा घेऊन येवो. सत्य, सदाचार आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आपल्या स्वप्नांना यशाची नवी उंची मिळो, हीच सदिच्छा! 🌿🌟 आपट्याच्या पानांसोबत आनंद, प्रेम आणि समृद्धीची सोन्यासारखी नाती जपूया! #PMRDA #दसरा #विजयादशमी #दसऱ्याच्या_हार्दिक_शुभेच्छा #शुभदसरा
2
441
PMRDA retweeted
शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महानगरपालिकेच्या मुख्य भवनात मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील रस्ते विकासकामे तसेच रस्त्यांच्या कामांचा दर्जा व टिकाऊपणा सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस मा. पुणे जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) मा. आयुक्त डॉ. श्री. अभिजित चौधरी, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त(वि) श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. अपर पोलीस आयुक्त (पुणे) श्री. मनोज पाटील, पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच टाटा प्रोजेक्ट्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने बाणेर रोड व गणेशखिंड रोडवरील मेट्रो मार्ग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेल्या रस्ते विकासकामांचा, प्रलंबित कामांचा, वाहतूक व्यवस्थेचा तसेच रस्ते सुरक्षितता व कामांच्या गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #RoadDepartment #RoadRepair #RoadQuality #Meeting #PMCCare #PuneCity
28
2
6
29
6,317
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने विकसित करण्यात येत असलेल्या ६५ मीटर रुंदीच्या इनर रिंग रोड संदर्भात आज 'पीएमआरडीए'च्या आकुर्डी येथील मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मावळ तालुक्यातील साळुंब्रे, दारुंब्रे, गोडुंब्रे, परंदवाडी, धामणे आणि सांगवडे या सहा गावांतील सरपंच, विविध लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी मांडलेले आक्षेप आणि भावना विचारात घेऊन महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने खालील महत्त्वाचे निर्णय आणि स्पष्टीकरण दिले. 📌 १. विरोध असल्यास टीपी स्कीम लादली जाणार नाही! ज्या गावांतील ग्रामपंचायतींचे ठराव असतील आणि किमान ५० टक्के शेतकऱ्यांचा विरोध असेल, त्या गावांतील टीपी स्कीम रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल. 📌 २. सुधारित झोन दाखले दिले जातील! प्रादेशिक आराखड्यानुसार (RP) इनर रिंग रोडची रुंदी ६५ मीटर निश्चित करण्यात आली आहे. हा रस्ता मूळ ११० मीटरच्या अलाइनमेंटच्या मर्यादेतच बसविण्यात आल्यामुळे अतिरिक्त भूसंपादन टळले आहे. पीएमआरडीएच्या स्ट्रक्चरल प्लॅनमध्ये ६५ मीटर रुंदीच नमूद केली जाईल. हा प्लॅन अंतिम झाल्यानंतर सध्याच्या झोन दाखल्यांवरील ११० मीटरचा उल्लेख वगळून ६५ मीटर रुंदीचा उल्लेख असलेले सुधारित झोन दाखले दिले जातील. 📌 ३. जमिनींचा मोबदला रोखीने; संमती दिल्यास अधिक मोबदला! भूसंपादन प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जातील, त्यांना योग्य मूल्यांकनानुसार संपूर्ण मोबदला रोखीने (Cash Compensation) दिला जाईल. स्वेच्छेने संमती देणाऱ्या शेतकऱ्यांना नियमानुसार अतिरिक्त मोबदला देण्यात येईल. 📌 ४. परिसराचा सर्वांगीण विकास रिंग रोडलगतच्या क्षेत्राचे नियोजन 'स्ट्रक्चरल प्लॅन' आणि त्यानंतरच्या सविस्तर आराखड्याद्वारे ‘डेव्हलपमेंट झोन’ म्हणून केले जाईल. यामुळे भविष्यात नागरी व शहरी सुविधांचे योग्य नियोजन करणे शक्य होईल. या इनर रिंग रोडमुळे लगतच्या क्षेत्रातील विकासाला चालना मिळेल. ✨ या बैठकीस जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, से. नि. मुख्य अभियंता (प्रभारी) राजेंद्र रहाणे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले,उपायुक्त हिम्मत खराडे, सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, भूमी अभिलेख अधीक्षिका आशा जाधव, कार्यकारी अभियंता नंदकुमार कोरके, उपअभियंता अमित हासपे, यांच्यासह महसूल विभागाचे आणि पीएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते. #PMRDA #PuneNews #Maval #TPScheme #InnerRingRoad #FarmersFirst #MaharashtraNews #PuneInfrastructure
11
1,771
मुळे शेती वापर क्षेत्रात आता विकासाला मोठी चालना! शेती झोनमधील बांधकाम नियमांचे सुलभीकरण करण्यात आले असून, शेतकरी आणि जमीनमालकांना त्याचा थेट लाभ होणार आहे. 🚜 ✅ चटईक्षेत्र निर्देशांक (FSI): एकूण १.० FSI अनुज्ञेय (०.२ बेसिक FSI + ०.८ प्रीमियम FSI + अँसिलरी FSI) 🏡 शेतीघरास परवानगी: शेतकऱ्यांना देखील स्वतःच्या शेतामध्ये ४०० चौ. मी. पर्यंतचे शेतघर बांधण्यासाठी परवानगी मिळणार. 🏨 हॉटेल / मॉटेल / रिसॉर्ट: व्यवसाय उभारणीसाठी आता किमान १ हेक्टर जागेची आवश्यकता नाही; छोट्या जागेतही व्यवसायाला परवानगी. 🗺️ खाजगी नगररचना योजना (Private TP Scheme) – Voluntary: शेती विभागामध्ये आता स्वेच्छेने नगररचना योजना राबवता येणार. #PMRDA #Agriculture #UDCPR #शेतीझोन #FSI
1
862
📍 PIECC, मोशी, पुणे 🌐 उद्योग, नवकल्पना आणि संधींचे जागतिक व्यासपीठ – PIECC मोशी! उद्योजकांचे विचार, नागरिकांचे अनुभव आणि उद्योगविश्वातील नव्या संधी यांचा संगम म्हणजे पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी! 🤝 🌟 मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’ च्या माध्यमातून मराठी उद्योजकता, व्यवसायवृद्धी आणि व्यावसायिक नेटवर्किंगला नवी चालना मिळत आहे. 🗓️ दिनांक: १५ ते १८ ऑक्टोबर २०२६ 🕙 वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत 📍 ठिकाण: पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC), मोशी, पुणे 🎤 या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि अनुभवांतून PIECC हे उद्योग, व्यापार आणि नव्या संधींना जोडणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे अधोरेखित होत आहे. ✨ जागतिक दर्जाचे प्रदर्शन केंद्र, उद्योजकतेला नवी दिशा आणि पुण्याच्या विकासाला नवी गती! #PMRDA #PIECC #GlobalMarathaBusinessExpo2026 #PuneMetropolis #PuneDevelopment
5
831
औद्योगिक क्रांतीचे नवे प्रवेशद्वार – PIECC मोशी! उद्योग, नवकल्पना, रोजगार आणि व्यावसायिक संधींना जागतिक स्तरावर एकत्र आणणारे पुण्याचे प्रमुख प्रदर्शन केंद्र म्हणजे पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC). व्यवसाय, नेटवर्किंग आणि उद्योग संवादासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. 🤝 🌐 मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था आयोजित 'ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६' येथे होत आहे. 🗓️ दिनांक : १५ ते १८ ऑक्टोबर २०२६
🕙 वेळ : सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत
📍 ठिकाण : PIECC, मोशी, पुणे ✨ जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांसाठी, जागतिक दर्जाचे प्रदर्शन केंद्र! आपण सर्वांनी अवश्य भेट द्यावी. 🙏 #PMRDA #पुणेमहानगरप्रदेशविकासप्राधिकरण #PIECC #मोशी #GlobalMarathaBusinessExpo2026 #पुणे #उद्योग #नवकल्पना
5
729
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) क्षेत्रातील अग्निशमन केंद्रांची सद्यस्थिती आणि कामांचा आढावा महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत पीएमआरडीए क्षेत्रातील आपत्कालीन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला. या बैठकीस महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, भूमिअभिलेख अधीक्षिका आशा जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी (प्र.) वैभव तांडेल, अधीक्षक अभियंता (प्रभारी) अभिमान भोसले, उपअभियंता शंकर कोळेकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. पीएमआरडीए क्षेत्रात अग्निशमन सेवांचा विस्तार करण्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण १० अग्निशमन केंद्रे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी किमान चार अत्याधुनिक अग्निशमन केंद्रे पुढीलप्रमाणे प्रस्तावित आहेत. 🔹 खेड तालुका : या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक इमारती असल्याने येथे किमान एक अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे. 🔹 शिरूर तालुका : पुणे–नगर रस्त्यालगत वाढत असलेल्या औद्योगिक इमारतींचा विचार करून या तालुक्यात एक अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे. 🔹 मावळ तालुका : वाढते नागरीकरण तसेच औद्योगिक व निवासी इमारतींचा विस्तार लक्षात घेऊन या तालुक्यात एक अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे. 🔹 हवेली तालुका : पुणे–सोलापूर रस्त्यालगतच्या गावांचा वाढता विस्तार लक्षात घेता या परिसरात एक अग्निशमन केंद्र प्रस्तावित आहे. 🚒 वाढते नागरीकरण आणि औद्योगिकीकरण लक्षात घेता, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे! #PMRDA #PuneNews #FireDepartment #PMRDAFireStations #Development #SafetyFirst #MaharashtraUpdates
1
2
819
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे 🌸 ‘स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा स्वार्थ नसून कुटुंबाच्या सक्षमतेची गरज!’ — बागेश्री मंथाळकर 💐 केंद्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत पीएमआरडीए मुख्यालयात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. 👩‍⚕️ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या, एमएनजीएलच्या स्वतंत्र महिला संचालक व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बागेश्री मिलिंद मंथाळकर यांनी महिलांना संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून दिले. इतरांची काळजी घेताना महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, तसेच निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करावा, असा संदेश या संवाद सत्रातून देण्यात आला. या कार्यक्रमास 'पीएमआरडीए'च्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे आणि उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासन विभागाच्या अधीक्षिका विशाखा चिंतल यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभारही मानले. या संवाद सत्रास पीएमआरडीएतील महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. #PMRDA #SevaSankalpAbhiyan2026 #WomensHealth #WomenEmpowerment #HealthyLifestyle
2
523
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे भारताचे माजी राष्ट्रपती, ‘मिसाईल मॅन’ आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त (वाचन प्रेरणा दिन) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्यालयात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 🔹 याप्रसंगी मार्गदर्शन करताना पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी (भा.प्र.से.) यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. “मुलांच्या हातात ‘विंग्ज ऑफ फायर’ हे पुस्तक द्या आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहायला सांगा; हीच डॉ. कलाम यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आवाहन त्यांनी केले. रामेश्वरम येथील सामान्य कुटुंबातून सुरू झालेला प्रवास, वृत्तपत्रे विकण्यापासून ते इस्रो, डीआरडीओ आणि राष्ट्रपती भवनापर्यंतचा टप्पा... अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास न सोडणारा डॉ. कलाम यांचा जीवनप्रवास प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन के. मंजुलक्ष्मी यांनी केले. 🔹 या सोहळ्यास सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, अधीक्षक अभियंता अनिल सगर, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, भूमिअभिलेख अधीक्षिका आशा जाधव, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, उपअभियंता डी. एम. चौरे आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांच्यासह पीएमआरडीएचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #PMRDA #APJAbdulKalam #APJAbdulKalamJayanti #WakingUpToDreams #WingsOfFire #Inspiration #PMRDAPune #Akurdi #ISRO #Education #PuneNews #ReadingInspirationDay #वाचनप्रेरणादिन
2
587
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे 🌸 महिलांचे आरोग्य, स्वच्छता आणि सक्षमीकरणासाठी पीएमआरडीएचा पुढाकार! पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केंद्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या, एमएनजीएलच्या स्वतंत्र महिला संचालक व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती बागेश्री मिलिंद मंथाळकर यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. 📌 संवाद सत्रातील प्रमुख मुद्दे : 🔸पोषण आणि आहार : सध्या ७५ टक्के महिला व तरुणींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण १२ पेक्षा कमी आढळते. व्हिटॅमिन बी१२, बी३ व ओमेगा यांसारख्या पोषक घटकांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी जंक फूड टाळून जवस, तीळ, कारळे, शेवग्याचा पाला, कोशिंबीर व सॅलड यांसारख्या पारंपरिक अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा. 🔸झोप व पाणी : दिवसभरात पुरेसे पाणी पिणे तसेच मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरापासून दूर राहून किमान ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. 🔸मानसिक व शारीरिक स्वास्थ्य : तणाव न बाळगता आपल्या भावनांना मोकळी वाट करून द्यावी. स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःची काळजी घेणे हा स्वार्थ नसून घर व कुटुंब सक्षम ठेवण्याची ती पहिली अट आहे. 🔸वार्षिक आरोग्य तपासणी : ‘Prevention is better than cure’ हे तत्त्व जोपासत प्रत्येक महिलेने दरवर्षी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण आरोग्य तपासणी (Full Body Check-up) करून घ्यावी. या कार्यक्रमास पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे आणि उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार प्रशासन विभागाच्या अधीक्षिका विशाखा चिंतल यांनी मानले. या संवाद सत्राला पीएमआरडीएच्या महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ✨ सुदृढ महिला, सक्षम कुटुंब आणि निरोगी समाज! #PMRDA #SewaSankalpAbhiyan2026 #WomensHealth #WomenEmpowerment #HealthAndHygiene #BageshreeManthalkar #PuneNews #HealthyLiving #WomenCare
2
972
मतदार यादी नोंदणी आणि दुरुस्तीला मुदतवाढ! मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी (SIR) दावे आणि हरकती नोंदवण्याची अंतिम मुदत आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आजच प्रारूप मतदार यादीत तुमचे नाव तपासा आणि आवश्यक असल्यास दुरुस्तीसाठी २६ ऑक्टोबरपूर्वी अर्ज करा. #SIR #26October #Deadline #VoterList #ECI
1
3
1,995
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि उद्योजकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 'पीएमआरडीए'च्यावतीने लवकरच विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यान्वित केले जाणार आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली 'पीएमआरडीए'च्या आकुर्डी येथील मुख्यालयात विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी, तसेच चाकण, हिंजवडी, रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट व इतर औद्योगिक परिसरांतील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 📌 बैठकीतील प्रमुख निर्णय व ठळक मुद्दे : 🔹 १०० टक्के ऑनलाइन बीपीएमएस प्रणाली : औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक पारदर्शक आणि गतिमान व्हावी, यासाठी सर्व प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन बीपीएमएस (BPMS) प्रणालीद्वारेच राबविण्यात येईल. 🔹 उद्योजक व वास्तुविशारदांना तातडीने मदत : बीपीएमएस (BPMS) प्रक्रियेदरम्यान उद्योजक आणि वास्तुविशारदांना (Architects) येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी आणि बीपीएमएस प्रतिनिधी यांच्या समन्वयातून ‘फॅसिलिटेशन सेंटर’ कार्यरत राहील. 🔹 माहितीची सुलभ उपलब्धता : परवानगीसाठी आवश्यक असलेल्या शुल्काचा (Fees) सविस्तर तपशील, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि झोनिंग ओपिनियन यासंबंधीची माहिती औद्योगिक संघटनांना सहज उपलब्ध करून दिली जाईल. 🔹 रस्त्यांची दुरुस्ती व वाहतूक कोंडीवर उपाय : औद्योगिक क्षेत्रांतील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेची दखल घेऊन प्राधान्याने दुरुस्ती करावयाच्या रस्त्यांची यादी औद्योगिक संघटनांकडून मागविण्यात आली आहे. 🔹 ‘ट्रक टर्मिनस’ व अग्निशमन केंद्र : परिसरातील अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी ‘ट्रक टर्मिनस’ उभारणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी नवीन अग्निशमन केंद्र (Fire Station) उभारण्याकरिता जागा निश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश महानगर आयुक्तांनी दिले आहेत. 'पीएमआरडीए'च्या हद्दीतील उद्योगांना पोषक, सुरक्षित आणि सुलभ वातावरण उपलब्ध करून देणे, तसेच परवानगी प्रक्रिया अधिक सुटसुटीत व पारदर्शक करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे पुणे औद्योगिक परिसराला गती मिळण्यास मदत होणार आहे. #PMRDA #PuneIndustry #PuneNews #FacilitationCenter #ChakanMIDC
1
1
13
1,155
📍केसनंद फाटा, वाघोली वाघोली येथे मोबाईल टॉवरवर चढलेल्या तरुणाला PMRDA वाघोली अग्निशमन दलाकडून सुखरूप खाली उतरवले. वाघोली, दि. 12/10/2026 (सायं. 17:50 वा.) - केसनंद फाटा, वाघोली येथे एका अज्ञात व्यक्तीने मोबाईल टॉवरवर चढला असल्याची वर्दी वाघोली पोलीस स्टेशनचे बिट मार्शल गोरे यांच्याकडून PMRDA वाघोली अग्निशमन केंद्रास प्राप्त झाली. वर्दी प्राप्त होताच वाघोली अग्निशमन केंद्राचे अग्निशमन वाहन व प्रशिक्षित कर्मचारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर वाघोली अग्निशमन दलाचे जवान साईनाथ मोरे (फायरमन), सागर जानकर (PDRF जवान) आणि श्राजेंद्र फुंदे (PDRF जवान) यांनी रेस्क्यू हार्नेस परिधान करून अतिशय शिताफीने मोबाईल टॉवरवर चढाई केली. जवानांनी टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचे समुपदेशन करून त्याचे मन परिवर्तन घडवून आणले व त्याला सुखरूपरित्या खाली उतरवले. सदर व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी सुमारे 3 ते 3.5 तासांचा कालावधी लागला. सदरचे धाडसी बचाव कार्य पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) मुख्य अग्निशमन अधिकारी व्ही. व्ही. तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. PDRF संपर्क क्रमांक: 9545282930 #PMRDA #PDRF #RescueOperation #FireSafety #Pune
1
1,147
📍 पीएमआरडीए मुख्यालय, आकुर्डी, पुणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वतीने चाकण व हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अभियांत्रिकी, जमीन व मालमत्ता, विकास परवानगी आणि नियोजन विभागांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यादेखील उपस्थित होत्या. 🔹 चाकणमधील बहुतांश रस्त्यांची कामे सध्या प्रगतिपथावर असून, ती आगामी डिसेंबरअखेर पूर्ण होतील, अशी माहिती अभियांत्रिकी विभागाने बैठकीत दिली. तसेच, हिंजवडी परिसरातील रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती व प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून रस्त्यांची कामे कोणत्याही अडथळ्यांशिवाय निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश महानगर आयुक्तांनी दिले. 🔹 ज्या ठिकाणी अतिक्रमणे आणि भूसंपादनासंदर्भातील अडथळे आहेत, ते तातडीने चर्चा व समन्वयाच्या माध्यमातून दूर करावेत. आवश्यकतेनुसार पोलिस बंदोबस्ताची मदत घ्यावी, असे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले. प्रशासकीय दिरंगाई टाळून रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या. 🛣️ या बैठकीस विकास परवानगी विभागाच्या उपसंचालक स्मिता कलकुटकी, सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, सहमहानगर नियोजनकार श्वेता पाटील, जमीन व मालमत्ता विभागाचे उपायुक्त हिम्मत खराडे, भूमिअभिलेख विभागाच्या अधीक्षिका आशा जाधव, अधीक्षक अभियंता (प्रभारी) नंदकुमार कोरके, कार्यकारी अभियंता शिवकुमार कुपल, कार्यकारी अभियंता वसंत नाईक, उपअभियंता अमित तिडके, जितेंद्र पगार व नंदकुमार खोत यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #PMRDA #PCMC #RoadDevelopment #Chakan #Hinjawadi #UrbanDevelopment #Infrastructure #PuneNews
2
3
1,608
🚨🏢 आपली इमारत, आपली जबाबदारी! अग्निसुरक्षेला प्राधान्य द्या! 🧯🔥 आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षिततेसाठी इमारतीतील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत आणि सुस्थितीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित तपासणी करा, अग्निसुरक्षा नियमांचे पालन करा आणि आपत्तीच्या वेळी सतर्क राहा. 🚒 आपत्कालीन मदतीसाठी पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या PDRF हेल्पलाइन ९५४५२८२९३० या क्रमांकावर संपर्क साधा. अग्निसुरक्षेची सुनिश्चिती, आपली जबाबदारी! #PMRDA #FireSafety #PDRF #अग्निसुरक्षा #सुरक्षितपुणेमहानगर
2
887
आदिशक्ती आई भवानीच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. नवरात्रीचा हा मंगलमय उत्सव प्रत्येकाच्या मनात नवचैतन्य, सकारात्मक ऊर्जा आणि भक्तिभाव निर्माण करो, हीच सदिच्छा! 🙏🌼 ✨ शक्तीचा जागर, भक्तीचा उत्सव आणि नवचैतन्याचा संकल्प! 🌺🚩 आपणा सर्वांना घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🚩 #PMRDA #घटस्थापना #शारदीयनवरात्रोत्सव #नवरात्रीच्या_शुभेच्छा #Navratri2026 #Pune
1
523
🛣️ पुणे इनर रिंग रोडसाठी जमीन मोजणीचा मार्ग मोकळा! शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील सकारात्मक संवादातून पुणे इनर रिंग रोड प्रकल्पाला गती मिळत आहे. भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि सर्वांच्या सहकार्याने विकासाचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. 🤝 संवादातून विश्वास, सहकार्यातून विकास! #PMRDA #PuneInnerRingRoad #पुणेइनररिंगरोड #शेतकरी_संवाद #भूसंपादन
13
1,249