KMC Kolhapur (@KolhapurKmc) header
KMC Kolhapur (@KolhapurKmc) profile picture

Govt Organization

Kolhapur, India
Joined September 2020
Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)Photo by KMC Kolhapur (@KolhapurKmc)
कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे स्वनिधीतील ५% राखीव निधीतून दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत सहाय्यक आयुक्त मा. स्वाती दुधाने यांनी दिलेल्या माहितीनुसार: ​• दिव्यांग बांधवांच्या खात्यात ₹१ कोटी ६५ लाखांहून अधिक निधी वर्ग • कुष्ठरोगी बांधव, दिव्यांग खेळाडू व वारसांना आर्थिक साहाय्य • आतापर्यंत एकत्रित सुमारे ₹२ कोटी ३४ लाख रुपयांचे अनुदान वितरित • नव्याने नोंदणी झालेल्या १५३ दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान देण्याची कार्यवाही प्रगतिपथावर ​शहरातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक न्याय हेच आमचे मुख्य उद्दिष्ट! ​#KMCKolhapur #SocialWelfare #PublicService #SocialJustice #kolhapur
2
94
यंदाची दिवाळी साजरी करूया अधिक सुंदर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने! कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, सणासुदीच्या काळात प्लास्टिक साहित्याचा वापर पूर्णपणे टाळून आपल्या परिसराचे रक्षण करूया. आपल्या सणाची सजावट करताना या सोप्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा: 🔸 घराच्या सजावटीसाठी झेंडूची ताजी फुले, आंब्याची पाने आणि पारंपरिक मातीच्या पणत्यांचा वापर करा. 🔸 प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी कलाकुसरीचे आकाशकंदील निवडा. 🔸 रांगोळीसाठी रासायनिक रंगांऐवजी फुलांच्या पाकळ्या व नैसर्गिक रंगांचा वापर करा. 🔸 सणासुदीच्या खरेदीसाठी जाताना सोबत हक्काची कापडी पिशवी नक्की ठेवा. "प्लास्टिकला नाही म्हणा, पर्यावरणाला हो म्हणा!" 🌱 आपल्या शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करा. अधिक माहिती व नागरी सेवांसाठी डाउनलोड करा 'MYKMC' ॲप किंवा संपर्क साधा टोल फ्री क्रमांक: १८०० २३३ १९१३. — कोल्हापूर महानगरपालिका #KMCKolhapur #EcoFriendlyDiwali #Diwali2026 #MajhiVasundhara #SayNoToPlastic
64
कोल्हापूरकर नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! 📢🏛️ कोल्हापूर महानगरपालिकेचा मिळकत कर भरणे आता झाले आहे अधिक सोपे आणि सोयीस्कर. आता रांगेत उभे न राहता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून भरा मिळकत कर! 📲 कर भरण्याच्या सोप्या पायऱ्या: १) प्ले स्टोअरवरून 'My KMC' ॲप डाऊनलोड करून लॉग इन करा. २) होम स्क्रीनवरील 'नागरी सेवा' या पर्यायावर जाऊन 'मिळकत कर' निवडा. ३) आपला मिळकत क्रमांक प्रविष्ट करा आणि 'शोधा' बटनावर क्लिक करा. ४) कराची रक्कम तपासून 'बिल भरा' पर्यायावर क्लिक करा. ५) UPI, नेट बँकिंग किंवा कार्डद्वारे सुरक्षित पेमेंट पूर्ण करा. आजच 'माय केएमसी' ॲप वापरा आणि आपल्या शहराच्या विकासात आपले योगदान द्या. — कोल्हापूर महानगरपालिका #KMCKolhapur #MyKMCApp #PropertyTax #KolhapurNews #DigitalKolhapur
77
यंदा सरासरीच्या केवळ ५०% पाऊस झाल्यामुळे भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे अत्यंत गरजेचे आहे. ‘Precaution is better than cure’ या तत्त्वावर चालत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन पाणी गळती रोखण्यासाठी आणि योग्य नियोजनासाठी कटिबद्ध आहेच; पण यामध्ये प्रत्येक कोल्हापूरकराचे सहकार्य तितकेच मोलाचे आहे. पाणी बचतीसाठी छोटी पावले, मोठा बदल: पाइप लावून गाड्या धुणे टाळा; बादली व कापडाचा वापर करा. बागेसाठी पाइपऐवजी बादलीचा वापर करा अथवा पुनर्वापर केलेले पाणी वापरा. घरातील नळ गळती त्वरित दुरुस्त करा आणि पाण्याचा पुनर्वापर करा. चला, करवीरकर म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊया आणि प्रतिज्ञा करूया:"मी पाणी वाया घालवणार नाही आणि कोणालाही वाया घालवू देणार नाही!" #KMCKolhapur #SaveWater #JalSanvardhan #WaterConservation #Kolhapur
74
नागरिकांच्या अडीअडचणी थेट ऐकून त्यांचे जलद गतीने निराकरण करण्यासाठी मनपातर्फे आयोजित 'जनता दरबारास' नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या या दरबारात नगररचना, अतिक्रमण, पाणीपुरवठा, उद्यान व विविध विभागांशी संबंधित १९ अर्ज प्राप्त झाले. महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी सर्व तक्रारींवर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. यावेळी सर्व प्रमुख अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. #JanataDarbar #KMCKolhapur #PublicGrievances #CivicAdministration #PeopleFirst
79
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील लेबर रूमचे (प्रसूतीगृह) निर्जंतुकीकरणाचे (Sanitization) महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची सुरक्षा आणि योग्य ती खबरदारी म्हणून हे प्रसूतीगृह शनिवार, दि. ७ ते सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ३ दिवस बंद राहणार आहे. मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी स्वॅबचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर लेबर रूमचे नियमित कामकाज पूर्ववत सुरू करण्यात येईल. या ३ दिवसांच्या कालावधीत संबंधित गर्भवती महिला व रुग्णांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी महापालिकेच्या पंचगंगा रुग्णालय तसेच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) येथे जाऊन वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. सर्व संबंधित नागरिकांनी व रुग्णांच्या नातेवाईकांनी याची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, ही विनंती! #KMCKolhapur #SavitribaiPhuleHospital #LaborRoom #HealthDepartment #Kolhapur
1
1
82
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला विशेष 'जनता दरबार' आयोजित करण्यात येतो. आज महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार संपन्न झाला, ज्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या अडीअडचणी मांडल्या. आजच्या जनता दरबारात विविध नागरिकांकडून एकूण १९ अर्ज प्राप्त झाले असून, संबंधित विभागांनुसार अर्जांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे: नगररचना विभाग: ४ अर्ज, अतिक्रमण विभाग: ४ अर्ज, विभागीय कार्यालय क्र. १: २ अर्ज, उद्यान विभाग: २ अर्ज, मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालय: २ अर्ज, इतर विभाग (विभागीय का. २ व ४, पाणीपुरवठा, इस्टेट आणि पेन्शन विभाग): प्रत्येकी १ अर्ज महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी प्रत्येक नागरिकाची समस्या अत्यंत आस्थेने ऐकून घेतली. तसेच संबंधित खात्याच्या प्रमुख अधिकाऱ्यांना ताраडीने पाचारण करून प्राप्त तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे आणि केलेल्या कार्यवाहीचा योग्य तो पाठपुरावा करण्याचे सक्त निर्देश दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, आरोग्य विशेष समिती उपसभापती वैभव माने, नगरसेवक विजयसिंह देसाई, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता जयेश जाधव, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, नगरसचिव दिवाकर कारंडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिषे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या प्रश्नांना थेट वाचा फोडणारा हा उपसंच लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण ठरत आहे! #KMCKolhapur #JanataDarbar #MayorRuparaniNikam #CitizenServices #Kolhapur
101
दिवाळी सणानिमित्त सर्व शहरवासीयांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी शहरातील फेरीवाले, केबिनधारक व स्टॉल्सवरील कारवाई १२ नोव्हेंबरपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ​सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेत फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच १२ नोव्हेंबरनंतर अनधिकृत अतिक्रमणांवर पुन्हा धडक मोहीम सुरू करण्यात येईल. ​ज्या फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी झालेली आहे, त्यांचे महापालिकेकडून योग्य व्यवस्थापन करण्यात येईल. अद्याप नोंदणी बाकी असलेल्या सर्व फेरीवाल्यांनी आपली बायोमेट्रिक नोंदणी तातडीने पूर्ण करावी, १३ नोव्हेंबरनंतर कोणतीही सवलत दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी. #DiwaliFestival #PublicNotice #StreetVendors #BiometricRegistration #kolhapur
1
94
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व पात्र फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची सूचना! कागदपत्रे तपासणी पूर्ण झालेल्या ३,०७९ पात्र फेरीवाल्यांची यादी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर व वॉर्ड ऑफिस १ ते ४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या फेरीवाल्यांची नावे या यादीत आली आहेत, त्यांनी लवकरात लवकर ₹१,००० नोंदणी शुल्क (Registration Fee) नजीकच्या वॉर्डमधील CFC केंद्रात भरून आपले QR कोड ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. येत्या दोन दिवसांत शुल्क न भरल्यास महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाऊ शकते, याची नोंद घ्यावी. अधिकृत ओळखपत्र मिळवून महानगरपालिकेच्या मोहिमेस सहकार्य करावे, ही नम्र विनंती! ##KMCKolhapur #KolhapurHawkers #Kolhapur #StreetVendors
86
मनपा क्रीडा समितीची पहिली सर्वसाधारण सभा सभापती विजयसिंह खाडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शहरात स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यासोबतच महापालिका शाळांतील खेळाडूंसाठी 'मिशन ऑलिम्पिक' उपक्रम राबवून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तसेच प्रभाग २० मध्ये भव्य फुटबॉल स्टेडियम, अंबाई टँक जलतरण तलाव पूर्ववत सुरू करणे आणि क्रीडा क्षेत्रासाठी ५% निधीची तरतूद करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. ​#SportsPolicy #MissionOlympic #KMCKolhapur #FootballStadium #SwimmingPool
65
मुलांच्या आरोग्यासाठी व शारीरिक विकासासाठी मनपाच्या आरोग्य विभागामार्फत जरगनगर व नेहरूनगर विद्यामंदिरात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६ अंतर्गत जनजागृती करण्यात आली. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, महिला व बालकल्याण सभापती सौ. कौसर बागवान, आरोग्य सभापती सौ. सुरेखा ओटावकर, शिक्षण सभापती सौ. शीला सोनुले व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळी सेवनासाठी प्रवृत्त करून या मोहिमेत सक्रिय सहकार्य करावे. ​#NationalDewormingDay #KMCKolhapur #ChildHealth #HealthCampaign
70
नाट्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता कोल्हापूरचे ऐतिहासिक 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह' बुक करणे झाले आहे आणखी सोपे! 🎭✨ कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे तुम्ही आता घरबसल्या काही मिनिटांतच तुमच्या कार्यक्रमासाठी नाट्यगृहाचे ऑनलाइन बुकिंग करू शकता. 🌐 अधिकृत वेबसाइट: web.kolhapurcorporation.gov.… आजच भेट द्या आणि आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सहज आणि सोयीस्कररीत्या स्लॉट बुक करा! #KMCKolhapur #Kolhapur #KeshavraoBhosaleNatyagruha #OnlineBooking #केशवरावभोसलेनाट्यगृह
1
1
78
कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात क्रीडा समितीची पहिली सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात पार पडली. क्रीडा समितीचे सभापती विजयसिंह खाडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहरातील क्रीडा सुविधांचा विकास, स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याबाबत अनेक दूरगामी व ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या धर्तीवर महापालिकेचे स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्यात येणार असून यासाठी आवश्यक पदे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपा शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना ऑलिम्पिक स्पर्धांच्या तयारीसाठी विशेष प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती देण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग क्र. २० मधील ५ एकर जागेवर भव्य फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. तसेच अनेक दिवसांपासून बंद असलेला अंबाई टँक जलतरण तलाव आगामी उन्हाळ्यापूर्वी डीपीडीसीच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. दुधाळी मैदानावरील मनपाच्या शूटिंग रेंजचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी निधीचा पाठपुरावा केला जाईल. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धांसह 'महापौर चषक' स्पर्धा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील क्रीडा क्षेत्रासाठी मंजूर असलेली ५ टक्के तरतूद प्रत्यक्ष क्रीडा विकासासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या सभेस क्रीडा उपसभापती रोहित कवाळे, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, मुख्य लेखापरीक्षक कलावती मिसाळ, नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्यासह समितीचे सदस्य अश्किन आजरेकर, विजयसिंह देसाई, प्रमोद देसाई, ऋतूराज क्षीरसागर, सचिन शेंडे, प्रशांत खेडकर, पुष्पा नरुटे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरच्या क्रीडा संस्कृतीला आणि होतकरू खेळाडूंना नवी दिशा देणारा हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे! #KMCKolhapur #SportsPolicy #MissionOlympic #FootballStadium #Kolhapur
94
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण समिती, आरोग्य समिती आणि प्राथमिक शिक्षण मंडळ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय जंतनाशक मोहीम २०२६' अंतर्गत आज जरगनगर येथील श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर आणि नेहरूनगर विद्यामंदिर येथे विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला. आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी मार्गदर्शन करताना, १ ते १९ वर्षांखालील बालकांनी जंतनाशक गोळी घेतल्याने शरीरातील कृमींचा प्रादुर्भाव कमी होऊन मुलांची शारीरिक वाढ, पोषण आणि बौद्धिक विकास उत्तम होण्यास मदत होते, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमास महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, आरोग्य समिती सभापती सौ. सुरेखा ओटावकर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती सौ. शीला सोनुले, उपसभापती सौ. पूजा पवार, स्थानिक नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, नगरसेविका सौ. रेखा उगवे, सौ. माधुरी व्हटकर, डॉ. सुषमा जरग आणि ॲड. मानसी लोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरसेविका डॉ. सुषमा जरग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोबाईलचा अतिवापर टाळून मैदानी खेळ आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचा मोलाचा सल्ला दिला. प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पिता खैरमोडे, मुख्याध्यापक, शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जंतनाशक गोळी सेवनासाठी प्रोत्साहित करून मनपालिकेच्या या उपक्रमास पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. ​आपल्या मुलांचे आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य यासाठी प्रशासनाला साथ द्या! ​#KMCKolhapur #NationalDewormingDay #ChildHealth #DrPrakashPavara #Kolhapur
66
कोल्हापूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आज प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून झंझावाती काम केले आहे. महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व थेट उपस्थितीत आज सकाळी ७ ते २ या वेळेत शहरातील प्रमुख मार्गांवर व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. खानविलकर पेट्रोल पंप, १०० फुटी रोड, विन्स हॉस्पिटल परिसर, महावीर गार्डन परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आणि नागाळा पार्क मुख्य रस्ता. या मोहिमेदरम्यान तब्बल २० टन खरमाती, तणकट, झाडांचे कटिंग, प्लॅस्टिक कचरा आणि डिव्‍हायडरची स्वच्छता करून संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला. स्वच्छता कामाला वेग देण्यासाठी २ आयवा डंपर, २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबीचा प्रभावी वापर करण्यात आला. महापौर सौ. रूपाराणी निकम यांच्यासह सहायक आयुक्त डॉ. विजय पाटील, नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, उपशहर अभियंता अरुणकुमार गवळी, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांडरे, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, आरोग्य निरीक्षक प्रकाश लोंढे, आनंदा बावडेकर, छ. ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय क्र. ४ मधील पवडी विभागाचे ७० कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. ​आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला असेच सतत सहकार्य करावे, हीच अपेक्षा! 🚩 ​#KMCKolhapur #SwachhBharat #CityCleanliness #Kolhapur #SwachhKolhapur
1
3
180
कोल्हापूर शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी खानविलकर पेट्रोल पंप, १०० फुटी रोड, विन्स हॉस्पिटल, महावीर गार्डन, जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागाळा पार्क परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत तब्बल २० टन खरमाती, प्लॅस्टिक, तणकट व कचरा गोळा करण्यात आला. आयवा डंपर, ट्रॅक्टर व जेसीबीच्या सहाय्याने झालेली ही मोहिम यशस्वी करण्यासाठी मनपाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. #CleanKolhapur #MajheShaharMajhiJababdari #KMCKolhapur #SmartKolhapur #Kolhapur
80
कोल्हापूरच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचे जतन, संवर्धन आणि प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने अत्यंत महत्त्वपूर्ण व ठोस उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दरम्यान, रंकाळा संवर्धन संरक्षण समितीच्या वतीने उद्या नियोजित असणारे 'रास्ता रोको' आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे. देवकर पाणंद येथील श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाणी दुधाळी एसटीपी केंद्राकडे वळविण्यात आले असून वाहिनीतील अडथळे दूर करण्यात आले आहेत. परताळा क्षेत्रातील दूषित पाणीही पूर्णपणे वळविण्यात आले असून देखरेखीसाठी पूर्णवेळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. केंद्र शासनाच्या 'अमृत २.०' अभियान अंतर्गत रंकाळा पुनरुज्जीवनासाठी ११ कोटी ९९ लाख रुपयांच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये गाझियाबाद येथील अत्याधुनिक 'काऊनॉमिक्स' (Cowonomics) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संध्यामठ व परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, नवीन पदपथ, सुरक्षा भिंत दुरुस्ती, लँडस्केपिंग आणि गार्डनिंगची कामे हाती घेण्यात आली आहेत. उपआयुक्त नागेंद्र मुतकेकर, जल अभियंता जयेश जाधव यांच्यासह अधिकारी-अभ्यांतरांच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करून समितीच्या प्रतिनिधींना सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती दिली आहे. रंकाळ्याचे सौंदर्य आणि पर्यावरण टिकवण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून नागरिकांनी व संघटनांनी प्रशासनाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती! #KMCKolhapur #LakeRejuvenation #DrRajendraBharud #Kolhapur #RankalaConservation
1
1
102
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय जमिनीवरील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमण नियमित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी! ​महाराष्ट्र शासनाच्या २५ मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत विविध भागांत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याच क्रमाने उद्या दिनांक ३ नोव्हेंबर २०२६ रोजी 'सचिव वसाहत' येथे शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण नियमित करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ​तरी संबंधित सर्व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा व शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. ​#KMCKolhapur #KolhapurNews #CitizenNotice #MaharashtraGovt #Kolhapur
1
114
कोल्हापूर शहरात कसबा बावडा येथील 'झूम' कचरा प्रकल्पाच्या परिसरात अचानक लागलेली आग महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त व अतिशय तत्पर प्रयत्नांमुळे पूर्णपणे विझवण्यात आली आहे. नागरिकांच्या आरोग्याचे आणि सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून सर्वतोपरी खबरदारी घेत तातडीने योग्य त्या उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. घटनेची गंभीर दखल घेत परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि तातडीने योग्य तो उपाय काढण्यासाठी खालील मान्यवरांनी जातीने भेट देऊन पाहणी केली व आवश्यक त्या सूचना दिल्या, यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, माजी महापौर सौ. स्वाती येवलुजे, नगरसेवक सचिन चौगुले, ॲड. नीलेश नरुटे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे उपस्तित होते. प्रशासनाच्या आणि अग्निशमन दलाच्या धाडसी व वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. #KMCKolhapur #ZoomProject #FireDepartment #DrRajendraBharud #Kolhapur
81
कोल्हापूर शहरातील रस्ते व पदपथांवरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत धडक कारवाई यापुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार आहे. दिवाळीपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई होणार नाही या गैरसमजुतीतून ज्यांनी पुन्हा अतिक्रमणे थाटली आहेत, त्यांना प्रशासनाकडून सक्त ताकीद देण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी हटविलेली अतिक्रमणे पुन्हा बळकावणाऱ्यांनी तात्काळ हातगाड्या व स्टॉल काढून घ्यावेत. अनधिकृतपणे अतिक्रमण केल्यास साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाईल. अधिकृत फेरीवाल्यांनी व्यवसाय करताना रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, पादचारी व वाहनधारकांच्या रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी आणि कमीत कमी जागेत व्यवसाय करावा. ज्या फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण झाली आहे, त्यांनी महापालिकेची निर्धारित फी भरून लवकरात लवकर क्युआर कोड व प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व फेरीवाल्यांनी व व्यावसायिकांनी महानगरपालिकेला पूर्ण सहकार्य करावे, ही नम्र विनंती! #KMCKolhapur #AntiEncroachment #TrafficManagement #DrRajendraBharud #Kolhapur
81