
Official Twitter account of District Information Office, #WARDHA,
WARDHA, MAHARASHTRA
Joined July 2016
- Tweets8K
- Following65
- Followers8.4K
- Likes540
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
सध्याची दुष्काळी स्थिती पाहता विशेष बाब म्हणून जिथे गरज आहे तिथे झाडे जगविण्यासाठी केवळ शेतीकामाकरीता विंधन विहिरींवरील बंदी येत्या १५ डिसेंबरपर्यंत उठविण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे मुख्यमंत्र्यांनी विविध ग्रामपंचायत सरपंचांशी संवाद साधला.
या परिसरात मोठ्या प्रमाणात पशुधन आहे, मात्र पशू दवाखाने नाही, अशी व्यथा अनेक प्रतिनिधींनी मांडली. त्यावर गुरांच्या दवाखान्यांबाबत पाहणी करून लगेच निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
पुरेसे पैसे न मिळाल्याने जलजीवन मिशनची काही कामे अपूर्ण आहेत, मात्र आता ती प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. जेथील कामे ७५ टक्यांच्यावर पूर्ण झाली आहेत, तेथे तातडीने निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण केली जातील. अन्य ठिकाणची कामेही टप्प्यात पूर्ण केली जातील, असे याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांकडून होत असलेले नुकसान गंभीर आहे. त्यासाठी तार कुंपण योजना अधिक व्यापक करण्यात येईल. जंगलाला लागून असलेल्या शेतांना यात विशेष प्राधान्य देण्यात येईल. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यामधील गाळ काढून ती माती शेतीत टाकण्याची कामे हाती घेण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare #DiwaliWithFarmers #Diwali
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
📍नागपूर
राज्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी आज लोहारी सावंगा (ता.नरखेड, जि. नागपूर) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकऱ्यांनी संवाद साधतांना दुष्काळाच्या संकटातून बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त केला. गावातच रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्यांच्या घरी भरीत भाकरीचे जेवण करुन मुक्काम केला.
त्यांच्या आगमनानंतर महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेत त्यांनी सहभाग घेतला. रामभाऊ बालपांडे या शेतकऱ्याच्या घरी जेवण करुन दिवाळी सणानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या अडचणी, समस्या, दुःख जाणून घेतले. यावेळी शेतकऱ्यांनी मोकळेपणाने मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या.
शेतकरी पुरुषोत्तम वघाळे यांनी खोरी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर यासाठी मान्यता देण्यात आली असून लवकरच काम सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जगदीश देशमुख या शेतकऱ्याने ४३ वर्षांपूर्वी पायाभरणी झालेल्या पाझर तलावाची अडचण सोडवून तलाव पूर्ण करण्याची मागणी केल्यानंतर याबाबत आवश्यक कारवाई लवकरच करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी फाऊंडेशनचा युवा कार्यकर्ता जयंत चाफले यांनी जुन्या खोरी तलावाचे काम मार्गी लावल्याबद्दल आभार व्यक्त केले. राजेंद्र चाफले व तेजपाल चौधरी यांनी रोही, वाघ, रानडुकरांचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष तालुका स्तरावर देखील कक्ष सुरू करण्यात येत मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नागपूर जिल्ह्याच्या एका टोकावरील असलेल्या आमच्या गावास भेट दिल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आणि आत्मविश्वास दिला, अशी भावना व्यक्त करत गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राजू पोतदार, आमदार चरणसिंह ठाकूर, आमदार आशिष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी आमदार सुधाकर कोहळे, सरपंच विपीन चाफले आदी उपस्थित होते.
@Dev_Fadnavis @cbawankule
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोहारी सावंगा (ता.नरखेड) येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्काम केला होता. आज अरुणाबाई बालपांडे यांनी मुख्यमंत्री यांचे औक्षण केले.
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री @DRPANKAJBHOYAR यांनी #वर्धा तालुक्यातील #सालोड हिरापूर येथे शेतकऱ्यांसोबत #दिवाळी साजरी केली. माजी खासदार रामदास तडस, सरपंच अमोल कन्नाके, उपसरपंच आशिष कुचेवार, शेतकरी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या घरी आगमन झाले. कुटुंबातील सदस्यांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला..
@Dev_Fadnavis
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
📍 इटकी (ता. सांगोला, जि. सोलापूर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी इटकी येथील शेतकरी पोपट गोविंद सावंत यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत #दिवाळी साजरी केली.
यावेळी मंत्री भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ व आहेर देत शुभेच्छा दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंत यांच्या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या नावे १ हेक्टर २६ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रात मका व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली होती. पर्जन्यमानातील तुटवड्यामुळे मक्याचे ०.५० हेक्टर व बाजरीचे ०.५० हेक्टर असे एकूण १ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून शासन निर्णयानुसार त्यांच्या खात्यावर अग्रीम आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.
यावेळी मंत्री भोसले यांनी सावंत कुटुंबीयांशी संवाद साधून शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीबाबत माहिती घेतली.
@Dev_Fadnavis
@Shivendraraje11
#दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
📍 नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोहारी सावंगा येथील शेतकरी रामभाऊ बालपांडे यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त त्यांच्या कुटुंबियांसमवेत घरगुती भोजनाचा आनंद घेतला. सर्वांशी आपुलकीने संवाद साधला...
@Dev_Fadnavis
#लोहारीसावंगा #दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
📍अहिल्यानगर
कळसपिंपरी (ता. पाथर्डी )येथे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी स्वतःला एकटे समजू नये. राज्य शासन प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतकरी, पशुधन आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रशासनाने शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दुष्काळग्रस्त शेतकरी भीमसेन शंकर भवार यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस केली. कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ आणि कपडे देत त्यांना दिलासा दिला. पालकमंत्री डॉ. विखे पाटील आणि आमदार मोनिका राजळे यांनी भवार कुटुंबीयांसोबत जेवण करून दिवाळीचा आनंद साजरा केला. गावातील इतर कुटुंबीयांनाही दिवाळीचा फराळ आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले.
आगामी आठ ते नऊ महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री विखे पाटील यांनी दिले.
पशुसंवर्धन आणि कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीतून पशुधनाची संख्या तसेच उपलब्ध चाऱ्याचा आढावा घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे पशुधन सुरक्षित राहावे आणि चारा टंचाईचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
@Dev_Fadnavis @RVikhePatil
#दुष्काळ #शेतकरी #FarmerWelfare
#DiwaliWithFarmers #Diwali
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
राज्यात दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आता तालुकास्तरावरही स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या कक्षात स्वतंत्रपणे वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यविषयक सेवा प्रभावीपणे राबविता येणार आहेत.
दुष्काळग्रस्त भागातील गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची यंत्रणा आता थेट तालुका स्तरापर्यंत नेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. यासोबत जिल्हा व तालुकास्तरावर आरोग्यविषयक समन्वय समित्याही स्थापन होणार आहेत. हा तालुकास्तरावरील कक्ष केवळ खरीप हंगाम २०२६ मध्ये ट्रिगर-१ मधील दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या सर्व तालुक्यांत स्थापन करण्यात येणार आहे. या तालुक्यांतील नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात हा कक्ष सुरू होईल. जिल्हाधिकारी या कक्षात एका स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची कक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती करतील. त्यांच्या मदतीला लिपिक व टंकलेखक असतील, तर आवश्यक सुविधा गटविकास अधिकाऱ्यांनी प्राधान्याने पुरवायच्या आहेत.
तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष स्थानिक आमदार, तर उपविभागीय अधिकारी (महसूल) सहअध्यक्ष असतील. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, इंडियन मेडिकल असोसिएशन व केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी सदस्य असतील. कक्ष प्रमुख सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष पालकमंत्री, सहअध्यक्ष जिल्हाधिकारी, तर जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य सचिव असतील. तर, वैद्यकीय क्षेत्रातील दोन समाजसेवक अशासकीय सदस्य म्हणून या समितीचे काम पाहणार आहेत.
सविस्तर वृत्त : mahasamvad.in/220881/
#मुख्यमंत्रीसहायतानिधी
#CMRF
#कारंजा तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना धरती येथे चारा साक्षरता व संवर्धन अभियान राबविण्यात आले. शेतकऱ्यांना निकृष्ट चाऱ्यापासून सकस चारा कसा तयार करावा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
#वर्धा आरसेटीच्यावतीने १४ दिवसांचे कृत्रिम दागिने व ६ दिवसांचे मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण.
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह
११ ते १८ नोव्हेंबर २०२६ | राज्यभर विविध उपक्रम
#भगवानबिरसामुंडा
#आदिवासीविकास
#महाराष्ट्रशासन
#MahaDGIPR
#वर्धा दुष्काळी स्थितीमुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती. तालुका व जिल्हास्तरावर आतापर्यंत १,८८,१९७ खाती स्वीकृत करण्यात आली आहे. त्यापैकी १ लाख ५१ हजार खात्यांमध्ये प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे ७५.५० कोटी जमा करण्यात आले आहे.
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
राज्यातील भरती परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल शासनास सादर केला आहे.
राज्यातील विविध विभागांमधील विद्यार्थी व संबंधित हितधारकांशी केलेल्या सल्ला मसलतीदरम्यान प्राप्त मागण्या, सूचना व अभिप्रायांचा या अहवालात समावेश आहे. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या काही महत्त्वाच्या व तातडीच्या मुद्यांवर प्राधान्याने निर्णय घेणे आवश्यक असल्याने समितीने हा अहवाल शासनास सादर केला आहे.
@mpsc_office
#अहवाल #भरती #परीक्षा #महाराष्ट्रशासन #एमपीएसी
DISTRICT INFORMATION OFFICE, WARDHA retweeted
दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील ७५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पुढील दोन दिवसांत मदतीचे पैसे जमा होतील. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांना चारा, पिण्यासाठी पाणी व अन्य उपाययोजनाही शासन करीत आहे. आपण सर्वांनी एकजुटीने या दुष्काळाचा सामना करुया असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी केले आहे.
@makrandpatil99
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत #वर्धा जिल्ह्यातील अजून १२०६२ शेतकऱ्यांच्या खात्यात १२९.७५ कोटी जमा. आतापर्यंत ४४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४४१.८६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
#शेतकरीकर्जमुक्ती #शेतकरी #महाराष्ट्र



























