नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल, मा. व. ज. सं., महाराष्ट्र शासन.

Nanded, India
Joined July 2015
#नांदेड पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अपूर्ण पाणीपुरवठा योजना, शहरी व ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा आढावा घेतला.
1
4
469
यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
1
41
#नांदेड कीर्तनातून दुष्काळग्रस्त गावांत जनजागृतीचा जागर • पाणीबचत, पशुधन संवर्धन, शेतकरी कल्याण आणि सामाजिक सुधारणांसाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार
5
271
#नांदेड #चारा_मित्र संकल्पनेतून पशुधनासाठी चारा सुरक्षितता; पशुपालकांनी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
5
286
#नांदेड मुखेडमध्ये #सेवा_संकल्प_अभियान अंतर्गत समाधान शिबीर संपन्न शासनाच्या विविध सेवा नागरिकापर्यंत थेट पोहोचविण्याचा सेवा संकल्प अभियानाचा उद्देश
231
#नांदेड लिंगीत श्रमदानातून जलसंधारणाला बळ महिलांचा पुढाकार, #सेवा_संकल्प_अभियान अंतर्गत तीन तासात वनराई बंधाऱ्याची उभारणी
1
222
#नांदेड किनवट तालुक्यातील लिंगी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा; महिला शक्तीचा पुढाकार #सेवा_संकल्प_अभियान अंतर्गत तीन तास श्रमदान पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
2
290
District Information Office, Nanded retweeted
मतदार यादीत नाव नोंदणी १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरे #मतदारयादी #मतदारनोंदणी #MahaDGIPR
13
41
3,566
District Information Office, Nanded retweeted
आदिवासी कला-संस्कृतीचा जागतिक स्तरावर गौरव ‘शबरी नॅचरल्स’च्या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठेचा ‘गुड डिझाईन अवॉर्ड’ #आदिवासी #TribalEmpowerment #MahaDGIPR
5
10
1,921
District Information Office, Nanded retweeted
दुष्काळाच्या झळांनी होरपळणारा शेतकरी, महागाईमुळे आर्थिक ओढाताण सहन करणारा सर्वसामान्य नागरिक आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना होणारी दमछाक, अशा परिस्थितीत जनतेवर भाडेवाढीचा अतिरिक्त भार कशासाठी, असा सवाल उपस्थित करत परिवहन मंत्री तथा #एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिवाळीच्या गर्दीच्या हंगामासाठी एसटीची प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली. दरवर्षी दिवाळीच्या गर्दीच्या काळात एसटीच्या प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने मंत्री सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. एसटीच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य विसरणार नाही,’ या भूमिकेतून मंत्री सरनाईक यांनी प्रस्तावित भाडेवाढीला नकार देत सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. #दुष्काळ #Famerwelfare @PratapSarnaik @msrtcofficial
3
9
1
15
2,434
District Information Office, Nanded retweeted
#क्रीडा विभागामार्फत राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे. सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांसाठीच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज क्रीडा विभागाच्या "sports.maharashtra.gov.in" या अधिकृत संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. #राज्यक्रीडापुरस्कार
1
7
6
2,226
District Information Office, Nanded retweeted
राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना अखंडपणे डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग आणि #महाआयटी यांनी समन्वयाने काम करावे. ‘महाडीबीटी 2.0’, ‘मैत्री 2.0’ आणि ‘आपले सरकार 2.0’ या प्लॅटफॉर्मवरील सेवांचे २६ जानेवारी रोजी लोकार्पण करण्याच्या दृष्टीने सर्व प्रलंबित कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी डिजिटल सेवा वितरण अधिक सुलभ, प्रभावी आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर दिला. बाह्य पोर्टल्सचे एकात्मीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत, तर वापरकर्ता चाचण्या, क्षेत्रीय चाचण्या, अधिकारी प्रशिक्षण आणि नागरिक जागृतीची कामे १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तपासलेल्या १,२२२ सेवांपैकी ७२३ सेवांचे तर्कसंगतीकरण करण्यात आले असून, विविध महामंडळांच्या १३० योजना महाडीबीटी 2.0 वर आणण्यात येणार आहेत. तसेच, वसतिगृहांसाठी ‘महाहोस्टेल’ प्लॅटफॉर्म आणि शासकीय कंत्राटांसाठी ‘एक कंत्राटदार–एक ओळख क्रमांक’ ही व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे. राज्यातील सक्रिय सेवा केंद्रांपैकी १२ हजार ८२४ केंद्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. गुणवत्ता आणि नागरिकांचा अभिप्राय यांसारख्या निकषांवर केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येत असून, उत्कृष्ट ‘स्मार्ट’ सेवा केंद्रांचा २६ जानेवारी २०२७ रोजी गौरव करण्यात येणार आहे. डिजिटल सेवांचे यश केवळ तांत्रिक पूर्ततेत नसून नागरिकांना मिळणाऱ्या सुलभ सेवांमधून आणि त्यांच्या सकारात्मक अभिप्रायातून मोजले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. @Dev_Fadnavis @SunetraA_Pawar @ShelarAshish #आपलेसरकार #महाडीबीटी
3
6
1
22
5,945
#नांदेड दुष्काळी तालुक्यांच्या यादीत आणखी ३९ तालुक्यांचा समावेश राज्यातील एकूण ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड तालुक्याचाही समावेश #दुष्काळ #शेतकरी #Famerwelfare #MahaDGIPR
2
402
#नांदेड राज्यातील 304 तालुके दुष्काळग्रस्त घोषित-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड तालुक्याचाही समावेश
1
648
#नांदेड शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी पूर्वी 5 हजार रुपये जमा करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
326
#नांदेड जिल्ह्यातील 51 हजाराहून अधिक शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर ! शेतकरी कर्जमुक्ती योजना : जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 912 शेतकरी आधार प्रमाणिकरणासाठी पात्र #कर्जमुक्ती
242
#नांदेड किनवट तालुक्यातील लिंगी येथे लोकसहभागातून वनराई बंधारा; महिला शक्तीचा पुढाकार #सेवा_संकल्प_अभियान अंतर्गत तीन तास श्रमदान पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
201
#नांदेड #सेवा_संकल्प_अभियानातून योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत विविध प्रमाणपत्रांचे वितरण; 350 नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्य व सौरऊर्जा योजनांबाबत मार्गदर्शन
197
#नांदेड #सेवा_संकल्प_अभियानातून योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत विविध प्रमाणपत्रांचे वितरण; नागरिकांची आरोग्य तपासणी, आरोग्य व सौरऊर्जा योजनांबाबत मार्गदर्शन
173
चारा बियाणे/ठोंबे वाटपाच्या अटींमध्ये शिथिलता #दुष्काळ #शेतकरी #MahaDGIPR
3
385