हे चेंबर्स फुटलेले वाटत नाहीत तर ते जाणूनबुजून फोडलेले वाटत आहेत कारण फुटले तर थोडे भगदाड असते पण इथे ते फोडल्या सारखे दिसत आहे..
#पुणे
ड्रेनेजचे एक भगदाड दाखवले तर महापालिकेने एकच दुरुस्त करायचे काम हाती घेतले. स्वतःहून काहीच करायचे नाही. काल एरंडवणे येथे ग्राउंड रिपोर्ट करताना १०० मिटर अंतरात आणखी दोन- तीन भगदाड दिसले. हे मनपा अधिकाऱ्यांना दिसत नाहीत.
#pune #punenews
6
काही होत नाही जनता इलेक्शन येई पर्यंत झोपलेलीच असेल.. कितीही जागे करण्याचा प्रयत्न करा.. पण होणार काहीच नाही.. जे आपल्या हक्कासाठी लढु शकत नाहीत त्यांना सांगण्यात काही अर्थच नाही.. या महाराष्ट्राचे भले होवो हिच प्रार्थना..🤲
सरकार पिसाळलेल्यासारखं का करत आहे काय माहिती?
BJP महाराष्ट्राचा, पर्यावरण निसर्गाचा पूर्ण सत्यानाश करायचा प्रयत्न करत आहे
भीमाशंकर, सातारा वाई तारळी प्रकल्प, कोकण वाढवण बंदर आणि आत हा
चारही बाजूंनी लचका तोडून हळूहळू महाराष्ट्र देशोधडीला लावण्याच कटकारस्थान होत आहे
लक्षात घ्या
5
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे
पुणे महापालिकेच्या कारभाराचा अजब नमुना किरकटवाडी गावच्या हद्दीत पाहायला मिळत आहे. किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी बंद असलेली आणि आजपर्यंत प्रत्यक्ष वापरातच न आलेली ड्रेनेज लाईन अस्तित्वात आहे. विशेष म्हणजे या निरुपयोगी ड्रेनेज लाईनच्या चेंबर दुरुस्तीच्या नावाखाली पुणे महापालिकेत गावाचा समावेश झाल्यापासून सातत्याने लाखो रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. त्यामुळे वापरातच नसलेल्या ड्रेनेज लाईनच्या दुरुस्तीसाठी वारंवार निधी खर्च करण्यामागचे नेमके प्रयोजन काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या ड्रेनेज लाईनची रचना पाहता ती दोन्ही बाजूंनी बंद असल्याने तिचा प्रत्यक्ष वापर कसा होणार, हा मूलभूत प्रश्न आहे. असे असतानाही संबंधित चेंबरच्या दुरुस्तीची कामे वारंवार हाती घेतली जात आहेत. केवळ दुरुस्तीच्या नावाखाली निधी खर्च केला जात आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
निकृष्ट कामामुळे काही दिवसांतच जैसे थे परिस्थिती!
या दुरुस्तीच्या कामांच्या दर्जाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. चेंबर दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याने अवघ्या काही दिवसांतच त्याचे तुकडे होऊन पुन्हा पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली खर्च केला जातो. त्यामुळे कामाचा दर्जा, ठेकेदाराची जबाबदारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाणारी तपासणी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या पुन्हा दुरुस्तीचे काम सुरू!
सध्या याच ड्रेनेज लाईनच्या चेंबर दुरुस्तीचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. प्रत्यक्षात वापरात नसलेल्या ड्रेनेज लाईनवर वारंवार खर्च होत असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती नाही का? यापूर्वी केलेल्या कामांचा दर्जा तपासला जात नाही का? निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
पुणे महापालिका आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आतापर्यंत झालेल्या खर्चाची चौकशी करावी. ड्रेनेज लाईन प्रत्यक्षात वापरात आहे की नाही, दुरुस्तीची कामे कोणत्या निकषांवर मंजूर करण्यात आली, संबंधित कामांची बिले कोणत्या आधारावर अदा करण्यात आली आणि कामांचा दर्जा कोणी तपासला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अन्यथा सार्वजनिक निधीच्या अशा खर्चाला जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे. @navalMH @PMCPune @CMOMaharashtra
नक्कीच आवडेल आम्हाला ऐकायला
मी मला आवडलेल्या आणी मातीशी नाळ जोडलेल्या कवी कवियत्री यांच्या कविता 2 कडवी का होईना.घरच्या घरी मोबाइल वर व्हिडीओ करून तुमच्या समोर सादर करायचा विचार करतोय.ऑडिओ व्हिडीओ फॉरमॅट कदाचित टेक्निकली थोडा दर्जेदार नसेल पण
भावना समजवून घ्या
बहिणाबाई
बालकवी
ना धो महानोर
शांता शेळके
1
19
अजुन त्या ठिकाणी केबल टाकण्यासाठी चारही बाजूंनी खोदला आहे रस्ता त्या मुळ खड्डे पडलेत ४ दिवस झालेत तरी त्यावर काहीच कारवाई नाही..
#पुणे #सिंहगड रस्त्यावरील या खड्ड्यासाठी #पुणे महापालिकेला आणि पोलिसांना कोणता पुरस्कार देणार ?
#pune #punenews #punecity #pmcpune #punepolice
@CPPuneCity @navalMH
11
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
Jains: Feed every pigeon like it’s a saint.
Also Jains: Zero problem when lakhs of trees get chopped for their projects and businesses.
Pigeons get grain.
Forests get the axe.
Peak compassion.
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
देवेंद्र ला सत्तेची मस्ती
खंबीर वाटणारा पुरुष जेव्हा रडू लागतो काळीज पिळवटून निघते.
बाळासाहेब कदम यांच्या बद्दल बोल की काही लोकांना लयच झोंबत आहे. पण त्यांनी मतदार संघात असणे गरजेचं होतं.
देवेंद्र फडणवीस हा माणूस अण्णाजी पंत यांचा वारसा पुरेपूर चालवत आहेत का.?
#शक्तिपीठ_रद्द
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे धायरी
महापालिकेने सील केलेले RMC प्लांट पुन्हा सुरू झालेत.यापूर्वीही हे प्लांट सुरू असल्याची तक्रार केली,त्यावेळी मनपा प्रशासनाने पाहणी केली असता,प्लांट बंद असल्याचे सांगण्यात आले.आज पुन्हा एकदा प्लांट सुरू आहे. प्लांट सुरू असल्याचे तारीख व वेळेसह पुरावा उपलब्ध आहे
#Pune
बाबा त्यांनी गहाण केली मग तुम्ही काय करताय..तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्याशिवाय काय दिसत??
जनाब उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातील गुन्हेगारीच्या घटना ऐकल्या तर अंगावर काटा येईल…!
पत्रकार परिषद | गुरुवार दि. २६ नोव्हेंबर २०२६
#पत्रकार_परिषद #भाजपा #महाराष्ट्र #BJP
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@BJP4Maharashtra
1
18
अहो उपाध्ये बुवा मागच्या सत्ताकाळाची आठवण सारखी काढली तर तुम्ही काय केले त्याची जंत्री बाहेर येईलच की..पुलवामा , पहलगाम आहेच की..आपल्या बुडाखाली काय झाले त्याकडे पहा
ज्यांच्या सत्ताकाळात २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला झाला… मुंबईच्या रस्त्यांवर दहशतवादी खुलेआम गोळीबार करीत होते…
ज्यांच्या काळात मुंबईने वारंवार बॉम्बस्फोटांचे घाव सोसले…
ज्यांच्या काळात मुंबईवर अंडरवर्ल्डच्या टोळ्यांची दहशत होती…
त्याच कॅाग्रेस-शरद पवार यांना पुण्यातील घटनेवरून राज्याची कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली म्हणण, हा तर राजकीय दुटप्पीपणाचा कळसच…
पुण्यातील घटनेत पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक केली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी तातडीने कारवाई झाली.
पुण्याची घटना दुर्दैवीच पण ज्यांच्या काळात दहशतवाद आणि गुंडगिरीने मुंबईला वेठीस धरले, त्यांनी आज कायदा-सुव्यवस्थेवर बोलताना आधी स्वतःच्या सत्ताकाळातील इतिहासाचा आरसा पाहावा!
@Dev_Fadnavis
@RaviDadaChavan
#Mumbai #Pune #LawAndOrder #Maharashtra #BJP
He is responsible for the fate of #Pune
He must resign..
3
117
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे
पोलीस आयुक्तांना कोणीतरी सांगायला हवं की शस्त्र परवाना धारकांचे परवाने रद्द करुन पाठ थोपटून घेण्या पेक्षा अवैध शस्त्र, कोयता गॅंग यांच्यावर जरब बसविणे जास्त आवश्यक आहे. कोर्टापुढं हल्ले व्हायला लागले ! @CPPuneCity @PuneCityPolice @DGPMaharashtra @MahaDGIPR @CMOMaharashtra – at Pune, India
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात रोज ५००-६०० पोलिसांचा फौजफाटा असतो. तरीही ५-६ गुन्हेगार बंदुका घेऊन, कोयते घेऊन कोर्टाच्या आवारात येतात आणि एका व्यक्तीची हत्या करून पसार होतात. राज्याचे गृहखाते आमचे काहीही वाकडे करू शकत नाही हा विश्वास गुन्हेगारांच्या मनात पक्का झाला आहे.
गृहमंत्र्यांच्या निष्क्रियतेवर गुन्हेगारांचा असलेला हा विश्वास पुणेकरांसाठी मात्र घातक ठरत आहे. शहरात रोज गोळीबार, कोयत्याचे हल्ले घडत आहेत. शहरातील मोकळ्या जागांवर असलेला दारुड्यांचा, गर्दुल्ल्यांचा वावर रोखण्याची मोकळीक पोलिसांना नाही. एकूणच कायदा व सुव्यवस्था पुणे शहरात नावालाही शिल्लक राहिलेली नाही.
राज्याचे पार्टटाइम गृहमंत्री, फुलटाईम प्रचारमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस अमित शहांना ५००० पोलिसांचे संरक्षण पुरवू शकतात, त्यांच्या दौऱ्याच्या दिवशी तमाम पुणेकरांना वेठीस धरू शकतात, सामान्य पुणेकरांच्या रक्षणासाठी मात्र ते काहीही करू शकत नाहीत हे आता अनेकदा सिद्ध झाले आहे. पुणेकरांनो, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलं आहे. २४ तास राजकारण, राजकारणाची बेरीज - वजाबाकी आणि षडयंत्र एवढेच त्यांचे काम आहे. विचार करा, यापुढे किमान जनतेच्या जीवाची पर्वा असलेल्यांच्या हाती कारभार द्या ही नम्र विनंती.
त्या बिहारींची कशाला बदनामी करायची उगीच.. थांबायचे नाही आता
पत्रकारांनी बातम्या देताना दोन पाचकळ शब्द वापरणे आता बंद करा
महाराष्ट्राचा बिहार झाला
आणी
पुणे हादरले
नाशिक हादरले
नागपूर हादरले
काय कोणी कुठेच हदरत नाही .
महाराष्ट्र आता थाम्बणार नाही
महाराष्ट्र आता हदरत नाही .
उलट एक दिवसाआड कांड झाले नाही तर महारस्ट्रीयन लोक हदरतात🤦
1
31
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
भाजपला मतदान केलाय हिंदुत्वाच्या नावावर,
नी भाजपच जमीन घेते 🫡
काय मराठी माणसा? संपवल तुझ अस्तित्व फिरत बस आत्ता दारोदार प्रकल्पग्रस्त म्हणून,
लढायचं सोडल की असच होते.
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
#पुणे
श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी! खडकवासला, एनडीए गेट परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ नाही
आधार कार्ड, मोबाईल लिंकिंग आणि बँक खात्यांच्या अडचणींमुळे शेकडो महिला योजनेपासून वंचित; एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ खऱ्या गरजू महिलांपर्यंत पोहोचत आहे का, असा गंभीर प्रश्न खडकवासला आणि एनडीए गेट परिसरातील आदिवासी कातकरी महिलांची परिस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होत आहे. परिसरातील एकाही आदिवासी कातकरी महिलेला या योजनेचा लाभ मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे शासकीय नोकरदार आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांतील महिलांना योजनेचा लाभ मिळत असल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे अत्यंत गरजू असलेल्या कातकरी महिला मात्र शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. त्यामुळे 'श्रीमंत बहिणी तुपाशी, खऱ्या गरजू मात्र उपाशी!' अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
खडकवासला, एनडीए गेटसह हवेली तालुक्यातील विविध भागांत आदिवासी कातकरी समाजाच्या वस्त्या आहेत. या वस्त्यांमधील महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अडचणी सुटलेल्या नाहीत. अनेक महिलांकडे आधार कार्ड उपलब्ध नाही. काही महिलांचे आधार एनरोलमेंट झालेले असले तरी त्याला जोडलेला मोबाईल क्रमांक उपलब्ध नसल्याने किंवा आधार नोंदणीची पावती हरवल्याने पुढील प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्यातच अनेक महिलांकडे स्वतःचे बँक खाते नसल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.
विशेष म्हणजे, या महिला आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असून त्यांना शासनाच्या आर्थिक मदतीची सर्वाधिक गरज आहे. मात्र, मूलभूत कागदपत्रे आणि बँक खात्यांच्या अडचणी सोडवून देण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेकडो पात्र महिला योजनेच्या लाभापासून दूर राहिल्या आहेत.
दुसरीकडे, आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला योजनेचा लाभ घेत असल्याचा आरोप होत आहे. एवढेच नव्हे तर काही पुरुषांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेतल्याचेही समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणांची शासनाने स्वतंत्रपणे चौकशी करून अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करावी, अशी मागणी होत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
हवेली तालुक्यातील आदिवासी कातकरी नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याची जबाबदारी असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आदिवासी महिलांना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक लिंक करणे, बँक खाते उघडणे आणि शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात महिलांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची परिस्थिती आहे.
केवळ योजनांची घोषणा करून उपयोग नाही, तर त्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. आदिवासी कातकरी महिलांच्या समस्या सोडविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार बंद करण्याची मागणीही संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.
प्रशासनाला जाग कधी येणार?
आदिवासी कातकरी महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी खडकवासला आणि एनडीए गेट परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार कार्ड नसलेल्या महिलांची नोंदणी, आधारला मोबाईल क्रमांक जोडणे, बँक खाते उघडणे आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण करून देण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळेपर्यंत प्रशासनाने विशेष पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही केवळ कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी कातकरी महिलांना वंचित राहावे लागत असेल, तर ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. खऱ्या गरजू महिलांना न्याय मिळणार कधी आणि प्रशासनाला जाग येणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @Shivsenaofc @ShivSenaUBT_ @NCPspeaks @mnsadhikrut @INCMaharashtra @rautsanjay61 @uddhavthackeray @RajThackeray @supriya_sule @INCHarshsapkal @iambadasdanve @mohol_murlidhar
ॲड. सुनिल कोरपडे retweeted
भाऊ, प्रसिद्धीची हौस आहे ना?
आता महापालिकाच भागवणार!
अनधिकृत फ्लेक्स लावून पुणे विद्रूप करणाऱ्या भाऊ, दादा आणि साहेबांची नावानिशी आणि फ्लेक्सच्या संख्येसह जाहीर ‘गुणपत्रिका’ मांडण्याची कल्पना म्हणजे अस्सल पुणेरी तिरकसपणाचा उत्कृष्ट नमुना!
‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ या भन्नाट उपक्रमाबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे विशेष अभिनंदन!
बाकी, आपल्या अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याचा मोह आम्ही आवरला आहे.
@PMCPune @navalMH @prajytnair
bhauflexkadha.pmc.gov.in
























