प्रशासनाच्या इच्छाशक्तीने व्यवस्था कशी बदलू शकते याचे आदर्श उदाहरण म्हणजे पुणे जिल्हा परिषदेचा "पुणे मॉडेल स्कूल" हा अभिनव उपक्रम !
या उपक्रमाच्या माध्यमातून बारामती तालुक्यातील सोनवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अक्षरशः कायापालट झाला आहे. स्वच्छ व सुंदर परिसर, प्रशस्त क्रीडांगण, स्वच्छतागृह व पाण्याची उत्तम सोय, रोबोटिक्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण अशा विविध सुविधांनी विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दल मोठे आकर्षण निर्माण झाले आहे.
बदलाचा हा प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्वतः अनुभवू शकता!
#ceozp
#punezillaparishad
#MSPA2point0
@narendramodi
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@JoshiPralhad
@dadajibhuse
@Info_Pune
@gajananpatilIAS
@MahaDGIPR
124
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्था, विज्ञान-तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक एक्स्पोजर कार्यक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेले २५ विद्यार्थी आज अमेरिकेसाठी प्रस्थान करणार असून, १ डिसेंबर २०२६ रोजी भारतात परतणार आहेत. यंदाच्या उपक्रमासाठी तब्बल २०,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभागासाठी अर्ज केले होते. त्यामधून IUCAA (आयुका) या संस्थेने तीन टप्प्यांतील निवड प्रक्रियेद्वारे २५ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
या १० दिवसांच्या अमेरिकेतील शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी., ऑर्लॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को येथील नामांकित वैज्ञानिक, शैक्षणिक आणि तंत्रज्ञान संस्थांना भेट देणार आहेत.
वॉशिंग्टन डी.सी. येथे विद्यार्थी स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री (Smithsonian National Museum of Natural History), नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम (National Air and Space Museum) आणि नासाचे स्टीव्हन एफ. उद्वार-हॅझी सेंटर (Steven F. Udvar-Hazy Center) यांना भेट देणार आहेत.
ऑर्लॅंडो येथे नासाच्या केनेडी स्पेस सेंटर (NASA Kennedy Space Center), अंतराळवीर प्रशिक्षण केंद्र (Astronaut Training Centre) आणि एम्ब्री-रिडल एरोनॉटिकल युनिव्हर्सिटी (Embry-Riddle Aeronautical University) येथे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, एरोनॉटिक्स आणि अंतराळवीर प्रशिक्षण प्रक्रियेची माहिती मिळणार आहे. एम्ब्री-रिडल विद्यापीठात भारतीय वंशाचे तज्ज्ञ, विद्यार्थी आणि व्यावसायिक विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
सॅन फ्रान्सिस्को येथे विद्यार्थी कॅलिफोर्निया अकॅडमी ऑफ सायन्सेस (California Academy of Sciences), स्टॅनफोर्ड विद्यापीठ (Stanford University) आणि गुगल कॅम्पस (Google Campus) यांना भेट देणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे संशोधन, नवोन्मेष, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेची ओळख होणार आहे.
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
#nasa
@narendramodi
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@JoshiPralhad
@dadajibhuse
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
@IUCAAScipop
2
182
दिवंगत अजितदादा पवार यांचे अकाली निधन ही महाराष्ट्राची कधीही भरून न येणारी क्षती आहे. दादांचे नेतृत्व हे राजकारणातील युवा पिढीसाठी एक मार्गदर्शक असे विद्यापीठ ठरेल.
- मा.श्री. अमित शाह
केंद्रीय गृह व सहकार मंत्री
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
1
231
आपल्या सर्वांच्याच मनात स्व. अजितदादांच्या आठवणींचं काहूर आहे. आज महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना अजितदादांच्या नेतृत्वाची कमतरता प्रकर्षाने जाणवते !
- मा.श्री. देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
1
147
दिवंगत अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्यात घडवलेला विकास, उभ्या केलेल्या वस्तू आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यांचे हे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही.
- मा.श्री. एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
2
168
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुणे जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळ देण्यासाठी एकूण १३० आधुनिक प्रयोगशाळा तपासणी यंत्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. यात ३९ बायोकेमिस्ट्री ॲनालायझर, ९१ थ्री पार्ट हेमॅटोलॉजी ॲनालायझर या यंत्रांचा समावेश आहे.
या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे पुणे जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर आरोग्य संस्थांच्या प्रयोगशाळा तपासणी सुविधांना बळ मिळणार आहे. पुणे मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील आरोग्यवस्थेला आधुनिक रूप देण्याच्या प्रयत्नांना या माध्यमातून अधिक गती मिळणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील, मा. सभापती श्रीमती दिपाली दीपक हुलावळे, बांधकाम व आरोग्य समिती, मा. सभापती श्री. अमोल उल्हास नलावडे, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, मा. सभापती श्री. जितेंद्र बाळासाहेब बडेकर, समाज कल्याण समिती, मा. सभापती श्रीम. अंकिता हर्षवर्धन पाटील, महिला व बालकल्याण समिती, तसेच सभागृह नेते मा. श्री. श्रीमंत पोपट ढोले आणि जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य मा. श्री. शांताराम बाजीराव इंगवले, मा. श्री. मंगेश प्रतापराव जगताप, मा. श्रीमती रुपाली अमोल झेंडे, मा. श्रीमती सुनिता शरद बुट्टे पाटील, मा. श्रीमती रुपाली रमेश कोंडे, मा. श्रीमती मोनिका नवनाथ हरगुडे, मा. श्री. राजेंद्र पोपटराव गावडे, गटनेते मा. श्री. विजय शिंदे, मा.श्री. करण खलाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
1
146
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ आयोजित समस्या-आधारित शिक्षणावर (PBL) प्रादेशिक संशोधन परिसंवाद !
एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाच्यावतीने आयसर (IISER), पुणे येथील सी. व्ही. रामन सभागृहात समस्या-आधारित शिक्षण (Problem-Based Learning - PBL) या विषयावर प्रादेशिक संशोधन परिसंवादाचे (RRSPBL) आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी या परिसंवादात पुणे जिल्हा परिषद प्रशासनाचे प्रतिनिधित्व केले.
या परिसंवादात विविध पेपर आणि पोस्टर प्रेझेंटेशन, मुख्य व्याख्याने, कार्यशाळा आणि पॅनेल चर्चेद्वारे समस्या-आधारित शिक्षणावरील विविध दृष्टिकोनांवर चर्चा करण्यात आली. श्री. गजानन पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, जिल्हा परिषद पुणे नेहमीच शिक्षणातील नवनवीन उपक्रमांचे स्वागत करते. समस्या-आधारित शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असून, यामुळे विद्यार्थी पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष जीवनातील समस्यांवर उपाय शोधण्यास शिकतील. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य केले जाईल, असे त्यांनी आश्वासित केले.
यावेळी प्रख्यात शास्त्रज्ञ आणि अध्यक्ष, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, आयसर पुणे, डॉ. अरविंद नातू, राज्यमंत्री श्री. पंकज भोयर यांच्यासह राज्यातील शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
1
153
ज्या जिल्हा परिषदेवर आदरणीय दादांनी मनापासून प्रेम केलं, ज्या पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, त्याच जिल्हा परिषदेच्या प्रांगणात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे... ही भावना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे !
- श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री, पुणे जिल्हा
#ceozp
#punezillaparishad
#mspa2point0
#sunetrapawar
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@supriya_sule
@parthajitpawar
@MahaDGIPR
@Info_Pune
84
शिक्षण, आरोग्य, जलसंधारण, शेती व पशुसंवर्धन अशा सर्वच क्षेत्रांमध्ये स्व. अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याला प्रगतीपथावर नेलं.
- मा.श्री. वीरधवल जगदाळे
अध्यक्ष, पुणे जिल्हा परिषद
#ceozp
#punezillaparishad
#mspa2point0
@AmitShah
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@supriya_sule
@parthajitpawar
@VirdhavalJgdle
@Info_Pune
@MahaDGIPR
3
247
जनसेवेसाठी आजीवन योगदान देणाऱ्या लोकनेत्यांना पुणे जिल्हा परिषदेचे अभिवादन !
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@AmitShah
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@supriya_sule
@parthajitpawar
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
2
135
youtu.be/4ure-MXy9D8?si=gVvE…
अजितदादा पवार...
विकासासाठी समर्पित नेतृत्वाचे अतुलनीय योगदान !
ग्रामविकासासाठी जीवन समर्पित करणाऱ्या लोकनेत्यांना पुणे जिल्हा परिषदेचे अभिवादन !
स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या, विशेषतः पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी फार मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य, जलसंपदा, कृषी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना त्यांनी नेहमीच भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून पुणे जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्व. अजितदादा यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. या अनावरण कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या महान कार्याची महती सांगणारी चित्रफीतही दाखवण्यात आली.
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@AmitShah
@AmitShahOffice
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@parthajitpawar
@supriya_sule
@Jaykumar_Gore
@ChDadaPatil
@gajananpatilIAS
@VirdhavalJgdle
@VivekWalsePatil
164
विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणारा उपक्रम : ज्ञान सेतू
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक जाणीव आणि अनुभवाधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद, पुणे यांच्या वतीने विद्यार्थी आदान-प्रदान उपक्रम (Exchange Program) राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील परीक्षेद्वारे निवड झालेले ५१ गुणवंत विद्यार्थी आणि ९ शिक्षक जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांना भेट देणार आहेत. हे विद्यार्थी आज, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रेल्वेने पुण्यातून प्रस्थान करत आहेत. या अभ्यास दौऱ्यात पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी जम्मू काश्मीर, आसाम व अरुणाचल प्रदेश या राज्यांमधील शाळांना ५ दिवस भेट देणार आहेत. त्यानंतर २ दिवस स्थानिक भौगोलिक परिस्थिती, शेती, चहाचे मळे, महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
भारताची भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधता प्रत्यक्ष अनुभवणे, विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि ‘विविधतेत एकता’ या भारतीय मूल्याची जाणीव निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमासाठी विद्यार्थी रेल्वेने प्रवास करणार असून हा प्रवासदेखील त्यांच्या शैक्षणिक अनुभवाचा महत्त्वाचा भाग असणार आहे. महाराष्ट्रातून देशाच्या विविध भागांकडे जाताना विद्यार्थ्यांना बदलते भौगोलिक स्वरूप, निसर्ग, लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि प्रादेशिक परंपरा अनुभवता येतील. विद्यार्थ्यांना प्रवासातूनच भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्याची संकल्पना या उपक्रमामागे आहे.
परस्पर विद्यार्थी आदान-प्रदान या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जिल्हा परिषद, पुणे यांच्याकडून जम्मू-काश्मीर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातील यजमान शाळांमधील विद्यार्थ्यांनाही पुणे भेटीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रेल्वे मंत्रालयाने, पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बोगीची व्यवस्था उपलब्ध करून दिली. याबद्दल रेल्वे मंत्रालयाचे व केंद्रीय रेल्वे मंत्री मा.श्री. अश्विनी वैष्णव यांचे मनापासून आभार.
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
@AshwiniVaishnaw
@RailMinIndia
1
136
ग्रामविकासासाठी जीवन समर्पित करणाऱ्या लोकनेत्यांना पुणे जिल्हा परिषदेचे अभिवादन !
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा.श्री. अमित शाह यांच्या हस्ते अनावरण संपन्न झाले. यासोबतच पुणे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराचेही नामकरण संपन्न झाले.
स्व. अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या, विशेषतः पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी फार मोठे योगदान दिले. शिक्षण, आरोग्य, जलसंपदा, कृषी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल घडवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांना त्यांनी नेहमीच भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून पुणे जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीच्या आवारात स्व. अजितदादा यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला. या अनावरण कार्यक्रमात स्व. अजितदादा पवार यांच्या महान कार्याची महती सांगणारी चित्रफीतही दाखवण्यात आली, तसेच कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन करण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री मा.श्री. अमित शाह यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचे स्मरण करत ते केवळ आमचे मित्र नव्हते, तर विकासासाठी स्वतःला वाहून घेतलेले असे सहकारी होते अशी भावना व्यक्त केली. मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस यांनीही स्व. अजितदादा पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली याबद्दल आनंद व्यक्त करत त्यांच्या अकाली विरहाबद्दल दुःख व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी आपल्या मनोगतात स्व. अजितदादा पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. तसेच, पुणे जिल्हा परिषदेच्या कामगिरीचे कौतुक करत यापुढे हे कार्य अधिक जोमाने पुढे न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे यांनीही एक उत्तम प्रशासक, कठोर शासक व हळवे व्यक्तिमत्व म्हणून स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. जयकुमार गोरे, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, राज्यमंत्री श्री. योगेश कदम, खा.सौ. सुप्रिया सुळे, खा.श्री. पार्थ पवार, विधानसभा उपाध्यक्ष श्री. अण्णा बनसोडे, आ.श्री. दिलीप वळसे पाटील, आ. श्रीमती नीलम गोऱ्हे, आ.श्री. रविंद्र चव्हाण, आ.श्री. राहुल कुल, आ.श्री. शंकर मांडेकर, आ.श्री. बाबाजी काळे, आ.श्री. बापूसाहेब पठारे, महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, ग्रामविकास विभागाचे सचिव श्री. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
#ceozp
#punezhilhaparishad
#mspa2poijt0
@narendramodi
@AmitShah
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
2
229
लोकनेते अजितदादा पवार यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व प्रवेशद्वार नामकरण सोहळा -लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/2JQekroWW…
बालदिनाची विद्यार्थ्यांना अनोखी भेट...
ZP चे विद्यार्थी थेट राष्ट्रपती भवनात !
बालदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ५१ विद्यार्थ्यांना देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची भेट घेण्याची, त्यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. महामहीम राष्ट्रपती महोदयांनी या विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला व त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.
शिरूर तालुक्यातील कोयाळी पुनर्वसन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी ऋग्वेद गायकवाड याने राष्ट्रपती महोदयांसोबत संवाद साधताना "आपण पुन्हा विद्यार्थी झालात, तर काय शिकायला आवडेल ?" असा प्रश्न विचारला. यावर अगदी मनमोकळेपणाने उत्तर देत राष्ट्रपती महोदयांनी आपल्या बालपणी तंत्रज्ञानाच्या फारसा सुविधा नव्हत्या, त्यामुळे आज उपलब्ध असलेले आधुनिक तंत्रज्ञान शिकायला आवडेल असे उत्तर दिले.
यासोबतच विद्यार्थ्यांना जंतरमंतर, नेहरू तारांगण, नेहरू विज्ञान केंद्र, संसद भवन यांसारख्या महत्वाच्या ठिकाणीही भेट देण्याची संधी मिळाली. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळावी हाच या अभ्यास दौऱ्याचा मुख्य हेतू ठरला.
#ceozp
#punezillaparishad
#mspa2point0
@narendramodi
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@JoshiPralhad
@PralhadJoshiOfc
@dadajibhuse
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
1
2
340
आजची बालके हीच उद्याच्या सक्षम भारताचे आधारस्तंभ आहेत...
या बालकांना स्वप्न पाहण्याचा अवकाश देणे, पाहिलेले प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी बालकांना शारीरिक, मानसिक, शैक्षणिकदृष्ट्या बळ देणे हे पुणे जिल्हा परिषद प्रशासनाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी व भारताची सक्षम पिढी घडवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सदैव प्रयत्नशील आहे.
#राष्ट्रीय_बालदिन
#ceozp
#punezillaparishad
#mspa2point0
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
186
📍सांगवी, ता. बारामती
पुणे मॉडेल स्कूल : आधुनिक शिक्षण व्यवस्थेची क्रांती !
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात धावण्याची क्षमता मिळावी यासाठी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने "पुणे मॉडेल स्कूल" हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे.
या प्रकल्पांतर्गत बारामती तालुक्यातील सांगवी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा अक्षरशः कायापालट झाला. एका प्रकल्पाने घडवलेला हा बदल आपण स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतात !
#ceozp
#punezillaparishad
#mspa2point0
@narendramodi
@CMOMaharashtra
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@dadajibhuse
@JoshiPralhad
@gajananpatilIAS
@Info_Pune
@MahaDGIPR
1
243
































