PMC Care (@PMCPune) header
PMC Care (@PMCPune) profile picture

Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

Shivaji Nagar, Pune
Joined May 2015
Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)Photo by PMC Care (@PMCPune)
कल्याणकारी योजनांच्या मुदतवाढीबाबत जाहिर प्रकटन या योजनांचे अर्ज dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती दि. १ फेब्रुवारी २०२७ पर्यंत नागरिकांना उपलब्ध करण्यात येत असून ज्या नागरिकांना पुणे मनपाच्या योजनांचे लाभ घ्यावयाचे आहेत, त्यांनी योजनांसाठीची पात्रता तपासून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती भरावेत. अ.क्र. २५ ते २८ या योजनांची अंमलबजावणी क्षेत्रिय कार्यालयामार्फत केली जाईल. तसेच ज्या योजनांकरीता रक्कम रु.१ लाखाची उत्पन्न मर्यादा होती त्या योजनांना र.रु.२.५० लाखाची उत्पन्न मर्यादा करणेत आलेली आहे. या बाबतचा तपशील व अटी व शर्ती या पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क क्र. १८००१०३०२२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजिकच्या क्षेत्रिय कार्यालयात समुसंघटिकांशी संपर्क साधावा. · पीएमसी केअर ॲप डाउनलोड करा · नागरिक म्हणून नोंदणी करा · सेवा विभागात जा · योजना निवडा आणि अर्ज भरा नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WelfareSchemes #GovernmentSchemes #PMCDBTSchemes #DBTPMC #OnlineApplication #PublicWelfare #SocialWelfare #WelfareSchemeExtension #PuneCitizens #CitizenBenefits @MinistryWCD
1
1
285
पुणे शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत आज सकाळपासून विविध विभागांच्या संयुक्त पथकांमार्फत धडक कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण, बांधकाम, आकाशचिन्ह, आरोग्य व विद्युत विभागांच्या समन्वयाने शहरातील विविध ठिकाणी अनधिकृत पथारी, हातगाड्या, व्यावसायिक टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, जाहिरात फलक तसेच पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू आहे. कारवाईची प्रमुख ठिकाणे सिंहगड रोड : सकाळी ८ वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निष्कासन मोहीम सुरू. नगररोड-वाघोली : बकोरी रोड, वाघोली येथे दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांच्या संयुक्त पथकांमार्फत अतिक्रमण निष्कासन कारवाई. येरवडा-वडगाव शेरी : वाघोली-बकोरी फाटा परिसरात अतिक्रमण व बांधकाम विभागामार्फत कारवाई. नगर रोड : आठवडे बाजारातील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई. बालेवाडी : अनधिकृत व्यावसायिक टेम्पो जप्त. सिंहगड रोड : वीर बाजी पासलकर चौक व गंगा भाग्योदय परिसरात अतिक्रमण निष्कासन मोहीम. वारजे : आकाशचिन्ह विभागामार्फत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अनधिकृत फ्लेक्स, बोर्ड व बॅनर हटविण्याची कार्यवाही. कात्रज ते नवले ब्रिज : राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडची पाहणी करून अस्वच्छता करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई. पदपथावर साहित्य ठेवणाऱ्या मार्बल दुकानदारांवरही दंडात्मक कार्यवाही. औंध-बाणेर : पॅनकार्ड क्लब रोड येथे अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneMunicipalCorporation #PMC #PuneEncroachmentDrive #EncroachmentRemoval #AntiEncroachmentDrive #PuneCity #PuneUpdates #TrafficManagement
37
9
3
86
6,903
खिडकी उघडा हवेसाठी, कचऱ्यासाठी नाही! आपले शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. वाहनातून प्रवास करताना रस्त्यावर कचरा, प्लास्टिक किंवा खाद्यपदार्थांची पाकिटे फेकू नका. स्वच्छतेची सवय लावा, पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हातभार लावा! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #pmccare #SolidWasteManagement #WasteManagement #SwachhBharat #SwachhSurvekshan2025 #MajhiVasundhara #CleanCityGreenCity #DontLitter #StopLittering #CivicSense @SwachSurvekshan @SwachhBharatGov @majhivasundhara
257
स्वतःच्या मनाने औषधांचे प्रमाण कमी-जास्त करणे टाळा. जागतिक AMR जनजागृती सप्ताह २०२६ १८ ते २४ नोव्हेंबर २०२६ नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorldAMRWeek #WAAW2026 #AMRAwareness #AntimicrobialResistance #PreventAMRNow #OneHealthOneAction #AntibioticResistance #AntibioticAwareness #ResponsibleAntibioticUse #PublicHealth #HealthAwareness #pmccare @MoHFW_INDIA
1,748
अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी महापालिकेची धडक कारवाई सुरूच! शहरातील सार्वजनिक जागांचा सुयोग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी तसेच रस्ते, पदपथ आणि वाहतुकीचे मार्ग अडथळामुक्त ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेमार्फत अनधिकृत अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून संबंधित भागांमध्ये पाहणी करून अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे, सार्वजनिक जागा मोकळ्या करणे आणि शहरातील नागरी शिस्त व सुव्यवस्था राखण्यावर भर देण्यात येत आहे. कारवाई करण्यात आलेली क्षेत्रीय कार्यालये : 1. छत्रपती शिवाजीनगर – घोले रोड 2. वानवडी 3. वारजे – कर्वेनगर 4. औंध – बाणेर 5. कोंढवा – उंड्री स्वच्छ, सुरक्षित, सुव्यवस्थित आणि अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी पुणे महानगरपालिकेची ही मोहीम यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #pmccare #EncroachmentFreePune #EncroachmentAction #CivicDiscipline #PublicSpaces #CleanPune #BetterPune
12
3
7
62
6,457
पुणे महानगरपालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत अतिक्रमणे आणि नियमबाह्य बांधकामांविरोधात नियमित कारवाई करण्यात येत आहे. सार्वजनिक जागा मोकळ्या ठेवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ न देणे तसेच शहरातील नागरी सुव्यवस्था राखणे, या उद्देशाने संबंधित विभागांच्या समन्वयाने ही कारवाई राबविण्यात येत आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #PuneMunicipalCorporation #PMC #Pune #EncroachmentAction #CivicAction
34
9
5
99
6,299
येरवडा जेल परिसरातील जुना कचरा हटविण्याची मोहीम सुरू! पुणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत येरवडा जेल परिसरातील साचलेला जुना कचरा (Legacy Waste) हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २७ मेट्रिक टन जुना कचरा उचलण्यात आला आहे. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पुण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा सातत्यपूर्ण प्रयत्न! नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Pune #PMC #PuneMunicipalCorporation #SwachhPune #CleanPune #solidwastemanagement #LegacyWaste #SwachhBharat #CleanCityGreenCity @SwachhBharatGov @SwachSurvekshan @majhivasundhara
12
976
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे स्वतःहून बंद करू नका किंवा डोस बदलू नका जागतिक AMR जनजागृती सप्ताह २०२६ १८ ते २४ नोव्हेंबर २०२६ नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #WorldAMRWeek #WAAW2026 #AMRAwareness #AntimicrobialResistance #PreventAMRNow #OneHealthOneAction #AntibioticResistance #AntibioticAwareness #ResponsibleAntibioticUse #PublicHealth #HealthAwareness #pmccare @MoHFW_INDIA
1
1,495
मिशन: कचऱ्याचं वर्गीकरण नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #GTA6 #WasteSegregation #WasteManagement #स्वच्छपुणे #स्वच्छभारत #कचरावर्गीकरण #ओलासुकाकचरा #घनकचराव्यवस्थापन #स्वच्छसर्वेक्षण #CleanPune #CleanCityGreenCity #SustainablePune #ReduceReuseRecycle #PuneMunicipalCorporation #PMCCARE #PuneCity #SwachhBharatMission @SwachhBharatGov @SwachSurvekshan @majhivasundhara
3
4
1,640
आरोग्य, एकता आणि धावण्याचा नवा उत्साह! पुणे श्रमिक पत्रकार संघ आयोजित मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी marathon.patrakarbhavan.com या वेबसाईट ला भेट देऊन नाव नोंदणी करा. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Marathon #pune #PatrakarBhavan #PuneCity #Punekar
1
5
1,263
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६ दोन थेंब लसीचे, बालपण सुरक्षिततेचे! पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. दिनांक: रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ वेळ: सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.०० वयोगट: ० ते ५ वर्षे आपल्या बालकाने यापूर्वी नियमित लसीकरणांतर्गत पोलिओचे डोस घेतले असले तरी या विशेष मोहिमेत पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत. आपल्या जवळील पोलिओ लसीकरण केंद्रांची ठिकाणे आणि माहिती जाणून घेण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Polio #poliopulse #dobundzindagike #PMCCare #PuneCity @MoHFW_INDIA
1,421
कात्रज–कोंढवा रस्त्याच्या कामाला गती; भूसंपादन व विविध युटिलिटी स्थलांतराचा आढावा कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. ओमप्रकाश दिवटे यांनी आज प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान ग्रेड सेपरेटरचे काम, ८४ मीटर रस्त्यासाठी भूसंपादन, विद्युत पोल व जलवाहिन्यांचे स्थलांतर याबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश देण्यात आले. कामे वेगाने व समन्वयाने पूर्ण करण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ व वेगवान होण्यास मदत होणार आहे. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #Pune #PMC #PuneMunicipalCorporation #InfrastructureDevelopment #KatrajKondhwaRoad #RoadDevelopment #पुणेमहानगरपालिका
4
4
2
39
4,335
मा. केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यात जलसंधारण, नदी पुनरुज्जीवन व जलव्यवस्थापन प्रकल्पांचा आढावा सिंहगड येथील पुणे महानगरपालिकेच्या एसटीपी प्रकल्पाची पाहणी; विविध जलविषयक उपक्रमांचा आढावा मा. केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे येथे जलसंधारण, नदी, जलाशय व धरण व्यवस्थापन तसेच जलविषयक विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यादरम्यान मा. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, पुणे महानगरपालिका मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, मा. उपआयुक्त (विद्युत विभाग) श्रीमती मनीषा शेकटकर तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खडकवासला येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र (CWPRS) येथे आयोजित National Conference on Integrated River, Reservoir and Dam Systems या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नदी, जलाशय आणि धरण व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच जल संचय जन भागीदारी उपक्रमाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. त्यानंतर CWPRS येथे आयोजित तंत्रज्ञान व नवोपक्रम प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जलक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांची माहिती सादर करण्यात आली. दरम्यान, मा. केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली PARMM प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, कामकाजातील प्रगती आणि संबंधित विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मा. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, पुणे महानगरपालिकेच्या मा. महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे, पुणे महानगरपालिका मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर, उपआयुक्त (विद्युत विभाग) श्रीमती मनीषा शेकटकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या दौऱ्यादरम्यान पुणे महानगरपालिका मा. आयुक्त श्री. नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत सिंहगड परिसरातील पुणे महानगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची (STP Plant) पाहणी करण्यात आली. यावेळी मा. केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री. सी. आर. पाटील, मा. केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, मा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या पाहणीदरम्यान प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती घेण्यात आली. या संपूर्ण दौऱ्याच्या माध्यमातून जलसंधारण, जलव्यवस्थापन, नदी व धरण प्रणाली, आधुनिक तंत्रज्ञान आणि सांडपाणी प्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व आढावा घेण्यात आला. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #STP #WaterPurification #CWPRS #PARMM #PMCPune
1
1
16
2,323