माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) header
माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) profile picture

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

Mumbai, India
Joined February 2013
Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)Photo by माझी Mumbai, आपली BMC (@mybmc)
माझी Mumbai, आपली BMC retweeted
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत ७१९ आशा स्वयंसेविकांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये भाऊबीज भेट महापौर श्रीमती रितू तावडे यांचे निर्देश आशा स्वयंसेविका; आरोग्य स्वयंसेविका, बालवाडी शिक्षिका व मदतनिसांसह सर्व घटकांच्या कामाची बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दखल 🔷दीपावली २०२६ निमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतील आशा स्वयंसेविकांबाबत महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील १,४६१ आशा स्वयंसेविकांना पहिल्यांदाच प्रत्येकी ५,००० रुपये भाऊबीज भेट जाहीर केल्यानंतर, आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी कार्यरत असलेल्या ७१९ आशा स्वयंसेविकांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे मुंबईत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या एकूण २,१८० आशा स्वयंसेविकांना प्रथमच ५,००० रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान मिळणार आहे. 🔷प्रारंभी, महानगरपालिकेच्या १,४६१ आशा स्वयंसेविकांना भाऊबीज भेट जाहीर झाली होती. याच धर्तीवर मुंबईत तळागाळात आरोग्य सेवा देणाऱ्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानातील (NUHM) आशा स्वयंसेविका या लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्तिशः पुढाकार घेतला. त्यांनी प्रशासनाला निर्देश देत उर्वरित ७१९ आशा स्वयंसेविकांनाही समान न्याय मिळवून दिला आणि त्यांचा समावेश या सानुग्रह अनुदानात करून घेतला आहे. 🔷महानगरपालिकेचे नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणेच जनसामान्यांशी थेट जोडल्या गेलेल्या इतर सर्व घटकांच्या कामाचीही महानगरपालिकेने यथोचित दखल घेतली आहे. या निर्णयानुसार महानगरपालिकेतील २,३९३ सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना (CHV) प्रत्येकी १४,००० रुपये, तर २,३६० बालवाडी शिक्षिका आणि मदतनिसांना प्रत्येकी ७,००० रुपयांची भाऊबीज भेट दिली जाणार आहे. 🔷मुंबईकरांच्या आरोग्याची अहोरात्र काळजी घेणाऱ्या आशा व आरोग्य स्वयंसेविका आणि बालकांच्या शिक्षणाचा पाया रचणाऱ्या बालवाडी शिक्षिका-मदतनीस हे सर्व जण महानगरपालिकेच्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहेत, असे नमूद करून या सर्व भगिनींची दिवाळी आनंदाची व उत्साहाची व्हावी, याच उद्देशाने हा सर्वसमावेशक निर्णय घेण्यात आल्याचे महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्पष्ट केले आहे. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
1
2
6
1,796
🔷मुंबईच्या स्वच्छ हवेसाठी कटिबद्ध होऊया! धूळ रोखूया, प्रदूषण टाळूया! #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
13
21
33
15,053
🔷मुंबई मराठी साहित्य संघाचा ९१ वा वर्धापन दिन आणि 'वाचन प्रेरणा दिन' आज सायंकाळी मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना. भालेराव सभागृहात संपन्न झाला. 🔷या समारंभाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीमती रोहिणी हट्टंगडी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे या होत्या. 🔷या सोहळ्यात 'दिवाळी अंक प्रकाशन साहित्य विशेषांक' तसेच मुंबई मराठी साहित्य संघ प्रा. प्रतिभा सराफ संपादित 'मराठी ग़ज़ल : एक दृष्टिक्षेप या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी 'तेथे कर अपुले जुळती' हा विशेष कार्यक्रम पार पडला. या वेळी साहित्य संघाकडून विविध पुरस्कार वितरित करण्यात आले. 🔷मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, कोषाध्यक्ष श्री. आनंद बिर्जे, कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ, श्रीमती मंगल केंकरे, आदींसह साहित्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi @AshwiniBhide
6
19
41
7,692
🔹माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास मनाई आहे. 🔷माननीय न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूया आणि प्रदूषणमुक्त उत्सव साजरे करूया, असे आवाहन अभिनेत्री श्रीमती निशिगंधा वाड यांनी केले आहे. #MyBMCUpdates #EcoFriendlyDiwali #SayNoToCrackers #nishigandhawad #पर्यावरणपूरकदिवाळी @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @mybmcSWM @MumbaiPolice
50
31
10
61
18,917
🔷 मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 🔷 या मोहिमेअंतर्गत आज जोगेश्वरी- विक्रोळी जोड मार्गाच्या (JVLR) एकूण ११ किलोमीटर लांबीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये एकूण ८ टन धूळ आणि ३९.५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा (C&D Waste) संकलित करण्यात आला. 🔷 सदर मोहिमेसाठी ९५ मनुष्यबळ व ११ यंत्रसामग्री कार्यरत होती. यामध्ये २ जेसीबी, २ डंपर, १ मेकॅनिकल पॉवर स्वीपर, २ NCAP मेकॅनिकल पॉवर स्वीपर, ३ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर आणि १ डिव्हायडर क्लिनिंग संयंत्राचा समावेश होता. 🔷 मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व धूळमुक्त ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सातत्याने उपाययोजना सुरू आहेत. #MyBMC #BMC #स्वच्छमुंबई #JVLR #RoadCleaning #DustMitigation @mybmcSWM
12
29
2
86
20,194
🔹माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. 🔹माननीय न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत असतानाच वायू आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती माधुरी दीक्षित यांनी केले आहे. #MyBMCUpdates #EcoFriendlyDiwali #SayNoToCrackers #madhuridixit #पर्यावरणपूरकदिवाळी @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @MadhuriDixit
246
77
93
215
130,689
🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या वतीने आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा- २०२६’चा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते आणि उप महापौर श्री. संजय घाडी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्री. अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज थाटात आणि उत्साहात पार पडला. याप्रसंगी स्‍पर्धेदरम्‍यान सर्वोत्‍कृष्‍ट ठरलेल्‍या गणेश मंडळांसह सर्वोत्‍कृष्‍ट मूर्तिकार, सर्वोत्‍कृष्‍ट नेपथ्‍यकार यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. 🔷तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक गणेशमूर्ती विसर्जन स्थळ व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धा - २०२६ अंतर्गत प्रशासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचाऱयांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्‍या १२ विभाग कार्यालयांना (Ward Office) प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 🔷सभागृहनेते श्री. गणेश खणकर, शिवसेना गटनेते श्री. अमेय घोले, शिक्षण समिती अध्‍यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्‍यक्ष श्री. आकाश पुरोहित, उप आयुक्त (परिमंडळ - २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरुषोत्तम माळवदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, खाते प्रमुख तसेच अधिकारी व कर्मचाऱयांसह विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. #mybmcupdates @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
3
22
22
13,736
🔷 मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 🔷 या मोहिमेअंतर्गत आज सांताक्रूझ - चेंबूर जोड मार्गाच्या (SCLR) एकूण १.५ किलोमीटर लांबीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये एकूण ४०० किलो धूळ आणि २ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा (C&D Waste) संकलित करण्यात आला. 🔷 महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही स्वच्छता केली. #MyBMCUpdates @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha @MumbaiPolice
10
20
1
54
11,273
🔷As per the directives of the Hon’ble Bombay High Court, bursting of firecrackers on public roads, lanes and footpaths is strictly prohibited. 🔷In this regard, Indian cricketer Shri. Ajinkya Rahane has appealed to citizens to refrain from bursting firecrackers and help prevent noise pollution. @ajinkyarahane88 @CPCB_OFFICIAL @mpcb_official @EnvironmentMaha
23
52
2
92
25,868
🔷मुंबईतील वायू गुणवत्ता राखण्यासाठी तसेच रस्त्यांवरील धूळ आणि बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यामुळे (C&D Waste) होणाऱ्या प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक २८ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 🔷या मोहिमेत महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) १४६ रस्त्यांवर स्वच्छता करण्यात येत आहे. 🔷या अंतर्गत, आज एकूण २९ मार्गांवर सुमारे ६९.५५ किलोमीटर अंतर परिसरात स्वच्छता करण्यात आली. यामध्ये एकूण ३९.७५ टन धूळ आणि ११५ टन बांधकाम व पाडकाम राडारोडा (C&D Waste) संकलित करण्यात आला. 🔷यासाठी महानगरपालिकेचे ५४१ स्वच्छता कर्मचारी, ४७१ स्वयंसेवक अविरतपणे कार्यरत होते. तसेच, १८ जेसीबी, २० डंपर, २१ मल्टीपर्पज मस्टींग मशीन, २१ मेकॅनिकल पॉवर स्वीपर (MPS), ६ वॉक-बिहाइंड ई-स्वीपर, ६ डिव्हायडर क्लीनिंग मशीन आदी संयंत्रांचा यासाठी वापर करण्यात आला. #mybmcupdates
22
27
3
90
21,411
आशा स्वयंसेविकांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे महापौर श्रीमती रितू तावडे यांचे निर्देश 🔷बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याबाबत मुंबईच्या महापौर श्रीमती रितू राजेश तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांना लेखी निर्देश दिले आहेत. 🔷यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नमूद केले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सद्यस्थितीत एकूण १,४६१ आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. या स्वयंसेविका अत्यंत अल्प मानधनावर आरोग्य सेवा, लसीकरण मोहीम तसेच विविध शासकीय लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण व कष्टाचे काम अविरतपणे करत असतात. 🔷दीपावलीसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या सणाच्या काळातही सानुग्रह अनुदान देण्याबाबत या आशा स्वयंसेविकांचा विचार न होणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या सर्व आशा स्वयंसेविकांना दीपावली सणानिमित्त प्रत्येकी ५,००० (पाच हजार) रुपयांचे सानुग्रह अनुदान तत्काळ मंजूर करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. #mybmcupdates
2
17
31
15,624
बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे; महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या मध्यस्थीला यश 🔷राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत मे. डी. एस. एंटरप्रायझेस यांच्या कंत्राटाखाली कार्यरत बाह्यस्रोत आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन आज (दिनांक २९ ऑक्टोबर २०२६) सायंकाळपासून मागे घेण्यात आले आहे. आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज सायंकाळी सदिच्छा भेट घेतली आणि आंदोलन मागे घेत असल्याचे लेखी पत्र महापौरांना सुपूर्द केले. 🔷या शिष्टमंडळात स्वराज्य संघटनेचे युवक अध्यक्ष श्री. संतोष कदम, सचिव श्री. राहुल पाटील यांच्यासह श्री. गिरीश सुर्वे, श्री. परेश मेटकर, श्री. दीपक चव्हाण, श्री. प्रवीण चव्हाण, श्री. पंकज धाडवे, श्रीमती हर्षदा डुंबरे, श्रीमती प्रतीक्षा भागवत, श्रीमती रेश्मा कोचले आणि श्रीमती सुमन शिगवण आदी प्रतिनिधी उपस्थित होते. 🔷विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पासून हे आंदोलन सुरू होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणून घेत महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आंदोलनस्थळी थेट भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यानंतर महापौरांनी महानगरपालिका प्रशासनाला निर्देश देऊन मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. 🔷प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक पावले उचलत बाह्यस्रोत महिला कर्मचाऱ्यांच्या मातृत्वाच्या जबाबदाऱ्या आणि आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून त्यांना १८० दिवसांची सवेतन प्रसूती रजा मंजूर केली आहे. 🔷तसेच, या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाबाबतचा प्रस्ताव प्रमुख कामगार अधिकारी आणि वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे. वेतन विलंबाच्या तक्रारींवर संबंधित कंत्राटदार संस्थेवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. अशा समस्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी विशेष तक्रार निवारण समिती स्थापन करून कार्यवाही केली जाणार आहे. सद्यस्थितीत सप्टेंबर २०२६ पर्यंत या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. 🔷त्याचप्रमाणे, कोविड काळात मुंबईकरांसाठी आरोग्य सेवा देणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याकरिता 'एकवेळचे धोरण' आणि दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) या शासनस्तरावरील धोरणात्मक बाबी असल्याने, त्यासंदर्भात महानगरपालिकेकडून राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे या कर्मचाऱ्यांसमोर स्पष्ट करण्यात आले आहे. 🔷महापौरांची संवेदनशील मध्यस्थी आणि महानगरपालिका प्रशासनाने घेतलेले सकारात्मक निर्णय याबद्दल शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले. कर्मचारी प्रतिनिधींनी महापौर दालनात प्रत्यक्ष उपस्थित राहून महापौर श्रीमती रितू तावडे आणि महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानत आंदोलन मागे घेतल्याचे लेखी जाहीर केले. @CMOMaharashtra @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MPLodha @TawdeRitu @misanjayghadi
2
20
26
12,036