उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री @ChDadaPatil, सिम्बायोसिसचे
संस्थापक व अध्यक्ष डॉ. एस. बी. मुझुमदार आदी उपस्थित...१/३
#पुणे
1
304
शिक्षण हे नैतिक मुल्यांची जपणूक करणारे आणि समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणारे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी न करता समाजाच्या कल्याणासाठी आणि राष्ट्र उभारणीसाठी करावा- उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन..२/३
1
26
रब्बी हंगामात विहिरी, कॅनॉल, तलाव बोअरवेल या ठिकाणी पाणी उपलब्ध होऊ शकते अशा ठिकाणी ज्वारी पिकाची पेरणी केल्यानंतर त्यास २ ते ३ संरक्षित पाणी मिळाले तर ज्वारीचे धान्याचे उत्पादन होईल तसेच जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात कडबा उपलब्ध होईल.
#शेतकरी
#DroughtRelief
#Farmer
पुणे जिल्ह्यात कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३ तालुक्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा पोषण अभियान योजनेअंतर्गत ज्वारी पिकाच्या फुले यशोमती या वाणाचे १९ हजार ७५५ एकर क्षेत्रासाठी मोफत बियाणे पुरवठा.
#शेतकरी
#DroughtRelief
#Farmer
286
दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात ‘वॉटर कप’ स्पर्धा राबविण्याचे नियोजन.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलसंधारण आणि लोकसहभागाला मिळणार चालना.
सविस्तर वृत्त 👇
mahasamvad.in/222454/
#WaterConservation
#DroughtRelief
323
पुणे जिल्हा परिषदेचे २५ गुणवंत विद्यार्थी अमेरिकेतील नासा, स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि गुगल परिसराला देणार भेट.
२० हजार विद्यार्थ्यांमधून आयुका संस्थेच्या निवड प्रक्रियेद्वारे निवड; २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान अमेरिका शैक्षणिक दौरा.
@PuneZp
387
यशदा येथे 'विकसित महाराष्ट्र २०४७' च्या उभारणीत बालकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यस्तरीय 'बाल संसद २०२६'चे आयोजन.
बालसंसदेतील विद्यार्थ्यांनी मांडलेले प्रश्न संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवून सोडविणार–महिला व बालविकास मंत्री @iAditiTatkare
#विकसितमहाराष्ट्र
#बालहक्क
#बालसंसद
395
जलसंधारणातून भूजल समृद्धी आणि शाश्वत जलसुरक्षेचा संकल्प!
✅ जलसंधारणाच्या सर्वांगीण अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना.
#WaterConservation #JalyuktaShivar
#DroughtRelief
464
जलसंधारणासाठी महाराष्ट्राचा व्यापक कृती आराखडा.
▪️ दुष्काळमुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल.
#WaterConservation #JalyuktaShivar
#DroughtRelief
4
661
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ मध्ये कर्जमाफी, एकरकमी समझोता आणि प्रोत्साहन असे तीन घटक समाविष्ट.
#शेतकरीकर्जमाफी
#DroughtRelief
#Farmer
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता; पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध.
#पुणे जिल्ह्यातील १६ हजार १७९ शेतकरी एकरकमी कर्जफेड योजनेसाठी पात्र.
#शेतकरीकर्जमाफी
#DroughtRelief
#Farmer
449
दुष्काळग्रस्त भागातील गर्भवती महिलांच्या पोषणासाठी शासनाचे विविध उपक्रम
#दुष्काळ
#आरोग्य
#Healthcare
4
682
महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांचे विचार आणि कार्याचा प्रसार करण्यासाठी पुस्तके, पथनाट्य, नाटक, चित्रपट असे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
328
राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्पुरत्या तसेच बंद पडलेल्या नळयोजना सुरू करणे तसेच टँकर आणि बैलगाड्यांद्वारे पाणीपुरवठा करणे यासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना ४० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतच्या खर्चास मंजुरी देण्याचे अधिकार प्रदान.शासन निर्णय निर्गमित.
#DroughtRelief
सायबर गुन्हा किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास, तात्काळ १९३० या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवावी.
सतर्क रहा, सुरक्षित रहा.
#CyberAwareness
#CyberSecurity
419
अपवादात्मक प्रकरणांतील शेतकऱ्यांना फार्मर आयडीसाठी त्रिस्तरीय कार्यपद्धती निश्चित.
शासन परिपत्रक :
gr.maharashtra.gov.in/Site/U……
#शेतकरी
#फार्मरआयडी
#FarmerID
396
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्राच्या कामकाजाचा गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला आढावा.
झोपडपट्टीधारकांना मोफत घरांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी प्रशासन व विकसकांनी समन्वयाने काम करावे- राज्यमंत्री
@DRPANKAJBHOYAR
370
जलशक्ती अभियान (जलसंचय: जनभागिदारी ३.०) राबविण्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक. बैठकीस वर्षा शासकीय निवासस्थान येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुण्यातून केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी सहभागी झाले.
जलशक्ती अभियान (जलसंचय: जनभागिदारी ३.०) राबविण्याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. बैठकीस वर्षा शासकीय निवासस्थान येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर पुण्यातून केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी सहभागी झाले.
पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे, जुन्या जलसंधारण संरचनांचे पुनरुज्जीवन करणे आणि नव्या संरचनांची निर्मिती करणे, यासाठी राज्य शासनाने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. केंद्र सरकारच्या जलसंचय : जनभागीदारी अभियानांतर्गत राज्यात मे २०२७ पर्यंत ३४ लाख ८३ हजार ९४० भूजल पुनर्भरण संरचनांची निर्मिती पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि निश्चित उद्दिष्टानुसार काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री यांचे जल विषयक सल्लागार श्रीराम विदिरे, पाणी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव सचिव पराग जैन-नैनुटीया, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
🔵 एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासमोर दुष्काळाचे मोठे संकट निर्माण. राज्यातील सुमारे ९० टक्के भाग दुष्काळाच्या झळा सोसत असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता. या संकटाचे संधीत रूपांतर करण्याच्या दृष्टीने जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, तलावांची दुरुस्ती, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मितीवर विशेष भर देण्यात येत आहे.
🔵 राज्य शासनाची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना तिसऱ्या टप्प्यात राबविण्यात येणार असून, त्यासाठी १८ हजार गावांची निवड करण्यात आली. जलयुक्त शिवार ३.०, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मनरेगा तसेच इतर योजनांमधील निधी आणि कामांचे एकत्रिकरण करून जलसंधारणाची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील. या कामांचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन, मॅपिंग आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येईल.
🔵 जलसंधारणाच्या कामांसाठी ग्रामविकास, वन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, कृषी आणि पाणीपुरवठा विभागांची जबाबदारी निश्चित केली आहे. जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करावे. वन विभागामार्फत वनबंधारे आणि वनतळ्यांची निर्मिती, तर सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागामार्फत खासगी घरे तसेच शासकीय इमारतींवर छतावरील पावसाचे पाणी साठविण्याच्या (रूफटॉप रेनवॉटर हार्वेस्टिंग) उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. याशिवाय, पावसाळ्यात वाहणाऱ्या आणि उर्वरित काळात कोरड्या राहणाऱ्या ५० किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक लांबीच्या नद्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
🔵 दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान जलसंधारण संरचनांची दुरुस्ती, तलावांचे पुनरुज्जीवन, शेततळी आणि पुनर्भरण खड्ड्यांची निर्मिती यासाठी केंद्र सरकारकडे विशेष आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली आहे. राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून केंद्राने प्रचलित निकषांच्या पलीकडे जाऊन मदत करावी.
🔵 #जलजीवनमिशन ची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने एकत्रितपणे राज्यनिहाय अडचणींचा अभ्यास करून उपाययोजना निश्चित कराव्यात. यासाठी केंद्र व राज्य अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन निधी, संसाधने आणि कामांचे नियोजन करण्याची गरज.
🔵 जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीचाही उपयोग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. राज्यस्तरावर जलसंधारण पुरस्कार आणि स्पर्धांचे आयोजन करून गावांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण करणे आवश्यक आहे. यापूर्वी #जलयुक्तशिवार आणि #वॉटरकप सारख्या उपक्रमांमुळे गावागावांत मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग निर्माण झाला आहे. याच धर्तीवर जलसंचय अभियानातही लोकसहभाग वाढविण्यात येईल.
🔵 #जलसंचय अभियानांतर्गत निश्चित केलेली उद्दिष्टे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची राज्य शासनाची जबाबदारी असून, या कामांचा मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव आणि संबंधित विभागांच्या स्तरावर नियमित आढावा घेण्यात येईल.
०००
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गावाचे पाणी गावात आणि शेताचे पाणी शेतात अडविण्याच्या संकल्पनेतून जलसंधारणाची कामे लोकसहभागातून राबविण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामे करताना लोकसहभागाबरोबरच शास्त्रीय पद्धती आणि तांत्रिक मार्गदर्शनाला प्राधान्य द्यावे. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरात तसेच शेतात पाणी अडविण्यासाठी छोटे जलसंधारण काम केल्यास भूजलपातळीत मोठी वाढ होऊ शकते. जलसंधारणाची कामे करताना योग्य आराखडे, तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. यासाठी आयआयटीसारख्या संस्थांची मदत घेऊन पावसाचे पाणी अडवून त्याचा वर्षभर उपयोग होईल, अशी व्यवस्था करण्यात यावी. जलसंधारणाच्या कामात अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देऊन अंमलबजावणीतील अडचणी दूर कराव्यात - केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील
@CRPaatil @Dev_Fadnavis @dr_rajbhushan
#जलसंधारण
#पाणीअडवापाणीजिरवा
380






















