Chandrakant Patil (@ChDadaPatil) header
Chandrakant Patil (@ChDadaPatil) profile picture

Minister of Higher & Technical Education, Parliamentary Affairs - Govt Of Maharashtra | MLA Kothrud | BJP | RSS | Former President @bjp4maharastra

Maharashtra, India
Joined August 2014
Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)Photo by Chandrakant Patil (@ChDadaPatil)
निरागस हातांनी जपला सामाजिक बांधिलकीचा दिवा! कोथरुडमधील चिमुकल्यांसोबत आनंदाचे क्षण अन् त्यांच्या छोट्याशा पिगी बँकमधून दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मदतीचा मोठा हात! निरागस बालमनांनी दिलेल्या या दातृत्वाच्या शिकवणीने यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय झाली या प्रसंगीची खास क्षणचित्रे! #दिवाळीचा_आनंद #कोथरुड #दिवाळी२०२६ #Diwali @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
1
559
दिवाळीचा खरा आनंद… दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात! 🪔 दिवाळीचा सण केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न राहता समाजातील प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश घेऊन यावा, या भावनेतून यंदा कोथरुडमधील विविध वस्ती भागांतील कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. या भेटीदरम्यान नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. चिमुकल्यांना खेळणी आणि खाऊचे वाटप केले. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य आणि डोळ्यांतील आनंद हीच माझ्यासाठी दिवाळीची सर्वात मोठी भेट ठरली. या आनंदसोहळ्यात मनाला विशेष स्पर्श करून गेला तो काही चिमुकल्यांचा सेवाभावी पुढाकार! दुष्काळग्रस्त भागातील गरजू बांधवांना मदत करता यावी, यासाठी त्यांनी स्वतःच्या पिगी बँक माझ्याकडे सुपूर्द केल्या. स्वतःच्या छोट्या इच्छांपेक्षा दुसऱ्यांच्या गरजांना प्राधान्य देणाऱ्या या बालमनांचे मनापासून कौतुक वाटले. या चिमुकल्यांनी दिलेली मदत योग्य गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मी निश्चितच पार पाडेन. खऱ्या अर्थाने दिवाळीचा प्रकाश दिव्यांमध्ये नसतो, तर माणसामाणसांतील प्रेम, माणुसकी आणि मदतीच्या भावनेत असतो. या चिमुकल्यांनी आपल्या कृतीतून हाच सुंदर संदेश दिला. अशा निरागस हास्यात आणि निस्वार्थ भावनेतच दिवाळीचा खरा आनंद सामावलेला आहे! 📍१० नोव्हेंबर २०२६ | कोथरूड #दिवाळीचा_आनंद #दीपावली२०२६ #कोथरुड #kothrud #Diwali @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
2
3
17
1,013
भारतीय नेमबाजांची सुवर्णवेधी कामगिरी! 🇮🇳🥇 ISSF जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या ईशा सिंग, मनू भाकर आणि दिव्या सुबराजू यांचे मनःपूर्वक अभिनंदन! जिद्द, अचूकता आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर या तिन्ही खेळाडूंनी जागतिक व्यासपीठावर भारताचा अभिमान उंचावला आहे. या सुवर्णकन्यांना पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आणि उज्ज्वल क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #ISSFWorldChampionships #IndianShooting #TeamIndia #GoldMedal #ProudMoment @Media_SAI
3
3
557
करवीर नगरीची आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) च्या अध्यक्षपदी महायुतीचे राजेश पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! गोकुळच्या या सत्तासंघर्षात विरोधकांनी राजकीय द्वेषातून आमच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले. दिशाभूल करणारे दावे करून वातावरण दूषित करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, माझे सहकारी हसनजी मुश्रीफ आणि महायुतीच्या सर्व शिलेदारांनी या राजकीय आव्हानांना अत्यंत खंबीरपणे सामोरे जात विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला कृतीतून उत्तर दिले. कोल्हापूरच्या मातीचा गुणधर्मच स्वाभिमान आणि सत्याची कास धरण्याचा आहे. त्यामुळेच आमचा बळीराजा आणि दूध उत्पादक सभासद कोणत्याही चिखलफेकीला बळी पडला नाही. उलट, महायुतीवर ठाम विश्वास व्यक्त करून त्यांनी आपला कौल दिला. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि कोल्हापूरकरांच्या भक्कम पाठिंब्याने सहकारातील ही स्वाभिमानाची गाथा पुढे जात आहे. ‘गोकुळ’ ही केवळ दूध उत्पादक संस्था नसून कोल्हापूरच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळवून देणे, पारदर्शक कारभार सुनिश्चित करणे आणि गोकुळचा विस्तार अधिक व्यापक करून संस्थेला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणे, हा हसनजी मुश्रीफ यांच्यासह आम्हा सर्वांचा संकल्प आहे. या संपूर्ण वाटचालीत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! राजेशजी, आपल्या नेतृत्वात गोकुळ दूध संघ विकासाचे नवे टप्पे गाठेल आणि दूध उत्पादकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! #GokulDairy #Kolhapur #Mahayuti #Sahakar #सहकार #कोल्हापूर @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra @mrhasanmushrif #RajeshPatil
73
10
3
96
19,452
कोल्हापूर येथे आयोजित सभेस उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना… 📍१० नोव्हेंबर २०२६ | कोल्हापूर #कोल्हापूर #भाजपा_महायुती #BJP @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
73
21
6
170
35,584
गोवर्धन पूजा के पावन पर्व की आप सभी को हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। भगवान श्रीकृष्ण की असीम कृपा से सभी के जीवन में सुख-समृद्धि, खुशहाली एवं शांति बनी रहे। #GovardhanPuja #गोवर्धनपूजा
1
9
13
9,631
राष्ट्रहित, स्वदेशी विचार आणि श्रमिक कल्याण यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि स्वदेशी जागरण मंचाचे संस्थापक श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! राष्ट्रप्रथम हा विचार, स्वदेशीचा आग्रह आणि समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठीची त्यांची निष्ठा आजही असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे विचार, कार्य आणि राष्ट्रसेवेचा आदर्श सदैव मार्गदर्शक ठरत राहील. #DattopantThengadi #दत्तोपंतठेंगडी
2
9
14
9,531
जागतिक विकास व शांततेच्या प्रक्रियेस हातभार लावणाऱ्या सर्व वैज्ञानिकांना जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! आजच्या दिनी नव्या पिढीमध्ये विज्ञानाप्रती आवड निर्माण करूया आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरत देशाला प्रगत राष्ट्र बनवण्याचा निर्धार करूया. #WorldScienceDay #जागतिकविज्ञानदिन
10
17
8,414
ऐतिहासिक प्रतापगड युद्धातील विजय, अद्वितीय पराक्रम आणि अफाट शौर्याचे प्रतीक असलेल्या शिवप्रताप दिनानिमित्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी वंदन! 🚩 #शिवप्रतापदिन #छत्रपतीशिवाजीमहाराज #ShivajiMaharaj #ShivPratapDin
2
12
26
7,555
नात्यांमधील स्नेह अधिक दृढ करणारा, सुख-समृद्धीची नवी पहाट घेऊन येणारा दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेचा सण सर्वांसाठी आनंददायी आणि मंगलमय ठरो! दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💐 #dipavali #दिवाळी२०२६ #दीपावली_पाडवा #बलिप्रतिपदा
2
10
24
9,790
१०० ग्रँडमास्टर्सचा टप्पा… भारताच्या बुद्धिबळ प्रवासातील सुवर्णक्षण! 🇮🇳 फिलिपिन्स येथे पार पडलेल्या ७व्या ‘आसियान प्लस इंडिव्हिज्युअल ओपन बुद्धिबळ स्पर्धेत’ उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा १००वा ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान पटकावणाऱ्या अनुज श्रीवास्तव यांचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी आपल्या कौशल्याच्या, जिद्दीच्या आणि अथक मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे यश भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणारे आहे. अनुज यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या यशाची घोडदौड अशीच सुरू राहो आणि जागतिक स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकत राहो! #AnujSrivastava #100thGrandmaster #IndianChess #ChessChampion #ProudMoment @Media_SAI
9
12
10,603
शेतकऱ्यांसोबत दिवाळी! 📍९ नोव्हेंबर २०२६ | सांगली #Sangli #शेतकरी #Maharashtra #दिवाळी२०२६ @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
1
9
13
9,725
शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत, त्यांच्यासोबत साजरी केली दिवाळी! 🪔 मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनुसार आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला भेट देऊन शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. संकटाच्या काळात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांवर अग्रीम मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलावा, त्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी, यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्या प्रत्येक अडचणीत सरकार त्यांच्या सोबत आहे, हा विश्वास यानिमित्ताने दिला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. 📍९ नोव्हेंबर २०२६ | सांगली #Sangli #Jat #शेतकरी #शेतकरीहित #Maharashtra #दिवाळी२०२६ @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
2
9
29
9,342
युवा खेळाडूंच्या जिद्दीला आणि कर्तृत्वाला मिळालेली जागतिक स्तरावरील दाद! 🇮🇳🥉 ठाण्याची युवा धावपटू शौर्या अविनाश अंबुरे हिने 'डकार २०२६ युथ ऑलिम्पिक गेम्स'मध्ये १०० मीटर हर्डल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत भारतीय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. युथ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू ठरली आहे. शौर्याच्या या ऐतिहासिक यशाने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. शौर्या, तुझ्या या देदीप्यमान यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! तुझ्या कर्तृत्वाची भरारी अशीच जागतिक स्तरावर उंचावत राहो! 🇮🇳 #YouthOlympics2026 #Dakar2026 #ProudIndian #IndianAthletics @Media_SAI
9
13
9,253
भारतीय जलतरण क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण! 🇮🇳🥉 सेनेगल येथे पार पडलेल्या 'डकार युथ ऑलिम्पिक गेम्स २०२६' मध्ये अवघ्या १७ वर्षांच्या तीर्थंक पेगु याने २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला आहे. विशेष म्हणजे, युथ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष जलतरणपटू ठरला आहे. त्याची ही ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रीडा क्षेत्रातील नव्या क्षमतांची साक्ष देणारी आहे. तीर्थंक, तुझ्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! तुझ्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #DakarYouthOlympics2026 #TirthankPegu #ProudMoment #IndianSwimming #YouthOlympics @Media_SAI
9
10
5,908
केंद्रीय सहकार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधरजी मोहोळ यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आई अंबाबाईची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुम्हाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना! #मुरलीधर_मोहोळ #MurlidharMohol @mohol_murlidhar @BJP4Maharashtra
1
9
1
15
12,230
स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! स्त्रीशिक्षणाचा दीप प्रज्वलित करून त्यांनी भारतीय समाजाला नवी दिशा दिली. त्यांचे कार्य आजही सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणादायी आहे. #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे #पुण्यतिथी #MaharshiKarve
1
9
18
8,469
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांसोबत दीपावली साजरी करण्याचा हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमान आणि प्रेरणेचा आहे! 🪔🇮🇳 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी स्वतः जवानांमध्ये जाऊन त्यांच्यासोबत दीपावलीचा आनंद साजरा करतात, ही बाब सैनिकांप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा, आदर आणि कृतज्ञतेची भावना अधोरेखित करते. आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या प्रत्येक वीर जवानाला दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले शौर्य, समर्पण आणि त्याग यांना कोटी कोटी सलाम! जय हिंद! 🇮🇳 #HappyDiwali #IndianArmy #NarendraModi #JaiHind @BJP4India @narendramodi @NitinNabin @AmitShah @blsanthosh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
9
12
10,613
आशेचा दिवा तेवूया, दुष्काळातही आनंद वाटूया..! महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळामुळे पाणी व चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांचे मनोधैर्य वाढवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. ​त्यामुळे यंदाच्या दिवाळीत दुष्काळग्रस्त कुटुंबांना शक्य तेवढी मदत करूया आणि त्यांच्याही दारात आनंदाचा दीप उजळवूया! ​#Diwali2026 #MaharashtraDrought #FarmerSupport #CommunityCare #FestiveSolidarity @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @BJP4Maharashtra
9
13
10,610